गणेशगीत- मन लागो तव चरणासी

Submitted by संयोजक on 24 August, 2014 - 23:31
गणेशगीत- मन लागो तव चरणासी!



मन लागो तव चरणासी |
माझी विनती ही परियेसी || धृ ||

मज सुख लाभो तव गुण गाता |
कधी नसो मम मनी अहंता |
कृपा करी तू एकदंता |
धरि मज हृदयासी || १ || मन लागो तव चरणासी ||

चराचरी मज तव आश्वासन |
अविरत हृदयी तुझेच चिंतन |
घडो सदा तव मानसपूजन |
तू मम सुखराशी || २ || मन लागो तव चरणासी ||

गजानना मी तव शरणागत |
जोडुनिया कर हेच मागत |
कृतीतुनी मम तूच सदोदित |
यावे रूपासी || ३ || मन लागो तव चरणासी ||


गीत- संगीत- चैतन्य दीक्षित
गायन- ओंकार देशमुख
वादन-
तबला- केदार देशमुख
सिंथेसायजर- ओंकार दीवाण
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा ! चैतन्य,
गीतलेखन, गायन, संगीत सर्वच छान झालंय.
प्रसन्न वाटलं ऐकताना.

तुझं आणि तुझ्या सहकार्‍यांचं अभिनंदन.

सर्व प्रतिसादकर्त्यांचे मनापासून आभार!
काही सुधारणा हवी असेल तर त्याबद्दलही कळवा.
धन्यवाद,
चैतन्य

एक छान गाणे.. अजून व्हरायटी ऐकायला आवडली असती.. ध्रुवपद इतक्या वेळा गायले आहे त्यात तोच तोच पणा वाटला.. का माहित नाही पण सुरुवातीला ध्रुवपदाची चाल ठसल्यावर पुढे त्यात व्हेरिएशन आले की त्याची लज्जत वाढते असे मला नेहमीच वाटते.. एकसूरी वाटते नाहीतर गाणे.. तसे होउ न देणे अवघड आहे.. पण प्रयत्न नक्कीच करायला पाहिजे..

कदाचित बाबूजी, आशाताई, लतादिदी, सुरेश वाडकर ह्यांची गाणी फार ऐकल्यामुळे असेल पण ती गाणी ऐकताना प्रत्येक कडव्यात नवीन काहीतरी नक्कीच सापडते.. उदा. ऋतू हिरवा अल्बम मधली सगळी गाणी,

गाणे ऐकताना सोपे वाटते पण ते परत म्हणताना त्यावर कष्ट करून बसवायला लागते आणि गायकाचा कस लागतो

रच्याकने राग गोरखकल्याण आहे का??

चैत्राली, अगो, भारतीताई, कविन धन्यवाद.
हिम्सकूल.... अतिशय महत्वपूर्ण प्रतिसाद. अनेकानेक धन्यवाद त्यासाठी.
माझ्या दृष्टीनं खूपच उपयुक्त मुद्दा मांडला आहेस. पुढल्या कॉम्पोझिशनच्या वेळी नक्की प्रयत्न करेन.
मुखड्यात वेगळेपणा आणणे सहजसाध्य नाही, हे मात्र खरे.
आणि मुख्य गोरख कल्याणावरच बेतलंय. अधे-मधे बागेश्री, इंटरल्यूडमध्ये रागेश्रीचे स्वर,असे इतर पण गोरख कल्याणाच्याच जवळपासचे स्वर आले आहेत.