One Night Stand आणि आपण सगळे

Submitted by बावरा मन on 16 August, 2014 - 00:18

५ वर्षांपूर्वीची गोष्ट . नवीन नौकरी . Office चा एक इवेन्ट . पार्टी एका उच्चभ्रु हॉटेल मध्ये . मी आणि माझा मित्र -कम -सहकारी एकत्रच गेलो . पार्टी एकदम रंगात आली असतानाच हा एकदम दिसेनासाच झाला . मी त्याला फोन केला . तर त्याने तो उचललाच नाही . थोड्या वेळाने त्याचा मेसेज आला कि त्याला काही अर्जंट काम निघाल्यामुळे त्याला एकदम जावे लागले . उद्या ऑफिस मध्ये भेटूयात . असेल काही काम म्हणून मी हि फारस लक्ष दिल नाही . दुसर्यादिवशी हा गडी ऑफिस मध्ये एकदम खुशीत . मी त्याला विचारले , "काय रे मित्रा , कुठे गायबला होतास काल ?" तो म्हणाला ," कुणाला सांगणार नसशील तर सांगतो ." माझी उत्सुकता चाळवली . मित्र पुढे म्हणाला ," आपल्या HR मधली ती अबक मुलगी आहे ना तिच्यासोबत माझ्या flat वर गेलो होतो . माझा flatmate सध्या बाहेरगावी आहे आणि मी एकटाच आहे ." मला धक्का बसला .

मी ," आयला भारी रे ! कधीपासून चालू आहे ? लग्न वैगेरे कधी करताय मग ?"

तर तो ," वेडा झालायस का ? ते तितक्या पुरतच होत . काही serious नाही आहे ."

परभणी सारख्या ठिकाणाहून आलेल्या मला सगळ्यात पहिले सांस्कृतिक वैगेरे म्हणतात तसा धक्का बसला . आणि नंतर त्या धक्क्याची जागा हेव्याने घेतली . One Night Stand या गोष्टीशी आलेला हा माझा पहिला संबंध .

आताशी हा लिंगो बर्याच वेळा कानावर पडतो . आणि या प्रकारच्या गोष्टींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे हे स्पष्टच आहे . मला स्वतहाला या नातेसंबंधांच्या कदाचित सगळ्यात छोट्या फॉर्म बद्दल कुतूहल आहे . म्हणजे योनिशुचीतेबद्दल कुठलेही वांझोटे प्रोटेस्ट माझ्या मनात नाहीत पण अशा एखाद्या नात्यात (?) आलेल्या लोकांबद्दल कुतूहल नक्कीच आहे . म्हणजे असे पाहा की शारीरिक आकर्षण हाच एखाद्या नात्याचा (मग तो किती पण short span चा असेल) पाया असू शकतो का ? का मुळात तमाम आपली महान भारतीय संस्कृती वादी म्हणतात तस या नात्यांना काही शेंडा बुडखा नसतो ? या अशा गोष्टींमुळे आपल्या महान संस्कृती ला धक्के बसतात का? आणि सगळ्यात महत्वाच म्हणजे भारतीय समाजमनात sex किंवा इतर कुठल्याही अधिभौतिक गोष्टीचा मजा घेण्याबद्दल जो प्रचंड अपराधगंड आहे त्यामुळे one Night Stand सारख्या गोष्टींमुळे आपल्या तकलादू मुल्य व्यवस्थेला
धक्के बसतात का ?

माझ निरीक्षण अस आहे की अनेक ठिकाणासारखा इथे पण इंडिया आणि भारत असा divide झाला आहेच . एका बाजूला शहरांमध्ये हा phenomena वाढत असताना संस्कृती रक्षकाना अर्थातच हा भारतीय संस्कृती वरचा घाला वाटत आहे . समाजात यामुळे एक sexual anarchy येईल अशी भीती त्यांना वाटते. आपल्या मुली (नोट -मुलांची त्याना काळजी नाही ) बिघडतील असे पण त्याना वाटते .

बर हा stand कायम दोन अविवाहित लोकांमध्ये च होईल असे काही नाही . अशी काही अट नाही . म्हणजे एखादा विवाहित पुरुष किंवा स्त्री एखाद्या अविवाहित पुरुष किंवा स्त्री सोबत पण अनेकदा रात्र घालवू शकतात . सिनिकस असे पण म्हणू शकतात हा विवाह संस्थेच्या मुळावरच घाला आहे . Where is the sanctity of marriage ? या अवघड प्रश्नांची उत्तर फार गुंतागुंतीची आणि प्रत्येकापुरती वेगवेगळी आहेत . माझ्या अनुभवाच्या कक्षेत आलेल्या लोकांची जेवढी अशी प्रकरण मी पाहिली आहेत तेवढ्यावरून मी माझ्यापुरती काही उत्तर बनवली आहेत .

सर्वात महत्वाच म्हणजे या अशा नात्यात असलेल्या एकमेका कडून असणार्या शुन्य अपेक्षा . हि सर्वात सुंदर गोष्ट आहे . न कसले राग , न कसले लोभ , ना कसल्या आणि कुठल्या तरी insignificant तारखा लक्षात ठेवण्याचे ओझे . आपल्या दोघाना या क्षणी एकमेकांची गरज आहे . आपण ती पूर्ण करूया आणि लेट्स अपार्ट ऑन गुड नोट . साध आणि सरळ . काही लोकाना हे खूप कोरड वाटू शकत पण पहिलेच नमूद केल्याप्रमाणे to each his /her own .

आणि किती लोक अशी संधी समोर आल्यावर ती सोडतील ? मग ती विवाहित असो वा अविवाहित . याच उत्तर आपणच आपल्या मनाशी ताडून बघाव . नात्याचं पावित्र्य , आपली संस्कृती , कुणाला कळल तर, आणि लोक काय म्हणतील हे प्रश्नांचे ब्रम्ह राक्षस मानगुटीवरून उतरवून . मला वाटत बहुतेक लोकांच उत्तर नाही असेच असेल .

भानू काळे यांच्या बदलता भारत या पुस्तकात अतिशय सुंदर para आहे तो quote करण्याचा मोह आवरत नाहीये . : आपला देश अंतर्विरोधानी एवढा भरलेला आहे की कुठल्याही एका चौकटीत या देशाचे संपूर्ण वास्तव सामावले जाणे अशक्य वाटते .

इथल्या विविधातेबद्दल असे गमतीने म्हणतात की या देशाबाबत केलेलं कुठलेही विधान खरे असू शकते आणि त्या विधानाचा व्यत्यास हि तेवढाच खरा असू शकतो .

आम्ही अणु उर्जा वापरतो , तसेच शेण गोळे हि वापरतो .

इथे धारावी आहे तसेच मलबार हिल पण आहे .

पाण्याचा एकही नळ नसलेल्या शाळा आहेत तसेच स्विमिंग पूल असलेल्याही आहेत .

हा देश गरीब आहे , हा देश संपन्नही आहे .

भानू काळे यांचे हे विधान अजून पुढे न्यायचे ठरवल्यास या देशात आणि समाजव्यवस्थेत one night stand ला पण जागा आहे आणि विवाह संस्थेला पण असे म्हण्यास हरकत नसावी . भारतीय व्यवस्थेने पहिले विरोध करून नंतर विधवा विवाह , संगणक आणि जागतिकीकरण पचावलेच की .
कदाचित काही वर्षांनी हे मोठ्या शहरांमध्ये असणारे लोण छोट्या शहरांमध्ये आणि ग्रामीण भागात पण जाईल . त्याचा वेग कमी जास्त असू शकतो .

लेखाच्या सुरुवातीला ज्या मित्राचा उल्लेख आहे त्याची परवा फेस बुक वर मैत्री विनंती आली . मी लगेच त्याची friend लिस्ट चाळून बघितली . त्यात "ती ' पण होती . दोघांची पण लग्न झाली होती . वेगवेगळ्या लोकांसोबत .

Group content visibility: 
Public - accessible to all site users

'उसाच्या फडात, ओढ्याकाठी, वावरात' >> पाहीव, ऐकीव कि वाचीव माहीती ही ? सिनेमाने काही गोष्टी घट्ट करून ठेवल्यात मनात.

गावाकडे शक्यतो प्रत्येक जण एकमेकांना, कुटुंबाला ओळखत असतो. फक्त आपल्या गावातच नाही तर पंचक्रोशीतही ओळख असते. त्यामुळं असा एखादा प्रकार गुप्त राहणे अशक्य असते. कोण, कुठ,, कुठल्या दिशेला गेलं यावरूनही उडत्या पक्षाची पिस मोजणारे लोक गावात असतात. तसंच आमचं आम्ही पाहू, माईण्ड युवर ओन बिझिनेस हा अ‍ॅटीट्यूड अशा ठिकाणी ठेवून चालणार नाही.

शहरातही पेठा किंवा वाडे अशा ठिकाणी वर्षानुवर्षे, पिढ्यानपिढ्यां एकत्र राहणा-या कुटुंबामधे साधारण असंच वातावरण असतं. गावाच्या तुलनेत पुढारलेलं म्हणा हवं तर.

अशा वातावरणात असे प्रकार चोरून, लपूनछपून होत असतील ही शक्यता नाकारता येत नाही, पण प्रमाण काय असेल ? (नकळत्या वयातल्या एखाद दुस-या एबॉर्शनच्या केसचं उदाहरण नको).

टण्या आणि सध्या १२३४ यांचे प्रतिसाद वाचून ,एक सत्यघटनेवर आधारित पोलिसी चातुर्यकथा आठवली.
गावातली एक महिला व तिचा पती पोलिसांत तक्रार घेऊन आले की ती महिला पहाटेच्या कामासाठी शेतात गेलेली असताना गावातल्याच एका इसमाने तिच्यावर हात टाकला.
त्या महिलेची धिप्पाड (!) शरीरयष्टी पाहून तपास-अधिकार्‍याला संशय आला. त्याने त्या महिलेला व हात टाकणार्‍याला बाजूला घेऊन चौकशी केली तेव्हा कळले की सगळा राजीखुषीचा मामला होता. पण अचानक महिलेचा पती आल्याने तिला आरडाओरडा करावा लागला. अधिकार्‍याने इसमाला दम देऊन प्रकरण मिटवून टाकले.

यावरून घरोघरी(घरातच) शौचालये असणे संस्कृती, कुटुंबव्यवस्था इ.च्या रक्षणा-संवर्धनासाठी किती आवश्यक असतात हे लक्षात येईलच.

हे 'वन डॉन स्टँड' नावाच्या धाग्याखाली अधिक शोभेल बहुधा!

शौचालयाची संस्कृतीरक्षणासाठीची गरज ह्यावरून धिप्पाड महिलांनी केलेल्या तक्रारींकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहावे ही अमूर्त कल्पना प्रत्यक्षात आणली जावी ह्याचीही गरज पटवल्याबद्दल आभार!

(अवांतर - धागा कशावर आहे हा प्रश्न आता धागा कश्यावर नाही असा करत आहे मी)

ओके. पण यावरून सरसकटीकरण नाही करता येणार. विनोदी कथा, काही विनोद यामुळे काही गोष्टी या गावात घडतच असल्या पाहीजेत असा समज आहे. तसं काही नसतं. अपवाद असतात(च).

दॅट्स ऑल मायलॉर्ड !

(अवांतर : विषय समजलेला नसताना सहमतीचं राजकारण या विषयावर एक बाफ नंतर केव्हांतरी, आत्ता खूप रात्र झालीय) Proud

बाप्रे स्टँड कसला मोठा डेपो झालाय इकडे. Wink

टण्याशी सहमत. माझ्या मामेबहिणीबरोबर डी.एड.च्या कॉलेजला बरंच गावाकडचं पब्लिक होतं आणि त्यात हीच एक बावळी असं तिचंच मत तिने सांगितलं होतं ते आठवलं.

One night stand
पण हे असे दिवसा सुध्दा होऊ शकते ना Uhoh
उगाच कशाला बिचार्या "रात्री"ला बदनाम करत आहेत

जगामध्ये कुठेना कुठे रात्र असतेच! पोटोमॅकच्या काठावरच्या व्हाईट हाऊसपासून ते भीमेकाठच्या ऊसाच्या फडापर्यंत सगळीकडेच रंजले गांजले स्त्रीपुरूष 'जरा विसावू ह्या वळणावर' म्हणत घटका दोन घटका रंगमहाल बांधत त्यावर ईमले चढवत असतातच की राव, झाडून सगळेच अभिमन्यू आहेत ईथे.

राहू द्यावं, जगू द्यावं त्यांना हवं तसं, संस्कृतीचा शेंदूर चिकटत नाही म्हणून मिळेल त्या दगडाची कारणीमीमांसा करत बसू नये. असतात काहींचे विचार वेगळे कारणंही असतात वेगळी वहिवाट निवडण्याचे, पैशाच्या जगात असतील राव पण आनंदाच्या जगात सारेच रंक. घटकाभर आनंद शोधला म्हणून संस्कृती हनन आणि सामाजिक अस्वास्थ्य नाही पसरत. आपल्या आधीची पीढी तर ह्याचा साधा ऊल्लेखही करणार नाही पण तुम्ही आम्ही वापरत आहोत ना 'वन नाईट स्टॅंड' शद्बं कश्याचाही संकोच न बाळगता, मग मिळेलही ह्याला पुढे समाजमान्यता.
समाज, संस्कृती फार ईलॅस्टिक असते, परिणामांचे जबाबदारी घेतली, अनुभवातून शिकत गेले की सगळं सुरळीतंच होईल. एकाच नियमात सगळं बसलं पाहिजे, काळं पांढरं असलंच पाहिजे, जजमेंटल झालंच पाहिजे असं काही नाही.

गुर्जींचं स्टेटस डकवलं होतं इथं. पण हॉपिंग करताना कुणाचा पाय अडकून नाकावर पडू नये म्हणून काढून टाकलं. असो. Wink

हेमाशेपोना.

उगाच कशाला बिचार्या "रात्री"ला बदनाम करत आहेत
>>>>>>
या प्रकाराने रात्र बदनाम होतेय की उजागर होतेय हे अजून ठरायचेय आणि त्याचीच ही चर्चा चालूय Wink

एक डायलॉग,
रात तो बस नाम से बदनाम है,
क्यू की दिन के उजाले मे शैतान नकाब ओढ के घुमते है ..

"ऊसाच्या फडात ऊसाची पाती धारदार असतात ती कापत नाहीत?" - आता कोण ती कापत वगैरे बसणार? चटकन उरकायचा चोरीचा मामला तो Wink (आमचा आपला कंट्री विनोद हो जावयबापू Happy )

पण हे असे दिवसा सुध्दा होऊ शकते ना अ ओ, आता काय करायचं >>>

वन टाईम स्टँड करा नाव धाग्याचे म्हण्जे डे, नाईट, डॉन सगळेच येईल

१२३४ तुम्ही कुठल्या गावात राहायचा माहिती नाही, पण मला माहिती आहे ती महाराष्ट्रातल्या एका जिल्ह्यातल्या १०-१२ गावांतली तरी नक्की. आणि आमच्या गावरान कॉलेजात आजुबाजुच्या १०० गावातली टगी पोरं होती (पार चांदवड वगैरे तालुक्यातल्या डोंगरवाड्यांपासनं पूर्व भागातल्या कुर्डुवाडी/मंगळवेढ्याच्या आसपासच्या गावखेड्यातली) आणि त्यांचे अनुभव/किस्से हे 'दमदार' असत. सिनेमे पाहून खेड्याचे चित्र मनात उभे करायचे दुर्दैव मला लाभले नाही.

>>>
गावाकडे शक्यतो प्रत्येक जण एकमेकांना, कुटुंबाला ओळखत असतो. फक्त आपल्या गावातच नाही तर पंचक्रोशीतही ओळख असते. त्यामुळं असा एखादा प्रकार गुप्त राहणे अशक्य असते
>>>
म्हणुन तर गावभर बोंब होते ना. लपून काय राहील तर शप्पथ. मुद्दा होता ONSचा तर गावात ते होतच नाही असे नाही इतकेच. बाकी चालुदे इथला काथ्याकूट.

उसाची पाती कापत नाहीत काय>>>>म्हणुन तर, वन नाईट स्टँड आणि डेली मॉर्निंग सीट साठी धारविरहीत उसावर संशोधन झाले पाहीजे.फारच त्रास होतो गोरगरीबांना.

@ टण्या
गावगुंडी हा मामला वेगळा आहे. ते मान्य आहे. पण त्यात जबरदस्तीच असते बरेचदा. मुलीने घरी येउन सांगितलंत तरी तिलाच दटावणारे लोक असतात. याउलट प्रकार झाला तर खर्ड्यासारख्या दहशतीचे प्रकार पुढची अनेक वर्षे राहतात. अन्यत्र याच विषयावर चर्चा चाललेली असल्याने आणि प्रूव्ह करणे हा उद्देश नसल्याने स्टॉप. असो.

(वन नाईट स्टँडची कल्पना वेगळी आहे. एकमेकांशी आधीही आणि नंतरही ओळखदेख नसणे हे अपेक्षित आहे. ओळखीत वन नाईट स्टँड हे आपल्याकडे अवघडच नाही तर अशक्य आहे. कॅज्युअल डेटिंग किंवा अफेअर यासारखा प्रकार हा नाही. डिटेल्स्मधे जाण्याची गरज नाही, सगळे सूज्ञ आहेतच शिवाय गुगलदेव आहेत). Lol

चला, निघायचंय... आम्हाला कामं आहेत म्हटलं... ( तुमचं चालू द्या :फिदी:)

विषय काय आहे नक्की हे वाक्य मला इथे ताकाला जाऊन भांडं लपवणे अस का दिसतंय ? हे मलाच होतंय का ? Uhoh

भेटूयात. (हेमाशेपोना)

ऐसी अक्षरे या संकेत स्थळावर धाग्याच्या अनुषंगाने एक पोल सुरु झाला आहे . लोकांनी तिथे जाऊन मत नोंदवले तर आंतरजालावरील लोकांच्या मनाचा कल काय आहे याचा अंदाज येईल . धाग्याची लिंक देत आहे - http://www.aisiakshare.com/node/3170

असा पोल इथे सुरु करता येऊ शकतो का ?

गावाकडे शक्यतो प्रत्येक जण एकमेकांना, कुटुंबाला ओळखत असतो. फक्त आपल्या गावातच नाही तर पंचक्रोशीतही ओळख असते. >>>>>>> अहो अस नसत काही. पंचक्रोशीत राहू द्या सगळ्यांना सगळेचजण गावात ओळखत असतील असेही नाही.

उसाची पाती कापत नाहीत काय>>>> यावर खुप बोलण्यासारख आहे पण जाऊ दे Wink

शहरासारखेच गावाकडेसुद्धा असे प्रकार होतात हे सत्यच. त्यात कोण किती एकमेकाला ओळखतो याला काही अर्थ नाही. ज्याला करायच तो कसपण जमवुण आनतोच. मी पन अनेक वर्श गावाकडे राहिलेला आहे त्यामुळे मला माहित आहे.

शहरात सगळ कस मस्त असत. ना उसाची पाती कापत ना अचानक नवरा येत. इथे ब्युटीपार्लर असतात जी रेसीडेंशियल बिल्डींग मधे असतात. एक दरवाजा ए विंग मधे आणि दुसरा बि विंग मधे. मधे सहा ते आठ खोल्या.

क्रियेटीव्हिटी चा उच्च मामला फक्त याच विभागात असतो ज्यात अत्याधुनीक सुधारणा, समाजाचा ट्रेंड आणि लेटेस्ट टेक्नॉलॉजीचा बेमालुम वापर केला जातो.

चर्चेतून काय निष्पन्न करायचेय तेच कळेना झालेय.पण तरीही थोडक्यात काय

१) व.ना.स्टँ वाईट नाही
२) तो गावाकडेही होऊ शकतो
३) (मूडमध्ये) उसाची पाती कापत नाही
४) ते दिवसा सुद्धा होऊ शकते . Happy

शिर्षकात आपण सगळे का आहोत??>>>> हो अदिति तू बरोबर बोलतेस.तुला मी +१ दिलय.:फिदी::दिवा:

ओ बावरा मन खरच शीर्षकात आपण सगळे कसे येऊ? तुमच्या मित्राला ही सगळी चर्चा दाखवा बरे. तो राहीला बाजूला आणी आम्हालाच धरले मधल्या मध्ये.:फिदी::दिवा:

अहो आबासाहेब,
शक्यतो म्हटलंय कि... शिवाय तुम्ही कोल्हापूर, बारामती, जेजुरी की उंडवडी बु. यापैकी कशाला गाव म्हणता हे पण महत्वाचं आहे Lol
आमच्या गावात कुठलंही म्हातारं कुणालाही "कुणाचा/ची रं तू" असं विचारतं.. असो. आता शाब्दीक कीस पडेल. व्याख्या येतील. मग एकेका शब्दाच्या कसोटी वर एक्स्प्लेनेशन्स वगैरे नेहमीचं.

Pages