हितगुज दिवाळी अंक २०१४ प्रकाशन

Submitted by संपादक on 24 October, 2014 - 02:42

नमस्कार रसिकहो,

दीपावलीच्या या मंगलप्रसंगी 'हितगुज दिवाळी अंक २०१४' आपल्या हाती देताना आम्हांला अतिशय आनंद होत आहे.

देशोदेशी विखुरलेल्या आपल्यासारख्या मायबोलीकरांच्या उत्साहपूर्ण सहकार्याने व सहयोगानेच हे कार्य पूर्ण होऊ शकले आहे. आपला प्रेमळ जिव्हाळा आणि भरघोस प्रतिसाद या दिवाळी अंकालाही लाभो!

वैविध्यपूर्ण साहित्याचा हा रुचकर फराळ कसा वाटतो ते अभिप्रायाच्या पानावर जरूर नोंदवा.

ही दिवाळी आपणा सर्वांना आरोग्यदायी, आनंदाची व समाधानाची जावो.

सस्नेह,

संपादक मंडळ
हितगुज दिवाळी अंक २०१४

*** मुखपृष्ठावरून पुढे जाता न आल्यास इथे टिचकी मारा. हितगुज दिवाळी अंकाचा संपूर्ण आनंद लुटण्यासाठी कृपया आपल्या ब्राउझरची नवी आवृत्ती संगणकावर उतरवून घ्या. ***

विषय: 

विशेष डोमेन आणि दिवाळी अंक २०१४ पुन्हा कार्यरत झाले आहेत. इतर जुन्या दिवाळी अंकांचेही उर्ध्वश्रेणीकरण (upgrade) चालू आहे. ते झाले की तेही अंक दिसू लागतील.

Pages