विधान सभा निवडणुक निकाल २०१४ (महाराष्ट्र्/हरयाना)

Submitted by कासव on 18 October, 2014 - 21:03

महाराष्ट्र्/हरयाना दोन्ही राज्यातील निवडणुक निकाल आता थोड्या वेळात स्पष्ट व्हायला सुरुवात होइल.

त.टी.-: क्रुपया वयक्तीक किंवा व्यक्ती वाचक टीका करु नये.

विषय: 
प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भाजप मधील २० आयाराम निवडून आलेत.
१) नंदूरबार - विजयकुमार गावित (रा)
२) धुळे - अनिल गोटे (शेतकरी संघटना)
३) भुसावळ - संजय सावकारे ( रा.)
४) अमरावती - सुनील देशमुख (कां)
५) हिंगणा - समीर दत्ता मेघे (कां)
६) गंगापूर - प्रशांत बंब ( अपक्ष)
७) मुरबाड - किसनराव कथोरे (रा.)
८) बेलापूर - मंदा मात्रे (रा.)
९) घाटकोपर - राम कदम ( मनसे)
१०) पनवेल - प्रशांत ठाकूर (का)
११) चिंचवड - लक्ष्मण जगताप (रा)
१२) शिराळा - शिवाजीराव नाईक (का)
१३) नांदेड (दक्षीण)- दिलीप कंदकुर्ते (अपक्ष)
१४) दौंड - राहूल कूल ( रा.)
१५) कोपरगाव - स्नेहलता कोल्हे (रा)
१६) राहूरी - शिवाजी कर्डिले ( रा)
१७) नेवासा - बाळासाहेब मुरकुटे (का)
१८) आष्टी - भीमराव धोंडे (रा)
१९) ....... - मोनीका राजोळे (रा)
२०) कोल्हापूर (द.) - अमल महाडीक (का)

भाजपातील एकून ५५ नेत्यानी शिवसेनेत प्रवेश केला होता. एकूण आयारामातील १३ आयाराम सेनेकडून निवडून आले.

१) करमळा - नारायण पाटील
२) पिंपरी - गौतम चाबुकस्वार
३) रत्नागिरी - उदय सामंत
४) सावंतवाडी - दीपक केसकर
५) लोहा - प्रताप चिखलिकर
६) शिरोळ - उल्हास पाटील
७) खेड - सुरेश गोरे
८) मगाठणे - प्रकाश सुर्वे
९) राधानगरी - प्रकाश आबीटकर
१०) खानापूर - अनील बाबर
११) कुडाळ - वैभव नाईक (राणेचा पराभव करणारा आयाराम आहे बहुतेक)
१२) पालघर - कृष्णा घोडा
१३) हादगाव - नागेश आष्टीकर

एखादे नाव चुकले असल्यास जानकारानी तसे कळवावे. म्हणजे दुरुस्ती करता येईल.

सुभाष देसाई यांचा पराभव मात्र धक्कादायक आहे >>गोरेगावातील गुजराती-उप्र-संघिष्ट ही सगळी मतं ठाकुर बाईंना गेली. आणि शशांक रावला त्याच्या वडिलांएवढी मते खेचता नाही आली. म्हणुन मालाडमधला उमेदवार निवडुन आलाय. देसाईंनी चांगले काम केले होते असे ऐकले आहे.

..

..

तेलगीवालेच. आधी जनता दल, मग त्यांचा काहीतरी जनसंग्राम पक्ष असे करत भाजपाच्या वळचणीला!! आता ते पावन झालेतच..

बबनराव पाचपुतेसुद्धा चालले भाजपला. (मतदारांना नाही चालले). मग राकॉचा पाठिंबा घेतला तर त्यांचं सोवळं मोडेल असं का वाटतंय भाजपच्या पाठिराख्यांना? शरद पवार हे शहा-मोदी दुकलीपेक्षा जास्त धूर्त आहेत म्हणून की काय?

नेटचा प्रॉब्लम आहे सडेतोड ! त्यामुळे तीनदा पोस्ट पडली . त्रिवार दुःख वगैरे काही झालेल नाही . पण सुभाष देसाईनी खरोखर कामे केलेली आहेत . चांगला उमेदवार पडला याचा खेद निश्चितच आहे .

निवडणूकीच्या काही दिवस/महिने आधी पक्ष बदललेले किती निवडून आले कोणाकडे त्याचा अ‍ॅनेलिसीस आहे का >>

त्याच न्यायाने सेना भाजपा एकत्रीत पाहिले असते तर ह्यावेळी २२०+ जागा असत्या. काही जागा गरज नसताना दोघांच्या मतविभागणीमुळे दुसरीकडे गेल्या. इनफॅक्ट जिथे जिथे राष्ट्रवादी आणि काँग्रेस आले तिथे तिथे सेना + भाजप करून बघितले तर चित्र राष्ट्रवादी आणि काँग्रेससाठी अजून भयावह आहे.

पाच पक्ष असतानाही भाजपा बहुमताजवळ जावू शकते ह्यावरून उरलेल्या तीन्ही पार्ट्यांनी योग्य तो बोध घ्यावा.

सेनेने नाक पकडून भाजपा कडे यावे. तरच बरे होईल त्यांच्यासाठी. विरोधी पक्षात बसले तर पुढच्या वेळी ६० सोडा त्यांची मनसे होईल.

सेना आणि मनसे आता रिटायर व्हाव्यात. तसेही राष्ट्रवादी, सेना आणि मनसेच्या गुंडागर्दीला लोकं कंटाळले आहेत. आमच्या भागातील राष्ट्रवादी पडला म्हणून त्याने आज येथील मार्केट बंद केले आहे. हॅटस ऑफ टू हीम !

म्हणजे सगळ्याच पक्षांनी संन्यास घेऊन फक्त मोदींच्या हातात देश द्यावा असे आपण सुचवता आहात का केदार?? म्हणजे एकचालकानुवर्तित्व वगैरेच का?? मग ८९ साली भाजपाला गंगेतच बुडवायला हवे होते तर..

त्या तीन पक्षाच्या यादीत काँग्रेसचे नाव त्यात दिसले का ? तो अजूनही राष्ट्रीय पक्ष आहे की !

उलट तुमच्या पोस्ट वरून असे दिसते की कॉंग्रेस तशीही नामशेष होणार, कारण तुम्ही त्याला खिजगिणतीतही धरले नाही.

@हातोडावाला: वैभव नाईक हे माझ्या माहितीप्रमाणे २००७ पासून शिवसेनेत आहेत. २००९ ला पण ते सेनेकडून नारायण राणेंविरुद्ध उभे होते.गेली पाचेक वर्षे ते सेनेचे सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख आहेत. आयाराम म्हणजे ऐन वेळेस उडी मारून आलेले असा होतो.

वैभव नाईक हे श्रीधर नाईक यांचे पुतणे. श्रीधर नाईकांचा खुन झाला होता आणि तो राणे यांनी करविला असा त्यांच्यावर आरोप होता, पण राणे त्यातुन निर्दोष सुटले. वैभव हे काँग्रेसमध्येच होते पण राणे कॉंग्रेस मधे गेले आणि वैभव सेनेत आले. जेव्हा राणेंच्या विरोधात उभे राहायला कुणिच तयार नव्हते तेव्हा या नवख्या पोराने कुडाळ्मध्ये शिवसेनेची शाखा नव्याने उभी केली. त्याचा परिणाम आज दिसतो आहे, मागच्या वेळी ५००० मतानी राणे निवडुन आले होते, तेव्हाच या पराभावाची नांदी ठरली होती. हॅट्स ऑफ टु वैभव नाईक, सेना जर युती करुन सत्तेत आली तर वैभवना मंत्रीपद मिळालेच पाहिजे.