पुस्तक पारायण...

Submitted by हर्ट on 7 February, 2008 - 00:00

वाचन ही एक चांगली सवय आहे. मी वाचन करतो हे जर कुणाला सांगितले तर जनमानसात आपला सन्मान वाढतो. आपलेच कौतूक आपण करू नये म्हणतात पण ह्या बीबीला ही गोष्ट काही मानवणार नाही. ज्यांना वाचनाची आवड आहे, त्यांच्याकडे काही पुस्तकं संग्रही असतात. अधुनमधुन आपण ही पुस्तकं पुन्हा पुन्हा वाचतो, निदान काही भाग तरी विरंगुळा म्हणून वाचतोच वाचतो. कधी कधी असे होते की आपण एखादे पुस्तक अनेकदा वाचून देखील आपले पोट भरत नाही. सुदैवाने खूप पाने खायची सवय मला जडली नाही. पण अलिकडे मी एका पुस्तकाचे २१ वेळा पारायण केले तेंव्हा माझे हे पुस्तक चोरीला गेले. जळी स्थळी काष्ठी पाषाणी हे पुस्तक माझ्या सोबत असायचे कारण ते छोटेखानी होते. वर त्या पुस्तकाचे अनेक पदर माझ्या लक्षात सातत्याने येत गेले. मग गोडी वाढत गेली. कधीकधी मीटींगला देखील ते पुस्तक डायरीच्या आत ठेवून मी वाचले आहे. अनेकदा एकच एक पुस्तक वाचून त्या पुस्तकाची धार जाते म्हणतात. पण माझ्याबाबतीत उलटच होत गेले. चोरीला गेलेले पुस्तक सापडले खरे पण ते पुस्तक एका कोकणी व्यक्तीने तिच्या घरी ठेवून दिले आहे. आता अगदी वर्षभरानंतरच परत मिळणार आहे म्हणाली. ते पुस्तक आहे 'आहे हे असे आहे'. लेखक कोण हे इथे सांगणे न लगे. सगळेच त्यांचे पंखे आहेत. मला ह्या पुस्तकाने प्रचंड वेड लावले. काही पुस्तके मी दोन किंवा फ़ार फ़ार तर तिन वेळा पारायण केलेली असतील पण २१ वेळा खूप झाले की नाही

आज मराठी भाषा दिवस आहे. साहित्य हे भाषा टिकवण्याचे, तिला वृद्धींगत करण्याचे एक उत्तम साधन मानले जाते. ह्या दिनानिमित्त आणि चिरंजीव तुषार ह्यांना खूष करण्यासाठी मी हा बीबी उघडला आहे. (मिस नंदीनीला राग येणार नाही अशी अपेक्षा.)

तर मंडळी, तुम्हाला आवडलेल्या पुस्तकाचे तुम्ही किती वेळा पारायण केले ते आधी लिहा, आणि का आवडले हे जर सांगता येत असेल तर तेही नक्की सांगा. कदाचित आम्ही देखील ते पुस्तक वाचून बघू.

या आधिची चर्चा या दुव्यावर वाचा

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

"Yes Minister" चवथ्यांदा वाचतेय. प्रत्येक वेळी तेव्हडीच मजा येते वाचताना!
भारतात ह्यावर आधारित "जी मंत्रिज़ी" सुरु झालीय असं ऐकलं. बघायची उत्सुकता आहे. पॉल एडिंग्टन आणि नायजेल हॉथ्रोन ची कामं कोण करतंय?

दुर्गा भागवतांचे 'व्यासपर्व'!
यातला कृष्ण ज़बरदस्त आवडतो!

छान माहीती. साधारण किती वर्षाच्या मुलांना उपयोगी आहेत ही पुस्तके (बालगट - १ )?

लिट्ल विमेन या पुस्तकाचं शांता शेळके यानी केलेलं भाषांतर "चौघीजणी"-- अक्षरशः पारायणं केलेली आहेत या पुस्तकाची. पहिल्यांदा हातात पडले तेव्हा साधारण ११वीत वगैरे होते. नंतर कॉलेजमधे पूर्ण ग्रूपमधे ते फिरले. तेव्हा आम्ही सगळ्याजणी( हो तेव्हा मुलामुलींचे मिक्स ग्रूप फारसे नसायचे.)एका वेगळ्याच विश्वात होते. या पुस्तकावर आम्ही एक कल्पनिक पिक्चरही काढला होता. त्यातली पात्रं अर्थातच आजूबाजूला वावरणारी मुलं मुली आणि कॉलेज मधले प्रोफेसर ही सुटले नव्हते . आजचे थोर समिक्षक आणि लेखक आमच्या कॉलेजचे प्रिन्सिपॉल होते. त्यांना आम्ही एक फार महत्वाची भूमिका दिलेली होती!!!!!!!!!.
अजूनही घरातल्या वाढ्त्या वयाच्या सर्व मुलांना मी हे पुस्तक वाचायला सांगते.

mmm333, मी ही तुमच्याशी सहमत. 'चौघीजणी' कधीही वाचावे असे आहे. (विशेषतः मुड वाईट असेल तर )
फारच सुंदर... माझ्या पहील्या पगारातुन मी हे पुस्तक घेतले होते माझ्या साठी! Happy

तसेच, Alister Mclin (स्पेलींग कदाचीत चुकले असेल ) चे fear is the key सुद्धा असेच आवडते पुस्तक आहे.
नाथमाधव नावाचे एक लेखक होते (माझ्या आईच्या लहानपणी )त्यांचे 'वीरधवल' तसेच 'सोनेरी टोळी' देखील मस्त! (harry potter चे आपण कौतुक करतो fantacy साठी, वीरधवल तसेच पण खुप पुर्वी लिहीलेले आहे. सोनेरी टोळी वर एक मराठी चित्रपट ही निघाला होता त्यात अशोक सराफ होता )
जेफ्री आर्चर यांचे not a penny more, not a penny less हे ही मस्त आहे. (त्यावर एक horrible मराठी सिनेमा होता )
Robin Cook यांचे स्फिंक्स पण छान आहे.

gone with the wind आणि चार्ल्स डिकन्स च्या पिकविक पेपर्स चे मराठी भाषांतर उपलब्ध आहे का ?
..........................................................................
Money spent on books is never wasted, but it is invested !

मेघना १
गंमत म्हणून सांगते चौघीजणीतली ज्योची भूमिका निर्विवादपणे माझ्याकडे आली होती.(कल्पनिक पिक्चरमध्ये).
आम्ही मराठी मीडियमवाले असल्याने शालेय जीवनात उत्तम साहित्त्याची भाषांतरे खूप वाचली.
राम पटवर्धनांचे पाडस वाचले का? (द यर्लिन्ग चं भाषांतर) ...अप्रतीम!!!!!!!नंतर मात्र इंग्लिश खूप वाचले. आत्ता झुंपा लाहिरीचं अनकस्ट्म्ड अर्थ वाचतीये. छान आहे. पण फार डिप्रेसिन्ग वाटते. तिची आधीची --इंटरप्रिटर ऑफ मलाडीज आणि नेमसेक जास्ती आवडली !!
डिकन्स----ची अगणित पारायणे!!! पण गॉन विथ्....व पिकविकच्या भाषांतराबद्दल ऐकले नाही. ती इंग्लिशच वाचली आहेत.
भेटू.

माधुरी (mmm), तुम्ही little women चित्रपट पाहीलात का? मला unfortunately, पहिलाच भाग बघायला मिळाला.
पाडस वाचले नाहीये. वाचीन.

..........................................................................
You are not what you think you are; but what you think,you are.

'आहे हे असे आहे' या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?

    ***
    असेच काही द्यावे घ्यावे
    दिला एकदा ताजा मरवा
    देता घेता त्यात मिसळला
    गंध मनातील त्याहून हिरवा
    - इंदिरा

    slarti,
    'आहे हे असे आहे' हा गौरी देशपांडे यांचा कथासंग्रह आहे.

    मेघना१
    आजच लिट्ल विमेन पाहिला ...झी स्टुडिओवर
    अप्रतीम सुंदर.

    >>>>>आजचे थोर समिक्षक आणि लेखक आमच्या कॉलेजचे प्रिन्सिपॉल होते. त्यांना आम्ही एक फार महत्वाची भूमिका दिलेली होती!!!!!!!!!.

    एमएमएम३३३, चौघीजणींवरील त्या काल्पनिक सिनेमात तुमचे मुख्याध्यापक म्हणजे म.द. का? Happy

    बाप रे शंतनू........कसला तर्क आहे तुझा!
    धन्य आहेस!

    तो काळच असा होता की प्रोफेसर वगैरे मंडळी हीरो असायचा....... आम्ही खरंच मिस्टर लॉरेन्स यांची भूमिका त्यांना दिली होती.

    मी परत परत वाचू शकते असं अजून एक पुस्तक म्हणजे रविंद्रनाथ टागोरांच्या सगळ्या लेखनाचा एक मोठ्ठा ठोकळा आहे (नाव नक्की आठवत नाही, बहुतेक 'Selected' किंवा 'Best of' अशी काहीतरी सीरीज आहे ), तर त्यात गीतांजली मधल्या कविता, इतर कविता, लघुकथा असे बरेच काही आहे. त्यात काही उतारे सुद्धा आहेत. सगळेच वाचनीय आहे.

    अशी खूप पुस्तकं पारायणं करून झाली आहेत. शिवाजी सावंतांचं "मृत्युंजय" तर सहावी ते graduation दर सुट्टीत (मे आणि दिवाळी)वाचून व्हायचं!! पण अजूनही ते पुस्तक हातातून ठेववत नाही.तीच गोष्ट "स्वामी" ची!! या दोन्ही पुस्तकातल्या शेवट्च्या प्रसंगांत माझ्या अश्रूंमुळे पाने भिजून गेली आहेत इतकं ते लिखाण ह्रदयस्पर्शी कारूण्यपूर्ण आहे. कदाचित इतक्या वेळा वाचल्यामुळे असेल की आजही जेव्हा "महाभारत" चर्चेत येतं तेव्हा माझं मन नकळत कर्णाच्या बाजूने ठामपणे उभं राहतं. कदाचित या दोन्ही कादंबर्‍यातील नायकांच्या समान परिस्थितीने असेल पण मृत्युंजय कर्ण आणि श्रीमंत माधवराव पेशवे यांच्यात कुठेतरी मला एक साम्य दिसतं. दोघांमधेही महान पराक्रम आणि विलक्षण बुध्दीचातुर्य असूनही केवळ आप्तस्वकीयांच्याच द्वेष आणि कपटामुळे तसेच ऐनवेळी नशिबाने सोडलेल्या साथीमुळेच दारूण अंत आला. तसे नसते तर आज इतिहास काही वेगळाच असता!!
    ------

    Happy
    ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
    अत्तराची कुपी संपतानाच जास्त जपायची असते...

    आशु, तुझ्या आख्ख्या प्रतिसादाला सहमत! अगदी सहावी पासून ग्रॅज्युएशनच्या सुट्ट्यांमधे मृत्युंजय अगदी ठरलेलं! स्वामी पण तसंच.. आणि कर्णाबद्द्ल ठाम उभं राहणं देखील!! Happy

    अगदी अगदी..व्यक्ती आणि वल्ली, स्वामी, शिवचरित्र, राधेय, बनगरवाडी प्रत्येक सुट्टीत Happy कधी कधी झुंजारमाला पण Happy जोडीला ग्रंथालायातुन आणुन स्मृती चित्रे, आहे मनोहर तरि आणि काय काय....

    तशी मी निरगाठी ची पारायणं केली होती. मी १०वी-१२वी त असताना कधीतरी निरगाठी प्रसिद्ध झाली होती एका दिवाळी अंकात. त्यातले ते व्यक्तिरेखांचे तपशील, बारीक बारीक गोष्टीतली प्रत्येकाची वागण्याची वेगळी वेगळी पद्धत. सगळं इतकं जिवंत होतं की बस्स... आणि तेव्हापासून गौरीप्रेम आहेच.
    सध्या पारायण करू शकते ते म्हणजे स्टुडिओ च. कधीही कुठलंही पान काढून वाचावं आणि मस्त तंद्री लावून बसावं आपल्याच कल्पनाविश्वात.
    इतिहासाचा, इंडॉलॉजीचा अभ्यास करायला लागल्यापासून सगळ्या ऐतिहासिक/ पौराणिक कादंबर्‍यांमधल्या रोमँटिसिझम चा फुगा फुटला आणि त्यांचा प्रभाव संपला माझ्यासाठी.
    -नी
    http://saaneedhapa.googlepages.com/home

    इतिहासाचा अभ्यास करायला लागल्यापासून सगळ्या ऐतिहासिक/ पौराणिक कादंबर्‍यांमधल्या रोमँटिसिझम चा फुगा फुटला आणि त्यांचा प्रभाव संपला माझ्यासाठी. >>

    डीट्टो हिअर. त्या कांदबर्या हिस्ट्री असायच्या ऐवजी his stroy असतात. (हिज = रायटर) आणि नेहमी एकांगी. "खरा" ईतिहास सुरु केल्यावर तर माझे फिक्शन वाचने पण संपले होते अनेक वर्ष. नॉन फिक्शन आणि फिलॉसॉफीनेच वेड लावले.

    आशुला सहमत,
    मृत्युंजय, राधेय, स्वामी या पुस्तकांची खुप पारायण केली.

    मी 'सेकंड लेडी' हे अनुवादित पुस्तकपण २ वेळा वाचले होते कॉलेजमध्ये असताना. 'नॉट विदाउट माय डॉटर' पण खुप छान आहे पण मी तरी ते परत वाचु शकेन असे वाटत नाही. इथली सगळी चर्चा वाचुन मी 'लिटील वुमेन' वाचले हातातुन खाली ठेववतच नव्हते. धन्यवाद एवठे छान पुस्तक सुचवल्याबद्द्ल.

    पुलंच्या अनेक पुस्तकांची पारायणं झाली.
    "एक शून्य मी" मात्र अंतर्मुख करायला लावतं.त्यातला प्रत्येक लेख आपल्याला विचार करायला लावतो.
    "towards the silver crests of Himalayas" हेपण असंच एक मस्त पुस्तक.त्याचा अनुवाद म्हणजे "साद देती हिमशिखरे".भारतीय तत्त्वज्ञान हा विषय जर आवडत असेल तर जरूर वाचा.
    शिवय वर तुम्ही सगळ्यांनी ज्या खूप सुन्दर पुस्तकांचे उल्लेख केलेत त्यातलीही पुस्तकं "always favourite"मध्ये आहेतच.वेळ असला तर कुठल्याही पुस्तकातलं कुठलंही पान उघडून वाचायला सुरुवात!!!!!
    ..प्रज्ञा

    अजून एक असंच कुठलंही पान उघडून वाचत जावं.. दर वेळेला खूप वेगळे वेगळं जाणवत रहातं असं पुस्तक म्हणजे
    युगान्त - इरावती कर्वे
    माझ्याकडची प्रत ही माझ्या आजोबांनी कोणे एके काळी विकत घेतलेली आहे ज्यांना जाउनच आता २९ वर्ष झाली. अशी त्यांनी जमवून ठेवलेली अनेक पुस्तकं मला आजही तेवढीच महत्वाची होतात... खरंच पैशाने जेवढ्यास तेवढं असलं तरी वाचनाची आणि पुस्तकांची श्रीमंती जी घरात मिळाली ना मला ती नसती मिळाली तर आज मी जी काय थोडीफार बरी आहे तशी असूच शकले नसते.
    -नी
    http://saaneedhapa.googlepages.com/home

    युगान्त... कुठूनही सुरू करुन थोडी(च) पानं वाचावीत आणि नंतर वाचलेलं सावकाश सावकाश पचवत रहावं असं पुस्तक आहे हे. पहिल्यांदा वाचलं तेव्हा तर एक तासभर शांत बसून राहिलो होतो ते पुस्तक डोक्यात फक्त घोळवत... मग हळूहळू विचार करायला सुरुवात केली... अजूनही करतो आणि अज्जुका म्हणते तेच जाणवतं... प्रत्येक वेळी हे मनन काहीतरी नवीनच जाणीव करून देतं.

      ***
      Insane : When you're crazy and it bothers you.
      Crazy : When you're insane and you like it.

      >>पुलंच्या अनेक पुस्तकांची पारायणं झाली.
      "एक शून्य मी" मात्र अंतर्मुख करायला लावतं.

      हो खरच ! अगदी....प्रतेकाने वाचावे असे.

      तुषार

      युगान्त - इरावती कर्वे >>>> हो, हे ही आहेच कि "लिस्ट" मधे Happy
      .
      आमच्या घरीही वाचनाची परंपरा आजोबांपासुन चालत आली (कदाचीत त्याही आधीच्या पिढीपासुन). त्यांनी अगदी रुपया-पैशांमधे घेतलेली "अमुल्य" पुस्तके अजुनही आहेत. तरी त्यातली कितीतरी त्यांनी कोणा-कोणाला वाचायला म्हणुन दिली ती परत आलीच नाहीत Sad

      तात्या टोपेंबद्दल लिहीलेली काही चांगली पुस्तकं आहेत का? त्यांची नावं काय?

      केदार ऐतिहासिक non-fiction / fiction पुस्तकांची नावं लिही की जरा... कुठली चांगली आहेत ते.

      ~~~~~~~~~
      ~~~~~~~~~
      Happy

      व.पुंची जवळजवळ २२ पुस्तके वाचून झाली..एक अनेकवेळा अशी २२. Happy आपल्या आजूबाजूला त्या घटना घडतायत अशा प्रवाही कथा! म्हणूनच त्यांना काळाचे बंधन नाही. त्या आजही तशाच आणि तितक्याच खर्‍या वाटतात, पटतात. माणसं अशी असू शकतात? या प्रश्नापासून माणसं अशी 'च' असतात या निर्णया पर्यंत मला व.पुंनीच आणलं! एखादी कथा वाचत असताना आपण त्यात गुंतत जावं, शेवट काय असेल याचे साधेसुधे आडाखे बांधावे आणि शेवट एक अशी जबरदस्त कलाटणी मिळते की आपल्या विचारांचे चक्र पुन्हा उलटं फिरायला सुरूवात!! पण नंतर या प्रकारची मजा यायला लागली आणि मी जास्त सखोल आणि दुसर्‍याच्या बाजूने त्याच्या भूमिकेत शिरून विचार करायला शिकले! कोणताच माणूस कधीही संपूर्ण चांगला अथवा संपूर्ण वाईट कधीच नसतो. तो जे वागतो ते त्या वेळी त्याच्यावर जी परिस्थिती असते त्यानुसार तो वागतो. हे आता माझ्या मनात ठाम बसले आहे. सगळे श्रेय माझ्या लाडक्या व.पुंना!!!

      Happy
      ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
      आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा
      पाव्यातला सूर जैसा ओठातूनी ओघळावा

      पु.लं.चं कुठलंही पुस्तक ... कितीही वाचलं तरी समाधानच होत नाही.
      त्यांची 'मित्र हो', 'रसिक हो' आणि 'श्रोते हो' ही ट्रायोलॉजी तर खासच Happy 'हसवणार्‍या' पुलंपेक्षा विचारवंत पुलं समजून घ्यायचे असतील तर ह्या तीन पुस्तकांना पर्याय नाही !
      -----
      सुहास शिरवळकरांचं 'दुनियादारी' !!
      (आणि किती तरी)
      -----
      शिरीष कणेकरांचं 'क्रिकेट वेध' आणि 'माझी फिल्लमबाजी'
      -----
      'मृत्युंजय' -- कधीही, कितीही वेळा !!

      ------
      गोनीदांचं 'आम्ही भगीरथाचे पुत्र' आणि प्रभाकर पेंढारकरांचं 'रारंग ढांग' !!
      -------
      नुकतंच 'शांताराम' हे इंग्लिश पुस्तक अर्ध वाचून झालंय. 'सत्य हे कल्पनेहून अदभुत असतं' हेच खरं
      -------
      इंग्लिश पुस्तकांच्या ऑडिओ बुक्स -- विशेषतः हॅरी पॉटर सिरीजमधलं कुठलंही किंवा 'दा विन्ची कोड' -- 'पुस्तक वाचून दाखवणं' हा प्रकार काय भन्नाट असतो हे समजण्यासाठी ही पुस्तकं नक्की 'ऐकावीत!'

      आज लालुशी बोलताना आठवले- नेगल Happy
      .
      आणि अंकलची पोस्ट बघुन आठवले- शिरिष कणेकरांचं गोतावळा (हेच ना ? त्यांच्या मित्रपरिवाराविषयी ?)

      माझीही पारायण बरीच झालीत.... पण वयाच्या त्या त्या टप्प्यावर पुस्तक बदलत गेली:

      शाळकरी वयात झाडुन सगळ्या ऐतिहासिक/काल्पनिक कादंबर्‍या जसे स्वामी, मृत्युंजय आणि ययाति
      नंतर पुल आणि वपु
      कॉलेजच्या दिवसात शोभा डे ची पुस्तक , दुनियादारी आणि कोसला
      अगदि अलीकडे शाळा आणि रारंगढांग

      Pages