One Night Stand आणि आपण सगळे

Submitted by बावरा मन on 16 August, 2014 - 00:18

५ वर्षांपूर्वीची गोष्ट . नवीन नौकरी . Office चा एक इवेन्ट . पार्टी एका उच्चभ्रु हॉटेल मध्ये . मी आणि माझा मित्र -कम -सहकारी एकत्रच गेलो . पार्टी एकदम रंगात आली असतानाच हा एकदम दिसेनासाच झाला . मी त्याला फोन केला . तर त्याने तो उचललाच नाही . थोड्या वेळाने त्याचा मेसेज आला कि त्याला काही अर्जंट काम निघाल्यामुळे त्याला एकदम जावे लागले . उद्या ऑफिस मध्ये भेटूयात . असेल काही काम म्हणून मी हि फारस लक्ष दिल नाही . दुसर्यादिवशी हा गडी ऑफिस मध्ये एकदम खुशीत . मी त्याला विचारले , "काय रे मित्रा , कुठे गायबला होतास काल ?" तो म्हणाला ," कुणाला सांगणार नसशील तर सांगतो ." माझी उत्सुकता चाळवली . मित्र पुढे म्हणाला ," आपल्या HR मधली ती अबक मुलगी आहे ना तिच्यासोबत माझ्या flat वर गेलो होतो . माझा flatmate सध्या बाहेरगावी आहे आणि मी एकटाच आहे ." मला धक्का बसला .

मी ," आयला भारी रे ! कधीपासून चालू आहे ? लग्न वैगेरे कधी करताय मग ?"

तर तो ," वेडा झालायस का ? ते तितक्या पुरतच होत . काही serious नाही आहे ."

परभणी सारख्या ठिकाणाहून आलेल्या मला सगळ्यात पहिले सांस्कृतिक वैगेरे म्हणतात तसा धक्का बसला . आणि नंतर त्या धक्क्याची जागा हेव्याने घेतली . One Night Stand या गोष्टीशी आलेला हा माझा पहिला संबंध .

आताशी हा लिंगो बर्याच वेळा कानावर पडतो . आणि या प्रकारच्या गोष्टींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे हे स्पष्टच आहे . मला स्वतहाला या नातेसंबंधांच्या कदाचित सगळ्यात छोट्या फॉर्म बद्दल कुतूहल आहे . म्हणजे योनिशुचीतेबद्दल कुठलेही वांझोटे प्रोटेस्ट माझ्या मनात नाहीत पण अशा एखाद्या नात्यात (?) आलेल्या लोकांबद्दल कुतूहल नक्कीच आहे . म्हणजे असे पाहा की शारीरिक आकर्षण हाच एखाद्या नात्याचा (मग तो किती पण short span चा असेल) पाया असू शकतो का ? का मुळात तमाम आपली महान भारतीय संस्कृती वादी म्हणतात तस या नात्यांना काही शेंडा बुडखा नसतो ? या अशा गोष्टींमुळे आपल्या महान संस्कृती ला धक्के बसतात का? आणि सगळ्यात महत्वाच म्हणजे भारतीय समाजमनात sex किंवा इतर कुठल्याही अधिभौतिक गोष्टीचा मजा घेण्याबद्दल जो प्रचंड अपराधगंड आहे त्यामुळे one Night Stand सारख्या गोष्टींमुळे आपल्या तकलादू मुल्य व्यवस्थेला
धक्के बसतात का ?

माझ निरीक्षण अस आहे की अनेक ठिकाणासारखा इथे पण इंडिया आणि भारत असा divide झाला आहेच . एका बाजूला शहरांमध्ये हा phenomena वाढत असताना संस्कृती रक्षकाना अर्थातच हा भारतीय संस्कृती वरचा घाला वाटत आहे . समाजात यामुळे एक sexual anarchy येईल अशी भीती त्यांना वाटते. आपल्या मुली (नोट -मुलांची त्याना काळजी नाही ) बिघडतील असे पण त्याना वाटते .

बर हा stand कायम दोन अविवाहित लोकांमध्ये च होईल असे काही नाही . अशी काही अट नाही . म्हणजे एखादा विवाहित पुरुष किंवा स्त्री एखाद्या अविवाहित पुरुष किंवा स्त्री सोबत पण अनेकदा रात्र घालवू शकतात . सिनिकस असे पण म्हणू शकतात हा विवाह संस्थेच्या मुळावरच घाला आहे . Where is the sanctity of marriage ? या अवघड प्रश्नांची उत्तर फार गुंतागुंतीची आणि प्रत्येकापुरती वेगवेगळी आहेत . माझ्या अनुभवाच्या कक्षेत आलेल्या लोकांची जेवढी अशी प्रकरण मी पाहिली आहेत तेवढ्यावरून मी माझ्यापुरती काही उत्तर बनवली आहेत .

सर्वात महत्वाच म्हणजे या अशा नात्यात असलेल्या एकमेका कडून असणार्या शुन्य अपेक्षा . हि सर्वात सुंदर गोष्ट आहे . न कसले राग , न कसले लोभ , ना कसल्या आणि कुठल्या तरी insignificant तारखा लक्षात ठेवण्याचे ओझे . आपल्या दोघाना या क्षणी एकमेकांची गरज आहे . आपण ती पूर्ण करूया आणि लेट्स अपार्ट ऑन गुड नोट . साध आणि सरळ . काही लोकाना हे खूप कोरड वाटू शकत पण पहिलेच नमूद केल्याप्रमाणे to each his /her own .

आणि किती लोक अशी संधी समोर आल्यावर ती सोडतील ? मग ती विवाहित असो वा अविवाहित . याच उत्तर आपणच आपल्या मनाशी ताडून बघाव . नात्याचं पावित्र्य , आपली संस्कृती , कुणाला कळल तर, आणि लोक काय म्हणतील हे प्रश्नांचे ब्रम्ह राक्षस मानगुटीवरून उतरवून . मला वाटत बहुतेक लोकांच उत्तर नाही असेच असेल .

भानू काळे यांच्या बदलता भारत या पुस्तकात अतिशय सुंदर para आहे तो quote करण्याचा मोह आवरत नाहीये . : आपला देश अंतर्विरोधानी एवढा भरलेला आहे की कुठल्याही एका चौकटीत या देशाचे संपूर्ण वास्तव सामावले जाणे अशक्य वाटते .

इथल्या विविधातेबद्दल असे गमतीने म्हणतात की या देशाबाबत केलेलं कुठलेही विधान खरे असू शकते आणि त्या विधानाचा व्यत्यास हि तेवढाच खरा असू शकतो .

आम्ही अणु उर्जा वापरतो , तसेच शेण गोळे हि वापरतो .

इथे धारावी आहे तसेच मलबार हिल पण आहे .

पाण्याचा एकही नळ नसलेल्या शाळा आहेत तसेच स्विमिंग पूल असलेल्याही आहेत .

हा देश गरीब आहे , हा देश संपन्नही आहे .

भानू काळे यांचे हे विधान अजून पुढे न्यायचे ठरवल्यास या देशात आणि समाजव्यवस्थेत one night stand ला पण जागा आहे आणि विवाह संस्थेला पण असे म्हण्यास हरकत नसावी . भारतीय व्यवस्थेने पहिले विरोध करून नंतर विधवा विवाह , संगणक आणि जागतिकीकरण पचावलेच की .
कदाचित काही वर्षांनी हे मोठ्या शहरांमध्ये असणारे लोण छोट्या शहरांमध्ये आणि ग्रामीण भागात पण जाईल . त्याचा वेग कमी जास्त असू शकतो .

लेखाच्या सुरुवातीला ज्या मित्राचा उल्लेख आहे त्याची परवा फेस बुक वर मैत्री विनंती आली . मी लगेच त्याची friend लिस्ट चाळून बघितली . त्यात "ती ' पण होती . दोघांची पण लग्न झाली होती . वेगवेगळ्या लोकांसोबत .

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कोपु धाग्यावर फिरून आलात का ? >> आम्हाला नाहीत सवयी गावभर फिरायच्या म्हटलं Lol
रच्याकने, कोपु म्हणजे ?

आता कीबोर्ड हाती आलाच आहे म्हणून रात्रीची पोस्ट थोडीशी संपादीत करेन, नाहीतर...

आम्हाला नाहीत सवयी गावभर फिरायच्या म्हटलं
>>>> फिरत जा ओ, ज्ञानात भर पडेल, म्हणजे कळेल कुणाला कोण किती ओळखत Light 1 Wink

नको अस्लं ज्ञान. मेंदू फुटायची पाळी आली माबो वर Lol
जे म्हणणं असेल ते इथे मांडा.

भारतीय संस्कृती वरचा घाला वाटत आहे
कसली संस्कृती ? Lol Lol मला भारतीय संस्कृती १ नंबर ची ढोंगी , दांभिक वाटते .
अपराधी सगळे सारखे असतात . स्त्री असो किवा पुरुष . संस्कृती वगेरे सगळं बाजूला ठेवला तरी आपल्या जोडीदाराबद्दल एकनिष्ठ नं राहणं हा अपराधच आहे . chance मिळाला नाही म्हणून प्रत्यक्ष शरीर संबंध ठेवता आले नाही तरी परस्त्री किवा परपुरुशाकडे कामुक नजरेनं बघणं हा मनातल्या मनात केलेला व्यभिचारच असतो . आणि तो प्रत्येक जण करत असतो Proud Proud

माघार बिघार >>> आयडी हॅक झाला का ? आम्हाला कधी हौस होती वितंडवाद घालायची ? म्हणायला वेळ कुठे असतो ? जितका वेळ इथे तितका वेळ काम बोंबलतं. टेबल वर नेट कनेक्शन नाही आमच्या.

काम सुरू नेट बंद कॅटेगरी आमची Lol
ते जितम जितम
काम चालू नेट चालू वाल्यांना मुबारक

धागा २०० कडे झेप घेतोय.
कोणी नावे ठेवा वा टिका करा, सर्वांच्याच मनात या प्रकाराचे आकर्षण आहे एवढे मात्र खरे.
तसेच संधी मिळाल्यास कोणीही ती साधायला कसूर करणार नाही. (अपवाद असतातच हे वे सां न)
खुद्द लेखकाने मला मित्राचा हेवा वाटला म्हणून आपला प्रामाणिकपणा दाखवला आहे याबद्दल त्याचे अभिनंदन Happy

आतापर्यंत झालेल्या चर्चेचा सारांशः

१.वन नाईट स्टॅन्ड, वाईफ स्वॅपिंग यात नवे काही नाही. संस्कृती वगैरे काही बुडत नाही आणि विवाह संस्थाही मोडकळीला येत नाही त्यामुळे या गोष्टी ज्याना करायच्या आहेत त्यानी खुशाल कराव्यात, या गोष्टी शहरात, गावात, खेड्यात इ. सगळीकडे होतात त्यामुळे तुम्ही केल्यात तर त्यात काही विशेष नाही.
१अ. भारतीय संस्कृती १ नंबर ची ढोंगी , दांभिक आहे.

२.नेहमी बाहेर जाताना पाकिट, चाव्या, पर्स याबरोबरच काँडोम्स आणि गर्भनिरोधक गोळ्या बाळगाव्यात. (अहो वेळ काय सांगुन येते का?)

३.शक्यतो ओळखीच्या लोकांत किंवा कंपनीतल्या कलीग्जबरोबर करु नये. केल्यास त्याची जाहिरात करु नये आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे त्यांना फेसबुक ट्विटर, इ वर अ‍ॅड करु नये. कंपनीतल्या कलीग्जबरोबर करायचे झाल्यास प्रथम एच आर पॉलिसीचे पारायण करुन त्यातील पळवाटा शोधाव्यात.

४.आपल्या मुलांनाही याबाबत माहिती द्यावी आणि बुरसटलेल्या विचारांनी हे वाईट आहे किंवा हे करु नये असे सांगु नये. उलट हे करण्याच्या आधी गर्भनिरोधक साधनांचा वापर करण्यास प्रोत्साहन द्यावे.

एनीथिंग आय मिस्ड?

मनस्मि Rofl

आतापर्यंत झालेल्या चर्चेचा सारांशः दिल्याबद्दल धन्यवाद, पण इकडे प्रतिसाद फारच भारी आणि पुणेरी छाप आहेत

चालु द्या..खूप हसलिये आज मी Happy

अनेक घोडे आणि गाढवछाप पोस्टिंचं आश्चर्य वाटलं इथे. वनास्टॅ ची काही स्टँडर्ड व्याख्या आहे का? आणि असेल तरी ती कोण फॉलो करतं? या शब्दाचा अर्थ व्यक्तिसापेक्ष असू शकत नाही का? आपण का मापदंड लावतोय? किंवा तर्क वितर्क का लढवतोय? Uhoh

अनुभवी लोकांच्या पोस्टी वाचतोय अजुन. Wink
रच्याकने ONS सारखं अजुन काय काय आहे ज्याने संक्रुती बुडणार आहे? हे ही वाचुन बघा एकदा.. अजुन काय बघायला/ऐकायला/वाचायला मिळणार आहे देवा...

अनुभवी लोकांच्या पोस्टी वाचतोय अजुन >>>>>>>>>. चिखल्या.......... अनुभव न घेताच त्यावर निबंध लिहिणारे देखील या जगात आहेत Biggrin

संस्कृती वगेरे सगळं बाजूला ठेवला तरी आपल्या जोडीदाराबद्दल एकनिष्ठ नं राहणं हा अपराधच आहे>>अपराध आहे की नाही माहिती नाही पण अपेक्षित नक्की आहे..

बाकी धमाल येतेय....

One Night Stand - हा उच्चभ्रू समाजातला प्रकार खरा.......पण आता सर्वान्चाच हातात पैसा खेळू लागल्याने जगाची पर्वा करायची गोश्ट सम्पत आहे....म्हणजे एक प्रकारची बेफिकीरि आली आहे.... त्यामुळे लोक काय म्हणतील हा प्रश्नच नाही....... पण अशा गोष्टी करण्यापूर्वी जरा विचार करावा .......की उद्या पुढे आयुश्यात मागे वळून बघताना स्वतःला स्वत:ची लाज नाही ना वाट्णार..... जर स्वताच्या मनाला पट्त असेल तर दुसर्याला पट्वून द्यायची काहीच गरज नाही........ पण स्वतःलाच जर पट्त नसेल किवा चुकीचे वाट्त असेल तर समोर्च्याला पट्ल तरि स्वतःच्या मनात सद्सद्विवेक बुद्धीचा सल राहणाराच........(अर्थात तेवढे बर वाईट कळ्ण्यची सद्सद्विवेक बुद्धी हवी :D)

दुर्दैवी आहे ही चर्चा आणि अवमानकारक शेरेबाजी. वैयक्तिक ताशेरे नाहीयेत (तसे वाटल्यास क्षमस्व) पण मनस्मि तुमच्यासारख्या फर्स्ट वल्ड कंट्रीमध्ये बर्‍यापैकी वास्तव्य केलेल्याने असे करणे पटले नाही.

धागा काढणार्‍यांना विचारावेसे वाटते ईतरांच्या शारिरीक संबंधांसारख्या अतिशय खाजगी गोष्टींमध्ये 'आपण सगळे' कुठून आलो?

तुमचा मित्र किंवा त्याच्यासारखे ईतर लोक वन नाईट स्टँड, लग्नाआधी लिव ईन अथवा सेक्शुअली अ‍ॅक्टिव, बाय सेक्शुअल ओरिएंटेशन, मल्टिपल पार्टनर्स, पार्टनर पासून माहिती लपवणे अथवा न लपवणे, विवाहबाह्य संबंध वगैरे जे काही आहे तो ज्यांचात्यांचा प्रचंड खाजगी निर्णय आहे, सज्ञान नागरिक म्हणून त्यांनी तो घेतला आणि त्यांच्या परिणामांना ते जबाबदार आहेत, त्यांच्या प्रायवेट प्लेस मध्ये हे घडते अथवा घडतही नसेल, कायद्याने त्याला आडकाठी नाही, कुठला गुन्हाही घडला नाही, चार भिंतीआड काय झाले त्याचा बाहेर कुणाला काही त्रास नाही, ईन्वॉल्ड पार्टीजपैकी कोणाची काही तक्रार नाही, सगळा परस्पर सामंज्यास्याचा मामला आहे, तर प्रॉब्लेम नक्की कुणाला आहे, काय आहे आणि का आहे?

बावरा मन, शुद्धं मराठीमध्ये, ईट्स नन ऑफ अवर बिझनेस, लिव देम अलोन.

पहिल्या कल्चरल शॉक नंतर तुमचा अवेअरनेस वाढत जाऊन तुम्ही जास्त ओपन माईंडेड होत गेलात असे वाटत होते पण शेवटच्या वाक्यानंतर तुम्ही अजूनही तो शॉक पचवू शकलात नाही असे दिसले.
तुमच्या मित्राच्या वन नाईट स्टँडमुळे तुमच्या मैत्रीमध्ये काही फरक पडला का? तुम्हाला तुमच्या विचारांप्रमाणे जसे पटते तसे त्याने वागावे असा तुमचा तर्क आहे का?

< One Night Stand - हा उच्चभ्रू समाजातला प्रकार खरा.......पण आता सर्वान्चाच हातात पैसा खेळू लागल्याने> हो हो अगदी बरोबर. त्यासाठीच आपण मध्यमवर्गीय राहिलेलं बरं. संस्कृतिरक्षणाची जबाबदारी आपल्याच खांद्यांवरच तर आहेच.

चमन +१

स्वाती२,

१.
>> भारतातली विधवा किंवा परीतक्त्या स्त्री कष्ट करुन एकटी मुलांना वाढवते तेव्हा ते कुटुंब अपारंपारिकच म्हणायला
>> हवे. अशा कुटुंबातली मुलांचे पुढे पारंपारीक कुटुंब होते की.

विधवेला किंवा परित्यक्तेला बाकीच्यांचा आधार (सपोर्ट) असतो. त्यासाठी एकपालकी कुटुंब हा अपवाद असायला हवा. जर तो नियम झाला तर कोण कोणाला आधार (सपोर्ट) देणार? अशा वेळी मुलांकडे दुर्लक्ष होतं आणि ती गुन्हेगारीच्या विळख्यात अडकण्याचा धोका वाढतो.

२.
>> पुन्हा भेटणे अपेक्षित नाही म्हणूनच वन नाइट स्टॅन्ड.

मला म्हणायचंय की या नात्यात बांधिलकी नसल्याने स्त्रीपुरूष केवळ उपभोग्य देह ठरतात. मग एकरात्रसहवास आणि पैसे मोजून केलेलं वेश्यागमन यांत फरक तो काय राहिला!

एकरात्रसहवास आणि वेश्यागमन करावं का नाही हा ज्याचात्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण हा प्रकार बोकाळला की समाजावर विपरीत परिणाम होतोच.

आ.न.,
-गा.पै.

Pages