माझी (न) खरेदी यादी

Submitted by हर्पेन on 18 October, 2014 - 06:05

चेहरे पुस्तकावरील काही पाने विचार प्रवृत्त करतात. माझ्या नजरेस पडलेले त्यातलेच एक पान.

Anti Shopping list small.jpg

'वापरा आणि टाकून द्या' च्या काळात हे जगावेगळे / भलते सलते भासू शकेल. तसेच आपल्या वाड-वडीलांना आर्थिक परिस्थितीमुळे जे करावे लागले ते आता पैसे असताना आपण का करावे असा विचार पण मनात नक्की येईल परंतु आपल्या पुढच्या पिढ्यांकरता आपण किती / कोणती नैसर्गिक संसाधने सोडून जाणार आहोत ह्याचा विचार केला असता ही यादी सतत आपल्या नजरे समोर खरेतर मनात / डोक्यात असायला हवी असे वाटते.

मला माहीत आहे की आपण प्रत्येक जण जाणता-अजाणता का होईना, यातल्या अनेक गोष्टी करत असतो.

यातले काय काय केले अथवा करता येऊ शकेल किंवा केले आहे हे इथे मांडावे. जेणे करून इतरांना त्या कल्पनेचा वापर करता येईल.

एकमेकांच्या कल्पनांचे आदान प्रदान करूया आणि नैसर्गिक साधन संपत्तींचा वापर कमी करूया, गैरवापर टाळूया.

सुरूवात म्हणून दिवाळी निमित्त खरेदी-यादी तयार झाली असताना / करताना यातले काही करता येईल का याचा नक्की विचार करा.

आपण काय केले हे लिहीताना ते कोणत्या क्रमांका खाली मोडेल त्याचा संदर्भ द्या. कृपया धन्यवाद. त्याही प्रकारे एक संदर्भ म्ह्णून ही यादी इथे तयार करता येईल.

No shopping List.jpg

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

५) रिपेअर :- अलीकडे माप बदलल्याने बर्याच pants / shirts/ फंक्शन चे कुडते अचानक ढिले होऊ लागले,
नवीन मापाचे , अटकर बसणाऱ्या कपड्यांचे कितीही आकर्षण वाटले तरी एक आल्टर स्पेशालीस्ट गाठून सगळे नवीन मापात फिट्ट
करून घेतले.

६) च्या शिवाय काम चालवणे :- वर्षभरापुर्वी धावायला सुरवात केली तेव्हा एखादे GPS watch घेण्याची जबरदस्त उबळ आली होती. काही महिने गेल्यावर आपोआप ती गेली . आता पुढची उबळ येईपर्यंत निवांत आहे.

आता याच्या अगदी उलट अनुभव,
सायकलिंग साठी padded शोर्ट घ्यायची होती, नंतर बघू, डीकॅथेलोन ला सेल लागेल तेव्हा घेऊ म्हणून लांबणीवर टाकत होतो, तेव्हा "हि गोष्ट एस्सेन्शिअल मध्ये मोडते, गप गुमान घेऊन ये " अशी कां उघाडणी ऐकून घ्यावी लागली Happy

अभिनंदन सिम्बा बदललेल्या मापाकरता आणि धन्यवाद योग्य वेळेला धागा वर काढलास त्या बद्दल.
पुढच्या ट्रेकच्या तयारीकरता मोठी यादी तयार केली आहे आता त्या यादीत फेरफार करणे क्रमप्राप्तच.

आणि
उलट अनुभवा मधल्या तुझी कानउघाडणी करणार्‍या व्यक्तीकडे नक्कीच तू 'ढु..' दुखतंय म्हणून तक्रार केली असशील Wink

माझी न खरेदी यादी >>>> Sad
हे आधीही वाचलेलं. तेव्हा पटलेलं आणि आपणही असंच करायचं असं ठरवलंही होतं बहुतेक.
आता धागा वर आल्यवर पुन्हा आठवलं.
पगार झाल्यापासुन ७ दिवसात जी काही खरेदी केलीये ती खरंच गरजेची होती का असा विचार आला आता डोक्यात Sad

६) च्या शिवाय काम चालवणे :- ह्या वर्षीच्या 'टाटा मुंबई मॅरॅथॉन'मधे छोट्या प्लॅस्टीकच्या बंद बाटल्यांमधून पाणी देण्याऐवजी कागदी पेल्यातून देण्यात येणार आहे. आपण नेलेली बाटाली असेल तर त्यातही हे पाणी भरून घेता येणार आहेच. खूप आवश्यक आणि चांगला पायंडा ह्या निमित्ताने पाडला जात आहे.

९) एकमेकांच्या वस्तू वापरणे मी स्टोक कांगरी ट्रेक करते वेळी माझ्या एका मैत्रिणीने दिलेली पाठ-पाणपिशवी आणि काठी वापरली होती. बाकीचे बरेच सामान दुसर्‍या एका मित्राने दिलेले वापरले. आताही पुढच्या ट्रेक करता परत त्याच्याचकडचे सामान वापरेन.

हे असं दुसर्‍याक्ड्य्न मागुन वस्तु वापरणे जमणार नाही.
लोक काय म्हणतील किंवा ज्याच्याकडुन वस्तु मागणार तोच काय म्हणेल हे मनात येणारच.

बरोबर आहे सस्मित, माझ्याच्यानेही असे मागणे झाले असतेच असे नाही पण दोन्ही ट्रेकच्या वेळी, मित्रांनीच आपणहून त्यांच्या वस्तू देऊ केल्या होत्या, त्याशिवाय हिमालयातील ट्रेक कधीतरीच होणारे असल्याने त्याकरता लागणाऱ्या वस्तू नंतर मग घरातली जागा व्यापत पडून राहतात, खराब होतात ई ई सांगून मला पटवले गेले.

माझ्याकडे असलेली सॅक मीही दोन तीन वेळा मित्रांना दिलेली आहे. एरवी नाही तरी ट्रेकच्या बाबतीत हे सहज शक्य झाले/ आहे आणि ह्या बाबतीतच काय कुठल्याही बाबतीत लोक काही ना काही म्हणतातच त्यांचे मनावर घेणे सोडून द्यायचे असते. शास्त्र असतं ते Wink

शास्त्र असतं ते बरोबर आहे. Happy
आणि हिमालयातल्या ट्रेकच्या वस्तु वैगेरेसाठी पण बरोबर आहे.
पण इथल्या मिनिमलिस्टिक जीवनपद्धतीच्या धाग्यावरचे (हा धागा पण त्याच धर्तीचा आहे म्हणुन जरा अवांतर लिहित आहे)
प्रतिसाद वाचुन पण मला असाच प्रश्न पडला होता की अशी शेजार्यांकडे भांडी वैगेरे कशी काय मागु शकतो आपण.

न मागायला काय झालं..... खवणी, कातणं, पापडाची लाटणी, सोर्या पटकन आठवलेल्या ह्या वस्तु फिरतीवरच असायच्या .... सुबत्ता आली आणि ह्या गोष्टी हद्दपार झाल्या. भांडी, पाट , ताट-वाट्या, रांगोळं वै गोष्टी शेजारच्यांचेच वापरून कार्यप्रसंग साजरे करण्याचे शास्त्र होते.

मायक्रोवेव्ह या वस्तूच्या मी अजिबात नादी लागलेलो नाही आणि स्वतःहून तरी कधी घेणार नाही.
स्वयंपाकाच्या पारंपरिक पद्धतीवर मी खूष आहे.

आपण विकत घेतलेल्या वस्तू दुरुस्त करता येण्यायोग्य असल्या पाहिजेत. पण त्या तशा नसतात आणि त्यामागे उत्पादक कंपन्यांचाच हात असतो.
उत्पादक कंपन्या अगदी जाणीवपूर्वक त्यांची उत्पादने अशा प्रकारे डिझाइन करतात की वस्तू लवकर खराब व्हावी आणि दुरुस्त करता येण्याजोगी नसावी जेणेकरून आपल्याला त्यांची उत्पादने परत परत विकत घ्यावी लागतील.
ह्याला विरोध म्हणून अमेरिकेत आणि युरोपात दुरुस्ती हक्क चळवळ मूळ धरू पहात आहे.
https://www.nytimes.com/2020/10/23/climate/right-to-repair.html

आपण विकत घेतलेल्या वस्तू दुरुस्त करता येण्यायोग्य असल्या पाहिजेत. पण त्या तशा नसतात आणि त्यामागे उत्पादक कंपन्यांचाच हात असतो.... सहमत हर्पेन.

शिवाय रिसायकलेबल पण नसतात. शक्य असेल तर थोडं महाग घ्यावं पण दोन्ही गोष्टी पडताळून पहाव्यात. इथे डोलर ट्री मध्ये बऱ्याच गोष्टी रिसायकलेबल नसतात , लगेचच तुटून जातात. प्लॅस्टिक कचऱ्यात टाकताना जीव तळमळायचा.
तिथून प्लॅस्टिकचे काहीही घेणे बंद केलंय. एकुणच कमीतकमी केलयं. तिन्ही R आर महत्त्वपूर्ण आहेत... आधी रिड्यूस मगं , रियूज आणि शेवटचा पर्याय रिसायकल ... ही चेकलिस्ट डोक्यात ठेवलीये.

अवांतर होईल इथे कदाचित
एवढ्यातच पुण्यातील एक प्रसिद्ध मिसळ पार्सल आणली
1 प्लास्टिक डबा-तर्री साठी
1 प्लास्टिक पिशवीत उसळ
1- पिशवीत लिंबू 2 फोडी
1-प्ला. पि कांदा
1-प्ला.पि फरसाण
1-प्ला. पि बटाटा भाजी
1 -प्ला. पि पावजोडी
1 प्ला. चमचा
नशीब हे सगळं पोटात ठेवणारा बॉक्स पुठ्याचा होता, अर्थातच भल्या मोठ्या टेप 4 बाजूने चिकटवून..

काय, कसं करायचं इतक्या प्लास्टिक कचऱ्याचे ..?

आम्ही 1) कमी वस्तू वापरणे 2) वस्तू कमी म्हणजे काटकसरीने, पुरवून पुरवून वापरणे ही दोन सूत्रे वापरतो. त्यामुळे कचरा कमी निर्माण होतो. कोणी ह्याला दात कोरून पोट भरणे म्हणतील पण कचऱ्याची निर्मिती 5% जरी कमी झाली तरी हेतू साध्य झाला असे म्हणता येईल. सगळी मलमे, क्रीमे, पेस्टस अगदी शेवट पर्यंत वापरतो. लाटणे वगैरे फिरवून वगैरे. तेलाचा डबा/ पिशवी कणकेने अथवा अन्य पिठाने पुसून घेतो. आधीचे क्रीम संपण्यापूर्वी दुसरे क्रीम घरात आणत नाही. साठवण फारसे करीत नाही. साठवून ठेवलेल्या वस्तू कित्येकदा खराब होतात. बाकी टीवी फ्रिज वगैरे वस्तू व्यवस्थित वापरल्या गेल्यामुळे दीर्घकाळ टिकतात आणि मग त्यांना भंगारात काढावे लागले तरी दु:ख आणि हानी होत नाही. त्याही विकत घेणारे आणि कुठल्याही तऱ्हेने वापर करणारे असतात. काचेची वस्तू फारशी फुटत नाही. तीच तीच वस्तू वापरण्याचा कंटाळा करीत नाही. वस्तू उपयोग करता येण्याजोगी राहिली नाही की मग टाकतो. सेल फोन, चार्जर्स, हेड फोन्स इयर प्लग्स वगैरे मात्र वारंवार बदलावे म्हणजे फेकून द्यावे लागतात. प्लास्टिक पिशव्यांची समस्याही भेडसावते. त्यावर उपाय सापडलेला नाही.

Pages