आता कशाला शिजायची बात - मंजूडी - पॉवरपॅक!

Submitted by मंजूडी on 5 September, 2014 - 05:04
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

सुक्या मेव्याच्या बर्‍याच पाककृती स्पर्धेसाठी आल्या आहेत. सगळ्याच पाककृती मस्त आहेत, करायलाही सोप्या आहेत.

'आशिबा' जाहिर झाल्यावर नियम वाचल्याक्षणी ही पाककृती डोळ्यांसमोर आली. फोटोबिटो काढण्याचा खटाटोप करत गणपतीच्या आधी उत्साहाने केली. त्याच उत्साहात इथेही देते आहे.
बघा, आवडतात का आमचे पॉवरपॅक!

लागणारे जिन्नस:

काजू - १५-२०
बदाम - १५-२०
अक्रोड - ८-१०
पिस्ते - १०-१२
सुक्या अंजिराच्या चकत्या - ४-५
बेदाणे - १०-१२
जर्दाळू - ५-६
खजूर - ५-६
केशर-वेलची सिरप - अर्धा चमचा

powerpack1.jpg

क्रमवार पाककृती: 

१. काजू, बदाम, अक्रोड, पिस्ते ड्रायफ्रूट स्लायसरवर किसून घ्या.

Powerpack2.jpg

२. खजूराच्या बिया काढून साफ करून घ्या. सुके अंजीर, बेदाणे, जर्दाळू आणि खजूर सुरीने बारीक कापून घ्या.

Powerpack3.jpg

३. सगळं प्रकरण एकत्र करून त्यात केशर-वेलची सिरप घालून कालवा.

Powerpack4.jpg

४. आवडत्या आकारात पॉवरपॅक बनवा आणि रोज एक खा.

Powerpack5.jpg

अधिक टिपा: 

लहान मुलांसाठी, बाळंतिणींसाठी हा साखरविरहीत खास पदार्थ आहे. मधुमेहींनाही कधीतरी तोंडात टाकायला चालू शकेल.
आमची आजी खजूर, अंजीर वगैरे जरा तुपावर परतून घेते. ते आजीच्या हातचं खायला चांगलं लागतं. आम्ही केलं की पॉवरपॅक खाताना तूप तोंडात येतं, जे आवडत नाही, म्हणून शोधून काढलेला हा शॉर्टकट आहे.

सुका मेवा घेताना चांगला खुटखुटीत असावा. मऊ पडलेला/ सादळलेला/ खवट झालेला नको.
अंजीर/ खजूर/ केशर सिरप यातल्या ओलाव्यामुळे पॉवरपॅक नीट वळले जातात. पण वळले जात नसतील तर जरा तुपाचा हात लावून वळा.

पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रीयाबेन, अ‍ॅडमिनना संयोजकांकडून साकडं घाला प्लिज. मी त्यांच्या विपूत घातलेलं आहेच.

आहे खरा पॉवरपॅक.

अंजीर, बेदाणे, जर्दाळू आणि खजूर सगळ्यातच ठासून साखर भरलेली असते. त्यामूळे साखरेचे पथ्य असणार्‍यांनी जरा जपूनच.

ज्या फोटोच्या नावात स्पेस कॅरॅक्टर आहेत ते दाखवायला अडचण येते आहे. स्पेस काढून फोटो पुन्हा लावला तर अडचण येत नाही.
(ही अडचण का येते आहे ते माहिती नाही. शोध चालू आहे. पण तात्पुरता उपाय वर सांगितला आहे).

फोटोंच्या नावातली स्पेस काढून फोटो अपलोड केलेले आहेत.

धन्यवाद वेबमास्तर!

संयोजक मंडळ म्हणे गॅस नको, मायबोली म्हणे स्पेस नको!!
एक म्हण आठवली, पण जौद्या!! Proud

या पॉवरपॅक मध्ये जर म्युसेली किंवा इतर सिरल्स घातले तर घरगुती ग्रॅनोला बार टाइप लहान मुलांचं ब्रेकफास्ट स्नॅक्स तयार होईल. एक -दोन पॉवरपॅक आणि ग्लासभर दुध शाळेत जाताना घाईच्या वेळी पोटभरीचं होईल. Happy

छान आहेत हे लाडू. मुलांसाठी बेस्ट.
मला वाटते जागूने मागे बाळांतिनीसाठी लाडू नावाने अश्याच प्रकारच्या ड्रायफ्रुट्सच्या लाडवाची कृती लिहीली होती.

केशर-वेलची सिरप म्हणजे?>>>>गणपतिपुळे ,कोकण किंवा मालवनी जत्रा मुंबईत बॉट्ल मधे मिळते.परदेशात माहित नाहि.पण घरीही बनवु शकता केशर पावडर + साखर + वेलचीपूड एकत्र करुन गरम पाक थंड करुन वापरा.हे इतर गोड पदार्थातही वापरु शकता.

मस्त आहे हे ! फोटोतून एक उचलून घ्यायची भयंकर इच्छा झाली Happy
स्लाईसरवर काप करणं किती सहज होतं ? मला कुठलाही पदाथ किसायला खूप कटकटीचे वाटते. अपवाद चीज !

Pages