पन्नाशीपुढची वाटचाल

Submitted by अश्विनीमामी on 9 October, 2014 - 05:28

पन्नाशीत पाउल ठेवताना असे जाणवते कि अजून दहा अ‍ॅक्टिव्ह वर्षे आपल्या हातात आहेत. त्यानंतर ऑफिशिअली रिटायर व्हायचेच आहे. पण कितीतरी गोष्टी करता येतात. आवडीचे शिक्षण, छंद, भटकंती,
संसाराच्या, नोकरीच्या धावपळीत राहून गेलेले बरेच काही आता आरामात करता येते.

बदलत्या जीवनमानानुसार व चांगल्या आरोग्यसेवांच्या उपलब्धतेमुळे आता खर्‍या अर्थाने ज्येना होण्यास पंचाहत्तरी तरी गाठावी लागते. खुद्द पुण्यनगरीतच ह्याहूनही पुढचे कितीतरी विद्वान, हसरे अ‍ॅक्टिव ज्येना आहेत. जगभरातच जीवनाच्या ह्या कालखंडाकडे बघण्याचा दृष्टिकोण बदलत आहे.
व्यवस्थित प्लॅनिन्ग केल्यास, आरोग्य, अर्थ आणि भावनिकद्र्ष्ट्या अतिशय छान, आनंदी जीवन,
वयाच्या पन्नास ते पंचाहत्तर ह्या कालखंडात जगणे शक्य आहे.

पहिला गोल साठीपर्यंत पोहोचणे हा असावा. त्यासाठी आरोग्याचे तसेच पैशाचे व्यवस्थापन गरजेचे आहे. तसेच मुलांच्या जीवनात मायक्रो मॅनेजमेंट न करता आपला रोल आता कन्सल्टंट/ ऑकेजनल हेल्पर असा राहणार आहे हे उमजून घेउन आपले स्वतःचे जीवन कसे जास्त एन्रिच करता येइल या संबंधाने चर्चेसाठी हा बाफ उघडला आहे.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

१९९२ च्या शतायुषी मधे पु.ल. देशपांडेंचा एक पिकत जाणारे म्हातारपण कि असाच काहीसा लेख होता. नेट वर शोधून पाहिला सापडेल कि नाही शंका आहे.

त्यातला शेवटचा परिच्छेद

म्हातारपण सुखाता कसे घालवावे यावर 'रामबाण' असा एकच उपाय नाही. आपले म्हातारपण शक्य तितके इतरांना उपद्रवी न होईल अशा रितीने सांभाळणे हे ज्याने त्याने विचारपूर्वक ठरवायला हवे. आपण आयुष्यात जो मार्ग चोखाळला तोच काय तो योग्य होताहे विसरायला हवे आणि आपल्याला कोणी जुमानीत नाही हा विचार आधी काढून टाकायला हवा आणि आहे त्या अवस्थेत आपण लहानशा प्र्समानात का होईन पण आपल्या कुटुंबात उपयुक्त किती होऊ याचा विचार करुन जगणार्‍या म्हातार्‍याना छानपैकी पिकत जाता येते. असा पिकलेला म्हातारा सर्वांना हवा असतो.

ईथे चर्चा पन्नाशीची चालू आहे आणि पन्नाशी म्हणजे काही वार्धक्य नव्हे हे माहीत आहे. पण माझ्या उतारवयासाठी जपुन ठेवलेला हा 'उतारा'

बाकी वाचतो आहे. आम्ही अजून सुपात आहोत. पण काय करायचे आहे त्याचे bulllet points काढत आहे. छंद, योगासने आर्थिक व्यवस्थापन, मुलांच्या आयुष्यात ढवळाढवळ न करणे........

धागा काय, चर्चा काय? Sad

माझ्या आई वडीलांची/सासु सासर्यांची साठी झाली, त्यांना बघुन मला काही तरी सांगावेसे वाटते
१. मेडीकल चेकप आणी स्वास्था कडे लक्ष द्या
२. आनंदी राहायचा प्रयत्न करा
३. बकेट लीस्ट बनवा अन काय काय करयचे राहुन गेले ते आठवुन आठवुन लिचला/करत चला.
४. मुलांच्यात फार करमत नाही आपाअप्ले व्याप आवडत असतील तरीही संपर्क ठेवा. (ढवळाढवळ नको)
५. रीटायर झाल्यावर नैराश्य येतं. हाउस वाईफ नी पंनाशीतच हे समजुन नवर्याला सपोर्ट करायला सुरुवात करा ईमोशनली. वर्कींग बाय का असतील तर नवर्या नंतर रीटायर होतात, त्यांनीही नवर्याला "आपण अनुपयोगी झालोत" असे कधीही वाटु देउ नये. (आई ने जमवुन आणलंय)
६. आपल्या बायकोने आयुश्यभर खस्ता खाल्या आहेत, त्याची जाणीव असु द्या. तीला नवीन सुनेशी आणि तिच्या गेलेल्या कर्ते पणाची सवय होई पर्यांत मानसीक अधार द्या.
(माझ्या सासर्यांनी हे मस्त केलंय अगदी)
थोडक्यात आमह्च्या घरी मिड लाईफ पेक्शा रीटायर्मेंत नंतर फारच क्रायसीस होउ शकला असता.
तो वाचला!
७. ह्या वयात ही मैत्री करा अन टिकवा!

८.मन आनंदी अन समाधानी ठेवा अन स्वतः ला कुणाशी ही कंपेअर करु नका.

लहान तोंडी मोठा घास, पण लोक काय म्हणतील ह्याचा विचार हळु हळु सोडावा लागेल ह्या वयात तरी.

मला वाटत पन्नाशीनंतर काय करायच किंवा रिटायर झाल्यावर काय करायच हा प्रश्न नोकरी करणार्‍यांना पडत असावा. सत्तरीला आलेले व्यावसायिक , जसे डॉक्टर, वकिल, दुकानदार विविध सल्लागार या कुणाला असले प्रश्न पडत नसावेत. हो प्रकृतीच्या तक्रारी असतीलही वयोमानाप्रमाणे. पण ही मंडळी कामामध्येच इतकी मग्न असतात आणि सतत लोकांच्या संपर्कात आल्याने, व सतत व्यावसायिक ज्ञान अपटूडेट ठेवाव लागत असल्याने की त्यांचे मानसिक आरोग्यही उत्तम रहाते. शारिरीक पण . They compete with youngsters and demand premium for their services.

यावरून बोध घ्याचा असेल तर तो एकच की कधी ही रीटायर व्हायचे नाही हा.

नोकरी करत असाल व तुमच्या कंपनीत काही विवक्षित वयानंतर रिटायर होणार असाल तर नंतर पुढे काम करून अर्थार्जन कसे करू शकाल याची तयारी पनाशीनंतर करा. यात अर्थार्जन हा महत्वाचा भाग आहे. फुकट काम केल्यास , होइल तस, जमेल तस, अस होइल व तुम्ही हळू हळू खरच परत रिटायर व्हाल. या तयारी मधे शारिरीक तंदुरूस्ती, स्किल डेव्हलप्मेंट आलीच. You must remain competitive.

माझे वडील, माझे सासरे अगदी ८२-८३ वर्षापर्यंत कार्यरत होते आणि दोघांचीही प्रकृती उत्तम राहिली होती.

"Age is an issue of mind over matter, if you don't mind. it doesn't matter." Happy

"Age is an issue of mind over matter, if you don't mind. it doesn't matter." स्मित>> सही! Happy
मार्क ट्वेन

तो राम जेठमालानी आता ९१ वर्षाचा झालाय.
मस्तपैकी कोर्ट-कचे-यां मधून चकरा मारत असतो. भलेही केसेस हारतो पण म्हातारपणाचे डिप्रेशन घालवायची सोय झाली. जेठमलानीला पाहिले की वकिली व्यवसाय हे म्हातारपणावरील उत्तम उपाय असे वाटते. आता अभ्यास करावा लाग्तो ती गोष्ट वेगळी!
ज्याला अभ्यास करायचा कंटाळा आहे त्यानी राजकारणात जावं. डिपोझीट जप्त झाले तरी चालेल अशी मानसीक तयारी ठेवली की नुसती धमाल. आली निवडणूक की रहा उभं.

अश्विनीमामी, मूळ लेखात मस्त लिहिले आहेत.

तुम्हाला उद्देशून एक प्रश्नः

पनाशी जवळ आल्यावर एक खिन्नता जाणवते का? की आता आपण म्हातारपणाच्या उंबर्‍यावर पोचलो आहोत अशी? जाणवत असल्यास मनाला काय समजावून सांगावे?

पनाशी जवळ आल्यावर एक खिन्नता जाणवते का? की आता आपण म्हातारपणाच्या उंबर्‍यावर पोचलो आहोत अशी? जाणवत असल्यास मनाला काय समजावून सांगावे?>>
पहिला प्रश्नः हो जाणवते. पहिल्यांदा. मुख्य म्हणजे काळाच्या मागे पडत चाललो आहोत असे फीलिन्ग येते. नवे तंत्रज्ञान वगैरे आपल्याला कमी समजते का अशी असुरक्षितता वाट्ते ( तसे काही नसले तरी)
मुले मुली अगदी सहज आंटी म्हणतात किंवा आपल्या मुलांच्या वयाच्या लोकांबरोबर काम करताना त्यांच्या इतकीच मजा आपल्याला सहज करता येते पण तसे केल्यास ते लोक्स बावचळून जातात व अवघडतात. आपल्या वेळचे लोक, मित्र मैत्रीणी, सोशल संदर्भ, जसे आपली जुनी गाणी त्यांची जुनी गाणी ह्यात फार फरक असतो. तुम्ही लिहिले होतेत तसे खांद्यावर एक टपली मारून चल चाय पीके आते हैं असे म्हणून गप्पा दादागिरी करता येइल असे लोक कमी कमी होत राहतात. सर्व नात्यांमध्ये एक प्रकारचा रुक्ष पणा येतो. अगदी जवळची नाती सोडल्यास.

चेहर्‍यावरील तजेला नाहिसा होतो व एक प्रकारचा सेट चेहरा होतो. जो रोज बघायचाच वैताग येतो.
सण समारंभ साजरे करायचा उत्साह कमी होत जातो कारण केले की इतके दिवस. तेच तेच उकडीचे मोदक पुरण पोळ्या, वगैरे परत परत करणे बोअर होते. व आजु बाजूच्यांनाही त्यात कमीच रस असतो.

हे एकापरी पण प्रचंड मोकळे पणा, सुटल्याची भावना, फार चांगले दिसायची गरज नाही जे आहे ते आहे
शेवटी सर्व जळूनच जाणार आहे. असे देखील वाटून राहते. स्वतःत रमणे वाढते. डोक्यावरील काळजीचे
भीतीचे डोंगर नाहीसे होत जातात. जिथे मोठी साम्राज्ये टिकली नाहीत तिथे आपण आणि आपले घर ते काय त्यासाठी किती काळजी करायची हे समजून आहे त्या क्षणात एंजॉय करणे वाढते. ऑन द होल अजून खरे म्हातार पण आलेले नाही पण पुढे काय आहे त्याची कल्पना आलेली आहे असे ज्ञान होते.
इमोशनल स्विंग कमी होउन एक प्रकारचा समतोल येतो.

पन्नाशी नंतर नव्याने जोडीदार शोधण्यास काहीच हरकत नाही. काही कारणाने ५० शी पर्यंत सिंगल राहीले म्हणजे पुढेही तसेच रहायला हवे असे नाही. भारतात ५०+ नंतर जोडीदाराचा शोध घेणे हळू हळू रुळू लागले आहे. अशा वेळी व्यक्तीला मुले असल्यास बरेचदा ती विरोध करतात परंतू शेवटी आपल्या अयुष्याचा निर्णय आपण घ्यावा. फॅमिली काऊंसेलिग केल्यास बरीच मदत होते. मात्र फसवणूक होऊ नये म्हणून सजग रहावे. अजून एक म्हणजे अजूनही भारतात ५० शी नंतर जोडीदाराचा शोध घेताना स्त्री-पुरुषांच्या अपेक्षांचा मेळ बसवणे अवघड जाते. पुरुषांकडून बरेचदा कंपॅनियनपेक्षा केअरगिवरची अपेक्षा असते. या मानसिकतेत बदल होणे गरजेचे आहे.

मी आणि माझ्या वयोगटातील बरेच जण सॅन्डविज जनरेशन. एकीकडे मुले नुकतीच कॉलेजला गेलेत पण अजून आर्थिक दृष्ट्या अवलंबून आहेत आणि दुसरीकडे वयोवृद्ध पालक. आपले वाढते वय सांभाळत या दोन्ही पिढ्यांच्या गरजा समजून घेत/पूर्ण करत, स्वतःच्याही गरजा पूर्ण करणे, जोडीला स्वतःच्या वृद्धापकाळाची तरतूद करणे यात बरेचदा मनाने थकायला होते. त्यात भौगोलिक अंतर असेल तर ताण अधीकच वाढतो.
यावेळी भारतभेटीत जाणवलेली गोष्ट म्हणजे भारतात वाढत्या आयुर्मानामुळे ५५+ ची मुले आणि त्यांचे ८० + चे पालक अशी परीस्थिती बर्‍याच घरांतून आहे. त्याचवेळी रिटायरमेंटला आलेली मंडळी आणि घरातील वृद्धांसाठी उपलब्ध असलेले रिसोर्सेस अतिशय लिमिटेड आहेत. .

आपल्या आईच्या पिढीची माणसे, खाण्यापिण्याच्या बाबतीत जास्त सजग होती. त्यांना आजकालचे ताण नव्हते त्यामूळे ती पिढी नवे तंत्रज्ञान वगैरे स्वीकारून, नव्याने उपलब्ध झालेली औषधे वगैरे घेत सुखात जगतेय.

आता पन्नाशीत असलेल्या लोकांनी मात्र तरुणपणात ताण सोसलेत, पण तब्येतीची हेळसांड केली ( जंक फूड वगैरे या पिढीनेच लोकप्रिय केले ) त्यामूळे हि पिढी जास्त म्हातारी दिसायला लागलीय.

आज तिशीच्या उंबरठ्यावर असलेले मात्र तब्येतीबाबत जागरुक आहेत. फिटनेस, जिम वगैरे करत तब्येत राखून आहेत. स्पर्धेत टिकून राहण्याचा ताणही सोसताहेत.

हे माझ्या घरचे आणि आजूबाजूचे चित्र !

स्वाती२ चांगली पोस्ट. वृद्ध मात्या-पित्याची काळजी हा विषय ५०+ वयात येतो. कालच एका मैत्रिणीने घरी वृद्ध आई असल्याने नवीन करीयर सुरुवात करावे लागले (होम बेस्ड बिझनेस) हे सांगितले. पण चांगली गोष्ट म्हणजे २-३ वर्षात ती तिच्या नेहमीच्या नोकरीपेक्षा जास्त कमाई करीत आहे. बदल स्वीकारण्याची तयारी असेल तर कुठलेही दशक तसे जड जात नसावे.

अमा अगदी माझ्या आईचेच उदाहरण दिले तुम्ही. तिचाही पुढल्या महिन्यात पन्नासावा वाढदिवस. तेच तेच सणवार व्रते, स्वैपाक किती दिवस करणा? याचा वैताग. त्यात भाऊ अजून शिकतोय त्याचे शिक्षण संपायला अजून तीन वर्षे. शिवाय घरी बेड रिडन आजी , थोडेसेही बदलायला तयार नसणारे आजोबा (दोघेही ७५+) माझे लग्न झालेले. त्यामुळे रोजच्या घरकामात माझी फारशी मदत नाहीच मी दुसर्या गावात. आणि या सगळ्यांना पुरून उरणारा आर्थिक प्रश्न. त्यापुढे तर सगळेच गौण होऊन जात.

वृध्द मातापित्यांची काळजी..यात फायदाही असतो. माझ्या वडिलांना आणि त्यांच्या भावंडांना आजीचा (त्यांच्या आईचा) सहवास खूप वर्षं मिळाला..अगदी अलीकडे आजी गेली. माझे मोठे काका तेव्हा ऑलमोस्ट ६७-६८ वर्षांचे होते.
६७ वर्षांचा 'मुलगा' वेळेवर जेवला नाहीये आणि नव्वदीची आई त्याला त्यावरुन ओरडतेय आणि स्वतः किचनमध्ये बसून त्याला जेवण वाढतेय, त्यातही सगळं जेवण तिने केलेलं नसलं तरी एखादा पदार्थ तिने स्वतः केलाय असे नुसते लाड असायचे. जबाबदारी, हॉस्पिटलायझेशन वाटून घेतलेलं असायचं. त्यात आम्ही नातवंडं आणि आमचे स्पाऊसेस पण मदत करायचो. शेवटी काही महिने एक पूर्णवेळ नर्स होती आणि आम्ही सगळे येऊन-जाऊन असायचो. पण त्यावेळी कोणीच परदेशात नव्हतं..सगळे इंडियातच होतो. मोठे काका खूप लकी असं मला वाटतं कारण मॅक्झिमम सहवास त्यांना मिळाला.

शुम्पी +१. तेच लिहायला आलो होतो शुम्पी अगदी. Its really cool to read all this. I am a bit far from 50 but its great to look in to my future through your eyes अमा. मस्त लिहीत आहात. Happy

हे एकापरी पण प्रचंड मोकळे पणा, सुटल्याची भावना, फार चांगले दिसायची गरज नाही जे आहे ते आहे
शेवटी सर्व जळूनच जाणार आहे. असे देखील वाटून राहते. स्वतःत रमणे वाढते. डोक्यावरील काळजीचे
भीतीचे डोंगर नाहीसे होत जातात. जिथे मोठी साम्राज्ये टिकली नाहीत तिथे आपण आणि आपले घर ते काय त्यासाठी किती काळजी करायची हे समजून आहे त्या क्षणात एंजॉय करणे वाढते. ऑन द होल अजून खरे म्हातार पण आलेले नाही पण पुढे काय आहे त्याची कल्पना आलेली आहे असे ज्ञान होते.
इमोशनल स्विंग कमी होउन एक प्रकारचा समतोल येतो.
<<

एंजॉय करणे वाढते, हे बरोबर. पण त्यामागची ट्रेन ऑफ थॉट्स नाही पटली.

माझी कारणं ही अशी आहेत :

बेसिकली, कौटुंबिक जबाबदार्‍या जवळजवळ पूर्ण झालेल्या असतात. मुलाबाळांची शिक्षणं, लग्नं पार पडलेली असतात. डोक्यावरची मोठी कर्जं उदा. २० वर्षे लांबीचं होम लोन इ. फिटलेली असतात. आता कर्ज काढायचं, तर ते ट्याक्स वाचवण्यासाठी, अशी वेळ आलेली असते. व्यवसाय-धंद्यात जम बसलेला असतो. अन अचानक रिटर्न तिकिट कटलं, तर पाठी राहिलेल्यांना इन्शुरन्सचं डबोलं घसघशीत मिळेल, अशीही सोय करून झालेली असते.

शिवाय अजून मिनिमम १५ वर्षे अ‍ॅक्टिव्ह कमाईची बाकी आहेत, हे माहिती असते. माझ्या व्यवसायात तर सर्जरीसाठी हात नाही चालला, तरी अगदी "शेवटपर्यंत" पेशंट्स किमान कन्सल्टेशन्स साठी येतच राहतात. कमी येतात, पण तितकेच हँडल करण्यात वेळही छान जातो, अन मुख्य म्हणजे रोजच्या मीठमिरचीइतके इन्कम सुरु रहाते, हे अनेक सत्तरीतल्या सिनियर्सकडे पाहून ठाऊक आहे.

दुकान सांभाळायला ज्युनियर्स आहेत आता, अन मी सिनियर, अनुभवी झाल्याने कमी वेळ, पण जास्त स्पेशलाईज्ड काम करून जास्त चार्जेस मिळवू शकतो. ओपीडी अवर्स कमी केलेत, इमर्जन्सीज करत बसायची गरज कमी झाली. माझ्यासाठी द्यायचा वेळ आता मला मिळू लागला आहे. कारण लाएबिलिटीज संपल्या/संपत आल्या, त्यामुळे हाय-उपस कमी करून आयुष्य रेग्युलराईज करता येतंय!

पहाटे उठून मस्तपैकी बागकाम, सायकलिंग, व्यायाम, असं २ तास करता येतं. स्वयंपाक करायचा नवा छंद मिळालाय. वीकेंड्सना मित्रकंपनी जमवून वेगवेगळे प्रकार करून खिलवणे हा नवा उद्योग मिळालाय. पूर्वीचे वाचन, गाणी ऐकणे, चित्रं काढणे, 'समाजकारण' वगैरे आहेतच. ३-४ वर्षांपासून नवं व्यसन पण लागलंय! ( मायबोलीचं Wink स्वयंपाकासोबत इथे पाकृ टाकून लोकांना पकवताही येतंय. )

अमा,
चांगलं दिसण्याची गरज कशी नाही? ऑफकोर्स गरज आहे! माझी फिटनेस लेव्हल सध्या कधी नव्हती इतकी छान आहे. वेळअवेळची जागरणं, जे मिळेल ते गिळणं, प्रॅक्टिस सेट करतानाचा प्रचण्ड स्ट्रेस हे सगळं कमी झाल्याने मी चक्क यंग फील करतोय. अन थोडे केस रंगवावे लागतात म्हणून काय झालं? तीशीतल्या लोकांचे केस पांढरे असतात आजकाल.

सो, अत्ताशी तर लाईफ सुरू झालंय. पहिली २५ वर्षं स्वतःचं शिक्षण अन नंतरची २५ पोराबाळांचं करून जबाबदार्‍या पूर्ण झाल्यात. आता जरा गाडीची सर्विसिंग रेग्युलर ठेवून मस्त जगून घ्यायचंय.

तुम्ही म्हणताहात तसं टिकणार काहीच नाही. अल्टिमेटली भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुतः? हेही खरं आहेच. तेव्हा ॠणं कृत्वा नाही, तर आजवर केलेल्या कष्टांच्या रिवॉर्डचं घृतं नक्कीच पिबेत!

एंजॉय करणे वाढते, हे बरोबर. पण त्यामागची ट्रेन ऑफ थॉट्स नाही पटली.>>>>>> इब्लिस, एखाद्याला एका वयात काय वाटतं हे पुर्णपणे वैयक्तीक आणि सापेक्ष नाहीये का? तुमची पुढची पोस्ट पण छान आहे पण अगेन दॅट्स जस्ट यु. आपल्या भुतकाळात काय घडलय आणि त्याचा आपल्या सध्याच्या (पन्नाशीच्या) मनावर काय परिणाम झालाय इज वॉट ड्राईव्ज युअर ट्रेन ऑफ थॉट, डजंट इट?
न पटणं हा विषयच येत नाही. Happy

बुवा,

मला काय वाटतं, ते लिहिलंय.

तुमच्याच शब्दात, "एखाद्याला (एका वयात) काय वाटतं हे पुर्णपणे वैयक्तीक आणि सापेक्ष नाहीये का?"

मला नाही पटलं, हे वैयक्तिक आणि सापेक्ष नसतं वाट्टं? तो विषय का येऊ नये? असो. पुन्हा तेच रिटायर्ड म्हातार्‍यांसारखं कुचाळक्या फीलिंग येतंय.

पुन्हा तेच रिटायर्ड म्हातार्‍यांसारखं कुचाळक्या फीलिंग येतंय.>>>>>> Lol ते बरोबर आहे, त्याकडे लक्ष द्या जरा (इतर बाफंवर बोलताना सुद्धा) Proud

जोक्स अपार्ट, माझा बहुतेक गैरसमज झाला. तुमची अख्खी पोस्ट त्यांना "फार चांगले दिसायची गरज नाही" असं वाटतं त्याबद्दल आहे. ते तुम्हाला न पटणं मी समजू शकतो पण परत मी वर लिहिलेला ही वैयक्तिक बाब असल्यामुळे खरं न पटणं तरी कसं शक्य आहे ते ही आलच. त्यामुळे तुमचा मुद्दा लक्षात आला येवढच म्हणेन. Happy

बुवा,

या वयात येणारं मोकळेपणाचं फीलिंग पॉझिटिव्ह असतं, असायला हवं. फाशीगेटाच्या कैद्यासारखं सरेंडर्ड एस्केपिस्ट नव्हे. अन ते तसं पॉझिटिव्ह यावं म्हणून प्रयत्न केलाच पाहीजे.
धागा ५०+ लोकांसाठी लिमिटेड नाहिये. वाचणारे तुमच्यासारखे या मुक्कामी येतील तेव्हा आनंदात या, अशी शुभेच्छा देतो.

असो.

कुचाळक्या "वाचल्याचं" फीलींग म्हटलं मी रच्याकने Wink

आनंद आहेच इब्लिस. अमांच्या विचारांमध्ये इतर गोष्टींचा आनंद आहेच, इन फॅक्ट चांगलं दिसण्याला फारसं महत्व द्यायची गरज आता वाटत नाही हा एक प्रकारचा आनंदच आहे. दॅट्स हाऊ आय लूक अ‍ॅट इट. Happy

बुवा,
ते क्रॉसफिट बंद करा बघू!
काय करायचंय चांगलं दिसून राहून? 19.gif

एनीवे, पर्सनल गप्पा पुरेत. Wink अ‍ॅडमिन रागावतील.

इब्लिस म्हणतायत त्याप्रमाणे त्यांनी पॉईंट आउट केलेले अमांचे मुद्दे मलाही किंचीत निगेटिव्ह वाटले. (पोस्ट चांगली असली तरीही). ते तसे असू नये म्हणून स्वतःला सतत समजावत रहावं.

अहो, त्या क्रॉसफिटनी ना माझं वाढत चाललेलं टक्कल केसांनी भरभरुन येतय ना माझे पांढरे केस परत काळे होतायत. Lol क्रॉसफिट इज मोअर फॉर माय इन्साईड्ज दॅन आउटसाईड्ज. आउटसाईड्स नीट दिसतात हे प्लस आहेत (माझ्याकरता) पण मेन ड्रायवर्स नाही. पुष्कळ झाली चर्चा. Happy इथे जास्त वाचण्यावर भर द्यायला पाहिजे मी.

अमा, सुंदर विषय आणि तुम्ही खूप सुरेख लिहिताय! इतर पोस्ट्स देखील वाचनीय!
दर भारतवारीत अनेक महिन्यांनी आपल्या आत्या-काका-मावश्यांना पाहून काळाच्या महिम्याची प्रकर्षाने जाणीव होते Sad आई बाबा बरेचदा स्काईप वर भेटतात त्यामुळे त्यांचे वय पटकन जाणवत नाही पण तरीही वयाचा विचार डोकावतोच! पण आमच्या घरात बरेचसे जण वयाच्या मानाने तरुण दिसतात!
नोकरी करणाऱ्यांपेक्षा व्यावसायिकांना वयाची जाणीव थोडी उशिरा होत असावी. कारण निवृत्तीचे वय वै. प्रकार नसतोच! बाबा वकील आहेत त्यांना आता व्याप कमी करा म्हटलं तर म्हणतात आता केस पिकले तेव्हा आता मी silver line peak (मला नक्की टर्म आठवत नाहीये!) मध्ये आहे! मला वाटतं की मन जितकं व्यापात गुंतलेलं असेल तितके नकारात्मक विचार कमी येतात. नव्या जबाबदाऱ्या, नवीन स्वप्ने पाहात रहावी, नव्या गोष्टी शिकाव्यात! मग तुम्ही कसे (म्हातारे/तरुण) दिसता याला फारसं महत्व उरत नाही. चतुरंग मध्ये येणाऱ्या सेकंड इनिंग सदरात अनेक छान तरुण ज्येष्ठांची माहिती येते ती वाचून फार मस्त वाटतं!
इथे (अमेरिकेत) तर इतके active ज्ये ना दिसतात. शेजारच्या lab चे प्रोफेसर गेल्या १० वर्षांपासून रिटायर होतायत Lol दर वेळी नवीन grant मिळते आणि नव्या उत्साहाने ते कामाला लागतात..रोज सकाळी साडेपाच वाजता हजर असतात! ही शिक्षक मंडळी सतत लहान/तरुण लोकांच्या सहवासात असतात त्यामुळे मानाने तरुण राहायला मदत होत असावी!

अमा,
मला तुमच्या पोस्ट आवडल्या.पण त्यात 'ढळला रे दिन...संध्याछाया भिवविती हृदया' हा सूर जाणवला. कदाचित माझ्या समजूतीचा दोष असेलही.

चेहर्‍यावरील तजेला नाहिसा होतो व एक प्रकारचा सेट चेहरा होतो. >>>
माझ्या आईचा याबाबतीत मस्त अप्रोच आहे.दोन्ही खांद्यावरून पदर घेणारी माझी आई वयाच्या ४२ नंतर पदर पिनअप करून वावरायला लागली ते अजूनही ८१ वर्षी तशीच वावरते.चेहर्‍याला बाहेर जाताना लॅक्टोकॅलामाइन +पावडर लावते.'स्वत:ला फ्रेश / प्रेझेंटेबल वाटलं पाहिजे. म्हातारपणी नीट नेटके राहिलंच पाहिजे.' हे तिचं मत.रात्री कोल्डक्रीम वगैरे रोज लावते.यातलं एक शतांशदेखील तिने तरूणपणी कधी केले नव्हते. खरच तिची स्किन मस्त आहे.८१ वर्षांची आजी म्हणून दिसत नाही. .मीच तिच्यापुढे म्हातारी आहे.
आता ४ वर्षांत २ आघात + दोन्ही पायांचे नी रिप्लेसमेंट होऊनही मूळ स्वभाव आशावादी असल्यामुळे मनाने खचली तरी बाहेर दाखवत नाही.वाचन चांगले आहे.मोबाईल वापरायचीच्,पण या २-३ वर्षांत मेसेज पाठवणे इ.शिकली आहे. आता whatsapp ची उत्सुकता आहे. सुडोकु सोडवणे ,झोप येत नसेल त्यावेळी मनात कविता म्हणणे,कसेही करून मन बिझी ठेवते.
सॉरी, 'माझी आई " निबंध लिहिला.

Pages