गणोबा आमच्या गावात-कविन -सानिका

Submitted by कविन on 7 September, 2014 - 14:10

पाल्यः सानिका
वयः १० वर्ष

या उपक्रमाच्या निमीत्ताने तिने मराठीत लिहीलं (अभ्यासा वय्तिरिक्त) हेच माझ्यासाठी सुखावह आहे. धन्यवाद संयोजक. डायरेक्ट पेनाने लिहील्याने काही चूका सुधारता आल्या नाहीत त्याचं वाईट वाटतय पण ठीक आहे सरावाने त्याही चूका टाळता येतील तिला अशी आशा आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा सानिका , मस्त लिहिलेस ..

तुझ्याकड़च्या जादूने उडतच जाऊ >>>> Rofl Proud Lol
ट्राफीकग्रस्त मुंबईकरांची वेदना बरोबर ओळखलिस . ट्रू मुंबईकर Wink

आपल्या आपल्या आईच्या कुशीत झोपून जाऊ >>>> सो क्यूट Happy

सो स्वीट ऑफ यु सानिका. अगदी छान लिहिलंस.

पावभाजी, चाट आयटेम आणि वडापाव खाऊन बाप्पा नक्कीच खुश होणार. मोदक, लाडू सगळे गोड पदार्थ खाऊन कंटाळला असेल तो आणि तू आपल्या डोंबिवलीच्या प्रदूषणाबद्दल त्याला सांगितलेस त्यामुळे तुझे आभार, आता लवकरच आपली समस्या सुटेल.

शेवटपण गोड.

सानिका, किती सुंदर लिहील आहेस.
ही मुलांची मनोगत मी तर परत परत वाचते. इतकी गोड वाटतात ना. संयोजक, ह्या उपक्रमाबद्दल धन्यवाद.
कविन, अग त्या पत्रातली खाडाखोड पत्राची शोभा वाढवतायत उलट यामुळे जास्त छान वाटतय.

सानिका... ग्रेटच.
डोंबिवलीकरांचा सुर एकदम परफेक्ट पकडला आहे.

अग त्या पत्रातली खाडाखोड पत्राची शोभा वाढवतायत उलट यामुळे जास्त छान वाटतय.>> अगदी अगदी Lol

एकदम बेस्ट. हे असले प्लॅन असतील तर बाप्पा १० ऐवजी २० दिवस राहिला तयार होईल की Wink

पावभाजी तुझी आई पण एकदम यम्मी बनवते (किमान फोटोत तरी दिसते Proud ) ती पण खायला द्या बाप्पाला Wink

बाकी गर्दी, प्रदुषण डब्बल भारी Happy
मस्त पत्र लिहिलयेस Happy

आपल्या आपल्या आईच्या कुशीत झोपून जाऊ >>>> सुपर क्यूट Happy

छान लिहिलंयस सानिका..मस्त
तुला शाब्बसकी Happy

सानू, मस्तच. Happy

शाळेतले वर्ग आणि खेळाचे ग्रांऊड यांच्या मध्ये बाप्पाला काय दाखवणार आहेस ते काही कळले नाही फक्त.

गजानन, तिच्या शाळेत गेल्या वर्षीपासून फळ्याचा पॅटर्न बदललाय, त्यात अर्ध्याभागात प्रोजेक्टर सारखी सोय केलेय त्यावर त्यांना अधूनमधून धड्यातल्या गोष्टींच्या अनुषंगाने इतर रेफरेन्सचे चार्टस, फ्लॅशकार्ड्स, एखादा छोटा सिनेमा, कविता, गोष्टी इ. दाखवतात. तसच वर्गात सिसिटिव्ही कॅमेरे बसवलेत
आणि त्यांच्या ग्राउंडवर फुटबॉल, व्हॉलीबॉलसाठीच्या सोयी आहेतच पण आता एक भाग पूर्णपणे अ‍ॅडव्हेंचर स्पोर्ट्ससाठी विकसीत केलाय. त्यात बीम बॅलन्स, टायर्सवर चालणं, बर्माब्रीज, रोपवरून चालणे (आपण विसावा रिसॉर्ट मधे केलं होतं तसं), रॉक क्लाईंबींग असे प्रकार आहेत. आणि ते ह्या मुलांना पिटी पिरिएड्स + स्पेशल शनिवार बॅचेसमधे करायला मिळतात त्यासाठी प्रशिक्षक आहेत.

हे सगळं तिला दाखवायचं आहे म्हणाली