मायबोली गणेशोत्सव २०१४ "बाप्पा माझ्या मनातला"- विनार्च (अनन्या)

Submitted by संयोजक on 23 August, 2014 - 07:43
हाय! मी आहे अनन्या!
ananya_clay_doll.jpg
यावर्षी मायबोलीच्या गणेशोत्सवात मला गणपती तयार करायचे आहेत, हे आईने मला सांगितल्यावर जो आनंद झालाय ! मी तर नाचायलाच लागले. त्या नादात माझ्या पायाला पण खरचटलं...पण फिकर नॉट! मी आईला विचारलं "जास्तीत जास्त किती बनवू शकते?" ती म्हणाली, "बनव पाच- सहा". मग मी आठ बाप्पा तयार केले. शेवटचा बाप्पा तयार करत असताना आई म्हणाली ,"एक बनवायला पण शिकव ना...किती भाव खाशील?" म्हणून मग एक टिटोरियल पण केलं आहे हं! आईने थांबवल म्हणून हे आठच बाप्पा आहेत. नाही तर डोक्यात इतक्या आयडिया होत्या की काय सांगू ! तर बघा कसे झाले आहेत माझे गणपती बाप्पा-

१) गादीवर आरामात झोपून,मागे लोड ठेवून विचार करण्याची पोझ म्हणजे माझी आवडती :-) मी अशी कित्तीही तास बसू शकते, म्हणून हा बाप्पा -
ananya ganesh_1.jpg

२) मी एक Secret सांगू? मला ना बाबाच्या गोष्टी वापरायला खूप मजा येते. जसं की त्याचा टी-शर्ट,पँट,बेल्ट,घड्याळ... हा बाप्पा पण तसाच आहे. शंकर बाप्पाचा म्हणजे त्याच्या बाबाचा साप पोटावर बांधलाय त्याने बेल्टसारखा :फिदी:

ananya ganesh_2.jpg

३) माझा फेव्हरेट बाप्पा माझ्यासारखा असणारच ना! मग मी कशी "यो" आहे तसा हा बाप्पा पण "यो"
ananya ganesh_3.jpg

४)हा बाप्पा पहा कसा पुस्तक वाचत मस्त पहुडलाय चटईवर.....आणि आई फोटो काढतेय म्हणून तिच्याकडे बघतोय
ananya ganesh_4.jpg
ananya ganesh_5.jpg

५) बाबा माझा फेव्हरेट आहे ना आणि त्याचं फेव्हरेट क्रिकेट, म्हणून हा बाप्पा....बाबासाठी खास!
ananya ganesh_6.jpg

६) हा माझा सिनियर बाप्पा...माझ्या आवडत्या 'हॅमर किक'ची प्रॅक्टीस करताना...
ananya ganesh_10.jpg

(मला पण आता लवकरच ब्लॅक बेल्ट मिळणार आहे :-) )


७) हॅरी पॉटरच्या शाळेत छोट्या-शिशूमध्ये दाखल झालेला बाप्पा.....उडायचे प्रयत्न चालले आहेत त्याचे!
ananya ganesh_9.jpg

८) आणि हा शेवटचा एकदम साधा सोप्पा बाप्पा! हा कसा बनवायचा हे खालच्या व्हीडिओत दाखवलंय मी-
ananya ganesh_8.jpg


कसे वाटले माझे सगळे बाप्पा? नक्की सांगा हं! :-)
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अतिसुंदर!!! अनन्या, राणी अगं किती सुरेख सुरेख बाप्पा आहेत. तुझ्याकडे खूप छान कला आहे आणि कल्पनापण. मला हॅरी पॉटर बाप्पाची कल्पना तर भारीच आवडली. शाब्बास!! Stay blessed always!

अनन्या आपण तर एकदम फॅन झालो तुझे. काय एकसे एक बाप्पा केलेत. अमेझिंग. कीप इट अप.
आम्हाला तुझी चित्रं पण खूप आवडतात बरका.

अरे, अनन्या, कसले भारी बाप्पा तयार केलेस ग तू Happy शाब्बास ग
मला तो क्रिकेटियर, पुस्तक वाचणारा, कराटे मास्टर आणि हॅरी पॉटर फार म्हणजे फार आवडले ग.
तुझ्या हातात खरच जादू आहे ग.
आणि हो ती अनन्या तर कसली भारी केलीयस, अगदी तूच ग तूच Wink

विनार्च, जन्मजात कलाकार आहे तुझी लेक. आणि तिच्या सगळ्या कलांना छान वावही देता तुम्ही दोघं. म्हणून तुम्हा दोघांनाही शाब्बासकी ग Happy

मस्त मस्तच आहेत सगळे बाप्पा.
अनन्न्या, तू पण खूप गोड आहेस.
व्हिडिओ पण खूप छान!

अनन्या, पिल्लू तू खुप गोड आणि हुशार आहेस Happy
रिया मावशीची तुला असलेली काळजी पण कळाली मला Happy
थँक्यू सो मच!
आपण भेटू ना तेंव्हा तुला एक छानसं गिफ्ट देणार आहे मी Happy
अशीच बहरत रहा.
आय एम सो प्राऊड ऑफ यू Happy

शाब्बास अनन्या. सुंदर बनवले आहेस.कीप इट अप !!!

"वॉव अनन्या, खूप मस्त बनवले आहेत बाप्पा...
मला पण क्लेच्या वस्तू बनवायला खूप आवडतं. पण मी आत्तापर्यंत पोकेमॉन्स वगैरेच बनवले आहेत.अजून गणपती बनवलेला नाही. तुझा व्हिडिओ बघून बनवीन आणि फोटो दाखवीन. तुझे बाप्पा बघून मी खूप इंप्रेस झालो आहे."
---मिर्चीचा मुलगा.

वा अनन्या!!! तुझ्या बोटांमध्ये जादू आहे.. काय मस्त आकार दिलेयस एकेका गोळ्याला.. शाब्बास आणि कीप इट अप Happy

Pages