'बलात्कार''

Submitted by -शाम on 8 September, 2014 - 13:37

बलात्काराच्या बातम्यांनी भरतात
पेपरचे रकाने
आणि वाचणारांचे चहासोबत
नाष्टयाचे बकाणे

चौकाचौकात जनावरं टाळ्या देत रवंथ करतात
ज्यांच्या घरात असतात वयात आलेली फुलं
त्याच झाडांची तेवढी
पाळंमुळं हादरतात

स्वप्न विकणाऱ्यांनो कसं घेऊ तुमचही नाव
पण ज्या चड्डीत मी घरात फिरू शकत नाही
तिच घालून फुलं
हुंदडतायेत अख्खा गाव

कायद्यालासुद्धा हसावं कि रडावं कळत नाही
जेंव्हा खरा गुन्हेगार अज्ञानी ठरवू बघतो
न्यायदेवते! तुला एवढंही कळू नये
अगं ज्याला बलात्कार करता येतो
तो बापसुद्धा होऊ शकतो

दे! अशा बापांना खुशाल सवलत दे
आणि डोळ्यांवर पट्टी बांधून बलात्कार करून घे
म्हणजे कळेल तुला उध्वस्त होणाऱ्या आयुष्याची किंमत
मग पट्टी सोडून हमसून हमसून म्हणशील
कायदा म्हणजे फक्त
वेळकाढू गंमत

____________________________________शाम

Group content visibility: 
Public - accessible to all site users

<<स्वप्न विकणाऱ्यांनो कसं घेऊ तुमचही नाव>>

ह्या ओळींमधूनच सारं काही स्पष्ट होतंय. प्रसिद्धी माध्यमे (जसे की चित्रपट, वर्तमानपत्रे, उपग्रह वाहिन्या, इत्यादी) यातून रंगविलं जाणारं स्त्रीचित्र यावरच ही टीका केलीये.

आपण जरा खालील बाबींना विचारात घ्या.

  1. महाराष्ट्र टाईम्स / टाईम्स ऑफ इंडिया व तत्सम वर्तमानपत्रांतून प्रसिद्ध होणार्‍या पेज थ्री पार्टीच्या बातम्या व त्यातील छायाचित्रे.
  2. उपग्रह वाहिनी / वर्तमानपत्रे / रस्त्यावरचे मोठ्या आकाराचे जाहिरातींचे फलक यावरील जाहिराती.

या छायाचित्रांत विशेषतः दारूच्या जाहिरातींत महिलांचे शरीर कशा प्रकारे सादर केलेले असते त्यावर लक्ष द्या. ही चित्रे सर्व थरांतील पुरुषांच्या नजरेस पडतात. त्यामुळे त्यांच्या टेस्टेस्ट्रॉन संप्रेरक पातळीत काय फरक होतो? त्याचा त्यांच्या शरीरावर काय परिणाम होतो हे अभ्यासा. संस्कारी पुरुष आपल्या संस्कारांच्या मदतीने भावनांवर नियंत्रण ठेवण्यात यशस्वी होतात. परंतु सर्वच पुरुष संस्कारी नसतात. त्यांच्यापासून स्त्रियांना धोका उद्भवू शकतो. अशी चित्रे पाहून पेटलेले पुरुष त्या (म्हणजे चित्रातील अल्पवस्त्रातील) महिलेला नव्हे तर इतर महिलांनाही तितकेच धोकादायक ठरतात. तेव्हा बलात्कारित स्त्रियांपैकी किती स्त्रियांचे कपडे आक्षेपार्ह होते हे पाहण्यापेक्षा बलात्कार करणार्‍या पुरुषांपैकी किती जण अशा महिलांना / चित्रांना पाहून चेकाळले होते ते अभ्यासा. ज्या महिलेला पाहून ते चेकाळले असतील ती कदाचित सुरक्षित कोशात असल्याने त्यांच्या हल्ल्यातून वाचली असेल परंतु त्यामुळे इतर कुणीतरी शिकार झाली हे देखील वास्तवच आहे ना.

साधी घटना आहे. एका महामार्गावर एका वळणाच्या जागी फार अपघात घडू लागले. रस्त्याच्या भौगोलिक रचनेत कुठलाही बदल न होता अचानक सहा महिन्यांपासून अपघातात वाढ का होतेय हे शोधले असता असे दिसून आले की तिथे एक होर्डिंग लावण्यात आले होते ज्यावर एका अत्यंत आकर्षक महिलेचे मोठ्या आकारातले चित्र होते. तिने निळ्या रंगाची साडी परिधान केली होती परंतू खण नव्हता. तिचे खांदे व पाठीचा बराचसा भाग अनावृत होता. त्याकडे टक लावून पाहत अनेक वाहनचालक वळणावर वाहन चालवित असत आणि अपघात होत. होर्डिंग काढून टाकले असता अपघातांच्या संख्येत लक्षणीय घट झाली.

राहता राहले - स्त्रियांनी कसे कपडे घालावेत हे सांगण्याचा इतरांना अधिकार आहे की नाही हा प्रश्न? ह्या प्रश्नाला पुन्हा अजुन एक पुष्टी की अंगभर कपडे घातलेल्या स्त्रियांवरही अत्याचार होतातच ना?

ह्या प्रश्नाचे उत्तर असे की, पुण्यात फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यावर एका बांधकाम व्यावसायिकाच्या भक्कम तिजोरीतून लाखो रुपये तिजोरी फोडून चोरण्यात आले आणि त्याच आठवड्यात एकाने स्कूटरच्या डिकीत रुमालात बांधून ठेवलेले पन्नास हजार रुपये स्कुटर मंडईसमोर उभी केली असता चोरण्यात आले. स्कुटरच्या डिकीत ठेवलेली रक्कम चोरी केली गेली यात मालकाचा काहीच गलथानपणा नाही हो.. कारण तसेही भरभक्कम तिजोरीतली रक्कम देखील चोरीच होतेच की असे ज्याला वाटत असेल त्याला जगात कोणीच शहाणपण शिकवू शकत नाही.

मोहिनिजि पुन्यातिल ओध येथे परिहार चौकमधे मुम्बैला जानारी बसमध्ये चड्डीतिल मुलि दिसतिल एखादि तरि
मुम्बाईला पन दिसतिल विदाउट high क्लास मुली त्यांच्या ४ चाकी गाड्यां bodyguard शिवाय . middle क्लास किवा उच्च मध्यम वर्गीय सुध्दा अश्या भरपुर मुली बान्द्रा जुहु एरियात दिसतिल.
.
लाईफ ओके वर high क्लास मुलीवर बलात्कार आनि खुन झलेल्या केसेस बघितल्य आहेत.नोकर व वाचमन कडुन
त्या निव्वळ वेशभुशा मुळे आकशित होउन झल्या होत्या.

मोहिनीबाई, तोंड आवरा , एकतर तुमच्या प्रतिसादावरुन तुम्हाला कवितेतलं घंटा काही कळालेलं दिसत नाही.

चड्डी घातल्याने कोणी high क्लास होत नसतो.. आणि तसे असेल तर उद्याचा हायक्लास भारत बघण्याआधी आमचे डोळे मिटावेत देवाने.

माझी अवस्था वैभवच्या "थँक गॉड कुसुमाग्रज" सारखी झालीये. कवितेत चड्डी सोडून इतरही मुद्दे आहेत. आणि एकूण कविता समजून घेतलीत तर ते किती भयानक आहेत हेही कळू येईल.

साधं उदाहरण सांगतो.. एखादा डिओ वापरला की, पोळ्याला डिवचल्यावर मधमाश्या मागे लागतात तशा बायका पुरूषामागे पळतात प्रसंगी त्या डोंगर-दर्‍या समुद्र लंघून आपले सावज गाठतात असे दाखवले जाते.
अता एखाद्याने ती जाहिरात पाहुन मेहनत केलेले पैसे खर्चून असा डिओ घेतला आणि जर एकही मधमाशी फिरकली नाही तर अश्या माणसाला मेंदूज्वर होऊन फेफर भरणार नाही का? हे फ्रस्ट्रेशन त्याला कुठेही पोचवू शकेल की.

असो.... सई, सुरेख्,चेतन...प्रतिसादा बद्दल धन्यवाद!!

बाकी, बेफिकीर पुरून उरतीलच!

.........

Pages