आता कशाला शिजायची बात - अल्पना - कुल काकडी सलाड

Submitted by अल्पना on 5 September, 2014 - 07:48
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

एक मोठी काकडी, ढोबळ्या मिरच्या (लाल, पिवळ्या, हिरव्या), गाजर, पत्ता कोबी,क्रिम चीझ, दही, मिर्‍याची पुड, पुदिना,कोथिंबीर, मीठ

क्रमवार पाककृती: 

दोन चमचे क्रिम ची़झ आणि चमचा-दिड चमचा दही एकत्र एका भांड्यात मिक्स करायचं. त्यात वाटलेला पुदिना-कोथिंबीर आणि मीठ, मिर्‍याची पुड मिक्स करायची.

हे मिश्रण शक्य असल्यास एखाद्या पायपिंग बॅगमध्ये घालून फ्रिजमध्ये ठेवायचे.

काकडी सोलाण्याने सोलून घ्यायची. आम्ही नेहेमी काकडी सोलताना एक आड एक सालाची स्ट्रीप ठेवून डिझाइन करतो. हवं असल्यास तसं करायचं. नाहीतर पुर्ण सोलली तरी चालेल किंवा नाही सोलली तरीही चालेल. (हे फक्त कृतीमधल्या पायर्‍या वाढवण्यासाठी लिहिलंय. :फिदी:)

सोललेल्या काकडीचे मोठ्या मोठ्या जाड चकत्या करायच्या. एका काकडीच्या ४ किंवा ५.

आता या चकत्यांमधला गर सुरीने /स्कूपने काढून त्यांना आतून पोकळ करायचे. दही-चीझचं मिश्रण पायपिंग बॅगेत भरलं नसेल तर त्यात हा गरपण घालता येईल. मी विसरले होते म्हणून नुसताच खाऊन टाकला. काकडीतला गर काढताना खालच्या बाजूला थोडा गर राहिल असं बघावं.

उरलेल्या भाज्या लांबट चिरून घ्याव्यात. दही-चीझचं मिश्रण पायपिंग बॅगेत भरल्यानंतरही भांड्याला चमच्याला लागलेलं असतं. ते निपटून काढून या भाज्यांमध्ये हलक्या हाताने मिक्स करावं.

एका प्लेटमध्ये या सगळ्या भाज्या ठेवून त्यावर काकड्या ठेवाव्यात. काकड्यांमध्ये दही-चीझचं मिश्रण भरावं.
सजवायची खूप इच्छा असेल तर याला वरून पुदिन्याचं पान, मिरची किंवा इतर जे काही घरात असेल त्यानी सजवावं.

फ्रिझमध्ये मस्त थंड करून हे गारेगार सलाड खायला छान लागतं.

IMG_20140905_164508.jpgIMG_20140905_164539.jpg

वाढणी/प्रमाण: 
२ जण
अधिक टिपा: 

हा प्रकार थोड्या वेगळ्या प्रकारे मैत्रिणीकडे खाल्ला होता. तिने काकडीमध्ये फ्लेवर्ड मेयो घातलं होतं. आणि तिला गणेशोत्सवासाठी रेसेपी बनवायची नसल्याने तिने खालच्या सलाडमध्ये वाफवलेल्या बीन्स, कॉर्नचे दाणे घातले होते. भाजलेले तीळ पण घातले होते.

माझ्याकडे मेयो नसल्याने आधी घट्ट दही /चक्का वापरून ही पाककृती करणार होते. पण चक्क्यासाठी दही बांधून ठेवणं जमलं नाही.अनायसे घरात ब्रिटानिया क्रिम चीझ होतं म्हणून ते वापरायचं ठरवलं. ते खूप घट्ट असल्याने आणि थोडी आंबूस चव हवी होती म्हणून त्यात दही मिक्स केलं.
माझा लेक अजिबात मिरची खात नसल्याने यात फक्त मिर्‍याची पुड घातली आहे. पण यामध्ये वाटलेली हिरवी मिरची किंवा चिली फ्लेक्स छान लागतिल. झालंच तर एखादी लसणाची पाकळी (मला घालायची होती, पण विसरले. :)) पण छान लागेल. पिझ्झा सिझनिंग असेल तर ते पण घालता येईल.

माहितीचा स्रोत: 
मैत्रिण
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

संयोजक, मला पाककृती लिहिताना सारखे एरर मेसेज येत होते. मायबोली गणेशोत्सव २०१४ चा टॅग त्यामूळे द्यायचा राहिलाय.
थोड्यावेळानी संपादन करून देईन टॅग.

मायबोली गणेशोत्सव २०१४ चा टॅग त्यामूळे द्यायचा राहिलाय>> ही एरर मलाही सारखी सारखी येत होती.

अ‍ॅडमिन, प्लिज लूक इंटू ऑल दिज् मॅटर्स!

आला बघा फोटो. Happy

ती एरर मात्र सारखी येतेय. प्लिज त्या टॅगचं कसं करायचं सांगा. माझी सिस्टिम हँग व्हायला लागली होती.

मस्त्त्त्त्त्त दिसतंय Happy

एररचं काय करायचंते बघावं लागेल Happy

अल्पना , मलाही मगाशी ती एरर येत होती. अ‍ॅड्मिन येईपर्यंत इथुन हे कॉपी कर आणि तिकडे टॅग मधे जाऊन पेस्ट कर.
एकदाच येईल एरर मग Happy
माझ्यामते तो टेक्ट बॉक्स आपल्याला सजेस्ट करतो ना टॅग्स तेंव्हा हा प्रॉब्लेम येतोय.

हे पेस्ट कर -
आता कशाला शिजायची बात,मायबोली गणेशोत्सव २०१४

वॉव !!!
एकदम कुssssssssल आहे ग . मस्त मस्त मस्त

शेवटचा फोटो एकदम जबरी आहे. डॉकलिटी सुप्पर आहे तुझी . पटकन एक ऊचलून तोंडात टाकवस वाटतय

तुसी ग्रेट हो . ( आल बघ मला पंजाबी Proud Lol Wink )