हितगुज दिवाळी अंक २०१४ प्रकाशन

Submitted by संपादक on 24 October, 2014 - 02:42

नमस्कार रसिकहो,

दीपावलीच्या या मंगलप्रसंगी 'हितगुज दिवाळी अंक २०१४' आपल्या हाती देताना आम्हांला अतिशय आनंद होत आहे.

देशोदेशी विखुरलेल्या आपल्यासारख्या मायबोलीकरांच्या उत्साहपूर्ण सहकार्याने व सहयोगानेच हे कार्य पूर्ण होऊ शकले आहे. आपला प्रेमळ जिव्हाळा आणि भरघोस प्रतिसाद या दिवाळी अंकालाही लाभो!

वैविध्यपूर्ण साहित्याचा हा रुचकर फराळ कसा वाटतो ते अभिप्रायाच्या पानावर जरूर नोंदवा.

ही दिवाळी आपणा सर्वांना आरोग्यदायी, आनंदाची व समाधानाची जावो.

सस्नेह,

संपादक मंडळ
हितगुज दिवाळी अंक २०१४

*** मुखपृष्ठावरून पुढे जाता न आल्यास इथे टिचकी मारा. हितगुज दिवाळी अंकाचा संपूर्ण आनंद लुटण्यासाठी कृपया आपल्या ब्राउझरची नवी आवृत्ती संगणकावर उतरवून घ्या. ***

विषय: 

अरे वा!!!!! अंक आला!!!! अंक आला!!!!!

आता वाचते Happy

धन्यवाद Happy हॅप्प्प्प्प्पी दिवाळी....

अभिनंदन,
नेहमीप्रमाणेच दर्जेदार दिवाळी अंक, आणि तोही वेळेवर प्रकाशित केल्याबद्दल.
वाचायला घेतोच.

मी पाहिला अंक . फोनवरून दिसत नाही म्हणून पीसी वरुन चाळला . अतिशय देखणा , सुरेख अंक ! डिझाईन , रंगसंगती , नाविन्यता , कल्पकता याबातित पैकिच्या पैकी मार्क्स . कटेंटही जबरी आहे.
पुढच्या संपादक मंडळाला सॉलिड आव्हान आहे.
सर्व संपादक मंडळाच मन:पूर्वक अभिनंदन. चार महिन्याची तुम्हा सर्वाची मेहनत खरोखर रंग लायी है .

अरे वा! अभिनंदन..
मस्त दिसतोय अंक.. कलाकुसर भारीयं..

मायबोली मुखपृष्ठावर हितगूज दिवाळी अंक टाका की राव! >> +१

वेका.. येतय की जाता IPAD वरून पुढे (आयपॅड २, IOS 8) .. कुठेही क्लिक कर.. फ्लॅश प्लेयर अर्थातच लोड होत नाहीत तिथे. पण पुढची पानं अ‍ॅक्सेस करता येत आहेत.

नमस्कार मायबोलीकर,

आपल्या सोयीसाठी लेखकांच्या नावासहित अनुक्रमणिकेचा दुवा 'संपादकीय' या पानावर सगळ्यांत शेवटी दिला आहे. सहकार्याबद्दल आभारी आहोत.

सस्नेह,
संपादक मंडळ
हितगुक दिवाळी अंक २०१४

>>IPAD वरून पहिल्या पानापुढे जाता येत नाही. त्या गूढ मार्गाची उकल होईल का ? <<
आय्फोन, आयपॅड (आयोएस ८.१) वर उत्तम नेविगेट करता येतंय. गुड जॉब!

ओह ओके. आता आलं. सकाळी तो मायबोलीचा लोगो दिसत नव्हता पहिल्या पानावर. आता त्यावर क्लिक करता येतं. चला विकेंड्स वाचनाची सोय झाली. गुड जॉब Happy

नमस्कार!

वाचकांचा वावर आणि अंकाचे वाचन हे सुलभ व्हावे, या हेतूने अंकात काही बदल केले आहेत -

१. स्मार्टफोनवरून मेन्यू दिसत नसल्याने अनुक्रमणिकेचे पान संपादकीय पानाच्या शेवटी दिले आहे.
२. अनुक्रमणिकेत लेखक/कवींची नावं साहित्यप्रकारासमोर दिली आहेत.
३. पानाच्या उजव्या बाजूस जी झलक आहे, तीत प्रत्येक साहित्याचे दुवे दिले आहेत.
४. मुख्य पानावरील अ‍ॅनिमेशन कमी केले आहे.
५. पानांच्या डोक्यावरील स्लायडरची उंची कमी केली आहे. तिथली चित्रे बदलून मोकळी जागा जास्त असणारी नवी चित्रे टाकली आहेत, जेणेकरून बदललेल्या चित्रांमुळे वाचनात व्यत्यय येऊ नये.
६. आधी असलेल्या स्लायडरमधली चित्रे 'कलादालन' या खास विभागात बघता येतील.
७. कवितांची आणि गझलांची ध्वनिमुद्रणे दृक्‌श्राव्य विभागात स्वतंत्र पानांवर दिली आहेत.

काही बदल तांत्रिक अडचणींमुळे करता आले नाहीत. ते पुढीलप्रमाणे -

१. दिवाळी अंकास पहिल्यांदा भेट दिली असता प्रतिसाद देण्यासाठी पुन्हा लॉगिन करावे लागते, याचे कारण म्हणजे दिवाळी अंक द्रुपल ७वर आधारित आहे, तर मायबोली अजूनही द्रुपल ६ वापरते.
२. प्रतिसाद संपादित केला असता तिथे देवनागरी लिहिता येत नाही. हा द्रुपल ७ इन्स्टॉल केल्यावर आलेला प्रश्न आहे ज्यावर मायबोली प्रशासन तोडगा शोधत आहे.
३. दिवाळी अंकातील नवीन लेखनाचे पान मुख्य मायबोलीत दिसत नाही, कारण दिवाळी अंक हा 'विशेष' डोमेनवर असतो, तर 'मायबोली' ही मायबोली डोमेनवर असते. त्यासाठीच 'अभिप्राय' हा धागा मुख्य मायबोलीत काढलेला असतो.
४. स्मार्ट फोनवर मेन्यू दिसत नाही, कारण तिथे मर्यादित मोबाइल आवृत्ती दिसते.
५. मेंडकेचा सल्ला आणि हास्यावली या दोन सदरांवर पानांना क्रमांक घालण्यासाठी जे तंत्र वापरले आहे त्यामुळे प्रतिसाद देण्याची सोय करता येत नाही. ही सुद्धा मायबोलीची तांत्रिक अडचण आहे.
६. अंकासाठी फाँटचा आकार अथवा वजन कमी-जास्त केलेले नाही. फाँट खूप लहान वाटत असल्यास ब्राउझरची फाँट साइझ वाढवून बघावी.

प्रतिसादावर प्रतिसाद देता येणे, प्रतिसादातले काही शब्द प्रतिसादाच्या वर मोठ्या आकारात दिसणे ही द्रुपल ७ची फीचर्स आहेत, तांत्रिक चुका नाहीत.

तुम्हां सर्वांच्या अभिप्रायांबद्दल आम्ही आभारी आहोत. आपल्या सोयीसाठी प्रकाशन झाल्यावर अंकाचे दृश्यस्वरूप शक्य तेवढ्या तत्परतेने बदलण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. सर्वच सूचनांची अंमलबजावणी करणे तांत्रिकदृष्ट्या शक्य झाले नाही, त्याबद्दल दिलगीर आहोत. यापुढे मात्र आपण आपले म्हणणे 'हितगुज दिवाळी अंक, अनुभव, अपेक्षा, सूचना' या धाग्यावर अवश्य नोंदवून ठेवा.

...तर मंडळी, याबरोबरच आम्ही संपादकपदाचे झगे उतरवून ठेवत आहोत. मायबोलीवर आपली भेट होत राहीलच.

धन्यवाद!

संपादक मंडळ,
हितगुज दिवाळी अंक २०१४

.

मृदुला, दिवाळी अंक विशेष डोमेनवर आहे आणि बहुतेक विशेष डोमेनच्या डागडुजीचे काम चालू आहे सध्या.

धन्यवाद वेबमस्तर!
तांत्रिक अडचण दूर होऊन दिवाळी अंक पुन्हा दिसायला लागला की कृपया येथे सांगणार का?

विशेष डोमेन म्हणजे त्यात नवे-जुने अंक, त्या डोमेनवर होस्ट केलेले आणखी काही उपक्रम असतील तर ते असं सगळंच.

Pages