गणपती बाप्पा मोरया!
या उपक्रमाविषयी अधिक महितीसाठी येथे टिचकी मारा - http://www.maayboli.com/node/50546
प्रसंग :
तर अशा या चतुरस्त्र अंजूला साहजिकच श्रीरंगपूरमध्ये राहून कसे चालेल? हुशार अंजूला अर्थातच पुण्याला नोकरी लागली आणि तिथे देखण्यांच्या अनेक बंगल्यांपैकी एकात तिने बस्तान बसवले. तिला चार मुलींसारखे सामान्य आणि डाएट आयुष्य जगायचे असल्याने ती रोज स्वत:चा डबा घेऊन ऑफिसला जात असे. आज ती श्रीरंगपूरला सात वाजता येणार असे कालच्या दैनिक फोनवर प्रसिध्द केले असल्याने आईच्या काळजाची घालमेल होत होती. डॅडी हे श्रीमंत वडील असल्याने पांढराशुभ्र सिल्कचा सलवार कुर्ता घालून आरामखुर्चीवर रात्री नऊ वाजता सोनेरी चष्म्यातून वर्तमानपत्र वाचत होते. अंजू ही त्यांची फक्त मुलगीच नव्हती तर त्यांचा गर्व होता. डॅडींनी अंजूसाठी उच्चवर्गीय, रुबाबदार, राजबिंडा अस्खलित इंग्लिश बोलणार्या, बंगला गाडी असलेल्या डॉक्टर किंवा इंजिनियर नवरा शोधायला सुरुवातही केली होती. जावयाने आपल्या लेकीला तळहातावरच्या फोडाप्रमाणे जपावे एवढीच अपेक्षा होती त्यांची. डोळ्यात तेल घालून वाढवले होते अंजूला. अंजू म्हणजे त्यांच्या संसारवेलीवर फुललेले गुलबकावलीचे फूल! अंजूच्या बाळलीला बघता बघता सोळा वर्षांचा काळ रेतीसारखा झरझर सरकला. कळीचे फूल झाले आणि सुगंध दशदिशात पसरला.
एक नम्र विनंती - कृपया बोल्ड
एक नम्र विनंती -
कृपया बोल्ड न केलेल्या ५ पेक्षा अधिक शब्दांमध्ये बदल करु नयेत किंवा नवीन वाक्ये लिहू नयेत.एकाच विशिष्ट परिच्छेदाचे वेगवेगळे रुप पाहण्याची गंमत पाहूया!
तर अशा या भैताड अंजूला
तर अशा या भैताड अंजूला साहजिकच श्रीरंगपूरमध्ये राहून कसे चालेल? हुशार अंजूला अर्थातच न्युजर्सी मध्ये प्रॉजेक्ट बिघडवायची नोकरी लागली आणि तिथे देखण्यांच्या अनेक बंगल्यांपैकी एकात तिने बस्तान बसवले. तिला चार मुलींसारखे ग्रीनकार्डच्या प्रतीक्षेत आयुष्य जगायचे असल्याने ती रोज स्वत:चा डबा घेऊन ऑफिसला जात असे. आज ती श्रीरंगपूरला सात वाजता येणार असे कालच्या वॉटसॅप न्युजर्सी नूबीज फोरम वर प्रसिध्द केले असल्याने आईच्या फोनची ब्याटरी चार्ज होत होती. डॅडी हे श्रीमंत वडील असल्याने अवाढव्य साइजची शॉर्ट व टीशर्ट वर बीअरचा टंपाळ ब्यालन्स करून मांडी घालून आरामखुर्चीवर रात्री नऊ वाजता सोनेरी चष्म्यातून वर्तमानपत्र वाचत होते. अंजू ही त्यांची फक्त मुलगीच नव्हती तर त्यांचा अमेरिकेचा व्हिसा होता. डॅडींनी अंजू साठी ग्रीनकार्ड धारक, अमेरिकेतच रूटस असलेला नेनेसदृश्य सुपरमोरॉन शोधायला सुरुवातही केली होती. जावयाने आपल्या लेकीला अम्मेरिक्केचे कायमस्वरुपी नागरिकत्व मिळवून जपावे एवढीच अपेक्षा होती त्यांची. डोळ्यात कोकाकोला घालून वाढवले होते अंजूला. अंजू म्हणजे त्यांच्या संसारवेलीवर लावले ला ब्लू रेड व्हाइट झेंडाच. अंजूच्या बाळलीला बघता बघता सोळा वर्षांचा काळ गेला एकदाचा. कळी ला ग्रीन कार्ड मिळाले आणि फेसबुकवर आई बा बांचे नाक उंच झाले.
अमा
अमा
हा हा, मस्त अमा
हा हा, मस्त अमा
तर अशा या अवलंडर अंजूला
तर अशा या अवलंडर अंजूला साहजिकच श्रीरंगपूरमध्ये राहून कसे चालेल? वक्तशीर अंजूला अर्थातच पुण्याला बाकरवडीच्या दुकानात नोकरी लागली आणि तिथे देखण्यांच्या अनेक बंगल्यांपैकी एकात तिने बस्तान बसवले. तिला चार मुलींसारखे टप्परवेअर आयुष्य जगायचे असल्याने ती रोज स्वत:चा डबा घेऊन कामाला जात असे. आज ती श्रीरंगपूरला सात वाजता येणार असे कालच्या दैनिक मुक्तपीठ वर प्रसिध्द केले असल्याने आईच्या काळजाची घालमेल होत होती. डॅडी हे श्रीमंत वडील असल्याने नवसाच्या राजासारखे गळ्यात मोत्यांचे हार व सोन्याचा मुकुट घालून आरामखुर्चीवर रात्री नऊ वाजता ईकॉनॉमिक टाईम्स ऑफ श्रीरंगपूर वाचत होते. अंजू ही त्यांची फक्त मुलगीच नव्हती तर त्यांचा सलमान होता. डॅडींनी अंजूसाठी घरकाम जमणारा आयटी ईंजिनीअर नवरा शोधायला सुरुवातही केली होती. जावयाने आपल्या लेकीने दिलेल्या कमांडवरच चालावे एवढीच अपेक्षा होती त्यांची. चितळ्यांचे दूध पाजून वाढवले होते अंजूला. अंजू म्हणजे त्यांच्या संसारवेलीवर फुललेले गुलबकावलीचे फूल! अंजूच्या बाळलीला बघता बघता सोळा वर्षांचा काळ क्रिकेटचे चार वर्ल्डकप बघितल्यासारखा सरकला आणि अंजूची अॅंजेलिना ज्योली झाली.
१) चतुरस्त्र - अवलंडर -- मी लहानपणी ऑलराऊंडरला अवलंडर म्हणायचो.

आणि इथे बातमी मुक्तपीठवर प्रसिद्ध झाल्याने जरा जास्तच.
२) गर्व - सलमान -- गर्व मध्ये सलमान होता.
३) आईच्या काळजाची घालमेल - जशास तसे -- आईच्या काळजाला दुसरी उपमा नाही, ते घालमेल होण्यासाठीच बनवलेय.
४) गुलबकावलीचे फूल हि ठोकळेबाज उपमा मी तरी म्हणू शकत नाही, आणि हि त्याच्या कारणाची रिक्षा -- http://www.maayboli.com/node/50455
तर अशा या सात्विक कु. अंजूला
तर अशा या सात्विक कु. अंजूला साहजिकच श्रीरंगपूरमध्ये राहून कसे चालेल? हुशार अंजूला अर्थातच पुण्याला 'दैनिक टणाटण पिठलंभात' मध्ये नोकरी लागली आणि तिथे देखण्यांच्या अनेक बंगल्यांपैकी एकात तिने बस्तान बसवले. तिला चार मुलींसारखे ७६% पातळीवरचे आयुष्य जगायचे असल्याने ती रोज स्वत:चा डबा घेऊन ऑफिसला जात असे. आज ती श्रीरंगपूरला सात वाजता येणार असे कालच्या दैनिक ट.पि. च्या श्रीरंगपूर (बुद्रुक) पुरवणीत प्रसिध्द केले असल्याने आईच्या साबुदाण्याच्या खिचडीत वाटेकरी आल्यामुळे तिची चिडचिड होत होती. डॅडी हे श्रीमंत वडील असल्याने पवित्र असा पांढराशुभ्र किरणोत्सर्गी सलवार कुर्ता घालून आरामखुर्चीवर रात्री नऊ वाजता आत्मचक्षूंनी वर्तमानपत्र वाचत होते. अंजू ही त्यांची फक्त मुलगीच नव्हती तर त्यांचं तत्त्वज्ञान, अपरोक्षज्ञान, ब्रह्मज्ञान होती. डॅडींनी अंजूसाठी गोब्राह्मणप्रतिपालक, ईश्वरी चैतन्य लाभलेला, सदैव सूक्ष्म-कोशात राहून व्यक्ती आणि समष्टीचा विचार करणारा आणि ८०% पातळीवाला त्रिपुंड्रधारी नवरा शोधायला सुरुवातही केली होती. जावयाने आपल्या लेकीला अखंड वज्रचुडेमंडित ठेऊन तिला अष्ट्पुत्रासौभाग्यवती होण्यासाठी सर्वतोपरी मदत करावी एवढीच अपेक्षा होती त्यांची. कपाळावर शक्तीवलय निर्माण करणारा तिलक लावून वाढवले होते अंजूला. अंजू म्हणजे त्यांच्या संसारवेलीवर फुललेली अध्यात्मिक साधना! अंजूच्या बाळलीला बघता बघता सोळा वर्षांचा काळ पप्पू रेक्टरांना बघून जशी हृदयस्पंदने जलद होतात तसा गेला. साधिकेची माँ झाली आणि तिच्या अंगातून येणारा दैवी सुगंध दशदिशात पसरला.
अरे देवा मामी
अरे देवा मामी
Mami
Mami
मामे... एक नंबर!!!
मामे...
एक नंबर!!!
तर अशा या भडकू, भांडकुदळ व
तर अशा या भडकू, भांडकुदळ व खंडणीखोर अंजूला साहजिकच श्रीरंगपूरमध्ये राहून कसे चालेल? हुशार अंजूला अर्थातच पंचक्रोशीत कोणीच आपले म्हणत नसल्यामुळे तिने फरारपूर येथे आपला मुक्काम हलवला आणि तिथे देखण्यांच्या अनेक बंगल्यांपैकी एकात तिने बस्तान बसवले. तिला चार मुलींसारखे पाणचट आणि फुळकावणी आयुष्य जगण्याची मनस्वी चीड असल्याने ती रोज स्वत:चा डबा घेऊन ऑफिसला जात असे. आज ती श्रीरंगपूरला सात वाजता येणार असे कालच्या काळूप्रसाद महाटवळे यांच्या दैनिक चुगलीखोर या चटोर सायंपत्रिकेत प्रसिध्द केले असल्याने आईच्या काळजाची घालमेल होत होती. डॅडी हे श्रीमंत वडील असल्याने सोन्याचा हिरेजडित मुकुट, सोन्याचांदीची लुंगी व हिरेमाणकांनी सजवलेला बनियन घालून आरामखुर्चीवर रात्री नऊ वाजता आसमंतातील सर्व जीवित व्यक्तींना यथेच्छ शिव्या देत आपल्या बटबटीत डोळ्यांना प्लॅटिनमच्या चष्माफ्रेमच्या आडून ताणत वर्तमानपत्र वाचत होते. अंजू ही त्यांची फक्त मुलगीच नव्हती तर त्यांचा पोटशूळ, माथेशूळ, साक्षात पदरी पडलेला नरकाचा प्रसाद होता. डॅडींनी अंजूसाठी तिला कधीही बाहेर न पडता येणारा, तोंड उघडायचीही बंदी असलेला, तिच्या लाथाबुक्क्यांनी व किंकाळ्यांनी न हादरणारा भूगर्भीय किल्ला शोधायला सुरुवातही केली होती. जावयाने आपल्या लेकीला पाहता क्षणी प्राणत्याग करू नये एवढीच अपेक्षा होती त्यांची. त्यासाठीच एखाद्या जंगली श्वापदाला चुचकारावे तसे गोंजारले होते त्यांनी अंजूला. अंजू म्हणजे त्यांच्या काळस्वप्नातून भयानक आक्रस्ताळा आकार घेत त्यांची वास्तवात उतरलेली भूल ! अंजूच्या बाळलीला बघता बघता सोळा वर्षांचा त्यांचा जीवितहानी न करण्याचा निग्रह कधी गळून पडला आणि त्याची जागा ध्यानी-मनी-स्वप्नी अंजूच्या तडाख्यातून स्वतःला व घरा-दाराला काहीही करून कसे वाचवावे या करूण विचारांनी घेतली हे त्यांचे त्यांनाच समजले नाही!
सगळ्या ष्टोर्या अँजेलिना
सगळ्या ष्टोर्या अँजेलिना जोशी बाईंकरता लिवल्यात जनू..
अभिषेक, मामी, अकु, काय अंजू
अभिषेक, मामी, अकु, काय अंजू रंगवली आहे सार्यांनी, लयी भारी
तर अशा या खेडवळ अंजूला
तर अशा या खेडवळ अंजूला साहजिकच श्रीरंगपूरमध्ये राहून कसे चालेल? हुशार अंजूला अर्थातच कशीबशी खेड्यातच नोकरी लागली आणि तिथे देखण्यांच्या अनेक बंगल्यांपैकी एकात तिने बस्तान बसवले. तिला चार मुलींसारखे खोडकरपणा सोडुन समजदारपणाचे आयुष्य जगायचे असल्याने ती रोज स्वत:चा डबा घेऊन ऑफिसला जात असे. आज ती श्रीरंगपूरला सात वाजता येणार असे कालच्या दैनिक कटकट प्रसिध्द केले असल्याने आई निश्चिंत होत होती. डॅडी हे श्रीमंत वडील असल्याने बरमुडा घालुन आरामखुर्चीवर रात्री नऊ वाजता नोकराक्डुन ढेरी शेकत होते. अंजू ही त्यांची फक्त मुलगीच नव्हती तर त्यांचा अभिमान होता. डॅडींनी अंजूसाठी खोडकरच नवरा शोधायला सुरुवातही केली होती. जावयाने आपल्या लेकीला खुपच खोडकर अशी दाद द्यावी एवढीच अपेक्षा होती त्यांची. रक्त, सलाईन लावुन वाढविले होते बारक्या अंजूला. अंजू म्हणजे त्यांच्या नकळत त्यांच्या डोक्यावर बसलेली पोर! अंजूच्या बाळलीला बघता बघता सोळा वर्षांचा त्यांचा संसार सरला
बिचारी अंजू.. किती ते बदडताय
बिचारी अंजू.. किती ते बदडताय तिला
तर अशा या भटकभवानी अंजूला
तर अशा या भटकभवानी अंजूला साहजिकच श्रीरंगपूरमध्ये राहून कसे चालेल? हुशार अंजूला अर्थातच रानात नोकरी लागली आणि तिथे देखण्यांच्या अनेक बंगल्यांपैकी एकात तिने बस्तान बसवले. तिला चार मुलींसारखे ब्लॅक अॅण्ड व्हाईट आयुष्य जगायचे असल्याने ती रोज स्वत:चा डबा घेऊन ऑफिसला जात असे. आज ती श्रीरंगपूरला सात वाजता येणार असे कालच्या स्काईप फोनवर प्रसिध्द केले असल्याने आईच्या टॉकटाईमची घालमेल मिटली होती. डॅडी हे श्रीमंत वडील असल्याने पांढराशुभ्र सिल्कचा रेनकोट घालून आरामखुर्चीवर रात्री नऊ वाजता वायपर लावलेल्या चष्म्यातून वर्तमानपत्र वाचत होते. अंजू ही त्यांची फक्त मुलगीच नव्हती तर त्यांचा छोटा रिचार्ज होता. डॅडींनी अंजूसाठी उष्णवर्गीय, उभयचर, आडदांड, अस्खलित इंग्लिश पिणार्या, बंगलाच्या खाडी वर प्रॅक्टीस करत असलेला डॉक्टर नवरा शोधायला सुरुवातही केली होती. जावयाने आपल्या लेकीला गाला वरच्या फोडाप्रमाणे टिपावे एवढीच अपेक्षा होती त्यांची. गोळ्यात जेल घालून वाढवले होते अंजूला. अंजू म्हणजे त्यांच्या लाईट गेल्यावर उडालेल्या क्लोरोफॉर्मची भूल! अंजूच्या बाळलीला बघता बघता सोळा वर्षांचा काळ चित्रपटा सारखा झरझर सरकला. मुनमुनची टुनटुन झाली आणि कुणकुण दशदिशात पसरली .
सगळेच..
सगळेच..
सही
सही
सगळेच सही !!!
सगळेच सही !!!