Submitted by डॉ.कैलास गायकवाड on 15 September, 2014 - 10:49
श्वास नुसता घेत आहे पण मला माहीत नाही
जीवनातिल एक माझा क्षण मला माहीत नाही
पाच खोल्या फ्लॅट गाडी घेतले भावी पिढीला
पण तिला देऊ कसे अंगण मला माहीत नाही
झाकल्या हासून हृदयातील जखमा पण लपावा
चेह-यावरचा कशाने व्रण मला माहीत नाही
कारणाविन एकही नाही घडत कसला बदल पण
मी असा झालो कसा कारण मला माहीत नाही
लोक येण्या सांत्वनासाठी असावे दु:ख पदरी
हे कुण्या कैलासचे धोरण मला माहीत नाही
---डॉ.कैलास गायकवाड
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पाच खोल्या फ्लॅट गाडी घेतले
पाच खोल्या फ्लॅट गाडी घेतले भावी पिढीला
पण तिला देऊ कसे अंगण मला माहीत नाही ...
छान!
कारणाविन एकही नाही घडत कसला
कारणाविन एकही नाही घडत कसला बदल पण
मी असा झालो कसा कारण मला माहीत नाही
लोक येण्या सांत्वनासाठी असावे दु:ख पदरी
हे कुण्या कैलासचे धोरण मला माहीत नाही <<<
आवडले.
अंगण आणि कारण खूप आवडले
अंगण आणि कारण खूप आवडले सर
धन्यवाद
आवडली.
आवडली.
कारणाविन एकही नाही घडत कसला
कारणाविन एकही नाही घडत कसला बदल पण
मी असा झालो कसा कारण मला माहीत नाही
हा शेर आवडला
अनेक शेर आवडले
अनेक शेर आवडले
वा! शेर आवडले. (पाचच असल्याने
वा! शेर आवडले. (पाचच असल्याने मी अनेक असा शब्दप्रयोग केला नाही )
*** मात्र, तुमच्यावर यतीभंगाचा आरोप कोणी केला नाही, हे फार चांगले झाले. त्यामुळेच वाचताना मजा आली.
तरी, एक सुचवू का?
मतल्यामध्ये ''एक'' असा शब्द वापरला आहे. तुम्हाला काय म्हणायचे आहे हे लक्षात आल्यावर ''एक'' म्हणजे 'एकही'' असे कळते. मात्र ते पूर्णपणे जर मतल्यात उतरले असते तर आणखी मजा आली असती असे वाटते. ह्रस्व - दीर्घ जाऊ देत.
जीवनातिल एकही का क्षण मला माहीत नाही
किंवा
जीवनामधलाच माझ्या क्षण मला माहीत नाही
असे आपले सुचले.
धन्यवाद.
अगदी बरोबर आहे अजय जी.
अगदी बरोबर आहे अजय जी.
जीवनातिल एक "माझा" क्षण मला माहीत नाही.
असे करावे का?
बाकी आपल्या पर्यायान्वर विचार करतो आहे.
'अंगण' आणि 'कारण' सर्वात
'अंगण' आणि 'कारण' सर्वात विशेष वाटले.