लेख नववा( शेवटचा)- स्नो स्केप्स -

Submitted by पाटील on 30 August, 2014 - 12:45

बर्‍याच दिवसानी लेख पोस्ट कर्तोय त्याबद्दल दिल्गीरी.
बर्फाच्छादित पर्वत कसे रंगवायचे हे आपण बघु.
बर्फाच्छादित पर्वतावरील बर्फावर दिवसाच्या वेळे प्रमाणे वेगवेगळे रंग दिसतात. अगदी सकाळी सोनेरी पिवळा ते नंतर आकाशाच्या नीळाईच्या छटा यावर दिसतात.
इथे मी पहिल्यांदा आकाश रंगउन घेतले, यात वेट इन वेट काम करता करता काही ठीकाणी पांढरा भाग सोडला, नंतर काही ठिकाणचा रंग लिफ्ट केला.
1_8.jpg2_8.jpg

त्यानंतर फोरग्राऊंड रंगवले
इथे पर्वताच्या भागावर अजुन काम केले नाही

3_5.jpg

नंतर पर्वत रंगवताना आकाशासाठी वापरलेले रंगांच्या थोड्या दाट छटा वापरुन ,त्यात मधे मधे इतर अर्थ कलर मिक्स करत आणि पायथ्याकडे अजुन डार्क करत गेलो. हे सगळे काम येकावेळी संपवले
4_3.jpg

त्यानंतर चोरटेन ( नॉर्थ इस्ट भागात तीथले लोक अशी बौद्ध मंदिरे बांधतात) चे स्ट्रकचर रंगवले , इथे तिन स्टेज मधे काम केले.
5_1.jpg

शेवटी चित्र त्या भागतले वाटावे म्हणुन याक , लोकल पेहरावतील व्यक्ती चित्रात अ‍ॅड केली.
6.jpg

हे आणि येक चित्र, कांचनगंगा शिखर सकाळि असे दिसते
7.jpg

ही कार्यशाळा करताना मला खूप शिकायला मिळाले. सहभागी सदस्यांचे आभार.
कार्यबाहुल्यामुळे ही कार्यशाळा आटोपती घेतोय मात्र कुणाला काही शंका असतील , मदत हवी असेल तर शक्य असेल तसा प्रयत्न करेन.
पुन्हा धन्यवाद
आधिचे लेख
8 http://www.maayboli.com/node/49190
7 http://www.maayboli.com/node/48503
6 http://www.maayboli.com/node/48296
5 http://www.maayboli.com/node/48032
4 http://www.maayboli.com/node/47815
3 http://www.maayboli.com/node/47609
2 http://www.maayboli.com/node/47506
1 http://www.maayboli.com/node/47445

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अजय, मस्त झाली आहेत चित्रं. कार्यशाळेबद्दल खूप धन्यवाद Happy

मला खूप फायदा झाला ह्या कार्यशाळेचा. सगळ्यात मोठा फायदा म्हणजे, माझ्याच विस्मृतीत गेलेल्या माझ्या छंदाची पुन्हा मला ओळख झाली. खूप प्रॅक्टीस करावी लागेल मला चांगलं चित्र काढण्यासाठी, तरी जे काही जमतंय तेही नसे थोडके.

मी नक्कीच तुला अजून त्रास देत राहणार आहे. मी मध्यंतरी म्हटल्याप्रमाणे, संथ्/खवळलेल्या लाटा कश्या काढायच्या ते जरा दाखव.

अजय पाटील आणि मायबोलीचे शतशः आभार.

खरंच अप्रतिम झाली लेख मालिका. आरंभशूरपणा करणारे आम्ही करंटे. पण मायबोलीच्या कृपेमु़ळे पुढेही केव्हाही वाचून धुळाक्षरं गिरवता येतील.

अजय खूप खूप धन्यवाद.

केश्वे, तुझ्या अजून चित्रांच्या प्रतिक्षेत. Happy

अश्विनी के - पुन्हा कधी जलरंग गटग झाला तर यायचा नक्की प्रयत्न राहील आणि सगळ्याबरोबर येखाद्या स्पॉटवर चित्रही काढता येईल.
इथे भाग घेतलेल्या प्रत्येकाच्या कामचे काहिना काही वैशिष्ठ्य आहेच , या कार्यशाळे निमित्त तुमच्या सारख्यानी पुन्हा चित्र रंगवायला घेतली हे यशच.
पुढे मागे या ग्रुपचे छोटे का होइना येखादे प्रदर्शन व्हावे ही शुभेच्छा. कामात नियमितपणा ठेवला तर हे नक्की शक्य होइल.

मामी+१

थँक्स अजय! मी प्रयत्न नक्कीच सुरु ठेवणार.
तुमच्यासारखे कॉन्फिडन्ट स्ट्रोक्स जमत नाहीत, त्यामुळे रंगवलेल्या चित्राला उठाव येत नाही. हळूहळू जमेल.
या वर्कशॉपचा खुप फायदा झाला.

पाटील, ही कार्यशाळा फारच उपयूक्त होती. वॉटरकलर बद्दल बरच काही माहिती कळली. धन्यवाद.

वरची चित्र अफलातून आहेत.

पुन्हा कधी जलरंग गटग झाला तर यायचा नक्की प्रयत्न राहील आणि सगळ्याबरोबर येखाद्या स्पॉटवर चित्रही काढता येईल.>>> वाह! ती एक मेजवानी ठरेल आम्हाला Happy

खूपच सुंदर, अजय. बारकावे अतिशय सुंदर.
तुम्ही इतकं छान समजावता, त्यामुळे सर्व एकदम सोपं वाटतं. ते तसं नसूनही. नक्कीच या कार्यशाळेचा उपयोग करून घेण्याचा, धडे गिरविण्याचा प्रयत्न करेन.
जीडी, नीलु, शैलुताई, केश्वी यू ऑल रॉक! छान चित्र काढलीत. कीपिटप Happy
तसेच ज्यांनी इतर माहीती पुरवून, प्रश्न विचारून, आरंभशूरपणा करून Proud हातभार लावला, त्यांचेही खूप आभार.
गटग आणि प्रदर्शनाची आयडीया भन्नाट! ऑलदीबेस्ट सर्वांना.
अजूनही काही चित्र किंवा काही अ‍ॅड करायचे झाल्यास कृपया करत रहा. शिकायला आवडेल!

या कार्यशाळेसाठी मायबोली आणि पाटील सर दोघांना खूप खूप धन्यवाद.
मला पण खूप फायदा झाला ह्या कार्यशाळेचा. खूप शिकायला मिळाले इथे.आतापर्यंत जलरंग माध्यम, ब्रश ,हॅड्मेड पेपर,स्केचिंग या बद्दल काहीच माहिती नव्हती.ती ह्या निमित्ताने मिळाली आणि ह्यापुढे जेव्हा लँड्स्केप पेंटीग बघेन तेव्हा ते कसे रंगवले असेल ते समजून घेता येइल.हे सगळे मायबोली अणि सरांच्या मार्गदर्शना मुळे शक्य झाले आहे. म्हणून पुन्हा एकदा धन्यवाद

या कार्यशाळेसाठी खूप धन्यवाद अजय पाटील.

मला जलरंगांची खूप भिती वाटायची पूर्वी. इथले लेख वाचून आणि थोडी प्रॅक्टिस करुन ती भिती नक्कीच कमी झालिये. सुरवातीचे काही दिवस सोडल्यास मला नंतर जास्त सराव करणं जमलं नाही. पण गॅप पडला म्हणजे मी जलरंग बंद करणार असं नक्कीच नाही. थोड्या दिवसात परत सराव सुरु करणार आहे.

आतापर्यंत जलरंग माध्यम, ब्रश ,हॅड्मेड पेपर,स्केचिंग या बद्दल काहीच माहिती नव्हती.ती ह्या निमित्ताने मिळाली आणि ह्यापुढे जेव्हा लँड्स्केप पेंटीग बघेन तेव्हा ते कसे रंगवले असेल ते समजून घेता येइल.हे सगळे मायबोली अणि सरांच्या मार्गदर्शना मुळे शक्य झाले आहे. म्हणून पुन्हा एकदा धन्यवाद >>> +१११

रविराज कुंभार, रोहन मोरे, सागर कुड्ले यांचा Recent Paintingचा Group Show नेहरु सेंटरच्या आर्ट गॅलरीत २३ ते २९ सप्टेंबर दरम्यान ११ ते ७ या वेळेत सुरु आहे. इच्छूकांनी जरुर भेट द्या.

खरंच अप्रतिम झाली लेख मालिका. आरंभशूरपणा करणारे आम्ही करंटे. पण मायबोलीच्या कृपेमु़ळे पुढेही केव्हाही वाचून धुळाक्षरं गिरवता येतील. अजय खूप खूप धन्यवाद. >> +९. अजय मनःपूर्वक आभार. मला नाहि झाला तरी मुलीला फायदा झाला.

एक छोटी विनंती, शक्य असेल तर पहिल्या नि शेवटच्या भागामधे सगळ्या भागांची लिंक देता येईल का ?

अजय, कार्यशाळा संपली याने खट्टू वाटले. आतापर्यंत तुमच्या लेखांच्या आधारे चित्र काढत होतो. आता चित्र काढावे म्हटले तर ते गाईड नसणार.

अधून मधून कृपया तुमची चित्रे पोस्टत जा.

नमस्कार मंडळी.

नवीन काही काढलेत का? अजय तुम्ही? इकडे जरूर पोस्ट करा. मला अजिबातच जमले नाही. तुम्ही कोणी चित्रे काढली असतील तर इकडे जरूर टाका. तेवढेच बरे वाटते. त्या नादात आपणही वेळ काढून एखादे ट्राय करू या असे वाटते.