शिवसेना आणि भाजप युती नक्की कोणामुळे तुटली?

Submitted by राज्याभाउ on 22 October, 2014 - 15:30

शिवसेना भाजप युती ही २५ वर्ष अभेद्द होती. पण ती या नीवडणुकीत तुटली. चला कारण शोधुया

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अंबानी-अडानी-मंगलप्रभात लोढा ही नावं महाराष्ट्राच्या राजकारणातल्या कुठल्याही चर्चेत घेतली गेली नाहीत तर चर्चा अपूर्ण राहील Happy

हा विषय संपला आहे. खाते वाटपाचा फॉर्म्युला तयार होत आहे. भाजप - सेना यांचे सरकार येणार आहे.

ज्यांनी युती तुटावी म्हणुन प्रयत्न केले आणि भाजप आपल्या नियंत्रणाखाली रहावा म्हणुन बिनशर्त पाठिंबा दिला त्यांना काँग्रेसने आणि शिवसेनेने सुध्दा तोंडावर पाडले.

हा विषय संपला आहे. खाते वाटपाचा फॉर्म्युला तयार होत आहे. भाजप - सेना यांचे सरकार येणार आहे.
------ अजुन मुख्यमन्त्री देखिल ठरलेला नाही आहे.... खातेवाटप करताना मुख्यमन्त्री प्रमुख भुमिका निभावतो कारण त्याला सोबत काम करायचे असते.

देवेंद्र फडणविसांनी आज नितीन गडकरींची भेट घेतली. या भेटीनंतर नितीन गडकरी यांनी पुन्हा दिल्लीतच रहाण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

देवेंद्र यांच नाव घ्याव यासाठी ही भेट देवेंद्र यांनी घेतली असावी. यावर नितीन गडकरी यांनी देवेंद्र यांच्या नावाला पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले असावे.

देवेंद्र यांच्या वडीलांनी मला राजकारणात आणले आणि माझ्या मुळे देवेंद्र राजकारणात आला ही आतली बाब ही आज समोर आली. यातुन या दोघात बेबनाव नाही हे समजले.

पुढील काही दिवसात ( ------ अजुन मुख्यमन्त्री देखिल ठरलेला नाही आहे.... ) हा विषय संपेल.

युती तुटली हा भूतकाळ झाला पुंन्हा जुळवून घ्यायची कसरत चालू आहे. परंतु शिवसेनेशी युतीपेक्षा राष्ट्रवादीशी युती केली तर ते दोघांनाही बरे पडेल.भाजपा हि मुख्यत्वे हिंदूंचे प्रतिनिधित्व करते राष्ट्रवादीचे आमदार हे हि हिंदूच आहेत.पवारांनी जो पुलोदचा प्रयोग केला होता त्यात भाजपही एक सहभागी असलेला पक्ष होता.त्यांची आर्थिक धोरणे हि समान आहेत.राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झालेत तसेच भाजपच्याही अनेक नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. भाजपचा वेगळ्या विदर्भाला पाठींबा आहे राष्ट्रवादीही वेगळ्या विदर्भाच्या बाजूची आहे. शिवसेना मात्र ह्याबाबतीत ताठर भूमिका घेवू शकते.दोघा पक्षांची आर्थिक धोरणेही समानच आहेत. माझ्या मते हे दोन्ही पक्ष नैसर्गिक मित्र म्हणून महाराष्टाला चांगले व अतिकार्यक्षम सरकार देवू शकतात.

पगारेंच्या वरील इच्छेला "तथास्तु" म्हणावंसं वाटतंय... स्मित>>>>>>ऑ! अहो तथास्तु काय म्हणताय? असे झाले तर काका-पुतण्या परत बोडक्यावर बसतील आमच्या. सगळा महाराष्ट्र कृषीविरहीत होईल. धरणे अचानक भरु लागतील.

पुण्याच्या सर्व नद्या अचानक मार्ग बदलुन मुळशी आणी इन्दापूर च्या दिशेने सैरावैरा सूटतील. चुकुन या नद्या एकत्र झाल्या तर पुण्यात पानशेतपेक्षा गम्भीर परिस्थिती उद्भवेल. आधीच पुण्यात पान्ढर्‍या रन्गाच्या गाड्या, पान्ढरे पोषाख, पान्ढरे बगळे भरपूर झालेत, त्यात अजून भर पडेल.

देवा देवा, नको रे बाब्बा! ( सैरावैरा धावत सुटलेली बाहुली)

पुलोद मध्ये जनता पक्ष होता पगारे साहेब भाजप नव्हता. या जनता पक्षात जुन्या जनसंघाच्या विचाराचे उपमुख्यमंत्री कै. उत्तमराव पाटील होते.

पण वाजपेयी आणि शरद पवार यांनी १९८४ साली लोकसभा निवडणुकीत एक समर्थ पर्याय उभा करण्याचा प्रयत्न केला होता. त्या वेळेला पवार साहेबांची प्रतिमा मलीन नव्हती.

भाजप ने भारतात २२२ जागा लढवल्या पण फक्त २ जागांवर विजय मिळाला होता. समाजवादी काँग्रेसचे १० खासदार भारतातुन निवडुन आले होते.

काँग्रेसचे ४०० खासदार स्व. इंदिरा गांधींच्या हत्येच मार्केटींग करुन आले होते. ( अवांतर ) २०१४ च्या निवडणुकीत भाजपने ज्या पध्दतीने लोकांच्या मनावर राज्य केले तेच गारुड १९८४ साली राजीव गांधी यांनी केले. ( अवांतर )

पगारे साहेब पुलाखालुन खुप पाणी वाहुन गेले आहेत. शरद पवार हे आज लोकनेते राहिले नाहित. ते नेत्यांचे नेते झाले आहेत. .

काँग्रेसच्या नेत्याकडुन ( नाव न घेता ) शिवसेनेला बाहेरुन पाठिंबा देण्याचा प्रस्ताव आला होता हे पवार साहेब धादांत खोट बोलले. सर्वच पक्षातले नेते त्याच्या राजकारणातल्या कुशलतेला मान देतात म्हणुन त्यांची फार छी तु झाली नाही.

शरद पवार हे धादांत खोटे का बोलले किंवा भाजप ला बिनशर्त पाठींबा का दिला याचे कारण पुढील काही दिवसात स्पष्ट होईल. आजच छगन भुजबळांची फाईल हालली आहे. महाराष्ट्रात या घडीला राष्ट्रपती राजवट आहे. भाजप -सेना यांचे राज्य येऊ द्या मग बघा काय होते आहे.

भाजपने जर पवार साहेबांच्या बरोबर युती केली किंवा बाहेरुन पाठिंबा घेतला तर महाराष्ट्राच्या जनतेच्या विधान सभेत दिलेल्या कौल झुगारुन ही कृती होईल, राष्ट्रवादीला आज विश्वासार्हता राहिलेली नाही. भाजप सुध्दा ती पाठीबा घेतल्यास घालवेल याची कल्पना भाजपा नेत्रूत्वाला नक्कीच असावी.

भाजपा हि मुख्यत्वे हिंदूंचे प्रतिनिधित्व करते राष्ट्रवादीचे आमदार हे हि हिंदूच आहेत
>>>
भाजप ज्या हिंदूंचे प्रतिनिधित्व करते आणि राष्ट्रवादी ज्या हिंदूंचे प्रतिनिधित्व करते ते हिंदू वेगवेगळे आहेत. अन्यथा दोन्ही पक्ष एकमेकात मर्जच केले पाहिजेत ना ! मग सेनेचे अस्तित्व कशाला टिकवायचे? एमायेम वगळता सगळेच पक्ष एकत्र कराना. बादवे एम आय एम ने अविनाश बर्वे नावाच्या एका हिंदूला उमेदवारी दिली होती त्याला २५००० मते पडली आहेत::फिदी:

नितीनचंद्र , उत्तमराव पाटील हे पुलोद मध्ये महसूल मंत्री होते. मात्र उपमुख्यमंत्री नव्हते . असे पदच पुलोदमध्ये नव्हते. उपमुमं हे पद वसन्तदादा मुमंअसतात्ना नासिकराव तिरपुडे याना अ‍ॅडजस्ट करण्यासाठी प्रथम निर्माण करण्यात आले व ते आता महाराष्ट्राच्या मानगुटीवर बसले आहे.मुख्यमंत्र्याला त्रास देणे , त्याला निर्णय घेण्यासाठी अडथळे आणणे हे या पदाचे मुख्य काम. आणि प्रत्येक उमुमं ते मनोभावे पार पाडीत असतो. भाजपने शिवसेनेचा मुमं केला तरी चालेल पण हे पद अजिबात ठेवू नये....