"ठो उपमा" - प्रसंग-९

Submitted by संयोजक on 6 September, 2014 - 02:19

गणपती बाप्पा मोरया!
या उपक्रमाविषयी अधिक महितीसाठी येथे टिचकी मारा - http://www.maayboli.com/node/50546

प्रसंग :

त्याच्यासोबत संसाराची किती किती सुखस्वप्ने रंगवली होती आपण! आणि आज हे अचानक असं का सगळं विस्कटलं? नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. त्यांच्या प्रेमाला कुणाची तरी दृष्ट लागली आणि होत्याचं नव्हतं झालं! तेवढ्यात अंजूच्या खोलीचा दरवाजा वादळाने ढकलावा तसा उघडला. . तोच! लाल गुलाबांचा भरगच्च पुष्पगुच्छ आणि उघडलेल्या निळ्या मखमली डबीत हिर्‍याची अंगठी घेऊन गुड्घ्यावर बसलेला! त्याने अंजूकडे एक तिरपा कटाक्ष टाकून विचारले, "माझं तुझ्यावर जीवापाड प्रेम आहे अंजू! तुझ्याशिवाय मी जगू शकत नाही, माझा वेडेपणा माफ कर अंजू! तुझ्याशिवाय माझा जीव कुठेच रमत नाही! तुझेही माझ्यावर निरतिशय प्रेम आहे, मला माहितेय. माझी होशील का, अंजू?" अंजू लाजेने चूर चूर झाली! तिचे गाल आरक्त झाले. अचानक झालेल्या या प्रेमवर्षावात ती बावरली, चिंब चिंब न्हाऊन निघाली! तिला एक शब्द सुचेना. अंजूने धावत जाऊन स्वतःला त्याच्या बाहुपाशात झोकून दिले आणि त्याच्या भरदार छातीवर हलकेच मारत स्फुंदू लागली.. 'का वागलास असं..? माझा जीव टांगणीला लागला होता. मला तुझ्याशी काहीच बोलायचं नाही..'

Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्याच्यासोबत किती डेटीन्ग केली होती आपण! आणि आज हे अचानक असं का सगळं विस्कटल.. दोघान्च्या मनात काहीतरी तिसरच होत.त्यांच्या डेटिन्ग्ला कुणीतरी बेटिन्ग लावली आणि सगळ भान्ड फुटल.! तेवढ्यात अंजूच्या खोलीचा दरवाजा अलगद उघडावा तसा उघडला. . तोच! निरनिराळ्या क्रेडिट कार्ड्सची अनपेड बिल्स आणि बॅन्कान्ची रिमाइन्डर्स हातात घेऊन उभा! त्याने अंजूकडे आशाळभूतपणे एक लाचार कटाक्ष टाकून विचारले, माझ्याबरोबर हॉटेलात हादड हादड हादडलस. आता ही बिले चुकवण्यात अर्धी वाटेकरी होशील का अन्जु? माझं तुझ्यावर जीवापाड प्रेम आहे! तुझ्याशिवाय मी जगू शकत नाही असा गैरसमज तर नाही ना करुन घेतलास?, असल्यास हा वेडेपणा बन्द कर अंजू बीले चुकती केल्याशिवाय माझा जीव कुठेच रमत नाही! तुझे हे माझ्या जीवावर उड्या मारणे होते हे मला माहितेय. माझ्या अनपेड बीलान्ची वाटेकरी होशील ना, अंजू?" अंजू रागाने लालेलाल झाली! तिचे गाल सन्तापाने थरथरू लागले. अचानक झालेल्या या शाब्दिक हल्ल्याने ती बिथरली, तिच्या अन्गाची लाही लाही झाली! तिला एक शब्द सुचेना. अंजूने धावत जाऊन त्याच्या श्रीमुखात भडकावून दिले आणि त्याच्या ओन्गळ तोन्डावर ती बीले फेकुन मारत स्फुंदू लागली.. 'का वागलास असं..? माझा जीव भुकेने कासावीस झालाय. मला ताबडतोब हॉटेलात जाऊन काहीतरी खायचय.