Submitted by अ. अ. जोशी on 18 September, 2014 - 10:29
सुखाचा केवढा झाला पसारा
बिलगला वेदनेचाही पहारा
तुझ्या लाटेत सामावून घे ना
कधीचा थांबला आहे किनारा
तुझ्या वाणीत सारे भाव होते
नको सांगूस की केला पुकारा
तुझा रस्ता कधी चुकलो नसे मी
नसे ही बातमी आहे इशारा
किती चेकाळली स्वप्ने उराशी
पहा मिळताच थोडासा उबारा
अजुन तुडवीत आहे पाय काटे
अजुन नक्की नसे माझा निवारा
शरीराची उडाली फार थरथर
मनामध्ये कुठे होता शहारा?
मला सांगून गेला आपलेपण
तुझा तो एक ओळीचा उतारा
दुरुन नुसतेच तू नाचू नको ना
इरेला पेटला आहे पिसारा
जगाला पाहिजे ते ते म्हणू दे
'अजय' बिनधास्त वाजव तू नगारा
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
किनारा...शहारा फार आवडले.
किनारा...शहारा फार आवडले.
मनावरती असेही वाचून पाहिले.
किनारा हा शेर सर्वाधिक
किनारा हा शेर सर्वाधिक आवडला
एक ओळीचा उतारा<< हा थॉट देखील खूप आवडला
धन्यवाद
सुंदर
सुंदर
धन्यवाद मित्रांनो...
धन्यवाद मित्रांनो...
मला सांगून गेला आपलेपण तुझा
मला सांगून गेला आपलेपण
तुझा तो एक ओळीचा उतारा... सुरेख
अजुन नक्की नसे माझा निवारा...मतला खूपच सुंदर
छान गझल!!
किनारा अफलातून, मतलाही मस्त
किनारा अफलातून, मतलाही मस्त !
धन्यवाद !
तुझ्या लाटेत सामावून घे
तुझ्या लाटेत सामावून घे ना
कधीचा थांबला आहे किनारा
अजुन तुडवीत आहे पाय काटे
अजुन नक्की नसे माझा निवारा
मला सांगून गेला आपलेपण
तुझा तो एक ओळीचा उतारा
शेर आवडले.
सुंदर! किनारा, निवारा आणि
सुंदर!
किनारा, निवारा आणि शहारा ... व्वाह!
धन्यवाद
छान गझल!!!!
छान गझल!!!!
धन्यवाद मित्रांनो.
धन्यवाद मित्रांनो.