कोकोनट केक

Submitted by साधना on 22 July, 2009 - 02:11
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२ तास
लागणारे जिन्नस: 

२०० ग्रॅम खोबरे (एक नारळ). ताजा नसेल तर डेसिकेटेडही चालते.
२५० ग्रॅम साखर (मिळाली तर कस्टर्ड, नाहीतर साधी)
१५० ग्रॅम बटर (कॅलरी मोजणा-यांनी ऑऑ वाचावे)
१०० ग्रॅम रवा
५० ग्रॅम मैदा, चिमुटभर मीठ
५ अंडी (अंड्यांच्या जागी दही वापरुनही केक करता येईल. साधारण दिड कप दही लागेल असा अंदाज आहे.)
१.५ टेबलस्पून बेकिंग पावडर
काजु, काळ्या मनुका वगैरे जे सापडेल ते...

क्रमवार पाककृती: 

१. साखरेचा एकतारी पाक करुन घ्यावा. त्यात खोबरे घालावे आणि मंदाग्नीवर पुर्ण सुकेपर्यंत ढवळावे. गॅसवरुन खाली उतरवुन थंड होऊ द्यावे.
२. मैदा, मिठ आणि बेकिंग पावडर दोन-तिनदा चाळून घ्यावी.
३. गरम पाण्यात भांडे ठेवून बटर वितळवावे, मग भांडे बाहेर काढुन वितळलेल्या बटरमध्ये अंडी घालुन चांगले फेटावे.
४. आता वरील मिश्रणात रवा व मैदा हळुवारपणे मिसळा.
५. सर्वात शेवटी खोब-याचे मिश्रण आणि ड्रायफ्रुट्स टाकुन अगदी जपुन अलगदपणे एकजीव मिश्रण करा. तासभर मुरवत बाजुला ठेवा.
६. ओवन १८० डिग्रीला तापवा. चांगला तापला की केकच्या भांड्याला तेलाचा हात लाऊन त्यात वरिल मिश्रण ओतुन साधारण ४५ मिनिटे बेक करा.
७. जर बेकिंग कप असतील तर त्यांना तेलाचा हात लाऊन थोडेथोडे मिश्रण घातले तरी मस्त मावाकेकसारखे केक तयार होतात.

वाढणी/प्रमाण: 
२-३ जण एकावेळी संपवु शकतात. ते तुमच्यावर आहे :)
अधिक टिपा: 

१. अंडी फोडल्यावर त्यातले पिवळे वेगळे काढुन फक्त पांढरेच फेटावे. त्यामुळे एकतर अगदी मस्त फेटले जाते, शिवाय डोक्यात कॅलरींचे आकडे नाचत असतील तर तेही थोडे कमी होतात Happy

२. अंडी किती फेटताय त्यावर केकचा स्पॉंजीनेस अवलंबुन आहे.
माझ्याकडे अंडे फेटण्यासाठी फक्त माझे हात आणि साधा एग बिटर असल्यामुळे मी असंभवच्या सुरवातीला अंडी फेटायला सुरवात केली ते थेट अग्निहोत्र संपेपर्यंत फेटत होते. Happy

३. मिश्रण करताना अगदी हळूबाईपणा करणे आवश्यक आहे. त्यामुळे अंड्यातील हवा टिकुन राहते आणि केक हलका होतो. ढवळण्यासाठी नॉनस्टिकच्या भांड्याबरोबर जो लाकडाचा कलथा मिळतो तो वापरावा.

माहितीचा स्रोत: 
ब-याच वर्षांपुर्वी कुठेतरी वाचलेली.
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान केक आहे हा. पांढरे फेटण्यासाठी इतका वेळ नाही लागत. यासाठी साबणाने स्वच्छ धुवून कोरडा केलेला बोल आणि काटा वापरता येतो. बोल किंचीत तिरका धरुन काटा मिश्रणात गोलाकार फिरवायचा. याला आलेला फेस टिकून राहतो व वाढत जातो. तो इतका घट्ट झाला पाहिजे कि बोल उलटा केला तरि सांडता कामा नये.
बोल जरा जरी तेलकट वा ओशट असला किंवा पांढर्‍यात थोडे जरी पिवळे गेले तर नीट फेस येत नाही.

मी पिवळे वेगळे केले नव्हते ना आळसामुळे.. त्यामुळे फेटत बसले. Happy

*****&&&*****
Excellence is not for someone else to notice but for your own satisfaction and efficiency...

वा! मस्त आहे रेसीपी. धन्स अ‍ॅशबेबी
---------------------------------------------
यह दिल बन जाये पत्थरका, ना इसमें कोई हलचल हो..

अंडे फोडून पिवळे वेगळे करण्याचे एक तंत्र आहे. अनुभवी लोक अंड्याच्या टरफलाचे दोन भाग करुन बरोबर पिवळे वेगळे करतात. ( त्यासाठी पिवळे घट्ट असावे लागते, ते जर फुटले तर असे करणे अशक्य होते )
असे करण्यासाठी एक छोटेसे उपकरण पण मिळते. छोटे गाळणे असावे तसे. त्याला तळाशी एकच छिद्र असते व सभोवताली एक पोकळ रिंग असते. या खोलगट भागात पिवळे अलगद राहते व पांढरा बलक कडेच्या रिंगमधून व तळाशी असलेल्या छिद्रातून बाहेर पडतो.

केकच्या कृतीमधे मैदा वगैरे चाळुन का घेतात ? मी आळशीपणा करुन कधीच चाळत नाही. कोकोनट केक मला फार आवडतो. करुन बघते एकदा.

पिठ चाळल्याने हवा मिक्स होवून पदार्थ हलका होतो.

अंडे न टाकता करायचे असेल तर काय दह्यात भिजवायचे का?

मीठ आणि बेकींग पावडर मैदयात छान मिक्स होण्यासाठीही चाळून घेतल्याचा फायदा होतो. Happy
मस्त आहे रेसिपी साधना.