"ठो उपमा" - प्रसंग-१०

Submitted by संयोजक on 7 September, 2014 - 01:50

गणपती बाप्पा मोरया!
या उपक्रमाविषयी अधिक महितीसाठी येथे टिचकी मारा - http://www.maayboli.com/node/50546

प्रसंग :

अंजू त्याच्या मिठीत हुंदके देत रडत होती आणि तो तिच्या काळ्याभोर केसांवरुन हलकेच हात फिरवत तिला शांत करण्याचा प्रयत्न करत होता. "ए वेडाबाई! अशी रडतेस काय लहान मुलासारखी.. अं? अशी इकडे बघ माझ्याकडे!" अंजूने तिच्या लांबसडक पापण्या वर उचलून त्याच्याकडे जीवघेणा कटाक्ष टाकला.
"आय हाय! इसी अदा के तो दीवाने हुए हम!"
"जावा तिकडं! तुमचं आपलं कायतरीच!"
म्हणत अंजू लाजेनं दरवाजाकडे पळाली. तर समोर डॅडी आणि आई गालातल्या गालात हसत उभे होते.
"काय मग अंजू बेटा, स्थळ पसंत आहे ना?" डॅडींनी आईकडे डोळा मारत अंजूला विचारले.
"डॅडी, तुम्ही पण ना.. जा बाबा आम्हाला किनई कुणाशी बोलायचंच नाही!" असं म्हणत अंजू हॉलमध्ये पळाली.
इकडे शशिकलाबाईंच्या डोळ्यात पाणी बघून डॅडीनी विचारले, "काय गं, रडतेस काय अशी?"
"अहो, हे दु:खाचे अश्रू नव्हेत, आनंदाश्रू आहेत! असा लाखात एक जावई मिळाला, पोरीनं नशीब काढलं हो! आता आपण सुखानं डोळे मिटायला मोकळे!"

- समाप्त

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अंजू त्याच्या मिठीत घामाघूम होत रडत होती आणि तो जाड्याभरड्या केसांतून येणार्‍या नव्या कंडिशनरचा वास सहन करीत तिला शांत करण्याचा प्रयत्न करत होता. "ए भवाने! अशी रडतेस काय लहान मुलासारखी.. माझ्या घामेजलेला टीशर्टमध्ये तुझ्या आसवांनी आणखीनच ओला होतोय. अंजूने तिच्या तिरळ्या डोळ्यांनी त्याच्याकडे डोळे लिंबाएवढे वटारून पाहिले.
"आय हाय! इसी अदा के तो दीवाने हुए हम!"
" हो ना, नाहीतरी तुझ्याशिवाय मला आणि माझ्याशिवाय तुला कोण पसंत करणार होतंं?"
म्हणत अंजू लाजेनं दरवाजाकडे पळाली. तर समोर डॅडी आणि आई आ वासून, कपाळाला हात लावून उभे होते.
"काय मग अंजू बेटा, स्थळ पसंत आहे ना?" डॅडींनी आईकडे डोळा मारत अंजूला विचारले.
"डॅडी, तुम्ही पण ना.. थांबा आत्ता मी माझं फेसबुक स्टेटस अपडेट करून येते." असं म्हणत अंजू हॉलमध्ये पळाली.
इकडे शशिकलाबाईंच्या डोळ्यात पाणी बघून डॅडीनी विचारले, "काय गं, रडतेस काय अशी?"
"अहो, हे दु:खाचे अश्रू नव्हेत, जावईबापूंच्या उग्र बॉडी स्प्रेने डोळे चुरचुरताहेत अगदी. असा पर्फ्युम फुकटात मिळाला, तरी मी तो घेणार नाही! आता आधी घरभर रूम फ्रेशनर मारायला हवा.

अंजू त्याच्या मिठीत त्याला ढुशा देत रडत होती आणि तो तिच्या सप्तरन्गी केसांकडे पान्ढरा फटफटीत होऊन बघत तिला शांत करण्याचा प्रयत्न करत होता. "ए
रन्गेल बये! अशी रडतेस काय लहान मुलासारखी.. अं? देऊ का एक थोबाडाडीत ठेवून?" अंजूने तिच्या कृत्रिम पापण्या वर उचलून त्याच्याकडे जळजळीत कटाक्ष टाकला.
"आय हाय! इसी अदा के तो दीवाने हुए हम!"
"जातोस बर्‍या बोलान की लाथ घालू कम्बरड्यात म्हणत अंजू लाजेनं दरवाजाकडे पळाली. तर समोर डॅडी आणि आई कपाळाला हात लावून उभे होते.
"काय मग अंजू बेटा, स्थळ पसंत आहे ना?" डॅडींनी आईकडे डोळा मारत अंजूला विचारले.
"डॅडी, तुम्ही पण ना.. चालते व्हा आई बाबा,तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती!" असं म्हणत अंजू हॉलमध्ये पळाली.
इकडे शशिकलाबाईंच्या डोळ्यात पाणी बघून डॅडीनी विचारले, "काय गं, रडतेस काय अशी?"
"अहो, हे दु:खाचे अश्रू नव्हेत, पश्चातापाचे अश्रू आहेत! असे लाखात एक घबाड मिळाले, पोरीनं नशीब काढलं असते हो! आता आपणास तोन्ड काळे करायलाच हवे."

अंजू त्याच्या मिठीत गुदमरत होती आणि तो तिच्या कुरळ्या केसांमधे अडकलेला हात सोडवत तिला शांत करण्याचा प्रयत्न करत होता. "ए मेघनाबाई! अशी रडतेस काय लहान मुलासारखी.. अं? अशी इकडे बघ माझ्याकडे!" अंजूने तिच्या पिटपिट्या पापण्या वर उचलून त्याच्याकडे खाउकी गिळू नयनबाण दिला.
"आय हाय! इसी अदा के तो दीवाने हुए हम!"
"ही मेली मेघना कोण ???"
म्हणत अंजू लाजेनं दरवाजाकडे पळाली. तर समोर डॅडी आणि आई गालातल्या गालात हसत उभे होते.
"काय मग अंजू बेटा, स्थळ पसंत आहे ना?" डॅडींनी आईकडे डोळा मारत अंजूला विचारले.
"डॅडी, तुम्ही पण ना.. तो गधडा मेघनाच्या प्रेमात बुडलाय!" असं म्हणत अंजू हॉलमध्ये पळाली.
इकडे शशिकलाबाईंच्या डोळ्यात पाणी बघून डॅडीनी विचारले, "काय गं, रडतेस काय अशी?"
"अहो, हे फक्त दु:खाचे अश्रू नव्हेत, नशीबच फुटकं माझं! जावई असा गावभवाना, पोरीनं वाभाडं काढलं हो! आता आपण पहिला तो टीव्ही बंद करायला हवा!"

अंजू त्याच्या मिठीत मुसमुसत रडत होती आणि तो तिच्या केसाच्या विगवरून हलकेच हात फिरवत तिला शांत करण्याचा प्रयत्न करत होता. "ए बावळट! अशी रडतेस काय लहान मुलासारखी.. अं? चष्मा सावरून बघ माझ्याकडे!" अंजूने तिचा पसरलेला मस्कारा पुसून सोनेरी चष्मा नाकावर चढवून वर उचलून त्याच्याकडे खाउ की गिळू कटाक्ष टाकला.
"आय हाय! इसी अदा के तो दीवाने हुए हम!"
"बावळट म्हणे, तु का मी सांगू का?!"
म्हणत अंजू लाजेनं दरवाजाकडे पळाली. तर समोर डॅडी आणि आई डोक्यावरआठ्या घालून उभे होते.
"काय मग अंजू बेटा, स्थळ पसंत आहे ना?" डॅडींनी आईकडे डोळा मारत अंजूला विचारले.
"डॅडी, तुम्ही पण ना.. खोदा पहाड निकला चुहा, हा तुमचा चॉइस?." असं म्हणत अंजू हॉलमध्ये पळाली.
इकडे शशिकलाबाईंच्या डोळ्यात पाणी बघून डॅडीनी विचारले, "काय गं, रडतेस काय अशी?"
"अहो, हे दु:खाचे अश्रू नव्हेत, ग्लिसरीन आहे! असा दिवट्या जावई मिळाला, पोरीनं त्यालाही धुडकावलं हो! आता आपण डोकं फोडायला मोकळे!"

बाकी ओरिजिनल गोष्ट इतकी छान लिहिलेय आणि बदल करण्याच्या जागाही इतक्या विचारपूर्वक ठेवल्यात त्यामुळे मजा आली प्रसंग बदलून लिहायला. धन्यवाद
संयोजक, ठो उपमाची मूळ कल्पना कोणाची व लेखक कोण हे सुद्धा सांगा प्लीज.

नाही, 'ठो' या खेळाची मूळ कल्पना फारेंडची नाही. मात्र त्यांचा लेख प्रेरक होता असे या खेळाच्या घोषणेत लिहीले आहे. Happy

हां तेच Happy
मुळ कल्पन फारेंडची खेळाची डोक्यालिटी आणी लिखाण संयोजकांपैकी कोणाचं त्यासाठी सस्पेन्स अजुनही कायम ठेवत आहोत Proud

अंजू त्याच्या मिठीत उवँ.. उवँ करून रडत होती आणि तो तिच्या नुकत्याच पोनी बांधलेल्या केसांवरुन हलकेच हात फिरवत तिला शांत करण्याचा प्रयत्न करत होता. "ए शोना! अशी रडतेस काय लहान मुलासारखी.. अं? मुलीसारखी रड!" अंजूने तिच्या लिमलेटच्या गोळ्या उचलून त्याच्याकडे बाहेरचा कागद टाकला.
"आय हाय! इसी अदा के तो दीवाने हुए हम!"
"बघ तुझ्या शर्टावर गोळीचा डाग पडला!"
म्हणत अंजू लाजेनं दरवाजाकडे पळाली. तर समोर डॅडी आणि आई हातातलं पॅम्पलेट हलवत उभे होते.
"काय मग अंजू बेटा, स्थळ पसंत आहे ना?" डॅडींनी आईकडे डोळा मारत अंजूला विचारले.
"डॅडी, तुम्ही पण ना.. जा बाबा मला नाही परत महाबळेश्वरला जायचं!" असं म्हणत अंजू हॉलमध्ये पळाली.
इकडे शशिकलाबाईंच्या डोळ्यात पाणी बघून डॅडीनी विचारले, "काय गं, रडतेस काय अशी?"
"अहो, हे दु:खाचे अश्रू नव्हेत, कांदा कापला ना आत्ताच! असा कसा हो इतका सडका कांदा मिळाला, थोडं लांब जाऊन भाजी आणायला काय होतं तुम्हाला! आता पुढच्या वेळेस असा कांदा आणाच मग दाखवते!"

अंजू त्याच्या मिठीत टिशर्ट भिजवत रडत होती आणि तो तिच्या हायलाईट केलेल्या केसांवरुन हात फ़िरवत तिला शांत करण्याचा प्रयत्नं करत होता.कमॉन! अशी रडतेस काय बच्चूसारखी.माझा टिशर्ट भीजवणं सोड आणि माझ्याकडे बघ. अंजूने पुन्हा एकदा मार डाला लूक दिला

आय हाय! इसी अदा के तो दिवाने हुए हम!

नौटंकी पुरे! म्हणत अंजू दरवाजाकडे वळली तर समोर डॅडी आण आई "कचं फशवलं" लूक देत उभे होते

काय मग अंजू बेटा, स्थळ पसंत आहे ना? डॅडींनी आईकडे डोला मारत अंजूला विचारले

डॅडी, तुम्ही पण ना... इमोशनल सस्पेन्स ऍवॉर्ड मिळवाल डिरेक्शनचा, पिक्चर काढाल तर" असं म्हणर अंजू हॉलमधे पळाली.

इकडे शशिकलाबाईंच्या डोळ्यात पाणी बघून डॅडींनी विचारले, काय गं, रडतेस काय अशी?"

"अहो, हे दु:खाचे अश्रू नव्हेत, पिक्चरचा दि एन्ड गोड झाल्याचे अश्रू आहेत. पोरीला महा लोटो लागला की हो, आता आपण विणाज वर्ड सोबत सेकंड इन्निंग्ज स्पेशल टूर्स करायला मोकळे!