माझी (न) खरेदी यादी

Submitted by हर्पेन on 18 October, 2014 - 06:05

चेहरे पुस्तकावरील काही पाने विचार प्रवृत्त करतात. माझ्या नजरेस पडलेले त्यातलेच एक पान.

Anti Shopping list small.jpg

'वापरा आणि टाकून द्या' च्या काळात हे जगावेगळे / भलते सलते भासू शकेल. तसेच आपल्या वाड-वडीलांना आर्थिक परिस्थितीमुळे जे करावे लागले ते आता पैसे असताना आपण का करावे असा विचार पण मनात नक्की येईल परंतु आपल्या पुढच्या पिढ्यांकरता आपण किती / कोणती नैसर्गिक संसाधने सोडून जाणार आहोत ह्याचा विचार केला असता ही यादी सतत आपल्या नजरे समोर खरेतर मनात / डोक्यात असायला हवी असे वाटते.

मला माहीत आहे की आपण प्रत्येक जण जाणता-अजाणता का होईना, यातल्या अनेक गोष्टी करत असतो.

यातले काय काय केले अथवा करता येऊ शकेल किंवा केले आहे हे इथे मांडावे. जेणे करून इतरांना त्या कल्पनेचा वापर करता येईल.

एकमेकांच्या कल्पनांचे आदान प्रदान करूया आणि नैसर्गिक साधन संपत्तींचा वापर कमी करूया, गैरवापर टाळूया.

सुरूवात म्हणून दिवाळी निमित्त खरेदी-यादी तयार झाली असताना / करताना यातले काही करता येईल का याचा नक्की विचार करा.

आपण काय केले हे लिहीताना ते कोणत्या क्रमांका खाली मोडेल त्याचा संदर्भ द्या. कृपया धन्यवाद. त्याही प्रकारे एक संदर्भ म्ह्णून ही यादी इथे तयार करता येईल.

No shopping List.jpg

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

६ - भेट म्हणून आलेले नवीन शर्ट घरातच असल्याने दिवाळीसाठी म्ह्णून वेगळी नवीन खरेदी करणार नाहीये. Happy

१. रिसायकलः पुनर्वापरः

पणत्या, रांगोळी, पुजासाहित्य, सजावटीचे सामान आणि इतर बर्‍याच वस्तु मागच्याच वर्षीच्या वापरणार आहोत.

२. अपसायकलः फेरबदल करुन पुनर्वापरः

जुन्या खोक्यापासुन साबांनी आकाशकंदील बनवला आहे यंदा.

३. बॉरो: उसने घेणे:

साफसफाईसाठी शेजार्‍यांचे उंच स्टूल उसने घेतले विकत घेण्याऐवजी.

४. सॅल्व्हेजः साठवणे? Uhoh

५. रिपेअरः दुरुस्त करणे:

मागच्या वर्षीची लाईटिंगची माळ चेक करुन त्यातले बल्ब्स बदलुन दुरुस्त केली आहे.

६. डू विदाऊटः च्याशिवाय काम चालवणे:

नवीन कपडे घेतले नाहीत. एकतर आता बाराही महिने कपडे घेणे होते.
शिवाय दिवाळी आहे म्हणुन काहीही फालतु माल काहिच्या काही किंमती लावुन विकतात आजकाल.
फटाक्यांवर तर माझा प्रचंड राग आहे. ते घ्यावे लागणे हिच शिक्षा असेल माझ्यासाठी.

७. बाय सेकंड हँडः इतरांनी वापरलेली वस्तु विकत घेणे:

हे करायची वेळच आली नाहीये. क्र. ६ वरच जास्त भर आहे. Happy

८. क्रिएटः बनवणे:

घरचा फराळ घरीच बनतो.

९. स्वॅपः अदलाबदल करणे:

हे करायची वेळ आली नाहीये.

१०. ग्रो: मोठे व्हा?

हे कळले नाही. Uhoh

पटकन काही डोक्यात येत नाहीये, पण ईंटरेस्टींग आहे हे जाणवतेय. तसेच आपली नेहमीची कुठलीही खरेदीपूर्व विचारप्रक्रिया याच मुद्द्यांना स्पर्शून जाते. पण बरेचदा पैश्याचा प्रश्न नसल्यास या प्रकारचे विचारमंथन न करता निर्णय घेतले जातात. जे खरे तर चुकीचे आहे, कारण पैसे कितीही असले तरी नैसर्गिक साधनसंपत्ती मात्र मर्यादीतच आहेच.

दिवाळीच्या आधीच हे इथे शेअर केल्याबद्दल धन्यवाद, काही सुचले तर येतो टंकतो. Happy

अवांतर - मराठी नावे शोधून त्यापुढे एक दोन वाक्यात उदाहरणासह अर्थ दिल्यास एक चांगला उपयुक्त लेख बनेल.

नवीन कपडे घेतले नाहीत. एकतर आता बाराही महिने कपडे घेणे होते.
शिवाय दिवाळी आहे म्हणुन काहीही फालतु माल काहिच्या काही किंमती लावुन विकतात आजकाल.
>>>

येस्स, मी सुद्धा दोनेक महिन्यांपूर्वीच एके ठिकाणी सेल लागलेला असताना बरेच कपडे ईन अ‍ॅडव्हान्स घेऊन ठेवलेत. अगदी वडिलांसाठीही खरेदी केलीय. सध्या ते न वापरता कपाटात पडून आहेत जे दिवाळीला वापरायला काढणार तसेच, वडिलांनाही त्यांचे दिवाळी गिफ्ट म्हणून देणार. त्याच कपड्यांच्या किंमती आता नक्कीच दिडपट मिळतील.

ग्रो.. म्हणजे उगवा.. ( छ्यॉ शेतीपासून कित्ती दूर चाललो आहोत आपण Happy )

>> खरंय दिदा.

नाही ब्वॉ. या कॅटेगरीत आम्ही फक्त चिवड्याला लागणारा कढीपत्ता घरात उगवतो.

ग्रो.. म्हणजे उगवा.. ( छ्यॉ शेतीपासून कित्ती दूर चाललो आहोत आपण स्मित )
>>>>

ओह्ह हे असे आहे का.. प्रोड्यूस - निर्माण करा ... पण त्यात अगोदरच no. 8 क्रीएट सुद्धा आहे ना? यात आणि त्यात फरक काय?

मला पहिले वाटलेले, ग्रो अप .. म्हणजे मोठे वा.. फटाके वाजवायला आता काही तुम्ही लहान नाही राहिलात Proud

मला पहिले वाटलेले, ग्रो अप .. म्हणजे मोठे वा.. फटाके वाजवायला आता काही तुम्ही लहान नाही राहिलात

>> ऋन्मेष +१ Happy

सॅल्व्हेज म्हणजे वाचवा

>> हम्म.. कस्टम्स अ‍ॅक्टची आठवण झाली.

धन्यवाद पियु Happy

ऋन्मेऽऽष - बरेचदा पैश्याचा प्रश्न नसल्यास या प्रकारचे विचारमंथन न करता निर्णय घेतले जातात. जे खरे तर चुकीचे आहे, कारण पैसे कितीही असले तरी नैसर्गिक साधनसंपत्ती मात्र मर्यादीतच आहेच.

अगदी अगदी

दिनेश +१

इतक्यात दिवाळी येत्ये म्हणून त्याच्याशी निगडीत गोष्टी आठवताहेत पण ही जीवन पद्धती एरवी देखिल बाणवण्याजोगी आहे.

त्यामुळे तशीही उदाहरणे द्यावी.

२. - गोधडी वापरतो आणि आवडते मला. Happy

या कॅटेगरीत आम्ही फक्त चिवड्याला लागणारा कढीपत्ता घरात उगवतो.
>>>>
येस्स कढीपत्ता आमच्याही बाल्कनीतल्या कुंडीत उगतो. Happy

हर्पेन, गेली काही वर्षे वर दिलेल्या दहाही गोष्टी जीवनपद्धतीचा भाग म्हणून केल्या जातात.

पियु,
साल्वेज म्हणजे एखादी वस्तू थोडी जुनी, खराब झाली आहे तर ती ठीकठाक करुन पुन्हा वापरात आणणे. उदा. जुने कॉफी टेबल थोडी डागडुजी, पॉलिश, रंग करुन वापरात आणणे. लाकडी फर्निचर बरेचदा साल्वेज केले जाते. आम्ही साल्वेज केलेला वॅक्युम क्लिनर देखील पुढे ४ वर्षे वापरला. - मित्राने बिघडला म्हणून टाकून द्यायला काढला होता. आम्ही त्यात एक २ डॉलरचा पार्ट घातला. Happy

सुरूवात म्हणून दिवाळी निमित्त खरेदी-यादी तयार झाली असताना / करताना यातले काही करता येईल का ही विचारधारा पटली नाही बाकी जीवनपद्धतीचा भाग म्हणून ठिक आहे.

हेच जेव्हा वडिल सांगतात तेव्हा आपल्याला 'लेक्चर ' असे नक्किच वाटते .पण जेव्हा इथे ,फेसबुक ,वॉट्स अप असे वर चित्र येते तेव्हा आपण त्याकडे नीट लक्ष देतो.:स्मित:
खुप खरेदी करत नाही .पण सण आनंदात साजरा करतो .पारंपारीक व नैसर्गीक (इको फ्रेण्ड्ली) गोष्टी जास्तीत जास्त करता यावा याचा प्रयत्न करते.फटाके बर्याच वर्षापासुन बंद आहेत .जुन्या वस्तु कपडे गरजुंना देतो .(भाऊ दानशूर कर्ण असल्यामुळे माझ्यावर ती वेळच फार कमी येते).सोनं कधी कधी वाट पाहुन दिवाळीतच घेतले जाते.

ग्रो अप मलाही तेच वाट्ले .विचाराने समृध्द व्हा.पण ग्रो.. म्हणजे उगवा.. हेही छान.

काही लोकांच शॉपिंग मुळे मानसिक आरोग्य चांगल राहते. जाहीराती तुमच्या मेंदुचा ताबा घेतात व आवश्यक नसतानाही खरेदी करायला प्रवृत्त करतात. अशा लोकांना मी त्यांच्या वापरायोग्य चांगल्या वस्तू गरजू लोकांना दान करण्याचा सल्ला देतो. अशा काही संस्था आहेत की तुमच्या वस्तु त्यांच्यापर्यंत पोहोचवतात.
पैसा जास्त झाला की त्याला आपोआप पाय फुटतात. जाउ द्या हो अशा लोकांच्या उधळेपणा मुळे वा खरेदीच्या किड्यामुळे काही लोकांना रोजगार मिळतो असा सकारात्मक विचार करा.

जाउ द्या हो अशा लोकांच्या उधळेपणा मुळे वा खरेदीच्या किड्यामुळे काही लोकांना रोजगार मिळतो असा सकारात्मक विचार करा.
<<

असहमती नोंदवतो.

ऐपत व आवक नसताना अनावश्यक खरेदी करून खड्ड्यात जाणारे अनेक लोक मला ठाऊक आहेत. एका क्रेडीट कार्डाचं बिल भरण्यासाठी दुसरं क्रेडिटकार्ड वापरून कर्जाचा डोंगर उभा करणार्‍या इंजिनियर मित्रासाठी आम्ही काँट्री काढून पैसे जमा केले होते अन समारंभपूर्वक त्याची सगळी कार्डं कात्री घेऊन कापून टाकली होती.

या असल्या रोजगारवाल्या पोस्टी मला समजतच नाहीत.

लोक दारू पितात. पिउ द्या हो! त्याने सरकारला एक्साईज ड्यूटीचा रोजगार मिळतो, प्लस कितीतरी लोकांना (त्यात खरे गरीब हॉटेलचे वेटर्स अन बारबाहेरचे भिकारी येतात बरं!) रोजगार मिळतो..

लोक सिग्रेटी फु़ंकतात, गुटखा खातात. खाऊ द्या हो! गरीब बिचार्‍या पानटपरीवाल्यांना रोजगार मिळतो..

लोक डान्सबारमधे जाऊन दौलतजादा करतात. करू द्या हो! बिचार्‍या निराधार बारबालांना आधार मिळतो..

ही वरची तिन्ही उदाहरणे तर सरळसरळ वेडगळपणाच आहे हे सगळ्यांच्या लक्षात येईलच. पण,

"सडकपे माल बेचनेवालेसे मोलतोल ना करे" स्टाईलचे, "या दिवाळीत पणत्या, दिव्यांच्या माळा आदि देशीच माल वापरा" म्हणून आग्रह करणारे व्हॉट्सॅप फॉर्वर्ड्स जेव्हा येतात, तेव्हा ते डोक्यात जातात.

या फॉर्वर्ड करणार्‍याची १०-१२ लाखाची गाडी घेताना इंपोर्टेड असते. अंगावरचा कपडा अंडरप्यांटीपासून बुटापर्यंत इंपोर्टेड असतो. ज्यावरून मेसेज फॉर्वर्ड करतात तो फोन इंपोर्टेड असतो; अन ५० रुपडक्यांची सबस्टँडर्ड दिव्याची माळ घेताना हे देशप्रेम आठवत सोशल फोरम्सवर 'गरीबांना' रोजगार स्टाईल उमाळे काढतात तेव्हा खरोखर किळस येते मला.

यंदा तुझ्या स्टाफला दिवाळी किती देणारेस? विचारलं, की मोठ्ठं तोंड करून हजाऽर रुपये! असं सांगतात हे कर्णाचे अवतार फॉर्वर्ड पटू..

असोच.

रच्याकने, तुमच्या पोस्टीचा पहिला पार्ट बरोबर असताना, सकारात्मक विचाराच्या नावाखाली त्याच्यावर तुम्हीच बोळा का फिरवला आहात?

वरच्या चर्चेतील ग्रो बद्दल.

ग्रो, आणि ग्रो-अप हे दोन वेगवेगळे शब्दप्रयोग आहेत. धाग्यातील लिस्टच्या संदर्भात ग्रो म्हणजे स्वतः पिकवा, वाढवा, हाच अर्थ योग्य आहे.

ग्रो-अप, म्हणजे वयाने मोठे होणे हा अर्थ इथे अजिबातच गैरलागू आहे.

प्रकाश घाटपांडे, इब्लिस, विचार करण्यासारख्या पोस्टी. इब्लिस - मी येथे "दिवाळीला किल्ले रचून त्यावर ती मावळे, वाघ वगैरे चित्रे असतात ती विकत घ्या स्थानिक दुकानदारांकडून, सामाजिक संस्था विकतात ते कंदील, भेटकार्डे घ्या" वगैरे लिहीणार होतो, पण तेवढ्यात तुमच्या पोस्ट ने विचारात पाडले Happy

वरती तुम्ही जी हास्यास्पद म्हणून उदाहरणे दिली आहेत ती पटलीच.

पण इतर बाबतीत - समाजातील बहुसंख्य लोकांच्या मानाने जे वरच्या आर्थिक स्तरांवर आहेत त्यांच्याकडून इतर स्तरांत पैसा योग्य मार्गाने जाण्याकरता स्थानिक छोट्या मोठ्या विक्रेत्यांकडून दिवाळीसाठी (व एरव्हीही) खरेदी करणे हा चांगला उपाय आहे असा माझा समज आहे. तसेच घरातील कामाकरता येणारे विविध लोक, वॉचमेन ई लोकांनाही दिवाळी भेट देताना कद्रूपणा न करणे हा ही. पण हेच आम्ही इतर असंख्य गोष्टी परदेशी बनवलेल्या घेत असतो हे ही खरे आहे. पण याने ते चुकीचे कसे होते? हा तुमच्या पोस्टीला विरोध नव्हे. फक्त डोक्यात आले ते विचारतोय.

(हर्पेन - मूळ लेखावर पुन्हा वेगळी प्रतिक्रिया देतोय)

हर्पेन, इंटरेस्टिंग पोस्ट. दर काही दिवसांनी/महिन्यांनी नवीन गोष्ट विकत घेणे याची क्रेझ काही लोकांना असते, तर आहेत त्या गोष्टी न वापरण्याजोग्या होईपर्यंत वापरत राहणे ही सवय इतर अनेकांना. हा मूळ स्वभावाचा भाग आहे, तो सहसा बदलत नाही. यातील एका बाजूच्या लोकांना दुसर्‍या बाजूचे सहसा पटणार नाही. त्यामुळे अशा बाबतीत सहमत होणारे मुळात अशाच विचाराचे असतील असे वाटते.

मात्र दुसरा "मॅक्रो" प्रश्न - भारताची अर्थव्यवस्था लोकांच्या खर्च करण्यावर किती अवलंबून आहे (जशी अमेरिकेची प्रचंड अवलंबून आहे)? उद्या गेली काही वर्षे जो नवश्रीमंत वा नवमध्यमवर्गीय वर्ग तयार झाला आहे त्यांनी "मनात आले म्हणून केलेला खर्च (discretionary spending)" कमी केले तर अर्थव्यवस्थेवर किती परिणाम होऊ शकतो?

मात्र एका बाबतीत मी पूर्ण सहमत आहे - जेथे मर्यादित नैसर्गिक साधने वापरायची आहेत (पेट्रोल) किंवा मर्यादित प्रमाणात उपलब्ध असलेल्या गोष्टी सर्वांना किमान प्रमाणात मिळाव्यात अशा गोष्टी ज्या आहेत (वीज, पिण्याचे पाणी), त्यात बचत करण्याचे सर्व मार्ग वापरायलाच हवेत.

ईब्लिस, इथेही सर्वोत्तम प्रतिसाद.
यात आणखी एक अ‍ॅडायचे म्हणजे भाजीपाला वा तत्सम शेतमाल घेताना घासाघीस करू नका.
आता आमच्या नाक्यावर बसणारा भाजीवाला भैय्या आधीच आम्हाला लुटायला बसला आहे त्यात त्याच्याशी घासाघीस करू नका असा याचा ढोबळमानाने अर्थ होतो. आणि या मेसेजला सारे हो, हो करतात. पण याने आपल्या शेतकरी बांधवांना काय फायदा होणार आहे याचा विचार कोणी नाही करत.

फारेण्ड,
परदेशी माल घेण्यात खरे तर काही वावगे मलाही नाही वाटत. पण हल्ली बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काम करणारी यंग जनरेशन रुपयांमध्ये गलेलठ्ठ पगार घेते आणि तो त्यांच्या बदललेल्या मॉडर्न लाईफस्टाईल नुसार उगाचच बनवलेल्या गरजांवर उडवते हे चित्र फार दिसते.

फारच छान विचार आहे! पटलं! ह्यातलं grow सोडून बाकीच्या सर्व गोष्टी कमी अधिक प्रमाणात होतात.
माझ्या आवडत्या वाक्यांपैकी एक गांधीजींचे वाक्य आहे: There is always enough for everybody's need but not for everybody's greed.

इब्लिस, तुमचे म्हणणे देखिल पटले! penny wise and pound foolish असे बऱ्याच जणांचे होते! माझेही होते कधी कधी!

फारएण्ड, जेवढं मी दुरून पहात्येय त्यावरून भारताची अर्थव्यवस्था हळूहळू अमेरिकेसारखी होत्येय (उदा. फ्लिपकार्ट चा सेल) जे मला आजिबात आवडत नाही Angry

<<जेथे मर्यादित नैसर्गिक साधने वापरायची आहेत (पेट्रोल) किंवा मर्यादित प्रमाणात उपलब्ध असलेल्या गोष्टी सर्वांना किमान प्रमाणात मिळाव्यात अशा गोष्टी ज्या आहेत (वीज, पिण्याचे पाणी), त्यात बचत करण्याचे सर्व मार्ग वापरायलाच हवेत.>> पण अश्या कुठल्या गोष्टी असतात ज्यासाठी नैसर्गिक संसाधने लागत नाहीत. सगळ्या साठी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष पणे ही संसाधने लागतातच! Grow locally, eat locally बरोबरच make locally (स्वदेश) हाच सर्वात शाश्वत विकासाचा मार्ग आहे.

इब्लिस - मी येथे "दिवाळीला किल्ले रचून त्यावर ती मावळे, वाघ वगैरे चित्रे असतात ती विकत घ्या स्थानिक दुकानदारांकडून, सामाजिक संस्था विकतात ते कंदील, भेटकार्डे घ्या" वगैरे लिहीणार होतो, पण तेवढ्यात तुमच्या पोस्ट ने विचारात पाडले स्मित
<<
आमच्याकडच्या एका मतीमंद/मूकबधीर विद्यालयाच्या शिक्षिका ऑगस्ट-सप्टेंबरापासून लोकांकडे फिरत भेटकार्डांच्या ऑर्डरी घेत असत. (असत भूतकाळवाचक कारण मी आजकाल त्यांच्याकडून घेत नाही.) 'सामाजिक संस्थेला' मदत म्हणून सुरुवातीच्या काळात मी हे घेत असे. दर वर्शी हजार कार्डे. खेड्यापाड्यातल्या जीपी लोकांना, नातेवाईकांना इ. पाठवत होतो.
एकदा असाच हिशोब केला.
त्या वर्षी त्याच संस्थेची डॉक्टरांनी एकमेकांना पाठवलेली फक्त २७ कार्डे माझ्याकडे आली होती.
१५०-२०० विद्यार्थी संख्या असलेल्या या शाळेने, अ‍ॅव्हरेज हिशोबाने, किमान २७ हजार कार्डे विकली होती!! मला अनोळखी असलेल्या इतर लोकांना विकलेल्या कार्डं कंदिलांचा हिशोब यात नाही. विचार करा, ही मुले वर्षभर अभ्यास करतात की भेटकार्डे-कंदील बनवत बसतात?

व्हाय आर वी रनिंग दीज स्कूल्स?

पण इतर बाबतीत - समाजातील बहुसंख्य लोकांच्या मानाने जे वरच्या आर्थिक स्तरांवर आहेत त्यांच्याकडून इतर स्तरांत पैसा योग्य मार्गाने जाण्याकरता स्थानिक छोट्या मोठ्या विक्रेत्यांकडून दिवाळीसाठी (व एरव्हीही) खरेदी करणे हा चांगला उपाय आहे असा माझा समज आहे.
<<
१. मॉलमधे नोकरीला असलेली मुले-मुली चायनीज असतात,
२. मॉलचे मालक लाईटबिल अमेरिकेच्या सरकारला भरतात.
३. मॉलमधील दुकाने १००% इम्पोर्टेड वस्तू विकतात, ज्या स्मगलिंग करून आणलेल्या असतात. यातून भारत सरकारला शून्य इम्पोर्ट ड्यूटी मिळालेली असते.
४. मॉलमधे येणार्‍या सामानाचा ट्रान्सपोर्टचा खर्च जपानी सर्कार करते.
५. फूटपाथवरून आणलेली वस्तू नक्कीच मेड इन इंडिया असते!!

पुरे?

ही दुसरी पोस्ट कळाली नाही इब्लिस, जरा अजून प्रकाश पाडा :). पहिल्या पोस्ट मधे दिलेल्या माहितीपेक्षा वेगळी वस्तुस्थिती असलेलेली संस्था मला माहीत आहे. लिहीतो थोड्या वेळाने त्याबद्दल.

.

गेली काही वर्षे वर दिलेल्या दहाही गोष्टी जीवनपद्धतीचा भाग म्हणून केल्या जातात.

>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>> स्वाती२ अगदी अगदी!
१. रिसायकलः पुनर्वापरः

पणत्या, रांगोळी, पुजासाहित्य, सजावटीचे सामान आणि इतर बर्‍याच वस्तु मागच्याच वर्षीच्या वापरणार आहोत.
>>>>>>>>>>> माझ्याकडेही बर्‍यापैकी हीच परिस्थिती!
२. अपसायकलः फेरबदल करुन पुनर्वापरः

हे माझं सतत चालूच असतं. बरंचसं शिवण घरीच असल्याने...........चौघड्या, गोधड्या, पिशव्या, पर्सेस इ.इ.

३. बॉरो: उसने घेणे:

साफसफाईसाठी शेजार्‍यांचे उंच स्टूल उसने घेतले विकत घेण्याऐवजी. >>>>>>>>>
हे फारसं होत नाही.

४. सॅल्व्हेजः स्वाती२ च्या पोस्टप्रमाणे साल्वेजचा अर्थ समजला. हेही बर्‍याच प्रमाणात अंगिकारलं आहे.

५. रिपेअरः दुरुस्त करणे:

अगदी आत्ताच माझी एक आवडती किचन नाइफ (इम्पोर्टेड म्हणून नाही बरं आवडती.........तर काम खूप छान होतं या सुरीने म्हणून) दुरुस्त केली. त्याची मूठ खराब झाली होती. त्याला फेविकॉल सेलो टेप इ.इ. लावून अगदी मस्त वापरणेबल केलीये.
इथे माझ्या वडिलांची आठवण होते............... ते प्लॅस्टिक बादल्या कधीच फेकत नसत एखादी चीर गेली म्हणून. त्याला जवळच्या साठवलेल्या प्लॅस्टिक गोळ्याला वितळवून ती बादली दुरुस्त करून त्याचा कुंडी म्हणून किंवा इतर काही उपयोग करायचे.

६. डू विदाऊटः च्याशिवाय काम चालवणे:
हेही खूप वेळा केले जाते. बर्‍याच गोष्टींबाबत विचारपूर्वक.
फटाक्यांवर तर माझा प्रचंड राग आहे. ते घ्यावे लागणे हिच शिक्षा असेल माझ्यासाठी. पियू +१००

७. बाय सेकंड हँडः इतरांनी वापरलेली वस्तु विकत घेणे:

शिकत असताना पुस्तके हमखास सेकन्ड हॅन्ड घेतली जायची.

८. क्रिएटः बनवणे:

आमचाही घरचा फराळ घरीच बनतो. यावेळी २ दा केला गेला. परदेशातील लेक जावयांसाठी केला व पाठवला सुद्धा.
आता घरच्यांसाठी चालूये.
शिवणकाम चालूच असते.

९. स्वॅपः अदलाबदल करणे:

मी व माझी वहिनी अधून मधून साड्या अदलाबदली करतो. मजा येते. पण हे इतकंच. अजून याचं काही व्यापक उदाहरण कुणी देईल का?

१०. ग्रो: ...................बरीच वर्षं ११ एकर जमीनीवर काय काय नाही उगवलं ते विचारा! संपूर्ण शेती(अर्थातच नवरोबांबरोबरच) केली. पण हा छंद असल्याने नंतर जमीन विकली.
पण घरी बरंच काही लावते. नारळ, बर्‍याच भाज्या.... दोडका, दुधी, टोमॅटो, मिरच्या, पुदिना, कारली, लाल भोपळा, कढिलिंब, ओवा असं बरंच काही सतत आलटून पालटून चालूच असतं.
किचनवेस्ट पासून खतही घरीच तयार होतं. ( हे अपसायलकिंग मधे मोडेल का?)

मानुषी,
स्वॅपिंग म्हणजे एक प्रकारचे बार्टरींग. तुमच्याकडील नको असलेली वस्तू देऊन त्या बदल्यात दुसरी हवी असलेली वस्तू मिळवणे. यात पुस्तके, डिविडीज, मुलांचे विडीओ गेम्स, लहांन मुलांंचे कपडे आणि इतर स्ट्रोलरसारख्या वस्तू वगैरे स्वॅप केले जाते. बरेचदा टाईम्/सर्विसेसही स्वॅप केले जाते.

लहान मुलांचे कपड़े ओळखीतल्या ओळखीत बरेचदा एकमेकांचे वापरलेत.

बऱ्याच गोष्टी (लॉन मोवर) सेकंड हैण्ड वापरतो.
एका मित्राने टाकुन दिलेला कूलर रिपेयर करून अजुनही वापरतो आहोत.
आमचा चांगला चालणारा मिक्सर स्टुडेंट्स ना दिला. जून पण चांगले लिनन पण स्टूडेंट्स वापरत आहेत.
मैत्रीणी सोब एकमेकांची मुले संभाळ ण्याचे बरेचदा टाइम शेयर/ बार्टर होते.

अजिबात करत नसलेल्या गोष्टी - mac डी मध्ये न जाणे, घरात पार्टी साठी किंवा इतर वेळी कोक अजिबात न आणणे.
घरी पार्टी असल्यास आणि साधारण पंचवीस पाहुणे असल्यास घरातील स्टीलची ताट वाट्या वगैरे वापरणे. (घरी पंचवीस लोकांचा स्वयंपाक+सर्विंग+जेवण यासाठी पुरेशी भांडी आहेत.)
जास्त लोक असल्यास disposable ताट न वाट्या, पेले वापरावे लागतात. जूस आणि पाणी यात खुप पेले वापरले जातात. मूलच नव्हे तर मोठी माणसं देखिल पेला एकदा वापरला की फेकतात. पेल्यान्शेजारी एक मार्कर ठेवतो. लोकं त्यांची नांवे पेल्यांवर लिहून घेतात. काही महाभाग मात्र तु क टाकतात. But who cares? चांगल्या कारणासाठी तू क झेलायला काही वाटत नाही. लोकांकड़े गेल्यावर diposable पेले वापरत असेल तर मार्कर मागुन आम्ही आमची नांवे लिहीतो. आमचे बघून अजुन काही लोकं पण एकच पेला पार्टी भर वापरतात.

>>ऐपत व आवक नसताना अनावश्यक खरेदी करून खड्ड्यात जाणारे अनेक लोक मला ठाऊक आहेत. <<
ऐपत नसताना अनावश्यक खरेदी हा वेगळा मुद्दा आहे. मी ऐपत असताना अनावश्यक खरेदी बद्द्ल बोलतो आहे.
रोजगार निर्मितीच्या संधी कुठे कुठे लपल्या असतात हा विषय वेगळा आहे. सगळ्यांनाच नैतिकमूल्य सामावलेल्या रोजगाराच्या संधी मिळणार नाहीत. वैद्यकीय व्यवसायात देखील पेशंटला अनावश्यक खर्च करायला लावणारे डॉक्टर्स असतातच की! जीवाच्या भीतीने ते करतात ही! डॉक्टर् ने जास्त खर्च करायला लावला नाही तर तो आपल्या आरोग्याकडे गांभीर्याने पहात नाही अशी समजूत असणारे ही काही पेशंट असतात.

Pages