माकडाच्या हातात मोबाईल

Submitted by मंदार-जोशी on 15 January, 2012 - 03:34

सर्वसाधारणपणे आपल्या देशात आधी वस्तू येते, मग त्या वस्तूच्या संदर्भातले कायदे आणि सगळ्यात शेवटी येते ती वस्तू कशी वापरायची याची अक्कल. भ्रमणध्वनी उर्फ मोबाईल हा गाडी चालवताना वापरू नये ही अक्कल आजही अनेकांना नाहीच. उलट तसे न करण्याविषयी सुचवताच आपलीच अक्कल काढली जाते.

हे महाशय पुण्यातील सेनापती बापट मार्गावरुन मोबाईलवर बोलत निवांत दुचाकी चालवत होते. अनेक वेळा हॉर्न वाजवल्यावर या साहेबांनी "काय शिंची कटकट ए" अशा अर्थाचे भाव चेहर्‍यावर आणत गाडी बाजूला केली, पण मोबाईलवर बोलायचं काही थांबवलं नाही. हे महाशयांचे मोबाईलवरचे गुफ्तगू चक्क नळ स्टॉप पर्यंत, म्हणजे साधारण दहा मिनिटं, चालले. तिथला सिग्नल आल्यावर बहुतेक समोर 'मामा' दिसल्यावर नाईलाजाने ते थांबले.

असे अनुभव वारंवार येतात. कायद्याचा धाक तर हल्ली कुणाला उरलेलाच नाही. आणि इतरांच्या सोडा, स्वतःच्या जीवाचीही काळजी या संभाषणवीरांना नसते, आणि वर यांची अरेरावी सहन करावी लागते हे वेगळंच. शिवाय यांच्यामुळे इतरांनी जीव मुठीत धरून गाडी चालवायची आणि रस्त्यावर चालायचं!!

याने वैतागून अस्मादिकांनी ठरवलं की अशांचे फोटो काढून सरळ पब्लिक फोरमवर टाकायचे. याचाच हा श्रीगणेशा. तुम्हालाही असेच घटिंगण दिसले तर बिनदिक्कत अशांचे फोटो इथे टाका. एक सूचना, फोटोत गाडीचा नंबर दिसल्यास सगळ्यात उत्तम!!

MHM0001.jpg

टीप: हा फोटो काढताना मी गाडी चालवत नव्हतो.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे त्यांच्या हाता गाडीपण आहे, नुसता मोबाईल नाही
असो
मला वाटते असे प्रकार जोतो स्वतः करित आलेला आहेच, लोकं क्षणभर सुध्दा थांबायला तयार नसतात.

हे तर काहीच नाही.

पुणे शहरात मोबाईल चालवत पी.एम्.पी.एम्.एल ची बस चालावणारे महाभाग ड्रायव्हर मी पाहिलेत. एक तर सिमला ऑफिसच्या चौकात चालवत होता. मी संपर्क करुन तक्रार केली. पी.एम्.पी.एम्.एल च्या अधिकार्‍याने त्याला १०० रुअपये दंड केल्याचे मोबाईलवरुन कळवले.

दुर्दैवाने पी.एम्.पी.एम्.एल कडे अशी स्वतःची यंत्रणा नाही जी अन्य ड्रायव्हरचा शोध घेईल.

पी.एम्.पी.एम्.एल एक सडलेली व्यवस्था आहे. निम्मे ड्रायव्हर कंत्राटी आहेत. ते सोडुन गेले तर पी.एम्.पी.एम्.एल बंद पडेल म्हणुन अशी यंत्रणाच कोणी निर्माण करत नाही.

अहो... आबा.. सरळ इथला धागा नंबर द्यायचा.. Happy 31936 Happy म्हणजे फोटो कोणी काध्लाआनी कुठे टाकला ते पण कळेल त्याला... Happy

>>जोशीबुवा, त्या हिरोच्या मागे जी स्कूटर आहे
आयडू, मस्त निरीक्षण

पण असे धागे काढून आणि फोटो काढून काय फरक पडणार आहे.....

आणि असले दोन चार जण पकडून ट्रॅफिक पोलीसांनी पण फार कर्तव्यदक्षतेचा आव आणू नये.... जोपर्यंत तीन आसनी रिक्षातुन पोलिसांसमोर चार्-चार पाच-पाच जण बसून बिन दिक्कत जाताना दिसतात... कोंबून कोंबून भरलेल्या सहा आसनी आणि वडापच्या गाड्यांकडे कानाडोळा करुन एखादा कोपरा पकडून एखादे चुकार सामान्य सावज पकडण्यात मग्न असलेले पोलीस दिसतात तोपर्यंत या व्यवस्थेवर विश्वास बसणे अवघड आहे Sad

पोलिसांसमोर चार्-चार पाच-पाच जण बसून बिन दिक्कत जाताना दिसतात>> एका चौकीचा एका गाडीला कमीत कमी ५०० रु हप्ता असतो मालक.. Happy

@ विनायक
निष्कर्शः माकडांच्या हाती मोबाईल देण्यापेक्षा लँडलाईन देणे हे त्यांच्या स्वतःच्या दृष्टीने आणि पब्लिकच्या दृष्टीनेही श्रेयस्कर!
पण त्यांना स्वतःच्या 'माकडलीला' प्रदर्शित करायची उर्मी येते त्याचे काय होईल?

त्याचा च परिणाम----|| आपली चर्चा आपले मनोरंजन,
त्यातून साधू या ज्ञान वर्धन ||

ह्या धाग्याला भेट देण्यार्‍या प्रत्येकाने जरि हे अन्गिकारले तरि मन्दार चा उद्देश सफल होइल.
सुरुवात मी स्वता पासुन .................

छान धागा,

माझी गर्लफ्रेंड मला फोन केल्यावर आजूबाजुला गाड्यांचा आवाज येताच मला पहिला विचारते तू पण गाडीवर आहेस का?
मी असल्यास येस्स बोलतो. तिचे महत्वाचे काम शक्यतो नसतेच म्हणून नंतर बोलूया म्हणत फोन कट. वा कधीतरीच अर्जंट काम असल्यास, चल गाडी बाजूला लाव.

गर्लफ्रेंड म्हटली की अश्या बाबतीत तिला फसवले तर तिच माझा जीव घेईल म्हणून हे सारे प्रामाणिकपणे घडते.

मॉरल ऑफ द स्टोरी - निदान समोरच्या व्यक्तीने तरी आपल्या माणसांची काळजी घ्यावी. Happy

जवळपास ८ वर्षाने धागा वर काढतो आहे.
मी सध्या रस्त्याने चालताना फुटपाथवर पार्क केलेल्या दुचाकी तसेच विरुद्ध दिशेने जाणारी वाहने दिसली की त्यांचे फोटो काढून Twitter वर @MTPheretohelp या handle ला tag करून टाकतो.

इतर शहरातील पोलिसांची अधिकृत Twitter handles खालीलप्रमाणे:
मुंबई - @MumbaiPolice @MTPheretohelp
ठाणे शहर- @ThaneCityPolice
ठाणे ग्रामीण - @Thane_R_Police
नवी-मुंबई - @Navimumpolice
पुणे- @PuneCityTraffic
पिंपरी-चिंचवड- @PCcityPolice
रायगड जिल्हा - @RaigadPolice
रत्नागिरी जिल्हा - @RatnagiriPolice
सिंधुदुर्ग जिल्हा - @Sindhudurg_SP
सातारा जिल्हा - @SataraPolice
सांगली जिल्हा - @spsangli
कोल्हापूर जिल्हा - @KOLHAPUR_POLICE
सोलापूर जिल्हा - @solapurpolice
नाशिक शहर- @nashikpolice
नाशिक ग्रामीण - @SPNashikRural
औरंगाबाद - @AbadCityPolice
बीड - @BEEDPOLICE
नागपूर शहर वाहतूक police - @trafficngp @NagpurPolice

Pages