"ठो उपमा" - प्रसंग-७

Submitted by संयोजक on 4 September, 2014 - 01:08

गणपती बाप्पा मोरया!
या उपक्रमाविषयी अधिक महितीसाठी येथे टिचकी मारा - http://www.maayboli.com/node/50546

प्रसंग :

हे सगळं जेंव्हा असह्य झालं तेंव्हा अंजूने त्या टळटळीत दुपारी घरातला एसी सुरू करुन झोपी जाण्याचा निर्णय घेतला. छ्ळणार्‍या विचारांपासून सुटका करुन घेण्याचा तो एकच मार्ग होता. डोळे मिटले तरी मन शांत होत नव्हते. दुसर्‍या कुणाबरोबर तरी लग्न करायचा विचारही तिच्या मनाला शिवत नव्हता. उलट सगळा भूतकाळ उसवत वर्तमानासोबत उभा ठाकला होता.

अंजूला जाग आली तेंव्हा संध्याकाळचे ७ वाजले होते. इतक्या वेळ शांत असलेल्या विचारांनी पुन्हा उसळी मारली होती. पुन्हा एकदा मनाचा डोह ढवळून निघाला होता. त्या डोहातून आठवणी एक एक करत बाहेर पडू पहात होत्या. त्यांना थोपवण्याचा खूप प्रयत्न करुनही यश न आल्याने हताश, पराजित वाटून अंजू शांतपणे बसून तो काळ आठवू लागली.

काळाच्या पडद्याआड गेलेला तिचा तो भुतकाळ तिच्या नजरेसमोर झरत राहिला. त्याच्या आलेल्या आठवणींनी ही कातरवेळ आणखीनच कातर होत होती.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे सगळं जेंव्हा कंटाळवाणं झालं तेंव्हा अंजूने त्या पावसाळी दुपारी घरातला हीटर सुरू करुन झोपी जाण्याचा निर्णय घेतला. शरीरात वाढलेल्या टॉक्सिन्सपासून सुटका करुन घेण्याचा तो एकच मार्ग होता. डोळे मिटले तरी मन शांत होत नव्हते. दुसर्‍या कुणाबरोबर तरी लग्न करायचा विचारही तिच्या लिव्ह इन पार्टनर्रला आवडला होता. उलट सगळा प्लान व्यवस्थित जुळून त्याला अनपेक्षित तरीही सुखद कलाटणी मिळायची चिन्हे होती.

अंजूला जाग आली तेंव्हा संध्याकाळचे ५ वाजून ३९ मिनिटे व १७ सेकंद झाले होते. इतक्या वेळ शांत असलेल्या विचारांनी पुन्हा उसळी मारली होती. पुन्हा एकदा 'त्या' नंबरवर त्याचा मेसेज आला होता. त्या डोहातून आठवणी एक एक करत बाहेर पडू पहात होत्या. त्यांना थोपवण्याचा खूप प्रयत्न करुनही यश न आल्याने कौतुक वाटून अंजू शांतपणे बसून तो काळ आठवू लागली.

तिच्या ब्लॉगवर नोंदला गेलेला गेलेला भूतकाळ तिच्या नव्या लिव्ह इन पार्टनरने वाचला होता. त्याच्या आलेल्या कमेंटस्नी तिच्या कल्पनांना भलतेच वळण दिले होते.

हे सगळं जेंव्हा डोक्याला शॉर्ट झालं तेंव्हा अंजूने त्या रणरणत्या दुपारी घरातला हीटर सुरू करुन झोपी जाण्याचा निर्णय घेतला. उपवर सर्पमित्र व त्यांचे वळवळणारे साप यांपासून सुटका करुन घेण्याचा तो एकच मार्ग होता. डोळे मिटले तरी मन शांत होत नव्हते. दुसर्‍या कुणाबरोबर तरी लग्न करायचा विचारही तिच्या हृदयाला विखारी दंश करीत होता. उलट सगळा सर्पमित्र परिवार सर्परूपी वरमाला घेऊन उभा ठाकला होता.

अंजूला जाग आली तेंव्हा नागदेवताच जाणे किती वाजले होते. इतक्या वेळ शांत असलेल्या विचारांनी पुन्हा उसळी मारली होती. पुन्हा एकदा सापांचा पेटारा उघडा पडला होता. त्या पेटार्‍यातून साप एक एक करत बाहेर पडू पहात होते. त्यांना थोपवण्याचा खूप प्रयत्न करुनही यश न आल्याने भीती व किळस वाटून अंजू हवालदिल बसून तो काळ आठवू लागली.

इच्छाधारी नागाप्रमाणे गेलेला तिचा तो भुतकाळ तिच्या नजरेसमोर पिंगा घालत राहिला. त्याच्या अक्राळविक्राळ वेटोळ्यांनी ही सापांची सरपटणारी सेना सर्पमित्रांबरोबर तिच्याशी लगट करत होती.