'बलात्कार''

Submitted by -शाम on 8 September, 2014 - 13:37

बलात्काराच्या बातम्यांनी भरतात
पेपरचे रकाने
आणि वाचणारांचे चहासोबत
नाष्टयाचे बकाणे

चौकाचौकात जनावरं टाळ्या देत रवंथ करतात
ज्यांच्या घरात असतात वयात आलेली फुलं
त्याच झाडांची तेवढी
पाळंमुळं हादरतात

स्वप्न विकणाऱ्यांनो कसं घेऊ तुमचही नाव
पण ज्या चड्डीत मी घरात फिरू शकत नाही
तिच घालून फुलं
हुंदडतायेत अख्खा गाव

कायद्यालासुद्धा हसावं कि रडावं कळत नाही
जेंव्हा खरा गुन्हेगार अज्ञानी ठरवू बघतो
न्यायदेवते! तुला एवढंही कळू नये
अगं ज्याला बलात्कार करता येतो
तो बापसुद्धा होऊ शकतो

दे! अशा बापांना खुशाल सवलत दे
आणि डोळ्यांवर पट्टी बांधून बलात्कार करून घे
म्हणजे कळेल तुला उध्वस्त होणाऱ्या आयुष्याची किंमत
मग पट्टी सोडून हमसून हमसून म्हणशील
कायदा म्हणजे फक्त
वेळकाढू गंमत

____________________________________शाम

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाचायची नाही... वाचायची नाही... असं घोकून घोकून टाळली.
शामच्या कवितांच्या बाबतीत ह्या गमजा फार काळ चालत नाहीत.
विलक्षण पश्चाताप होतोय वाचल्याचा. Sad

स्वप्न विकणाऱ्यांनो कसं घेऊ तुमचही नाव
पण ज्या चड्डीत मी घरात फिरू शकत नाही
तिच घालून फुलं
हुंदडतायेत अख्खा गाव
<<
<<
Sad

स्वप्न विकणाऱ्यांनो कसं घेऊ तुमचही नाव
पण ज्या चड्डीत मी घरात फिरू शकत नाही
तिच घालून फुलं
हुंदडतायेत अख्खा गाव

>>>
ज्या मुलींवर , स्त्रियांवर बलात्कार होतात त्यातल्या किती जनी चड्यांमध्ये गावभर हुंदडतात ? काहीही बोलायचं का ? बाकी कविता जळजळीत . ह्यावर उपाय म्हणजे पालकांनी मुलांवर योग्य संस्कार करण. प्रसंगी कठोर व्हावं लागलं तरी चालेल . तरच पुढची पिढी सुरक्षित होईल .

मोहिनीबाई , शॉर्ट घातलेल्याच किंवा घातल्या म्हणूनच त्यांच्यावर बलात्कार होतात असे म्हटलेले नाहीये इथे तर
फॅशनच्या अंधानुकरणाने चाळवल्या जाणार्‍या भावनांच्या उद्रेकाचे बळी ठरणार्‍या वेगळ्याही असू शकतात, आणि याला केवळ कुठलेही एक माध्यम जबाबदार आहे असेही आपण म्ह्णू शकत नाही. असा एकूण ह्या ओळींचा आशय आहे. हे काहीही वाटत असेल तर आपल्याला _____/\_____ !

>>>फॅशनच्या अंधानुकरणाने चाळवल्या जाणार्‍या भावनांच्या उद्रेकाचे बळी ठरणार्‍या वेगळ्याही असू शकतात<<<

एवढे समजून घेण्याच्या पेशन्सची अपेक्षा ठेवू नयेत अशी विनंती Happy

फॅशनच्या अंधानुकरणाने चाळवल्या जाणार्‍या भावनांच्या उद्रेकाचे बळी ठरणार्‍या वेगळ्याही असू शकतात.
नक्कीच असू शकतात . काही मुली अश्या असतील हि . नाही असं नाही .पण बलात्कार ह्या विषयावर discusion करताना प्रत्येक वेळेला हा मुद्दा आलाच पाहिजे असा नियम आहे का ? महत्वाची गोष्ट म्हणजे अश्या मुली बस मधून , रस्त्यावरून गावभर फिरत नाहीत . अश्या high क्लास मुली त्यांच्या ४ चाकी गाड्यांतून , bodyguard सोबत फिरत असतील . middle क्लास किवा उच्च मध्यम वर्गीय सुधा अश्या किती मुली तुम्हाला चड्डीत फिरताना दिसतात ?

फॅशनच्या अंधानुकरणाने चाळवल्या जाणार्‍या भावनांच्या उद्रेकाचे बळी >>
भावना चाळवल्या जायच्या असतील तर त्या कुठल्याही वयाच्या , कुठल्याही पोषाखाच्या , कुठल्याही रूपाच्या स्त्री कडे बघून चालवल्या जातात .कोठेवाडी प्रकरण आठवत नाही का ?
५-६ वर्षांची पोर हाफ चड्डीत फिरत असेल तर हेच म्हणणार का ? तुमचा प्रतिसाद हा फक्त विरोधाला विरोध वाटतोय

>>>महत्वाची गोष्ट म्हणजे अश्या मुली बस मधून , रस्त्यावरून गावभर फिरत नाहीत . अश्या high क्लास मुली त्यांच्या ४ चाकी गाड्यांतून , bodyguard सोबत फिरत असतील . middle क्लास किवा उच्च मध्यम वर्गीय सुधा अश्या किती मुली तुम्हाला चड्डीत फिरताना दिसतात ?<<<

प्रचंड अधिकारवाणीच्या टोनमध्ये, जाब विचारण्याच्या शैलीमध्ये, कर्कश्श्यपणे विचारलेला अनुभवहीनता दर्शवणारा चुकीचा प्रश्न!

वास्तव भयानक आहे पण त्यावरील चर्चा तरी सकारत्म दृष्टीकोनातून व्हायला काय हरकत आहे. एखादी गोष्ट जर एखाद्या गोष्टीच कारण ठरत असेल तर ती मान्य करायला काय हरकत आहे? आता मान्य आहे कि बलात्काराच्या प्रत्येक घटनेमागे दिवसेंदिवस अश्लील होत चाललेली फॅशनच जबाबदार नाही. पण मग याचा अर्थ असा घ्यायचा का कि त्या गोष्टीचा अशा घटनांमागे काहिच हात नाही? मला तरी नाही पटत हे.
मोहिनीबाई , शॉर्ट घातलेल्याच किंवा घातल्या म्हणूनच त्यांच्यावर बलात्कार होतात असे म्हटलेले नाहीये इथे तर
फॅशनच्या अंधानुकरणाने चाळवल्या जाणार्‍या भावनांच्या उद्रेकाचे बळी ठरणार्‍या वेगळ्याही असू शकतात, आणि याला केवळ कुठलेही एक माध्यम जबाबदार आहे असेही आपण म्ह्णू शकत नाही. असा एकूण ह्या ओळींचा आशय आहे.>>>>>>>
बरोबर आहे शॉर्ट घातला कि लगेच बलात्कार होईल आणि साडीतून फिरले म्हणजे तो होणारच नाही असाही त्या ओळीचा अर्थ होत नाही. पण अश्लील होत चाललेली ही फॅशन संस्कृती दिवसेंदिवस तरूणाचे मानसिक स्वास्थ बिघडवतेय हे तर आपणास मान्य करावच लागेल. आच मोठ्या स्क्रीनवर तर सोडाच पण घरातल्या टिव्हीवरही कुटूंबाने एकत्रित बसून पहावेत असे प्रोग्राम दुर्मिळ झालेत. कार्यक्रमाचे विषयही त्याच पठडितले. आपण ज्या वातावरणात वाढतोय ते वातावरणच आज बलात्कारांसारख भिषण वास्तव आपल्या समोर घेऊन आलय. बलात्कार करावा हि भावना निर्माण होण आणि तसा तो करण हि जशी अंत्यत घृणास्पद बाब आहे, तसेच हि भावना ज्या वातावरणामुळे वा संस्कारांमुळे मनात निर्माण होते त्या संस्कारांचा व वातावरणाचा हि तिरस्कार व्हायलाच हवा कि नको. रोगाच्या कारणांपैकी एखाद्या कारणाकडे डोळेझाक करून बाकि कारणाचा बंदोबस्त केलाच, तरी डोळेझाक केलेले ते कारण रोगाला कारणीभूत ठरणारच ना.

बेफ़िकीर |. प्रश्न समजला नसेल तर द्या सोडून तो अधिकारवाणीने विचारलाय कि कसा हे महत्वाचं नाहीय . स्वतच्या चुकीवर पांघरून घालण्यासाठी दुसर्याला कर्कश म्हणण ह्यात काही नवीन नाही .

अविनाश खेडकर ,बेफ़िकीर तुम्ही अजून हि माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं नाही . ज्यांच्यावर बलात्कार झाला त्यातल्या किती जनी चड्डीत फिरत होत्या ? ह्याचं उत्तर आधी द्या मग पुढे बोलू

>>>
मोहिनि३३३ | 17 September, 2014 - 18:16 नवीन

बेफ़िकीर |. प्रश्न समजला नसेल तर द्या सोडून तो अधिकारवाणीने विचारलाय कि कसा हे महत्वाचं नाहीय . स्वतच्या चुकीवर पांघरून घालण्यासाठी दुसर्याला कर्कश म्हणण ह्यात काही नवीन नाही .

मोहिनि३३३ | 17 September, 2014 - 18:17 नवीन

अविनाश खेडकर ,बेफ़िकीर तुम्ही अजून हि माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं नाही . ज्यांच्यावर बलात्कार झाला त्यातल्या किती जनी चड्डीत फिरत होत्या ? ह्याचं उत्तर आधी द्या मग पुढे बोलू
<<<

घरच्या नोकराला जाब विचारावा तसा टोन आवरा आणि सांभाळून वागा. तुम्हाला उत्तर द्यायला येथे मी बांधील नाही.

मुंबईत दुकानातील मॅनेक्विन्स पाहून (अंगभर कपड्यांत वावरणार्‍या) मुलींना छेडण्याचे प्रमाण वाढल्याचा व्यवस्थित अभ्यासपूर्ण वृत्तांत नुकताच मिररमध्ये येऊन गेला. तुमच्या थाटात विचार करणार्‍यांपेक्षा व्यवस्थित अभ्यासूपणे प्रश्नांकडे पाहण्याची कुवत असलेली अनेक मंडळी येथील समाजात आहेत हे सुदैव!

-'बेफिकीर'!

घरच्या नोकराला जाब विचारावा तसा टोन आवरा आणि सांभाळून वागा. तुम्हाला उत्तर द्यायला येथे मी बांधील नाही.>>>
मुलींच्या कपड्यांवर comment करण्याचा तुम्हाला अधिकार नाही. एवढा राग येतो तर देत कशाला प्रतिसाद ?
बलात्काराला फक्त पुरुषांची भिकार , थिल्लर मानसिकता कारणीभूत आहे हे सत्य स्वीकारायला अवघड जात असेल तर विषय सोडून द्या . तुमच्याशी वाद घालवण्यात फुकट वेळ वाया घालवण्यात काही अर्थ नाही. त्यामुळे मी माझे प्रतिसाद थांबवत आहे.

मुलींच्या कपड्यांवर comment करण्याचा तुम्हाला अधिकार नाही.<<<

हे मला सांगण्याचा तुम्हाला अधिकार नाही. आणि मुलींच्या कपड्यांवर कमेंट करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. मुली म्हणजे भगवंताने इहलोक पवित्र करण्यासाठी धाडलेला स्वतःचा अंश नव्हे त्यावर कमेंट करण्याचा अधिकार वगैरे असायला! फुकटची शानपत्ती नकोय.

एवढा राग येतो तर देत कशाला प्रतिसाद ?<<<

हे तुम्ही कोण सांगणार?

बलात्काराला फक्त पुरुषांची भिकार , थिल्लर मानसिकता कारणीभूत आहे हे सत्य स्वीकारायला अवघड जात असेल तर विषय सोडून द्या .<<<

कविता समजली आहे का? ते जाऊदेत, कविता समजून घेण्याइतका पेशन्स शिकला आहात का? कवितेत कुठे म्हंटलंय की मानसिकता जबाबदार नसते? मानसिकता जबाबदार नसते असे मी कुठे म्हंटलंय एवढे तरी दाखवाच! आणि विषय सोडून द्या वगैरे अवाजवी सल्ले ओकू नका. इथे तुमच्या सल्ल्याबरहुकूम काहीही चालत नसते.

तुमच्याशी वाद घालवण्यात फुकट वेळ वाया घालवण्यात काही अर्थ नाही. त्यामुळे मी माझे प्रतिसाद थांबवत आहे.<<<

तुम्ही तुमचे प्रतिसाद सुरू करा नाहीतर थांबवा! आम्हाला काहीही घेणेदेणे नाही. जीभ टाळ्याला लावण्यापूर्वी कोण काय म्हणत आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न केलात तरी पुरेसे आहे. हा सल्ला नाही, ताशेरा आहे.

चुकलो मॅडम! माफ करा. खर तर मुली चड्डीत फिरल्या काय किंवा नागड्या फिरल्या काय त्याचा वा अश्लील वातावरणाचा माणवी मनावर कुठलाच परीणाम होत नाही. हे मानसशास्त्रावाले डॉक्टर वगेरे सगळा भंकसपणा सांगतात. वास्तविक काय होत ते मला आता समजलय कि, जे कुणी हे बलात्काराच कृत्य करनारी मंडली असतात ना हि सगळी भगवंताने विशेष सवड काढून बनवलेली ब्याद आहे. त्यांच्यावर कश्याचाच परीणाम होत नाही, ना वातावरणाचा ना शिक्षणाचा. त्यांना जे करायच ना ते, ते करणारच. ऊगाच आपले कायदे आणि समाज प्रबोधन करून काहिच फायदा नाही..
चड्डीत फिरणार्‍या मुलींना नावे ठेवण्यात काहिच अर्थ नाही. ज्यांना त्याना आपाआपलं वेषभूशा स्वातंत्र्य आहे. मग त्यावर गदा आण्याचा आपणाला काय अधिकार? झालच तर बलात्कार्‍यांना देखील शिक्षा वगेरे काही करायला नको पाहिजे. क्षिशा जर कुणाला करायचीच असेल तर ती देवाला करायला हवी. कारण सगळ्या गोष्टींच मुळच तो आहे ना?

समोरच्या माणसाला काय म्हणायचं हे तुम्हाला समजत नसेल तर ignore mode on . कारण माझ्या पहिल्या प्रतिसादानंतर तुम्ही लगेच भांडायला सुरवात केली .
भुंकणाऱ्या कुत्राकडे लक्ष दिले कि त्याला अजून चेव येतो भुंकायला . दुर्लक्ष केले कि तो गप बसतो . तुम्ही काय बडबड करायची ती करत बसा.

समोरच्या माणसाला काय म्हणायचं हे तुम्हाला समजत नसेल तर ignore mode on . कारण माझ्या पहिल्या प्रतिसादानंतर तुम्ही लगेच भांडायला सुरवात केली .
भुंकणाऱ्या कुत्राकडे लक्ष दिले कि त्याला अजून चेव येतो भुंकायला . दुर्लक्ष केले कि तो गप बसतो . तुम्ही काय बडबड करायची ती करत बसा.>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>

तुमच्या इतका खालच्या पातळीवर जावून मला प्रतिसादाला प्रतिसाद देता येत नाही. कारण मायबोलीवर वैचारीक वाद होणं समजण्यासारखं आहे, वैचारीक वादात टिका, टिपणी वा विषयवार उपरोधात्मक भाष्य चालायला काहिच हरकत नाही पण जेव्हा या चर्चेला नळावरील भांडणाच स्वरूप येत तेव्हा वाईट वाटत. असो आपल्या विशेष सत्काराबद्द्ल आभारी आहे. कृपया यापेक्षा मोठा सत्कार करू नका एव्हढीच नम्र विनंती. _____/\_____ !

मोहिनी, तुमचा मुद्दाच समजला नाही. कवितेत कवीनं कुठेच असं घडतंय म्हणुन असं चाललंय किंवा तत्सम कसलाच दावा केलेला नाही, मग तुम्ही कसले निष्कर्ष काढताय, नक्की कशाबद्दल बोलताय ?

जे आजुबाजुला पहावं वाचावं लागतंय ते सगळं तितक्याच तीव्रतेनं मांडलं गेलंय.
कविता वाचताना स्पष्ट दिसतंय की वास्तव आणि त्या वास्तवाबद्दलचं वैषम्य मांडताना शब्द किती तोलून मापून वापरलेत, कसरत करून तोल सांभाळलाय!
काहीही बोलायचं का>> काहीतरी बेजबाबदार विधान केल्यानंतर आपण सहसा असं म्हणतो. म्हणुन तुमच्या अनेकपैकी या एकाच प्रश्नाचं न राहवून दिलेलं हे उत्तर.

तुम्हाला एखादी ओळ नसेल पटली, पण म्हणुन त्यातून तुम्ही म्हणताय तसे अर्थ निघताना दिसत नाहीत.

'आम्ही बायका सर्वज्ञानी आणि सद्गुणी, सर्व पुरुष दुर्जन, अक्कलशून्य, हपापलेले आणि कुत्रे' ह्या टिपीकल मानसिकतेच्या पंथातील नवीन अनुयायी दिसतात त्या!

टीप - ही वरील 'कुत्रे' वगैरे भाषा प्रत्यक्ष आयुष्यात एखाद्या पुरुषानेच नव्हे, स्त्रीनेही वापरली असती तर मी खाडकन् कानाखाली आवाज काढला असता. त्यामाने अविनाश खेडकरांचा संयम फारच महान आहे.

Pages