Submitted by हर्ट on 26 August, 2014 - 12:08
गुळाच्या वेगवेगळ्या जाती/प्रकारांबद्दल इथे कुणी माहिती लिहू शकेल का? मी गोव्याला म्हापशाला एक काळाकुट्ट रंगाचा गुळ पाहिला. हा गुळ औषधी असतो असे त्या आजीबाई सांगत होत्या. आणि हा गुळ त्रिकोणी आकाराचा होता. सगळ्या कडा धारदार होत्या. मी थोडा विकत घेतला आणि मला तो फार आवडला. नंतर वाटत राहिले अजून आणायचा असता.
दोन प्रकारचे ऊस असताना ना? एक जांभळा आणि एक हिरवा. आणि दोन्ही प्रकारच्या उसापासून वेगळा म्हणजे वेगळ्या चवीचा गुळ तयार होतो.
पाम तरु पासून सुद्धा गुळ बनवतात. इथे मलेशियाहून हा गुळ विकायला येतो. खूपच चवदार लागतो. मला खरे तर साखरेपेक्षा गुळाचेच पदार्थ आवडतात. गुळाचे अनारसे, पोळ्या, पुर्या, थालिपिठ, गुळपोळी, गुळाचे लाडू - सगळेच मेनू आवडीचे.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अग केशर, तो केशर गुळ
अग केशर, तो केशर गुळ सेंद्रियच आहेना, मला वाटतंय की तू वापरतेस तो सेंद्रियच असावा. जिथुन घेतेस त्यांना विचार.
अन्जू तो सेंद्रिय असेल तर
अन्जू तो सेंद्रिय असेल तर आनंदच आहे. पण दुकानदार विकताना केमीकलविरहीत असे सांगतात.
बर्याच जणांना सेंद्रिय/केमीकलविरहीत गुळ बाजारात मिळतो हेच माहित नाहिये. मागणी वाढेल तसा सेंद्रिय गुळ सहजपणे मिळेल बाजारात असे वाटतेय.
रामदेवबाबाच्या दुकानात पण
रामदेवबाबाच्या दुकानात पण केमिकलविरहित गुळ मिळतो.
एक सूचना गुळ तयार करताना
एक सूचना
गुळ तयार करताना त्यात रसायने वापरलेली नाहीत इतपत ठीक आहे परंतु उसाच्या पिकाला खते, किटक नाशके,संप्रेरके असे सर्व वापरलेले असतातच आणि हे तर आपल्या पोटात जाणारच मग जास्त पैसे देऊन तथाकथित सेंद्रिय गूळ घेण्यात काय हशील? त्यांच्या सेंद्रियतेची खात्री कुणी द्यावी?ओरगानिक म्हणून कितीही थुका लावला तर चालतो अशी दुर्दैवाने परिस्थिती आहे.
उलट मी कोठेतरी वाचले होते कि गूळ स्वच्छ करताना जी रसायने वापरली जातात उदा.चुनकळी. याने हि घातक रसायने गाळ म्हणून खाली बसतात किंवा फेस म्हणून वरती तरंगतात. आणि बाकी राहणारा गूळ हा जास्त शुद्ध असतो. इतर अनेक "रसायने" वापरली जातात त्यातील बरीचशी रसायने आपल्या रोजच्या वापरातील आहेत उदा. खायचा सोडा, जिप्सम इ. हि जर प्रमाणात वापरली गेली तर त्यापासून होणारे नुकसान नगण्य आहे.(उलट सेंद्रिय गुळातून मिळणारे संप्रेरके किटक नाशके हि जास्त नुकसान देणारी आहेत.
राहिली गोष्ट भेसळीची. सेंद्रिय गुळात भेसळ होणार नाही याची खात्री कोण देणार? याची विदा मिळेल तेंव्हा देईनच.
पण जे चमकते ते सर्व सोनेच असते असे नाही.
वा सुबोधजी छान. विचार करायला
वा सुबोधजी छान. विचार करायला लावणारा प्रतिसाद.
विचार करायला लावणारा
विचार करायला लावणारा प्रतिसाद.>> ++१
सुबोध छान प्रतिसाद आणि मी
सुबोध छान प्रतिसाद आणि मी सहमत आहे.
गुळ करताना रासायनिक प्रक्रिया घडावी लागते आणि त्यासाठी काही घटक वापरतातच. त्यामुळे सेंद्रिय गुळ आणला म्हणजे आपण काहीतरी खूप शुद्ध खातोय अशी समजूत अजिबातच करून घेऊ नये.
त्यामुळे सेंद्रिय गुळ आणला
त्यामुळे सेंद्रिय गुळ आणला म्हणजे आपण काहीतरी खूप शुद्ध खातोय अशी समजूत अजिबातच करून घेऊ नये.>>>>>>> अजिबातच नाही.उलट आता हा ब्राऊन गूळ मिळतो तो कदाचित कोणत्यातरी प्रोसेसने ब्राऊन तर करत नसतील ना ही शंका माझ्या मनात केव्हापासून आहे.पण मला त्याची टेस्ट आवडते.
सुबोध खरे, पोस्ट आवडली. मला
सुबोध खरे, पोस्ट आवडली.
मला भारतात मिळणार्या बहुतेक सर्व ऑरगॅनिक प्रॉडक्ट्सबद्दल (अगदीच माहितीचे उत्पादक नसतील तर) कायमच एक बारकुशी शंका असते - त्यांचे दावे नक्की किती प्रमाणात खरे असतात आणि त्याचे खरे फायदेतोटे काय ते.
डिट्टो विथ ब्राउन ब्रेड. त्यापेक्षा कमी प्रमाणात का होईना नेहेमीचा ब्रेड वापरते.
वरदा ताई हा दुवा वाचून पहा.
वरदा ताई
हा दुवा वाचून पहा. म्हणजे आपला ब्राउन ब्रेड बद्दलचा समज/ गैर समज दूर होण्यास मदत होईल
http://timesofindia.indiatimes.com/life-style/health-fitness/diet/5-food...
माझ्या मताला पुष्टीच मिळाली
माझ्या मताला पुष्टीच मिळाली तुमच्या दुव्यामुळे
धन्यवाद
ब्राउन ब्रेड बद्दल मला पण
ब्राउन ब्रेड बद्दल मला पण मागे मैत्रिणीने हेच सांगितले होते की तुला एवढ्या कमी पैशात ब्राऊन ब्रेड कसा मिळेल. केमीकल वापरुन ब्राऊन करतात. होल ग्रेन चा व्रेड बनवणे नक्कीच जास्त खर्चीक असेल.
पण केमिकलविरहित गुळाची चव, पोत नेहमीच्या गुळापेक्शा वेगळे आहे एवढे नक्की.
चिक्कीचा गूळ
चिक्कीचा गूळ
चिक्कीचा गूळ>>>>>>> नाही .हा
चिक्कीचा गूळ>>>>>>> नाही .हा एक वेगळा प्रकार आहे.
चवीला केमिकलविरहीत गुळ हा
चवीला केमिकलविरहीत गुळ हा जास्त चांगला लागतो, हे मात्र खरं आहे. मी विशेष गोड पदार्थ खात नाही पण नवर्याची पसंती चवीसाठी मात्र ब्राउन गुळालाच.
जो गुळ लालसर आणि चिकट असतो तो
जो गुळ लालसर आणि चिकट असतो तो गुळ चांगला असतो. गुळाला फार प्रोसेसिंगाची गरज भासत नाही म्हणून भारतात गुळ बर्यापैकी चांगला मिळतो.
Pages