बँग बँग ?

Submitted by Seema२७६ on 13 October, 2014 - 04:59

कालच बँग बँग का बॅन बॅन नावाचा चित्रपट पाहीला आणि पहीलाच पडलेला प्रश्न म्हनजे तो का पाहीला Happy खरतर मला कोणताच हिरो कींवा हिरोईन आवडत नाही...त्या त्या मुव्हीमध्येच तो आवडतो उदा सलमान हम साथ साथ है मध्ये खुप आवडतो पण तोच किक किंवा जय हो मध्ये नाही..तर असो..मी आपलं निर्विकार मन ठेवुन सिनेमा पाह्यला सुरवात केली...सर्वात पहीला सिन मस्तच होता जिमी शेरगील आणि डॅनीचा संवादही उत्तमच...पण त्यात व्हिलन ज्या प्रकारे येतात आणि डॅनीला घेउन जातात आणि जिमी ला मारतात ते पाहुनच सिनेमाच्या दर्जाची शंका आली पण नवरा म्हणाला सिनेमा आहे जास्त विचार करु नको म्हणुन रुतीक च्या एंट्री ची वाट पाहत राहीले...आला बाबा एकदाचा डोक्यावर टोपी घालुन्...आई ग त्याला पाहुन कळच आली हर्ट मध्ये....त्याचे अ‍ॅप्स पाहुन नाहि...तो किती म्हातारा दिसायला लागलाय ते पाहुन्..एकतर त्याने व्यायाम करुन करुन कंबर एवढी बारीक करुन घेतलीये कि कतरीना पण जाड दिसतेय त्याच्यासमोर...
आता सिनेमाविषयी थोड्क्यात.एकतर हा सिनेमा हॉलीवुड पट नाईट अँड डे(टॉम क्रुस आणि कॅमरीन डियाझ) वरुन कॉपी केलाय जसाच्या तसा... आपल्या रुतीक ने हे केले म्हणुन फार वाईट वाटले म्हंटल ठीक आहे पण रुतीक ने सगळी टॉम ची नक्कल केलीये कपड्यांपासुन.हेच नाय आवड्ल.सिनेमामधे सगळ्यात मोठा व्हिलन डॅनी आहे (१ च नंबर हाच बरा वाटला रुतीक पेक्षा) त्याला पकडायच हा या सिनेमाचा मोटो..मग आता डॅनीला कोहीनुर हिर्यामध्ये ईंटरेस्ट आहे म्हणुन रुतीक तो चोरतो (आता कोहीनुर मध्ये अक्ख्या जगाला ईटरेस्ट आहे ही गोष्ट महत्त्वाची नाही) फक्त डॅनीचा ईटरेस्ट महत्त्वाचा..मग डॅनीचे लोक रुतिक च्या मागे..आता महत्त्वाची गोष्ट कतरिना ला भेटवायच...बिचारीने पहिल्या सीनमध्येच आंघोळ दाखवुन(स्वतः ची) प्रेक्षकांना जागेवर बसवुन ठेवायचे काम ईमानेईतबारे केले आहे असो मग तीला कोणी बॉयफ्रेंड नाही हे तीच्या आजीचे दुखने आहे (किति छान आजी नाहि का?) तीच्या (आजीच्या) ह्या (कतरीनाच्या) वयापर्यंत ३० बॉयफ्रेंड झाले होते अस आजी सांगते मग कतरिना पन जिद्दिला पेटुन कुठेतरी नाव नोंदवुन जाते कोणालातरि भेटायला मग जाताना आजी तीला ओवाळते वैगेरे हा नेहमीचा सीन आहे.मग नेहमीप्रमाने ठरवलेला माणुस न आल्यामुळे आपला हिरो चान्स मारतो आणि त्यांच्या प्रेमाची सुरवात होते ह्ह्ह्ह..
आता हा आपला हिरो चोर असतो का नाहि मग त्याच्या मागे चोर आणी पोलीस दोन्ही पन असतात आता कॅट आणि हिरो एकत्र होते मग सगळे कॅट च्या मागे आणि तीला वाचवायला हिरो कॅट च्या मागे आणि त्यांच्या मागे व्हिलन अशी वरात...मध्येच डोक्यावरुन जाणारी हानामारी शेवटी हीरो कॅट ला वाचवुन बीचवर च नेतो खुप खुप प्रवास करुन बर का? मग आता प्रेम झालय हे काम पुर्ण जवळपास सिनेमाचा मोटो पुर्ण झाला वाटते तेवढ्यात व्हिलन येतात बेटावर मग तुफान हाणामारी (?) हिरो एकटाच वेगवेगळ्या कवायत प्रकारांमध्ये करतो..आधी जमीनीवर हाताने,मग हत्याराने ,मग, मग जाउ द्या खुपच प्रकारे हे जमिनीवरचे प्रकार मग खडे सॉरी हं पाण्यावरचे प्रकार हिरोकडे एकही बॅग नाही पण सगळी हत्यारे त्याच्याकडे आहेत..
हे सगळ झाल्यावर आता हिरोहीरोईन चा किसीग सीन (जो खुप महत्त्वाचा आहे) म्हनुन ते परदेशात जातात तसे पण कॅट ला परदेस पाहायचा पण असतो मग तीथे डॅनी चा उजवा हात असनारा(अजुन एक व्हीलन) हिरो ला दिसतो मग तो कॅट ला गळाला लावुन त्याला टेरेस वर बोलावतो तीथे कॅट आणि त्या व्हिलन चे डॉयलॉग मस्तच आहेत कोहीनुर वरुन...एवढ करुन पण तो मरतो डॅनी चा पता काय सांगत नाय एवढ्या घोळात कतरीना मात्र पोलीसांच्या तावडीत सापडते मग ते तीला नेहमीप्रमाने हिरो ची सच्चाई सांगतात ती पण बिचारी विश्वास ठेवते लगेच काहितर छोटस यंत्र घेऊन बाहेर येते मग ते एका पुलावर येतात हिरो ते यंत्र दाबतो सगळे व्हिलन येतात त्याला तुडवतात आणि नेहमीप्रमानेच कतरीना ला घेउन जातात...
आता शेवट एकदाचा आता हिरो तीथे पोचतो कसा ते विचारु नका...एवढ मार खाउन पण हे पण नाय विचारायच आता ईथे कळत सगळ..हिरो सांगतो डॅनीला हिरा मी चोरला नाहि तुला पकड्ण्यासाठी केल होत म्हणे आता ईथे हे पण कळल हिरो जीमी च्या मरणाचा बदला घ्यायला करतोय हो जीमी आणि रुतीक भाउ भाउ असतात आणि मिलीट्रिरि मध्ये सिक्रेट ड्युटीवर असतात (मला बाई एवढच कळल मिलीटरि मध्ये सिक्रेट मेंटेन करायचे असतात म्हणुन नीट नसेल सांगीतले बहुधा) आपल्या कतरीना घरि काम नसतं तेव्हा ती डेहराडुन ला त्याच्या (हिरोच्या)घरि जाते अशिच तेव्हा याचा उलगडा होतो हे मध्येच घडत कधीतरी मग काय नेहमीची मारामारी तीच वर्णन करण अशक्य आहे...आणि नेहमीप्रमाने शेवट होतो
कतरीना पण हिरो ला गुंगी ची दवा देऊन बीचवर घेउन जाते (कॅमरीन पण गेली होती म्हनुन)
यात बीचार्या कॅटवर बर्याच वेळा गूंगी ची दवा देऊन हीरो ने बरच काय काय केल आहे...पण सिनेमाची ती गरज आहे
एकंदरित एकदम बकवास सिनेमा आहे....बकवास कॉपी ..कुठेही नाईट अँड डे च्या जवळपास पण जात नाहि...भ्रष्ट अ‍ॅक्शन्स आहेत्..रुतीक खुप म्हातारा दिसलाय कॅट ने आपले काम बरे केले आहे...काही विसरले असल्यास वाचकांनी भर घालावी...

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रुतीक खुप म्हातारा दिसलाय

ह्म्म्म... डोळे येण्याची साथ आली आहे .. तपासून घ्या ..( ऋतिक मस्त दिसलाय ..अभिनय नाहीच )
बाकी चित्रपट भिकार आहेच !

मस्त परीक्षण. तुम्ही अजून लिहीत जा. हृतिक म्हातारा झाला आहे नक्की. आणि कॅट्रिना सॉइ सॉई आणि मेफूज असे म्हणते एकंदरित तिला बघूनच माझा फ्यूज उडाला मी अर्ध्यात बाहेर पळून गेले.
पन्नाशीतली खानावळ परवडली आणि टॉम्या पण आमचा पन्नाशीतलाच आहे. पण कीती गोड दीसतो. पूर्ण पैसे वाया सीनेमा आहे.

मूळात, डे अँड नाईट पण फार ग्रेट नव्हताच. हृतिकने चित्रपट निवडताना काळजी घ्यायला हवी.
( आता त्याचे बाबा एक छानसा "के" पट काढतील. )

आधी हृतिक असे लिहा बघू. ते रुतिक वाचून डोळे पाणावले.

या तरी चित्रपटात ह्रितिक मस्तच दिसतोय. वयाची चाळीशी जवळ आली शिवाय याच चित्रपटादरम्यान झालेल्या प्राणघातक जखमेमुळे तब्बेतीवर बराचसा परिणाम झालेल आहेच. (पर्सनल लाईफमधले प्रॉब्लेम वेगळेच ते असो)

तरीही कतरीना आणी ह्रितिक दोघंही मस्त दिसतात.

कथेच्या बाबतीत जितकं कमी बोलावं तितकं उत्तम!!!

चित्रपटाचे नाव समजले तेव्हाच हा चित्रपट आपल्यावर बुमरँग होऊ शकतो ह्याची कल्पना आली होती आता पाहण्याचा प्रश्नच नाही. माझे अमुल्य असे पैसे आणि वेळ वाचवल्याबद्दल धन्यवाद.:D

असाच एक हैदर पण पाहीलाय पण त्याच्यावर लिहावस पण वाटत नाही...

मस्त परीक्षण. तुम्ही अजून लिहीत जा
>>>
धन्यवाद अमा..
टॉम्या पण आमचा पन्नाशीतलाच आहे. पण कीती गोड दीसतो...
>>>
प्रत्येक सिनेमामध्ये त्याच ते बघन.. आई ग...कलेजा खलास
चित्रपटादरम्यान झालेल्या प्राणघातक जखमेमुळे तब्बेतीवर बराचसा परिणाम झालेल आहेच
>>
हे माहीतच नव्हत मला...

हो, या चित्रपटामधील एका अ‍ॅक्शन दृश्यामध्ये त्याच्या डोक्याला जबर दुखापत झाली होती,त यासाठी ब्रेन सर्जरी करावी लागली होती. जवळ जवळ तीन महिने तो घरी होता.

पण दाढीची खूरटी करडी व्हायला लागली आहेत (नशीब बापासारखे केस गेले नाहीत!!! त्याच्याकडे टकलाची अनुवंशिकता आहे!) आता त्याला हॉलीवूड ऑफर्स कराव्याशा वाटत आहेत. कहो नानंतर त्याल आप मुझे अच्छे लगने लगे, ना तुम जानो ना हम, मुझसे दस्स्ती करोगे सारखे अगम्य पिक्चर हॉलीवूडपेक्षा जास्त महत्त्वाचे वाटले होते.

पण दाढीची खूरटी करडी व्हायला लागली आहेत (नशीब बापासारखे केस गेले नाहीत!!! त्याच्याकडे टकलाची अनुवंशिकता आहे!)
>>
एकवेळ टकला पण बरा वाटला असता पण दाढीमुळे तो वयस्कर आणि थकलेला दिसतोय शिवाय त्याची हनुवटी खाली ओघळलीये चेहर्याचा भाग वाटत नाये...

बरं एक गोष्ट सांगा , ह्या शिनिमाचं नाव ' बँग बँग ' का हाये ?
>>>
ते आता हृतिक च्या बाबांना विचारायला पाहीजे..

बरं एक गोष्ट सांगा , ह्या शिनिमाचं नाव ' बँग बँग ' का हाये ? >>> चित्रपट बघितल्यावर प्रेक्षकांना डोके बँग बँग करावेसे वाटेल ह्याची पूर्वसूचना आहे ती Proud
( मला ती कळल्यामुळे मी पाहिलेला नाही. )

ड्रायवॉश च्या बातमीनंतर लगेच जे जॉय अलुकाचे पोस्टर आले त्यातच तो चेहरा ओघळलेला आणि म्हातारा दिसू लागला आहे. मला ते रोजच दिसते कारण हपीसच्या वाटेवरच आहे.

चित्रपट बघितल्यावर प्रेक्षकांना डोके बँग बँग करावेसे वाटेल ह्याची पूर्वसूचना आहे ती
( मला ती कळल्यामुळे मी पाहिलेला नाही. )
>>
Lol

चित्रपट पाहिला नाही. धन्यवाद आता बघणार पण नाही...
पण गाणे मस्त आहेत,,, शेखरच मेहरबा.... कीत्ती दा ऐकलं तरी परत परत ऐकावेसे वाटते..:)

फष्ट कल्लास परिक्षण ! लय करमणूक झाली. हृतिकचे पुढचे पिक्चर पाहिन की नाही , ते माहित नाही , पण तुमची पुढील परीक्षणे नक्की वाचणार ! लिखते रहियो जी !

आज काल गाजावाजा केलेले बरेच सिनेमा डोके ब्यांग ब्यांग च्या लायकीचे असतात !

फक्त उत्तम मार्केटिंग च्या जोरावर एखादा भिक्कार सिनेमा ही पैसा गोळा करु शकतो हे त्याच उत्तम उदाहरण आहे

लोकं माशी टु माशी कॉपी करायला का जातात काय माहीत? याने म्हणे २०० कोटीचा धंदा केला आणी त्या हैदरने फक्त ७ कोटी.

माशी टू माशी कॉपी नाहीये, सुरूवात आणि स्टोरीलाईन बरीच बदलली आहे. स्टंट टॉम क्रूझपेक्षा भारी आहेत. शेवटाला जाऊन वाईटरीत्या माती खाल्ली आहे. तिथं सगळाच घोळ घालून ठेवला आहे.

बाकी कुणी काहीही म्हणो, स्वतःच्या बंगल्याला "घर" असे नाव देणार्‍या माणसाच्या क्रीएटीव्हीटीचे मला जाम म्हणजे जाम कौतुक वाटले.

बिचारीने पहिल्या सीनमध्येच आंघोळ दाखवुन(स्वतः ची) प्रेक्षकांना जागेवर बसवुन ठेवायचे काम ईमानेईतबारे केले आहे असो मग तीला कोणी बॉयफ्रेंड नाही हे तीच्या आजीचे दुखने आहे (किति छान आजी नाहि का?) तीच्या (आजीच्या) ह्या (कतरीनाच्या) वयापर्यंत ३० बॉयफ्रेंड झाले होते अस आजी सांगते मग कतरिना पन जिद्दिला पेटुन कुठेतरी नाव नोंदवुन जाते कोणालातरि भेटायला मग जाताना आजी तीला ओवाळते वैगेरे ... Lol मी बघणार Lol

शिवाय त्याची हनुवटी खाली ओघळलीये चेहर्याचा भाग वाटत नाये >>> Sad

ऋतिक मला लूक बाबत फक्त एकदाच आवडला होता, कहो ना प्यार है, तो देखील त्यातील पहिला रोल मध्ये, त्याची पहिलीच एंट्री.. ती निरागसता पुन्हा कधी दिसलीच नाही.. Sad

तो त्याचा ओरिजिनल चेहरा होता, नंतर त्याने व्यायाम करूनकरून ते बेबीफॅट घालवलं. तसा थोडाफार तो फिझा, मिशन काश्मीर आणि लक्ष्यमध्ये दिसला होता.

कोइ मिल गयाच्या वेळी त्यानं खूप वजन अचानक उतरवलं, मग जोधाअकबरसाठी वजन वाढवलं, सगळाच परिणाम तब्बेतीवर झालेला आहे. शिवाय व्यसनं आहेतच जोडीला. तरीही मला तो या सिनेमामध्ये आवडला. त्याचा स्क्रीन प्रेझेन्स जबरदस्त आहे, स्टंट क मा ल आहेत. हे कॅरेक्टर खरंतर धूम २ चंच एक्स्टेन्शन झालंय, धूम२ सारखी अजून थोडी स्टाईल दिली असती तर मझा आला अस्ता.

प्रकाश बाबा आमटे.....

आजच्या काळात असा सिनेमा काढतात? समृद्धी पोरे वेड्या आहेत किंवा पैसे कुठे खर्च करावेत असा प्रश्नं असावा.पुढची यादी वाचा कळेल त्यात काय काय नाहीये ते - व्हिलन नाही, बागेतली गाणी, आयटम सौंग नाहीत. नानाचे जबरा डायलॉग नाहीत, पुढे काय घडणार याची उत्सुकता नाही, कौमेडी नाही, लोकेशन्स नाहीत, मोठाले बंगले, गाड्या, देखण्या बायका नाहीत.
जे आहे ते मात्रं अंगावर येतं. एक प्रार्थना आहे, साधा नाना आणि सोनाली आहे, आदिवासी आहेत, त्यांचे आजार आहेत, हताश परिस्थिती आहे, कल्पनेच्या बाहेरची संकट आहेत, अंगावर काटा आणि डोळ्यात टचकन पाणी आणणारी वस्तुस्थिती आहे. आपल्या खुजेपणाची, क्षुद्रत्वाची जाणीव करून देणारी क्वचितच घडू शकणारी सत्यकथा आहे.
असो! या सिनेमाचे परिक्षण वगैरे करायच्या भानगडीत मी पडणार नाही, तेवढा वकूबही नाही. दिवसेंदिवस समाजातील आदर्श कमी होत असताना असे सिनेमे पाहिले की दिलासा मिळतो. अव्यक्तं, निरपेक्ष प्रेम दुर्मिळ झालंय त्यामुळे हेमलकसाला वीज नाही म्हटल्यावर वीस वर्ष साधना ताईंनी तिकडे पंखा लावला नाही हे ऐकल्यावर, मुलाकडे लक्ष ठेवा, येताना एक लेकरू रस्त्यात गेलं त्याला पुरून येते हे ऐकल्यावर क्षणभर पडद्यावरील चित्रं दिसेनासं झालं.
मोजून १०० लोक असतील बघायला. वाईट वाटलं. लोकांना चिरडणा-या, लायकीशिवाय पद्मश्री मिळणा-या हिरोंचे सिनेमे पहिल्या दिवशी जेवढा गल्ला जमवतात तेवढा सुद्धा एकूण धंदा होणार नाही कदाचित. पण लायकीमुळे पद्मश्री, रेमन मगसेसे मिळालेल्या या रिअल हिरोला पदरमोड करून पहायला हरकत नाही. तेवढं देणं आपण निश्चितच लागतो त्यांचं.
डॉ.प्रकाश बाबा आमटे हा चित्रपट प्रदर्शित झालेला आहे, आपण कुटुंबासह जरुर पहावा...

तो त्याचा ओरिजिनल चेहरा होता, नंतर त्याने व्यायाम करूनकरून ते बेबीफॅट घालवलं. तसा थोडाफार तो फिझा, मिशन काश्मीर आणि लक्ष्यमध्ये दिसला होता.
>>>

व्यायामाचे मला काही कळत नाही पण तो अनावश्यक स्टाईली पण मारू लागला. बरेचदा मॉडेल जेव्हा अभिनयक्षेत्रात उतरतात तेव्हा स्टाईल मारणे, स्मार्ट वावर यालाच अभिनय समजत त्यांचे दुकान चालू असते. मला तो त्यातलाच एक वाटू लागला.

फिजा, मिशन काश्मीर ... येस्स.. पण त्यात त्याच्या कॅरेक्टरला एक उदास लूक होता. प्रत्येक फ्रेममध्ये... तरीही फिजाच्या माही माही रे गाण्यात गोड वाटला ..

त्या लूकमधील ऋतिक मला नेहमीच भावला, आणि त्याच्याबद्दल एक आपलेपणा पण नेहमीच वाटला.. अगदी त्याचे लग्न फिस्कटले तेव्हाही फार वाईट वाटले.

आपल्या खुजेपणाची, क्षुद्रत्वाची जाणीव करून देणारी क्वचितच घडू शकणारी सत्यकथा आहे.>>+ 10000

ही कथा कोणत्या देशात घडते ते काहिच कळले नाही.

दिवसा ढवळ्या एवढा गोळीबार केल्या नंतर एकदाही कधिच पोलिस आलेले दिसत नाहीत. परदेशात हे सगळ घडतं म्हणाव तर कत्रिना गाडी चालवत डेहेरादुनला जाते.

Pages