"ठो उपमा" - प्रसंग-६

Submitted by संयोजक on 3 September, 2014 - 00:20

गणपती बाप्पा मोरया!
या उपक्रमाविषयी अधिक महितीसाठी येथे टिचकी मारा - http://www.maayboli.com/node/50546

प्रसंग ६:

दुपारच्या जेवणात सलाड, उसळी, उकडलेल्या भाज्या असा लो कॅलरी, विदाऊट शुगर अंजूच्या आवडीचा भरगच्च मेनू शशिकलाबाईंनी निगुतीने स्वतःच्या हातांनी बनवला होता. तरीही अंजूने जेवणाच्या टेबलावर येण्यास नकार देण्याने आणि तिच्याच खोलीत तिचे जेवण मागवण्याने मगाशी दोघांना आलेल्या संशयावर खात्रीची मोहोर उमटली.

आपल्या घरातल्यांना आपल्या बदललेल्या वागण्याची कुणकुण लागली असणार याची अंजूला जाणीव होती परंतु विचार करुन करुन तिचा मेंदू थकला होता.. कालच्या आपल्या सुंदर स्वप्नांवर विरजण टाकणारा "त्याचा" नकार आणि त्यानंतर रात्रीच आईचा आलेला फोन तिला आठवला. "उद्याच इथे निघून ये आम्ही तुझं लग्न ठरवलं आहे."

असं कसं करू शकतात आई बाबा? एकदा मला विचारता नाही आलं माझ्या मनात कोणी आहे का? विचारलं असतं तरी काय सांगणार होते म्हणा मी? नाही म्हणावं तर "तो" मनातून जाता जाईना आणि 'हो' म्हणावं तर? 'तो' माझा राहिलाच कुठे आहे आता?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

दुपारच्या जेवणात तळलेला रावस, पापलेटचं कालवण - भात आणि सोलकढी असा अंजूच्या आवडीचा चमचमीत मेनू शशिकलाबाईंनी निगुतीने स्वतःच्या हातांनी बनवला होता. तरीही अंजूने जेवणाच्या टेबलावर येण्यास नकार देण्याने आणि तिच्याच खोलीत तिचे जेवण मागवण्याने मगाशी दोघांना आलेल्या माशाच्या वासावरच समाधान मानावे लागले.

आपल्या घरातल्यांना आपल्या बदललेल्या वागण्याची खबर मासळीच्या वासाप्रमाणे लागली असणार याची अंजूला जाणीव होती परंतु विचार करुन करुन तिचा बिनडोक मेंदू जडावला होता.. कालच्या आपल्या सुंदर स्वप्नांवर धुतलेल्या मासळीचं पाणी ओतून वास्तवाची जाणीव करुन देणारा"त्याचा" नकार आणि त्यानंतर रात्रीच आईचा आलेला फोन तिला आठवला. "उद्याच इथे निघून ये आम्ही तुझं लग्न ठरवलं आहे."

लग्नाच्या बाजारात जाण्याची मासळी बाजारात जाण्याइतकीच घाई करतात आई बाबा? एकदा मला विचारता नाही आलं माझ्या मनात कोणी आहे का? विचारलं असतं तरी काय सांगणार होते म्हणा मी? नाही म्हणावं तर "तो" मनातून जाता जाईना आणि 'हो' म्हणावं तर? धड एक मासा तरी कुठे गळाला लागलाय माझ्या? आता

@ भरत मयेकर - छे हो, अनंत चतुर्दशीला बराच अवकाश आहे, मी तर उद्या घरच्या बाप्पाचं विसर्जन झालं की परवाचीच वाट बघतेय आणि स्वप्न रंगवतेय.....

जबरी ...

नाही आशूडी, पण मी लहानपणी मासा न बोलता त्याला माशा बोलायचो.. आई मला माशा दे ना .. मला नाही आठवत, आईनेच सांगितले .. असो, पण हे जमलेय मस्त !

दुपारच्या जेवणात गाई एवढे खाऊन बकरी एवढेच ठेवणारा अंजूच्या आवडीचा मेनू शशिकलाबाईंनी निगुतीने स्वतःच्या हातांनी बनवला होता. तरीही अंजूने जेवणाच्या टेबलावर येण्यास नकार देण्याने आणि तिच्याच खोलीत तिचे जेवण मागवण्याने मगाशी दोघांना आलेल्या संशयाला फेवीक्विकचा जोड मिळाला.

आपल्या घरातल्यांना आपल्या बदललेल्या वागण्याची हिंट लागली असणार याची अंजूला जाणीव होती परंतु विचार करुन करुन तिचा नोबिता झाला होता.. कालच्या आपल्या सुंदर स्वप्नांवर तंबाखुच्या पानाची पिंक टाकणारा "त्याचा" नकार आणि त्यानंतर रात्रीच आईचा आलेला फोन तिला आठवला. "उद्याच इथे निघून ये आम्ही तुझं लग्न ठरवलं आहे."

लोच्याच करतात आई बाबा? एकदा मला विचारता नाही आलं माझ्या मनात कोणी आहे का? विचारलं असतं तरी काय सांगणार होते म्हणा मी? नाही म्हणावं तर "तो" मनातून जाता जाईना आणि 'हो' म्हणावं तर? माझे रजिस्ट्रेशन कॅन्सलच झाले आहे आता?

दुपारच्या जेवणात खिमा पावचा सुटसुटीत पण तोंपासु बेत शशिकलाबाईंकडून किचनचा ताबा घेत अंजूच्या बाबांनी स्वतःच्या हातांनी बनवला होता. तरीही अंजूने जेवणाच्या टेबलावर येण्यास नकार देण्याने आणि तिच्याच खोलीत तिचे जेवण मागवण्याने मगाशी दोघांना दालमे कुछ काला है वाटलेलं ते पूरी दाल काली निघाल्यासारखं वाटलं

आपल्या घरातल्यांना आपल्या बदललेल्या वागण्याचे सिग्नल्स फ्लॅश झाले असणार याची अंजूला जाणीव होती परंतु विचार करुन करुन तिचा भेजा फ्राय झाला होता.. कालच्या आपल्या सुंदर स्वप्नांची ट्रेन ओव्हरहेड वायर तुटून ठप्प झाल्याप्रमाणे "त्याचा" नकार आणि त्यानंतर रात्रीच आईचा आलेला फोन तिला आठवला. "उद्याच इथे निघून ये आम्ही तुझं लग्न ठरवलं आहे."

अशी हुकूमशाही कशी करु शकतात आई बाबा? एकदा मला विचारता नाही आलं माझ्या मनात कोणी आहे का? विचारलं असतं तरी काय सांगणार होते म्हणा मी? नाही म्हणावं तर "तो" मनातून जाता जाईना आणि 'हो' म्हणावं तर? त्याच्या मनावर कुणा दुसरीचाच स्टँप उमटलेला?