दुबई / अबु धाबी सहल - भाग ५

Submitted by दिनेश. on 26 August, 2014 - 09:34

दुबई / अबु धाबी सहल - भाग १ http://www.maayboli.com/node/50452

दुबई / अबु धाबी सहल - भाग २ http://www.maayboli.com/node/50460

दुबई / अबु धाबी सहल - भाग ३ http://www.maayboli.com/node/50475

दुबई / अबु धाबी सहल - भाग ४ http://www.maayboli.com/node/50501

दुबई हे नाव जरी आपल्या चांगल्याच परीचयाचे असले तरी संयुक्त अरब अमिरात या देशाची राजधानी, दुबई
नाही तर ती अबु धाबी आहे. तसेच देशाच्या एकूण क्षेत्रफळाच्या २/३ भाग अबु धाबी ने व्यापला आहे.
अबु धाबीलाही आंतर राष्ट्रीय विमानतळ आहे.

सध्या २०२० च्या एक्स्पो साठी दुबईच्या जवळच आणखी एक विमानतळ बांधण्याचे काम जोरात चालू आहे.

अल ऐन हि अमरात नाही तर अबु धाबीचाच भाग आहे. ऐन म्हणजे अरेबिक मधे नयन.. ( आठवा मामाजी कि
ऐनक ) इथे पूर्वापार मानवी वस्ती होती. त्या वस्तीच्या खाणाखुणा सापडल्या आहेत.
त्याच बघायला आम्ही निघालो होतो.

आमचा आजचा चालक, बदर खुपच बोलघेवडा होता. त्याच्याकडे अद्यावत माहिती तर होतीच आणि सांगण्याची हातोटी पण होती. त्यासाठी तो प्रत्यक्ष दृष्य तर दाखवायचाच त्याशिवाय, जी. पी. एस. , गुगल वगैरे वर पण
माहिती दाखवायचा.

त्याचा रोजा होता, पण आमच्या खाण्यापिण्याची त्याने खुप काळजी घेतली. खरं तर त्याच्यासमोर खायला
आम्हाला संकोच वाटत होता, पण त्यानेच आम्हाला सांगितले कि आमच्या खाण्याची सोय त्याने
केली नाही तर त्याचा रोजा अल्ला मान्य करणार नाही.

आम्ही दोघे खाऊन पिऊन मजेत असल्याने जास्तच उत्साही होतो. अनेक ठिकाणी त्याला थांबायला लावत
होतो. माहिती विचारत होतो. तो न कंटाळता आमची हौस पुरवत होता.
दिवसभराचा उपास, उन्हातले ड्रायव्हींग याच्यामूळे तो थकायचा. त्यामूळे पायी डोंगर चढणे, जिने चढणे तो
टाळायचा. पण त्याने आम्हाला मात्र तसे जाणवू दिले नाही. आमचीही कंपनी त्याला आवडत असावी कारण
टूअर मधे नसलेले भागही तो आम्हाला दाखवायचा. त्याच्यासाठीच आम्ही दुसर्‍या दिवसाची अबु धाबी ची
टूअर बूक करुन टाकली ( तो एक अविस्मरणीय अनुभव ठरला. )

त्याने हे देखील सांगितले कि वादी हत्ता, अल ऐन सारख्या ठिकाणी फारसे भारतीय जात नाहीत. पण मी
नेटवर बघून या सहली आधीच बूक केल्या होत्या, हे सांगितल्यावर त्याला आनंद झाला.

रमदान संबंधी तश्या अनेक अफवाही आहेत. शारजाह सारख्या ठिकाणी, चालत्या गाडीत पाणी प्यायले म्हणून
काही लोकांवर कारवाई केल्याचे सांगतात. ( रस्त्यावरची चालती गाडी, हि तिथे सार्वजनिक जागा मानतात.)
पण आम्हाला कुठेही तसे जाणवले नाही. अगदी सरकारी संग्रहालयातही तिथल्या कर्मचार्‍यांनीच आम्हाला
पाणी प्या असे आवर्जून सांगितले.

तर आपण अजून एक दोन दागिने बघू या का, त्या मॉलमधले ?

१)

२) हे पण खरे मोतीच. असे ओबडधोबड असले तर त्याला जास्त मोल मिळते बहुतेक Happy

३) मी २००१ साली दुबईत एक महिनाभर होतो- त्यावेळी लॅमसी प्लाझा नावाचा एक मॉल नव्यानेच सुरु झाला
होता. तिथे एक मजेदार खेळ होता. एक माणूस ढीगभर शिंपले घेऊन बसला होता. आपण त्यातला बंद शिंपला
निवडून विकत घ्यायचा. तो शिंपला तो माणूस आपल्यासमोर उघडणार. जर त्यात मोती निघाला तर आपला.
बर्‍याच लोकांनी नशीब आजमावून बघितले.. कुणाला मोती मिळाल्याचे दिसले नाही.

तर हे खरे मोत्यांचे शिंपले आणि त्यातले मोती. ( बहारीन जवळ मोठ्या प्रमाणात मोती सापडतात. )

४) दुबई आणि मस्कत मधे देखील ठिकठिकाणी अशा मशिदी दिसतात. पेट्रोल पंप, बाग या सारख्या ठिकाणीही
त्या असतात. मशिद बांधणे हे तिथे पुण्यकर्म समजतात. तर अशीच एक मशीद.

५) दुबईच्या राजवाड्याजवळ सुरक्षेचे अवडंबर नाही. त्याच्या बर्‍याच जवळ सामान्य माणसांना सहज जाता येते.
तिथेच हे काही मोर मोकळेच सोडलेले आहेत.

६)

७)

८)

दुबईच्या आकाशात बुर्ज अल खलिफा... अशी कायम दिसत असते. इतरांच्या तुलनेत ती किती उंच आहे पहा.

९)

दुबईच्या थोडे बाहेर पडल्यावर तर चक्क फ्लेमिंगोज दिसले आम्हाला. ( फोटोत नीट दिसत नाहीत. हा आणि वरचे बरेच फोटो चालत्या गाडीतून काढलेले आहेत. )

१०)

अरबी आदरातिथ्यात काहवाची ( कॉफी) सुरई, ती प्यायचा छोटासा कप आणि गुलाबपाणी शिंपडायची गुलाबदाणी खुप महत्वाची आहे. आपण ती नंतर बघणार आहोतच. हे शिल्प अल ऐन नगरीत प्रवेश करताकरता
दिसते.

११) अल ऐन जवळ काही ठिकाणी ( हाफित, हिली, बिदा बिंन सौद ) काही प्राचीन मानवी वस्तीचे अवशेष
सापडले आहेत. चार वर्षांपूर्वी युनेस्कोंने त्यांना वर्ल्ड हेरीटेज चा दर्जा दिलेला आहे.

आपल्याकडे एकतर अशा ठिकाणी सहज जाता येत नाही. समजा गेलोच तर तिथे काही सोयी नसतात.
या ठिकाणी मात्र त्या बांधकामापैकी काहीची थोडी डागडुजी केलेली आहे. व्यवस्थित माहितीफलक लावलेले
आहेत. इथे सापडलेल्या वस्तू मात्र तिथून जवळच असलेल्या म्यूझियम मधे ठेवलेल्या आहेत.

१२) तो परीसर मात्र एखाद्या बागेप्रमाणे सजवलाय आणि राखलाही आहे.

१३) इथे जरी एकाच इमारतीचे अवशेष दिसत असले तरी तिथे कधीकाळी मोठी वस्ती असावी असा कयास आहे.
ताम्रयुगात तसेच नंतर लोहयुगातही इथे वस्ती होती. इसवीसन पूर्व तिसरे ते पहिले शतक. हे बांधकाम चिखलांच्या विटांचे आहे.

१५) तो परीसर

१६)

१७) देखण्या रंगरुपाची सदाफुली तिथे आहे.

१८)

१९)

२०)

२१)

२२) साधारण ३ ते ४ हजार वर्षांपूर्वी बांधलेले हे थडगे. यासाठी तासून आकार दिलेले मोठेमोठे दगड वापरले आहेत. १२ मीटर व्यासाचे हे थडगे अनेक माणसांच्या दफनासाठी वापरले गेले. त्यासोबत नित्य उपयोगाच्या
अनेक वस्तूही सापडल्या आहेत. याचे उत्खनन १९६५ मधे सुरु झाले. १९७५ मधे त्यची डागडुजी झाली आणि
आता ते असे बर्‍या स्थितीत आहे.

२३)

२४)

२५)

२६)

२७) या थडग्यावर ओरीक्स या खास हरणाचे शिल्प आहे. हे हरण वाळवंटात तग धरून राहू शकते. अंगोलाचा
तो राष्ट्रीय प्राणी आहे. कातार एअरवेजचेही ते मानचिन्ह आहे.

२८)

२९)

३०)

३१)

३२)

३३)

३४) हा बी इटर ना ? उडताना याचे रंग मस्त दिसायचे. पण बसताना मात्र असे तोंड लपवून बसला.

३५) इथे अजून उत्खनन व्हायचेही आहे.

३६)

३७)

३८)

३९)

४०)

४१)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

भारीच जागा आहे की ही. फोटो पण भारी आहेतच.

दिनेश, या जागेबद्दल अधिक माहीती देणारे दुवे असतील तर ते पण लेखात द्याल का?

आभार,
जिप्स्या.. उडताना खुपच सुंदर दिसतो तो. या पक्ष्याचा एक फोटो ओमानमधल्या फोनकार्डावर असायचा पुर्वी.

माधव, पुढच्या भागात म्यूझियमचे फोटो टाकेन. त्यात इथे सापडलेल्या वस्तूंचे फोटो असतील,

दिनेशदा, हा घ्या झब्बू Happy

तुमच्या आबु धाबीतले निलपंख भारीच लाजरे बुवा. आमच्या कोकणातले बघा कसे धीट आहेत ते. Proud

जिप्स्या.. हा नर दिसतोय.. ती मादी होती.. लाजणारच ना !
कामिनी.. खजुर पिकायला लागले कि गोडूस वास सुटतो... तो येतच होता. पण आपण जास्त खाऊ शकत नाही.
५/६ पेक्षा जास्त नाहीच खाता येत.

मस्त आलेत फोटो. शिम्पल्यातल्या मोत्याचे तर खासच. ते थडगे भार्रीचे. त्यात एक झरोका मोकळा होता ना? तुम्ही त्यात डोकावले का? मी तो भोचकपणा नक्कीच केला असता. त्या बी इटरचा निळसर रन्ग मस्त झळाळतोय.

सभोवती कुंपण होते ना ? म्हणून.त्याच्या आतली रचना म्यूझियममधल्या मॉडेल मधे आहे.
हिरवळीवर नाचू नका, कुंपणाच्या आत जाऊ नका.. अशा सूचना कुठेही नसतात.. पण सगळे कसे मर्यादेत असतात त्या. त्यावेळी मी, विवेक आणि बदर शिवाय कुणीच नव्हते तिथे.

एक से एक फोटो. आज पाहिले सगळे भाग
वा दिनेश. तुमच्या निमित्ताने प्रचिंच्या माध्यमातून आम्ही दुबई फिरून आलो.