५ वर्षांपूर्वीची गोष्ट . नवीन नौकरी . Office चा एक इवेन्ट . पार्टी एका उच्चभ्रु हॉटेल मध्ये . मी आणि माझा मित्र -कम -सहकारी एकत्रच गेलो . पार्टी एकदम रंगात आली असतानाच हा एकदम दिसेनासाच झाला . मी त्याला फोन केला . तर त्याने तो उचललाच नाही . थोड्या वेळाने त्याचा मेसेज आला कि त्याला काही अर्जंट काम निघाल्यामुळे त्याला एकदम जावे लागले . उद्या ऑफिस मध्ये भेटूयात . असेल काही काम म्हणून मी हि फारस लक्ष दिल नाही . दुसर्यादिवशी हा गडी ऑफिस मध्ये एकदम खुशीत . मी त्याला विचारले , "काय रे मित्रा , कुठे गायबला होतास काल ?" तो म्हणाला ," कुणाला सांगणार नसशील तर सांगतो ." माझी उत्सुकता चाळवली . मित्र पुढे म्हणाला ," आपल्या HR मधली ती अबक मुलगी आहे ना तिच्यासोबत माझ्या flat वर गेलो होतो . माझा flatmate सध्या बाहेरगावी आहे आणि मी एकटाच आहे ." मला धक्का बसला .
मी ," आयला भारी रे ! कधीपासून चालू आहे ? लग्न वैगेरे कधी करताय मग ?"
तर तो ," वेडा झालायस का ? ते तितक्या पुरतच होत . काही serious नाही आहे ."
परभणी सारख्या ठिकाणाहून आलेल्या मला सगळ्यात पहिले सांस्कृतिक वैगेरे म्हणतात तसा धक्का बसला . आणि नंतर त्या धक्क्याची जागा हेव्याने घेतली . One Night Stand या गोष्टीशी आलेला हा माझा पहिला संबंध .
आताशी हा लिंगो बर्याच वेळा कानावर पडतो . आणि या प्रकारच्या गोष्टींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे हे स्पष्टच आहे . मला स्वतहाला या नातेसंबंधांच्या कदाचित सगळ्यात छोट्या फॉर्म बद्दल कुतूहल आहे . म्हणजे योनिशुचीतेबद्दल कुठलेही वांझोटे प्रोटेस्ट माझ्या मनात नाहीत पण अशा एखाद्या नात्यात (?) आलेल्या लोकांबद्दल कुतूहल नक्कीच आहे . म्हणजे असे पाहा की शारीरिक आकर्षण हाच एखाद्या नात्याचा (मग तो किती पण short span चा असेल) पाया असू शकतो का ? का मुळात तमाम आपली महान भारतीय संस्कृती वादी म्हणतात तस या नात्यांना काही शेंडा बुडखा नसतो ? या अशा गोष्टींमुळे आपल्या महान संस्कृती ला धक्के बसतात का? आणि सगळ्यात महत्वाच म्हणजे भारतीय समाजमनात sex किंवा इतर कुठल्याही अधिभौतिक गोष्टीचा मजा घेण्याबद्दल जो प्रचंड अपराधगंड आहे त्यामुळे one Night Stand सारख्या गोष्टींमुळे आपल्या तकलादू मुल्य व्यवस्थेला
धक्के बसतात का ?
माझ निरीक्षण अस आहे की अनेक ठिकाणासारखा इथे पण इंडिया आणि भारत असा divide झाला आहेच . एका बाजूला शहरांमध्ये हा phenomena वाढत असताना संस्कृती रक्षकाना अर्थातच हा भारतीय संस्कृती वरचा घाला वाटत आहे . समाजात यामुळे एक sexual anarchy येईल अशी भीती त्यांना वाटते. आपल्या मुली (नोट -मुलांची त्याना काळजी नाही ) बिघडतील असे पण त्याना वाटते .
बर हा stand कायम दोन अविवाहित लोकांमध्ये च होईल असे काही नाही . अशी काही अट नाही . म्हणजे एखादा विवाहित पुरुष किंवा स्त्री एखाद्या अविवाहित पुरुष किंवा स्त्री सोबत पण अनेकदा रात्र घालवू शकतात . सिनिकस असे पण म्हणू शकतात हा विवाह संस्थेच्या मुळावरच घाला आहे . Where is the sanctity of marriage ? या अवघड प्रश्नांची उत्तर फार गुंतागुंतीची आणि प्रत्येकापुरती वेगवेगळी आहेत . माझ्या अनुभवाच्या कक्षेत आलेल्या लोकांची जेवढी अशी प्रकरण मी पाहिली आहेत तेवढ्यावरून मी माझ्यापुरती काही उत्तर बनवली आहेत .
सर्वात महत्वाच म्हणजे या अशा नात्यात असलेल्या एकमेका कडून असणार्या शुन्य अपेक्षा . हि सर्वात सुंदर गोष्ट आहे . न कसले राग , न कसले लोभ , ना कसल्या आणि कुठल्या तरी insignificant तारखा लक्षात ठेवण्याचे ओझे . आपल्या दोघाना या क्षणी एकमेकांची गरज आहे . आपण ती पूर्ण करूया आणि लेट्स अपार्ट ऑन गुड नोट . साध आणि सरळ . काही लोकाना हे खूप कोरड वाटू शकत पण पहिलेच नमूद केल्याप्रमाणे to each his /her own .
आणि किती लोक अशी संधी समोर आल्यावर ती सोडतील ? मग ती विवाहित असो वा अविवाहित . याच उत्तर आपणच आपल्या मनाशी ताडून बघाव . नात्याचं पावित्र्य , आपली संस्कृती , कुणाला कळल तर, आणि लोक काय म्हणतील हे प्रश्नांचे ब्रम्ह राक्षस मानगुटीवरून उतरवून . मला वाटत बहुतेक लोकांच उत्तर नाही असेच असेल .
भानू काळे यांच्या बदलता भारत या पुस्तकात अतिशय सुंदर para आहे तो quote करण्याचा मोह आवरत नाहीये . : आपला देश अंतर्विरोधानी एवढा भरलेला आहे की कुठल्याही एका चौकटीत या देशाचे संपूर्ण वास्तव सामावले जाणे अशक्य वाटते .
इथल्या विविधातेबद्दल असे गमतीने म्हणतात की या देशाबाबत केलेलं कुठलेही विधान खरे असू शकते आणि त्या विधानाचा व्यत्यास हि तेवढाच खरा असू शकतो .
आम्ही अणु उर्जा वापरतो , तसेच शेण गोळे हि वापरतो .
इथे धारावी आहे तसेच मलबार हिल पण आहे .
पाण्याचा एकही नळ नसलेल्या शाळा आहेत तसेच स्विमिंग पूल असलेल्याही आहेत .
हा देश गरीब आहे , हा देश संपन्नही आहे .
भानू काळे यांचे हे विधान अजून पुढे न्यायचे ठरवल्यास या देशात आणि समाजव्यवस्थेत one night stand ला पण जागा आहे आणि विवाह संस्थेला पण असे म्हण्यास हरकत नसावी . भारतीय व्यवस्थेने पहिले विरोध करून नंतर विधवा विवाह , संगणक आणि जागतिकीकरण पचावलेच की .
कदाचित काही वर्षांनी हे मोठ्या शहरांमध्ये असणारे लोण छोट्या शहरांमध्ये आणि ग्रामीण भागात पण जाईल . त्याचा वेग कमी जास्त असू शकतो .
लेखाच्या सुरुवातीला ज्या मित्राचा उल्लेख आहे त्याची परवा फेस बुक वर मैत्री विनंती आली . मी लगेच त्याची friend लिस्ट चाळून बघितली . त्यात "ती ' पण होती . दोघांची पण लग्न झाली होती . वेगवेगळ्या लोकांसोबत .
त्रागा संघाचा ओपनिंग बॅट्समन
त्रागा संघाचा ओपनिंग बॅट्समन मैदानात!

आवरा आवरा बोलून प्लस वन पडतात
आवरा आवरा बोलून प्लस वन पडतात आणि सारे पुन्हा पुन्हा चालू होतात
किती जणांनी केले खर
किती जणांनी केले खर सांगा
किती जणांना वाटते उत्सुकता?
सांगा
उदयन.. तुझ्यापासूनच सुरुवात
उदयन..
तुझ्यापासूनच सुरुवात करुया.
अरे मी सांगितले ना फडात पाती
अरे मी सांगितले ना
फडात पाती कापतात म्हणून.. तरी पण विचारतोस
अरे आपला बिझनेस नाही अशा
अरे आपला बिझनेस नाही अशा कित्येक गोष्टींवर आपण गुर्हाळ चालवतोच की मायबोलीवर त्यात ओ एन एस नी काय घोडं मारलय?
वेगळे विचार वाचून कोणाचं मतपरिवर्तन होत असेल, आऊटलूक बदलत असेल तर काय हरकत आहे चर्चा करायला? इथे सुबोध खरे, स्वाती२ आणि अजून काही लोकांनी खुप महत्वाचे विचार ते पण अतिशय संयतपणे लिहिले आहेत.
थोडंस माईंड ओपन ठेवलं तर नक्कीच स्वतःचा आऊटलूक बदलू शकतो. आता लगेच नाही बदलला तरी बॅक ऑफ द माईंडला कुठेतरी फरक पडतोच आणि एखादा क्षण्/अनुभव असा येतो की हे कुठेतरी मनाच्या खोबदाडात लपलेले विचार अचानक समोर येतात आणि "रेलेवंट" होऊन पुढे आपल्या विचारात बदल घडतो.
>>अरे आपला बिझनेस नाही अशा
>>अरे आपला बिझनेस नाही अशा कित्येक गोष्टींवर आपण गुर्हाळ चालवतोच की मायबोलीवर त्यात ओ एन एस नी काय घोडं मारलय? >> तेच की. इथे स्वतःला पॉलिटिक्सचा अनुभव नसतानाही पानंच्या पानं भरून चर्चा होतात, बीबी शहीद होतात. आपल्याला अनुभव असतानाच चर्चा करायची म्हटली तर मग अशा बीबींवर संत्री, मंत्रीच येऊ शकतील की.
गापै, वन नाईट स्टँड संपला की पैसे ठेवून जायचं नसतं म्हणून वेश्यागमन नाही.
सायो, केवळ पैशात मोबदला दिला
सायो,
केवळ पैशात मोबदला दिला म्हणून वेश्या म्हणायचं असं का बरं? लैंगिक सुखाच्या मोबदल्यात दोघेही एकमेकांना वेश्येसारखं वापरून घेताहेत, असंही म्हणता येईल.
आ.न.,
-गा.पै.
वाह मस्तच अँगल आहे हा, बोले
वाह मस्तच अँगल आहे हा, बोले तो स्त्री-पुरुष समानतेचा.
म्हणजे एका खड्या रात्रीत दोन्ही पार्टी वेश्याही झाल्या आणि कस्टमरही झाल्या.
आनगापै, तुमचं तर्कट अजून
आनगापै, तुमचं तर्कट अजून ताणलं की लग्नाच्या नवरा-बायकोला पण लागू होतं की. वर कुणीतरी प्रतिसादात तसे म्हटलेले देखील आहे.
>>विधवेला किंवा परित्यक्तेला
>>विधवेला किंवा परित्यक्तेला बाकीच्यांचा आधार (सपोर्ट) असतो. त्यासाठी एकपालकी कुटुंब हा अपवाद असायला हवा. जर तो नियम झाला तर कोण कोणाला आधार (सपोर्ट) देणार? अशा वेळी मुलांकडे दुर्लक्ष होतं आणि ती गुन्हेगारीच्या विळख्यात अडकण्याचा धोका वाढतो.>>
गा. पै.,
एक पालकी कुटुंबातले पालक आणि मुलं समाजाकडून फक्त घेतात आणि देत काहीच नाहित असे म्हणायचे आहे का? की पारंपारीक कुटुंबाला समाजाची मदतच लागत नाही? खरे तर It takes a village to raise a child. सुजाण पालक हे जोडपे असते तसेच एकटेही असतात. आणि हे सगळेच आपापल्या परीने देवाण घेवाण करत असतात. दोन अपारंपारिक कुटुंब एकमेकांचा आधार बनू शकतात किंवा एक पारंपारिक आणि एक अपारंपारिक कुटुंब एकमेकांना आधार देऊ शकतात. माझ्या लहानखुर्या, क्लम्झी मुलाला बास्केटबॉल धरायला शिकवणारी व्यक्ती ही सिंगल डॅड होती. रोज मधल्या सुट्टीत आपल्या मुलीवरोबर लंच घ्यायला शाळेत येणारा हा डॅड पेशंटली माझ्या मुलाबरोबर खेळायचा. माझ्या मुलाच्या शाळेत दुकटे पालक मदतीला यायचे तसेच एकटे पालकही यायचे. अजून एक गोष्ट म्हणजे एक पालकी कुटुंब हे कायम एक पालकी राहिलच असे नाही.
मुलांकडे दुर्लक्ष झाल्यास ते गुन्हेगारीकडे वळू शकतात हे खरे. पण पारंपारिक कुटुंबात असे दुर्लक्ष होणारच नाही असे नाही. त्यामुळे पारंपारिक्/अपारंपारिक कुटुंबातील दुर्लक्षित मुलाला आधार उपलब्ध होणे हे महत्वाचे. अशा मुलांना आधार द्यायची मनापासून इच्छा असेल तर मुलांचे मेंटर होण्यासाठी, बिग ब्रदर्/बिग सिस्टर म्हणून त्यांना आधार देण्यासाठी लग्न झाले आहे/नाही, मुलं आहेत/ नाहीत या कुठल्याच गोष्टींची अडचण येत नाही.
>>मला म्हणायचंय की या नात्यात बांधिलकी नसल्याने स्त्रीपुरूष केवळ उपभोग्य देह ठरतात. मग एकरात्रसहवास आणि पैसे मोजून केलेलं वेश्यागमन यांत फरक तो काय राहिला! >>
पैशाची देवाणघेवाण नाही, उपजिविका चालवणे हा हेतू नाही हा फरक.
>>केवळ पैशात मोबदला दिला
>>केवळ पैशात मोबदला दिला म्हणून वेश्या म्हणायचं असं का बरं? लैंगिक सुखाच्या मोबदल्यात दोघेही एकमेकांना वेश्येसारखं वापरून घेताहेत, असंही म्हणता येईल>>
मुळात वेश्या कोण असते? जी पैशाच्या मोबदल्यात शरीरसुख देते. वन नाईट स्टँडमध्ये बाई पुरूषाला किंवा पुरूष बाईला पैसे देतो/ ते का? तर नाही. वन नाईट स्टँड आणि वेश्यागमन ह्यात एक (बरीचशी) कॉमन गोष्ट ही आहे की दोन्ही संबंधातल्या पार्टीजना 'नो स्ट्रिंग्ज अटॅच्ड' सेक्स हवा असतो. वन नाईट स्टँडमध्ये एकाला/किंवा दोघांना कदाचित आणखी पुढे जावंसं वाटू शकेल पण वेश्यागमनात पैसे देणार्या व्यक्तींना तसं काही वाटत नसतं. पैसे टाकून स्वतःला हवं ते मिळवणं हाच हेतू असतो. स्वाती२ म्हणतात त्याप्रमाणे त्यातून उपजिविका चालू शकते कुणाचीतरी.
एकरात्रसहवास आणि वेश्यागमन
एकरात्रसहवास आणि वेश्यागमन यातला एक फरक हा की एकरात्रसहवासात दोघेही शरीरसुख शोधू पाहत असतात. वेश्यागमनात फक्त ग्राहक शरीरसुख शोधत असतो तर सर्व्हिसप्रोव्हाइडर फक्त त्याच्या फीसाठी काम करत असतो. तसंच वेश्याव्यावसायिकांच्या स्वेच्छेने सहभागी होण्याबद्दलही विचार करायला हवा.
वन नाईट स्टँड म्हणजे काय
वन नाईट स्टँड म्हणजे काय याबद्दल एक पोस्ट लिहीली होती. त्याचा काही उपयोग झालेला दिसत नाही. ५०० डीबीच्या पोस्ट्स मात्र आल्या. इग्नोरास्त्र वापरणा-यांची कीव येते कधी कधी
कुणी वापरावं हे आणखी एक !
नेटवरच्या व्याख्येवर जाऊ नये. त्या इथे लागू पडणार नाहीत. प्रगल्भता नाही हे आहेच, त्याशिवाय ब्लॅकमेलिंग होण्याचा धोका आहे. स्टार न्यूजची सुरुवात असताना मोठा एपिसोड झाला होता. मुंबईत प्रचलित असणा-या गोष्टी दाखवण्यात आल्या होत्या. या एपिसोडनंतर मुंबई पोलिसांनी अटकसत्र चालू केलं होतं त्याची आठवण झाली. त्या एपिसोडनंतर गदारोळ झाल्याचे मात्र आठवत नाही (झालाही असेल).
जाता जाता -- एक पन्नाशीचा जाट
जाता जाता --
एक पन्नाशीचा जाट डॉक्टरकडे आला आणि म्हणाला "डॉक्टर आजकाल कमजोरी लगती है".
डॉक्टर --"ताऊ, हट्टा कट्टा तो लग रहा है"
जाट --"नही, रात मे कमजोरी है. आजकाल हप्ते मे तीन बार हि सेक्स हो पाता है"
डॉक्टर "फिर क्या तकलीफ है"
जाट-- " मेरा पडोसी तो हप्ते मी ७ बार करता है ऐसे बोला "
डॉक्टर--" ताऊ, तुने देखा क्या?
जाट -- "नही, देखेगा कैसे"
डॉक्टर --"फिर तुभी बोल, मै हफ्ते मे १० बार करता हुं.
तात्पर्य
ओ एन एस बद्दल जितकी शेखी मिरवली जाते तितकी वस्तुस्थिती असत नाही.
दुसरी गोष्ट -- वैवाहिक संबंधात शरीर संबंधांचे प्रमाण हे नुसत्या/लीव्ह इन नात्यांच्या पेक्षा किती तरी जास्त असते. (sex is available on tap). सलमान खान ( इथे कोणताही नट किंवा कासानोव्हा घ्या) च्या १५ मैत्रिणी झाल्या असतील पण प्रत्यक्ष संबंध १०-१५% च्या वर जात नाही.
हि माहिती CARC ( center for AIDS Research and Control) के इ एम रुग्णालय बरोबर काम करताना मिळाली होती. (साल १९९४). आजही यात फार बदल झाला असेल असे वाटत नाही.
बाकी काथ्याकुट चालू द्या.
ओ एन एस बद्दल जितकी शेखी
ओ एन एस बद्दल जितकी शेखी मिरवली जाते तितकी वस्तुस्थिती असत नाही. --अगदी खोटं
लोक असल्या गोष्टीबद्दल मुळी बोलतच नाहीत - अळीमिळी गूप चिळी असते - आणि बोलले, तर खोटं बोलतील असं वाटत नाही..
असो - I may be wrong..
ता. क. मला वरचे सगळे प्रतिसाद
ता. क.
मला वरचे सगळे प्रतिसाद आवडलेत..
- विशेष - सुबोध, गा. पै
काय तर म्हणे One Night Stand
काय तर म्हणे One Night Stand , यातलं Stand कशाबद्दल आहे तेच कळेना ?
तसे बरेच दळून झाले आहे याबद्दल. ओएनएस एकमेकांच्या इच्छेने होत असल्याने त्यात गैरे ते काय ? पण अजून आपण बुरसटलेले विचार सोडायलाच तयार नाही,
समजा अशा गोष्टीसाठी एखादे हॉटेल निवडले तर हॉटेवर छापा पडायची भिती वाटते, वास्तविक त्या वेळी कोणताही गुन्हा घडत नसतो. हे सारे मनावर बिंबवल्यामुळे. ओएनस मध्ये कोणी कोणाला पैसे दिले किंवा नाही याचा फारसा संबंध येतो कुठे , एका चिरतरुण आनंदासाठी एकत्र आलेले जोडपे नाईटमध्ये काय पत्ते खेळणार आहे काय ?
धाग्याची मात्र लाँग टर्म
धाग्याची मात्र लाँग टर्म रिलेशनशिप झाली आहे.
अमा
अमा
अमा, स्वाती२, सुबोध, तुम्ही
अमा, स्वाती२, सुबोध, तुम्ही चांगले मुद्दे चिकाटीने मांडलेत या चर्चेत.
टण्याच्या खेड्यातल्या/गावातल्या संबंधीत पोस्टींशी सहमत. कधी कधी वाटते बापरे किती प्लॅनींग असते लोकांचे.
त्याला गाव/शहराने काही फरक पडत नाही.
चमन, तुम्ही मला उद्देशुन
चमन,
तुम्ही मला उद्देशुन लिहिलेत त्याबद्दल माझी प्रतिक्रिया देत आहे.
इथे बर्याच लोकांनी ओएनेस चे समर्थन नसेल पण ओके आहे आणि ही खाजगी बाब आहे असे लिहिले आहे.
मी सुद्धा हे ठीक आहे, खाजगी बाब आहे असे Rationalize करायचा प्रयत्न केला पण नाही जमले.
उदा.
जर हा संबंध दोन सिंगल व्यक्तीमधे आला तर मी म्हणेन एकवेळ ठीक आहे कारण यातुन जे काही परिणाम होणार आहेत त्याला ते स्वतः जबाबदार असतील त्यामुळे इतरांचे काही नुकसान होणार नाही.(हेही तितकेसे खरे नाही कारण समजा यातील एका व्यक्तीला काही रोग झाला आणि त्यांनी लग्नापुर्वी ते सांगितले नाही की गेलेच त्याच्याशी लग्न झालेल्यांचे आयुष्य खड्ड्यात,,)
जर हेच ज्या व्यक्तींमधे घडले आणि त्यातील किमान एक व्यक्ती "कमिटेड" रिलेशनशिप मधे आहे तर त्यात ती व्यक्ती दोन तर्हेने इतरांवर परिणाम करु शकते:
१. त्या व्यक्तीचा पार्टनर/कुटुंब मानसिकरित्या उध्वस्त होणे.
२. त्या व्यक्तीचा पार्टनर/कुटुंब शारिरिकरित्या उध्वस्त होणे.
मानसिकरित्या त्रास झाला तर त्यातुन कदाचित मनुष्य सावरु शकतो (हेही सोपे नाही.. इमॅजिन.. ज्याच्यावर आपण पुर्ण विश्वास टाकला त्या व्यक्तीने हे केले हे जाणुनही रोज त्याच्याशी नॉर्मलपणे वागणे..Must be a living hell)
पण
समजा या संबंधातुन त्या व्यक्तीला काही रोग झाला (STD, HIV, AIDS..) आणि तो त्याने आपल्या कुटुंबातील व्यक्तीला पास केला त्यातुन जर ही व्यक्ती नवविवाहीत असेल आणि त्याच्या पत्नीला आणि समजा ती गर्भवती असेल तर त्या मुलाला/मुलीला अशी काही व्याधी झाली तर त्याला कोणाला जबाबदार धरायचे? या परिस्थितीतही हा फक्त खाजगी विषय राहु शकतो का? जेव्हा आपल्यावर आपल्या कुटुंबाची जबाबदारी असते आणि आपण घेतलेले निर्णय आपल्या जवळच्या व्यक्तीवर परिणाम करु शकतात तेव्हा ही खाजगी बाब राहत नाही असे मला वाटते.
तुम्ही माझ्या फर्स्ट वर्ल्ड देशामधल्या राहणीबद्दल लिहिले आहे.. हाही एक प्रचंड मोठा गैरसमज आहे कि परदेशात याला मान्यता मिळाली आहे किंवा हे तिथे मोठया प्रमाणत होते. तिथेही कुटूंबवत्सल आणि नात्यांना जपणारे लोक आहेत्च. आणि असे प्रकार घडलेच तर It is more exception than a rule.
दुसरी गोष्ट म्हणजे तिथे STD इ. बद्दल बराच awareness आहे त्यामुळे यातुन होणार्या प्रॉब्लेम्सचे प्रमाण बर्यापैकी कमी असावे. हाच मापदंड भारताला लागु होइल का? (असेल तर क्षमस्व)
मला भारतीय संस्कृती यामुळे लयाला जाईल वगैरे अजिबात वाटत नाही पण यामुळे खाजगी आयुष्यातील आणि कुटुंबातील सौख्य समाधान अगदी क्षणिक सुखासाठी लयाला जाईल असे मात्र नक्की वाटते.
एखाद्या व्यक्तीबद्दल आकर्षण वाटणे त्यांच्याशी जवळीक साधण्याची इच्छा वाटणे यात चुकीचे काहीच नाही. आपण संत नाही त्यामुळे या आकर्षणांना बळी पडुही शकतो पण समजा अशी संधी कोणाच्या आयुष्यात आली तर प्रथम आपल्या spouse/मुले यांचे चेहरे डोळ्यासमोर आणावेत आणि हे योग्य आहे का.. याचे माझ्या नात्यांवर काय परिणाम होतील याचा जरुर विचार करावा. Is it worth losing my family? हा प्रश्न विचारल्यास त्याचे उत्तर मिळेलच, My personal Opinion - It is a NO NO..
१. त्या व्यक्तीचा
१. त्या व्यक्तीचा पार्टनर/कुटुंब मानसिकरित्या उध्वस्त होणे.
२. त्या व्यक्तीचा पार्टनर/कुटुंब शारिरिकरित्या उध्वस्त होणे.
मानसिकरित्या त्रास झाला तर त्यातुन कदाचित मनुष्य सावरु शकतो (हेही सोपे नाही.. इमॅजिन.. ज्याच्यावर आपण पुर्ण विश्वास टाकला त्या व्यक्तीने हे केले हे जाणुनही रोज त्याच्याशी नॉर्मलपणे वागणे..Must be a living hell)>>>> आवडलंच.
तटस्थ विचार म्हणून ओ एन एस हा प्रश्न ठीक आहे.पण गोष्टी घरापर्यंत आल्या की तटस्थ राहू शकत नाही.
ओ एन एस आणि असुरक्षित
ओ एन एस आणि असुरक्षित शरीरसंबंध आणि विवाहबाह्य सम्बन्ध ह्या तीन वेगळ्या गोष्टी आहेत. काही ओ एन एस मध्ये असुरक्षित शरीरसम्बन्ध आणि विवाहबाह्य सम्बन्ध ह्यांचा अंतर्भाव असू शकतो. तशा ओ एन एस ला आपण तटस्थ दृष्टीने बघू शकत नाही. बाकीच्या बद्दल?
मनस्मि, तुम्ही लिहिलेले
मनस्मि,
तुम्ही लिहिलेले तार्किकतेच्या कसोटीवर बर्यापैकी खरे आहे, पण पुन्हा तोच प्रश्न
what's it got to do with you and me?
ते जे रोगांबद्दल लिहिले आहे ते तर झाडून सगळ्याच शारिरिक संबंधांबद्दल खरे आहे, तुम्हाला ही चर्चा 'मोनोगामी, पॉलिगामी आणि दुष्परिणाम' ह्याकडे वळवायची आहे का?
बाफचा विषय एका रात्रीच्या स्टँड बद्दल, दोन सज्ञान लोकांच्या नात्याबद्दल आहे आणि ती त्यांची आत्यंतिक खाजगी बाब आहे. बाफच्या विषयामध्ये मलातरी हा पॉलिगामी किंवा 'कुटुंबस्वास्थ्याचा प्रश्न आहे' असे वाचल्याचे दिसले नाही, तुम्हाला असा भास झाला का?
समजा चार डिवोर्स घेऊन एखादी व्यक्ती आयुष्यभरात चार पार्टनर्सबरोबर ईनवॉल्व्ड होती आणि एखादी व्यक्ती लग्नाआधी काही काळासाठी लिव ईन किंवा वन नाईट स्टँडच्या माध्यमातून एका पार्टनर बरोबर ईनवॉल्व्ड होती आणि आता लग्नानंतर दुसर्या तर काय फरक आहे दोन्हींमध्ये? नैतिकता वगैरे सांगू नका.
पुन्हा तुम्हाला ह्या युगात नैतिकता आणि मोनोगामी वगैरेवर जनजागरण करायचे नाहीये असे गृहीत धरून, तुम्ही बळेच कुणाला एखाद्याला ह्याबद्दल सल्ला द्यायला जाल तर काय प्रतिसाद मिळेल हे तुम्हालाही माहित असेलच 'It's none of your business'
वरती स्वाती ह्यांनी म्हंटले आहे तसे तुमची जवळची 'कायद्याने सज्ञान' व्यक्ती अश्या नात्यामध्ये असली तरी तुमचा सहभाग फक्त एकदा शोल्डर टॅपईन करण्यापलिकडे असू शकत नाही.
हाही एक प्रचंड मोठा गैरसमज आहे कि परदेशात याला मान्यता मिळाली आहे किंवा हे तिथे मोठया प्रमाणत होते. >>
खूपच छान चर्चा. आताच एका दमात
खूपच छान चर्चा. आताच एका दमात वाचून काढली.
स्वाती २, इब्लिस यांच्या पोष्टी आवडल्या.
माझ्या दृष्टीने या चर्चेचं सार म्हणजे "परिणाम भोगायची तयारी ठेवा". अर्थात हे आपल्या प्रत्येक कृतीला लागू असते.
आता थोडसं अवांतर: हा सगळा बाफ थोडं वैचारिक, थोडं तात्विक, थोडं विनोदी अशा अंगांनी आपसूक प्रवाहित होत असताना बेफिकीर यांच्या बऱ्याच पोष्टी दाताखाली खडा यावा तशा रसभंग करणाऱ्या वाटल्या. मूळ मुद्द्याला अगदी चिकटून किंवा धाग्याच्या मालकाला हव्या तेव्हढ्याच कक्षेमध्ये चर्चा झाली पाहिजे याची अंमलबजावणी करायचा मक्ता अड्मिनने बेफिकीर यांना दिलाय का?
दाताखाली खडा यावा तशा रसभंग
दाताखाली खडा यावा तशा रसभंग करणाऱ्या वाटल्या >> अनुमोदन. हे पहिल्यांदाच झालेलं नाही. टोन देखील अतिशय कर्कश्श असतो विशिष्ट वेळी.
टग्या
टग्या
संपली का चर्चा?
संपली का चर्चा?
नाही, ऊस भरपूर बाकी आहे.
नाही, ऊस भरपूर बाकी आहे.
Pages