आम्ही गायलेला राग मालगुंजी - रैना कारी डरावन लागी रे

Posted
9 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago

मला संगीत शिकवणारे गुरुजी श्री रविन्द्र परचुरे ह्यांच्यासाठी गुरुपौर्णिमेनिमित्त आम्ही गुरुबांधवानी मिळून राग मालगुंजी मधील एक बंदीश गायली - "रैना कारी डरावन लागी रे..."

त्याची तू-नळीवरची लिंक इथे देतो आहे:

http://youtu.be/7l2AKrCWjak

विषय: 
प्रकार: 

.

ह्या रागाचे नाव पहिल्यांदाच ऐकले पण गोड राग आहे आणि तुम्ही सगळ्यांनी एका सुरात...गायलात!
छान वाटलं ऐकतांना,

प्रमोद,

"घर आया आजा घिर आये बदरा सावरिया" ह्याच रागातले आहे. लतानी गायले आहे. पंचमदांनी संगीत दिलेले हे पहिले गाणे आहे.

हा राग खूपच गोड आहे.

श्रोत्यांचे धन्यवाद.

जीवन से भरी तेरी आंखे माझे आवडते गाणे आहे..पण त्यातला राग माहीत नव्हता.
संमि, ज्ञानात भर टाकल्याबद्दल धन्यवाद!
(बी, मी च्या ऐवजी आम्ही असं केलंस तर जास्त योग्य होईल असं नाही का वाटत?)

(बी, मी च्या ऐवजी आम्ही असं केलंस तर जास्त योग्य होईल असं नाही का वाटत?)>> केले तसे.. पण माझा तसा उद्देश नव्हता प्रमोद जी.. नकळत झाली मीपणाची चुक.

सुरेख वाटतंय ऐकताना. या रागातली गाणी म्हणजे नैन सो नैन नाही मिलाओ आणि जीवन से भरी तेरी आंखे.

बी. अभिनंदन.

तुम्ही माबो वर आधी प्रश्न विचारला नाहीत की कुठला राग गावू? खरे तर अजुन एक बेसिक प्रश्न पण विचारला नाहीत "पुण्यात गाणे शिकायसाठी कोणाकडे जाऊ?"

छान!