बँग बँग ?

Submitted by Seema२७६ on 13 October, 2014 - 04:59

कालच बँग बँग का बॅन बॅन नावाचा चित्रपट पाहीला आणि पहीलाच पडलेला प्रश्न म्हनजे तो का पाहीला Happy खरतर मला कोणताच हिरो कींवा हिरोईन आवडत नाही...त्या त्या मुव्हीमध्येच तो आवडतो उदा सलमान हम साथ साथ है मध्ये खुप आवडतो पण तोच किक किंवा जय हो मध्ये नाही..तर असो..मी आपलं निर्विकार मन ठेवुन सिनेमा पाह्यला सुरवात केली...सर्वात पहीला सिन मस्तच होता जिमी शेरगील आणि डॅनीचा संवादही उत्तमच...पण त्यात व्हिलन ज्या प्रकारे येतात आणि डॅनीला घेउन जातात आणि जिमी ला मारतात ते पाहुनच सिनेमाच्या दर्जाची शंका आली पण नवरा म्हणाला सिनेमा आहे जास्त विचार करु नको म्हणुन रुतीक च्या एंट्री ची वाट पाहत राहीले...आला बाबा एकदाचा डोक्यावर टोपी घालुन्...आई ग त्याला पाहुन कळच आली हर्ट मध्ये....त्याचे अ‍ॅप्स पाहुन नाहि...तो किती म्हातारा दिसायला लागलाय ते पाहुन्..एकतर त्याने व्यायाम करुन करुन कंबर एवढी बारीक करुन घेतलीये कि कतरीना पण जाड दिसतेय त्याच्यासमोर...
आता सिनेमाविषयी थोड्क्यात.एकतर हा सिनेमा हॉलीवुड पट नाईट अँड डे(टॉम क्रुस आणि कॅमरीन डियाझ) वरुन कॉपी केलाय जसाच्या तसा... आपल्या रुतीक ने हे केले म्हणुन फार वाईट वाटले म्हंटल ठीक आहे पण रुतीक ने सगळी टॉम ची नक्कल केलीये कपड्यांपासुन.हेच नाय आवड्ल.सिनेमामधे सगळ्यात मोठा व्हिलन डॅनी आहे (१ च नंबर हाच बरा वाटला रुतीक पेक्षा) त्याला पकडायच हा या सिनेमाचा मोटो..मग आता डॅनीला कोहीनुर हिर्यामध्ये ईंटरेस्ट आहे म्हणुन रुतीक तो चोरतो (आता कोहीनुर मध्ये अक्ख्या जगाला ईटरेस्ट आहे ही गोष्ट महत्त्वाची नाही) फक्त डॅनीचा ईटरेस्ट महत्त्वाचा..मग डॅनीचे लोक रुतिक च्या मागे..आता महत्त्वाची गोष्ट कतरिना ला भेटवायच...बिचारीने पहिल्या सीनमध्येच आंघोळ दाखवुन(स्वतः ची) प्रेक्षकांना जागेवर बसवुन ठेवायचे काम ईमानेईतबारे केले आहे असो मग तीला कोणी बॉयफ्रेंड नाही हे तीच्या आजीचे दुखने आहे (किति छान आजी नाहि का?) तीच्या (आजीच्या) ह्या (कतरीनाच्या) वयापर्यंत ३० बॉयफ्रेंड झाले होते अस आजी सांगते मग कतरिना पन जिद्दिला पेटुन कुठेतरी नाव नोंदवुन जाते कोणालातरि भेटायला मग जाताना आजी तीला ओवाळते वैगेरे हा नेहमीचा सीन आहे.मग नेहमीप्रमाने ठरवलेला माणुस न आल्यामुळे आपला हिरो चान्स मारतो आणि त्यांच्या प्रेमाची सुरवात होते ह्ह्ह्ह..
आता हा आपला हिरो चोर असतो का नाहि मग त्याच्या मागे चोर आणी पोलीस दोन्ही पन असतात आता कॅट आणि हिरो एकत्र होते मग सगळे कॅट च्या मागे आणि तीला वाचवायला हिरो कॅट च्या मागे आणि त्यांच्या मागे व्हिलन अशी वरात...मध्येच डोक्यावरुन जाणारी हानामारी शेवटी हीरो कॅट ला वाचवुन बीचवर च नेतो खुप खुप प्रवास करुन बर का? मग आता प्रेम झालय हे काम पुर्ण जवळपास सिनेमाचा मोटो पुर्ण झाला वाटते तेवढ्यात व्हिलन येतात बेटावर मग तुफान हाणामारी (?) हिरो एकटाच वेगवेगळ्या कवायत प्रकारांमध्ये करतो..आधी जमीनीवर हाताने,मग हत्याराने ,मग, मग जाउ द्या खुपच प्रकारे हे जमिनीवरचे प्रकार मग खडे सॉरी हं पाण्यावरचे प्रकार हिरोकडे एकही बॅग नाही पण सगळी हत्यारे त्याच्याकडे आहेत..
हे सगळ झाल्यावर आता हिरोहीरोईन चा किसीग सीन (जो खुप महत्त्वाचा आहे) म्हनुन ते परदेशात जातात तसे पण कॅट ला परदेस पाहायचा पण असतो मग तीथे डॅनी चा उजवा हात असनारा(अजुन एक व्हीलन) हिरो ला दिसतो मग तो कॅट ला गळाला लावुन त्याला टेरेस वर बोलावतो तीथे कॅट आणि त्या व्हिलन चे डॉयलॉग मस्तच आहेत कोहीनुर वरुन...एवढ करुन पण तो मरतो डॅनी चा पता काय सांगत नाय एवढ्या घोळात कतरीना मात्र पोलीसांच्या तावडीत सापडते मग ते तीला नेहमीप्रमाने हिरो ची सच्चाई सांगतात ती पण बिचारी विश्वास ठेवते लगेच काहितर छोटस यंत्र घेऊन बाहेर येते मग ते एका पुलावर येतात हिरो ते यंत्र दाबतो सगळे व्हिलन येतात त्याला तुडवतात आणि नेहमीप्रमानेच कतरीना ला घेउन जातात...
आता शेवट एकदाचा आता हिरो तीथे पोचतो कसा ते विचारु नका...एवढ मार खाउन पण हे पण नाय विचारायच आता ईथे कळत सगळ..हिरो सांगतो डॅनीला हिरा मी चोरला नाहि तुला पकड्ण्यासाठी केल होत म्हणे आता ईथे हे पण कळल हिरो जीमी च्या मरणाचा बदला घ्यायला करतोय हो जीमी आणि रुतीक भाउ भाउ असतात आणि मिलीट्रिरि मध्ये सिक्रेट ड्युटीवर असतात (मला बाई एवढच कळल मिलीटरि मध्ये सिक्रेट मेंटेन करायचे असतात म्हणुन नीट नसेल सांगीतले बहुधा) आपल्या कतरीना घरि काम नसतं तेव्हा ती डेहराडुन ला त्याच्या (हिरोच्या)घरि जाते अशिच तेव्हा याचा उलगडा होतो हे मध्येच घडत कधीतरी मग काय नेहमीची मारामारी तीच वर्णन करण अशक्य आहे...आणि नेहमीप्रमाने शेवट होतो
कतरीना पण हिरो ला गुंगी ची दवा देऊन बीचवर घेउन जाते (कॅमरीन पण गेली होती म्हनुन)
यात बीचार्या कॅटवर बर्याच वेळा गूंगी ची दवा देऊन हीरो ने बरच काय काय केल आहे...पण सिनेमाची ती गरज आहे
एकंदरित एकदम बकवास सिनेमा आहे....बकवास कॉपी ..कुठेही नाईट अँड डे च्या जवळपास पण जात नाहि...भ्रष्ट अ‍ॅक्शन्स आहेत्..रुतीक खुप म्हातारा दिसलाय कॅट ने आपले काम बरे केले आहे...काही विसरले असल्यास वाचकांनी भर घालावी...

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फष्ट कल्लास परिक्षण ! लय करमणूक झाली. हृतिकचे पुढचे पिक्चर पाहिन की नाही , ते माहित नाही , पण तुमची पुढील परीक्षणे नक्की वाचणार ! लिखते रहियो जी !

>>>
धन्यवाद ...

मला नाईट अँड डे हा खुप आवडला होता...म्हणजे टॉम आणि कॅमरीन माझे आवडते कलाकार आहे...खुप सिंम्पल वागने असते दोघांचे...पण ईथे ऋतिक सगळ कॉपी करुन स्वतःची ईमेज घालवुन बसलाय..

चित्रपट बघितल्यावर प्रेक्षकांना डोके बँग बँग करावेसे वाटेल ह्याची पूर्वसूचना आहे ती
( मला ती कळल्यामुळे मी पाहिलेला नाही. )

>>

Lol बरोबर मी पण.

हृतिक बद्दल थोडेसे:

मला आधी हृतिक आवडायचा. पण बापाने इतर इंग्रजी चित्रपटांची कॉपी करुन त्याचा क्रिश करुन वाट लावली त्याच्या करिअरची. नाही तर मुळात तो जबरदस्त ताकदीचा नट आहे. मला हीच तक्रार काही वर्षांनी रणबीर बाबत करायला लागू नये म्हणजे झालं.

आणखी थोडे:
हृतिकसारख्या जबरदस्त ताकदीच्या नटाने एखाद्या मेगासिरिअलमधे काम करुन पहावे. अनिल कपूरच्या २४ मधे त्याला पहायला आवडले असते. हल्लीच्या सिनेमात ज्या कथा असतात (or the lack of it) त्या बघितल्यावर ताकदीची पटकथा हे ऑफ बीट सिनेमातच बघायला मिळेल की काय अशी भिती वाटते.

मला हीच तक्रार काही वर्षांनी रणबीर बाबत करायला लागू नये म्हणजे झालं.
>>>>>

"रॉकस्टार" , "बर्फी" यासारख्या चित्रपटांमधील वेगळ्या भुमिका,
"सेल्समन ऑफ द ईयर रॉकेटसिंग" , "वेक अप सिद" सारखे सिनेमे सहजपणे स्विकारायची दाखवलेली हिंमत,
आणि "अजब प्रेम की गजब कहाणी" सारख्या हलक्या फुलक्या पटात त्याच्यात राजकपूर सारखा दिसलेला निरागसपणा..

एकंदरीत त्याचे टॅलेंट आणि त्याचा अ‍ॅटीट्यूड पाहता त्याच्या चित्रपट कारकिर्दीबद्दल त्याला किंवा आपल्याला खंत वाटावे असे घडू नये. Happy

अवांतराबद्दल क्षमस्व - पण रणबीर आपला फेव्हरेट Happy

रणबीरनं अ‍ॅक्टिंगपेक्षा जास्त लक्ष प्रॉडक्शनकडं द्यायला सुरूवात केली आहे. त्यामुळं तो फारसे प्रोजेक्ट घेत नाहीये

रुतिक (अहा, किती सोप्प आहे हे लिहायला) Happy कोई मिल गया मधे फारफार आवडला होता त्याच्या 'बुद्धीची कमी वाढ' असलेल्या भुमिकेत. इतर भुमिकेत तो जरा कमीच आवडला. मिशन कश्मीर तरी बरा पण 'मुझसे दोस्ती..' वगैरेत इतका अवघडलेला व खोटाखोटा उत्साही वाटत होता की तो पण नंतर हळहळला असेल 'हे मी काय केले' असे वाटून.

नाचतो अप्रतिम तरी का खटकायचे ते लेखाच्या 'त्याने व्यायाम करुन करुन कंबर एवढी बारीक करुन घेतलीये' या वाक्यातुन कळले. त्यात पुन्हा सीथ्रु शर्ट घालुन नाचताना अजुनच बायकी वाटायचे.
पण एकुण चांगला आहे. डायलाग डिलीवरीत जरा मार खातो.

मला पुर्वीचा कहो ना प्यार है मधला हृतिक भयंकर आवडतो. धूम वगैरे मध्ये दिसतो छानच पण फार ग्रीक गॉड वाटतो. कहो ना प्यार है मध्ये तो (अ व्हेरी हँडसम) बॉय नेक्स्ट डोअर वाटला होता. Happy

बँग बॅंग बघायचाय. अजुनही आहे का एलए मध्ये बघायला हवं.

आता थोडेसे कतरीनाबद्दलही बोलूया.
मॅडमनी काहीतरी अमाप प्रकारच्या वेगवेगळ्या बिकीनी घातल्यात तो हाच चित्रपट का?

पुर्ण चित्रपट हास्यास्पद असतानाही मी एकाच सीन ला हसले जेव्हा आजीला रिपोर्टर सिरीयल जास्त बघु नका म्हणतो तेव्हा.हृतिक जिंदगी मिले ना दुबारा मधे जास्त आवडला होता. ती पण कॉपीच होती .अश्या कॉप्या मात्र बेस्टच.

रणबीरनं अ‍ॅक्टिंगपेक्षा जास्त लक्ष प्रॉडक्शनकडं द्यायला सुरूवात केली आहे. त्यामुळं तो फारसे प्रोजेक्ट घेत नाहीये
>>>
ओके
पण शेवटी तो ग्रेट कपूर फॅमिलीतून आलाय. मल्टीटॅलेंटेड, मल्टीटास्कींग.. यातून त्याची चित्रपटांबाबतची जाण आणि प्रगल्भता वाढेलच. आणि जे कलागुण अंगी आहेत ते तो फुकट नक्कीच घालवणार नाही ..
बाकी ते बेशरम आणि बद्दतमीज दिल (यात कुठलेतरी एक गाण्याचे नाव आहे तर एक पिक्चरचे) वगैरे करण्यापेक्षा निवडकच केलेले बरे Happy

आता थोडेसे कतरीनाबद्दलही बोलूया.
मॅडमनी काहीतरी अमाप प्रकारच्या वेगवेगळ्या बिकीनी घातल्यात तो हाच चित्रपट का?
>>
हो...तीला तेवढच काम आहे ना...

आवडला लेख. कोणताही आव न आणता, भूमिका न घेता चित्रपट पाहणे आणि त्यावर लिहिणे दोन्ही आवडले.
>>
धन्यवाद...पहिल्यांदाच लिहलय संपुर्ण टाईप झाल्यावर खुप वेळ विचार करत होते टाकू की नको..

फिजा, मिशन काश्मीर ... येस्स.. पण त्यात त्याच्या कॅरेक्टरला एक उदास लूक होता. प्रत्येक फ्रेममध्ये... तरीही फिजाच्या माही माही रे गाण्यात गोड वाटला ..>>>> हज्ज्जार मोदक...

त्या उदास लूकमध्येच आवडला तो.. त्यात त्याचे डोळेच जास्त बोलके वाटले मला.

मला तो जास्त करुन कहो ना,कभी खुशी आणि कोई मिल गया मध्ये छान वाटला...बाकी ठीकानी त्याचे वावरने आर्टीफीशल वाटले...
बाकी धुम बद्दल बोलायचे म्हंटले तर तो जॉन शिवाय कोनालाच सुट होत नाही कारण जॉनच्या चेहर्यावर जे बेफीकीर भाव दिसतात ना ते एकदम ओरिजीनल आहेत्...

आवडला लेख. कोणताही आव न आणता, भूमिका न घेता चित्रपट पाहणे आणि त्यावर लिहिणे दोन्ही आवडले. >>> सहमत. आवडले परीक्षण!

त्याइतका बेक्क्कार तो आजवर कधीच दिसला नाही.
>>>
यादे मधे करिना वर सगळा खर्च केलाय ना...त्याच्यावाटयाला काही आलेच नाहि...

चित्रपट आणि हृतिक विषयी:
चित्रपटाचे शीर्षक योग्य आहे. चित्रपटाला जातांनाच मनाची तयारी करावी की यात मारामारी, स्टंट, बंदुकीच्या गोळ्या असणार!
मला तर बुवा तुरुंगात पिझ्झा खाणारा व्हिलन खूप आवडला.
दाढीवाल्या व्हिलन कडून जंगलात हृतिकने बंदूक हिसकवण्याचा प्रसंग मजेशीर.
सगळे स्टंट हृतिक ने स्वत: केले आहेत. त्याची मेहेनत पडद्यावर जाणवते.
आपण जेव्हा एखादा "एक्शन" चित्रपट बघतो तेव्हा स्टोरी ची अपेक्षा करू नये म्हणजे एक्शन एन्जॉय करता येते.
हृतिक चा डान्स छान आहे.
चित्रपट पैसा वसूल आहे.

थोडे कतरिना विषयी:
कतरिना या चित्रपटात सुद्धा मादक दिसते. पण हृतिक च्या बॉडी मुळे तिला तिची बॉडी दाखवायला जास्त वाव नाही. पण या चित्रपटात हृतिक ने घेतलेल्या कतरिना च्या कीस मध्ये मादकता जाणवते.
धूम २ मधल्या ऐश्वर्याच्या कीस पेक्षा ही हॉट होता हा बैंग बैंग मधला कीस!!
पण एकूण या चित्रपटापेक्षा कतरिना तीस मार खान आणि धूम थ्री च्या गाण्यात जास्त मादक दिसते.
"नाईट एंड डे" मधल्या केमरून डीयाझ सारखी अगदी छोट्या बिकिनीत मात्र कतरिना यात दिसत नाही. Sad

पण एकूण मला सांगावेसे वाटते की:
"कोहिनूर चुराया है (इस मूव्ही मी मैने) यार, (मेरी) कुछ तो इज्जत करो (मूव्ही को हिट करके) !!"

त्याइतका बेक्क्कार तो आजवर कधीच दिसला नाही. > तुम्ही "मै प्रेम की दिवानी हु" नावाचा शतकातुन एकदाच बनणारा एकमेव अद्वितिय चित्रपट बघितला नाही का ?

<<आधी हृतिक असे लिहा बघू. ते रुतिक वाचून डोळे पाणावले.>>

+१

माझे डोळे सगळंच वाचून पाणावले. हार्टच्या जागी हर्ट काय..सगळीकडे ण ऐवजी न काय...एकंदरित सगळंच परीक्षण असं इतकं अशुध्द का लिहिलंय?
चित्रपट मी पाहिलाय..तो टुकार आहेच..तुम्ही त्याची चिरफाडही उत्तम केली आहे Happy लिखाण छानच आहे तुमचं सीमा पण जरा शुध्दलेखनाकडे लक्ष दिलंत तर बरं होईल!

सीमा पण जरा शुध्दलेखनाकडे लक्ष दिलंत तर बरं होईल!
>>
हो नक्कीच पुढच्या वेळेला ....चुका होणार नाहीत...धन्यवाद Happy

Pages