One Night Stand आणि आपण सगळे

Submitted by बावरा मन on 16 August, 2014 - 00:18

५ वर्षांपूर्वीची गोष्ट . नवीन नौकरी . Office चा एक इवेन्ट . पार्टी एका उच्चभ्रु हॉटेल मध्ये . मी आणि माझा मित्र -कम -सहकारी एकत्रच गेलो . पार्टी एकदम रंगात आली असतानाच हा एकदम दिसेनासाच झाला . मी त्याला फोन केला . तर त्याने तो उचललाच नाही . थोड्या वेळाने त्याचा मेसेज आला कि त्याला काही अर्जंट काम निघाल्यामुळे त्याला एकदम जावे लागले . उद्या ऑफिस मध्ये भेटूयात . असेल काही काम म्हणून मी हि फारस लक्ष दिल नाही . दुसर्यादिवशी हा गडी ऑफिस मध्ये एकदम खुशीत . मी त्याला विचारले , "काय रे मित्रा , कुठे गायबला होतास काल ?" तो म्हणाला ," कुणाला सांगणार नसशील तर सांगतो ." माझी उत्सुकता चाळवली . मित्र पुढे म्हणाला ," आपल्या HR मधली ती अबक मुलगी आहे ना तिच्यासोबत माझ्या flat वर गेलो होतो . माझा flatmate सध्या बाहेरगावी आहे आणि मी एकटाच आहे ." मला धक्का बसला .

मी ," आयला भारी रे ! कधीपासून चालू आहे ? लग्न वैगेरे कधी करताय मग ?"

तर तो ," वेडा झालायस का ? ते तितक्या पुरतच होत . काही serious नाही आहे ."

परभणी सारख्या ठिकाणाहून आलेल्या मला सगळ्यात पहिले सांस्कृतिक वैगेरे म्हणतात तसा धक्का बसला . आणि नंतर त्या धक्क्याची जागा हेव्याने घेतली . One Night Stand या गोष्टीशी आलेला हा माझा पहिला संबंध .

आताशी हा लिंगो बर्याच वेळा कानावर पडतो . आणि या प्रकारच्या गोष्टींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे हे स्पष्टच आहे . मला स्वतहाला या नातेसंबंधांच्या कदाचित सगळ्यात छोट्या फॉर्म बद्दल कुतूहल आहे . म्हणजे योनिशुचीतेबद्दल कुठलेही वांझोटे प्रोटेस्ट माझ्या मनात नाहीत पण अशा एखाद्या नात्यात (?) आलेल्या लोकांबद्दल कुतूहल नक्कीच आहे . म्हणजे असे पाहा की शारीरिक आकर्षण हाच एखाद्या नात्याचा (मग तो किती पण short span चा असेल) पाया असू शकतो का ? का मुळात तमाम आपली महान भारतीय संस्कृती वादी म्हणतात तस या नात्यांना काही शेंडा बुडखा नसतो ? या अशा गोष्टींमुळे आपल्या महान संस्कृती ला धक्के बसतात का? आणि सगळ्यात महत्वाच म्हणजे भारतीय समाजमनात sex किंवा इतर कुठल्याही अधिभौतिक गोष्टीचा मजा घेण्याबद्दल जो प्रचंड अपराधगंड आहे त्यामुळे one Night Stand सारख्या गोष्टींमुळे आपल्या तकलादू मुल्य व्यवस्थेला
धक्के बसतात का ?

माझ निरीक्षण अस आहे की अनेक ठिकाणासारखा इथे पण इंडिया आणि भारत असा divide झाला आहेच . एका बाजूला शहरांमध्ये हा phenomena वाढत असताना संस्कृती रक्षकाना अर्थातच हा भारतीय संस्कृती वरचा घाला वाटत आहे . समाजात यामुळे एक sexual anarchy येईल अशी भीती त्यांना वाटते. आपल्या मुली (नोट -मुलांची त्याना काळजी नाही ) बिघडतील असे पण त्याना वाटते .

बर हा stand कायम दोन अविवाहित लोकांमध्ये च होईल असे काही नाही . अशी काही अट नाही . म्हणजे एखादा विवाहित पुरुष किंवा स्त्री एखाद्या अविवाहित पुरुष किंवा स्त्री सोबत पण अनेकदा रात्र घालवू शकतात . सिनिकस असे पण म्हणू शकतात हा विवाह संस्थेच्या मुळावरच घाला आहे . Where is the sanctity of marriage ? या अवघड प्रश्नांची उत्तर फार गुंतागुंतीची आणि प्रत्येकापुरती वेगवेगळी आहेत . माझ्या अनुभवाच्या कक्षेत आलेल्या लोकांची जेवढी अशी प्रकरण मी पाहिली आहेत तेवढ्यावरून मी माझ्यापुरती काही उत्तर बनवली आहेत .

सर्वात महत्वाच म्हणजे या अशा नात्यात असलेल्या एकमेका कडून असणार्या शुन्य अपेक्षा . हि सर्वात सुंदर गोष्ट आहे . न कसले राग , न कसले लोभ , ना कसल्या आणि कुठल्या तरी insignificant तारखा लक्षात ठेवण्याचे ओझे . आपल्या दोघाना या क्षणी एकमेकांची गरज आहे . आपण ती पूर्ण करूया आणि लेट्स अपार्ट ऑन गुड नोट . साध आणि सरळ . काही लोकाना हे खूप कोरड वाटू शकत पण पहिलेच नमूद केल्याप्रमाणे to each his /her own .

आणि किती लोक अशी संधी समोर आल्यावर ती सोडतील ? मग ती विवाहित असो वा अविवाहित . याच उत्तर आपणच आपल्या मनाशी ताडून बघाव . नात्याचं पावित्र्य , आपली संस्कृती , कुणाला कळल तर, आणि लोक काय म्हणतील हे प्रश्नांचे ब्रम्ह राक्षस मानगुटीवरून उतरवून . मला वाटत बहुतेक लोकांच उत्तर नाही असेच असेल .

भानू काळे यांच्या बदलता भारत या पुस्तकात अतिशय सुंदर para आहे तो quote करण्याचा मोह आवरत नाहीये . : आपला देश अंतर्विरोधानी एवढा भरलेला आहे की कुठल्याही एका चौकटीत या देशाचे संपूर्ण वास्तव सामावले जाणे अशक्य वाटते .

इथल्या विविधातेबद्दल असे गमतीने म्हणतात की या देशाबाबत केलेलं कुठलेही विधान खरे असू शकते आणि त्या विधानाचा व्यत्यास हि तेवढाच खरा असू शकतो .

आम्ही अणु उर्जा वापरतो , तसेच शेण गोळे हि वापरतो .

इथे धारावी आहे तसेच मलबार हिल पण आहे .

पाण्याचा एकही नळ नसलेल्या शाळा आहेत तसेच स्विमिंग पूल असलेल्याही आहेत .

हा देश गरीब आहे , हा देश संपन्नही आहे .

भानू काळे यांचे हे विधान अजून पुढे न्यायचे ठरवल्यास या देशात आणि समाजव्यवस्थेत one night stand ला पण जागा आहे आणि विवाह संस्थेला पण असे म्हण्यास हरकत नसावी . भारतीय व्यवस्थेने पहिले विरोध करून नंतर विधवा विवाह , संगणक आणि जागतिकीकरण पचावलेच की .
कदाचित काही वर्षांनी हे मोठ्या शहरांमध्ये असणारे लोण छोट्या शहरांमध्ये आणि ग्रामीण भागात पण जाईल . त्याचा वेग कमी जास्त असू शकतो .

लेखाच्या सुरुवातीला ज्या मित्राचा उल्लेख आहे त्याची परवा फेस बुक वर मैत्री विनंती आली . मी लगेच त्याची friend लिस्ट चाळून बघितली . त्यात "ती ' पण होती . दोघांची पण लग्न झाली होती . वेगवेगळ्या लोकांसोबत .

Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्वाती२,

तुमचा इथला प्रतिसाद वाचला.

हा भाग कळीचा मुद्दा आहे :

>> यात कुटुंब नेहमीच मोडून पडते का? तर नाही. तडे जातात. ते सांधायचा प्रयत्नही होतो. बरेचदा समाजाच्या
>> मदतीने कुटुंब सावरते. काही वेळा कुटुंबाचे स्वरूप बदलते. पण कुटुंब रहाते आणि विवाह संस्थाही.

यांतला बरेचदा हा शब्द खूप काही सांगून जातो. समाजाच्या मदतीने कुटुंब केव्हा सावरू शकेल? जर समाजात अशी कुटुंबे भरपूर असतील तरच ना? आज अमेरिकेतील ७०% मुले अपारंपारिक कुटुंबातून वाढलेली आहेत. पारंपारिक कुटुंब म्हणजे आईबाबा, मुले आणि असलेच तर आजीआजोबा. तर अशी मुलं पुढे पारंपारिक कुटुंबाचे सदस्य होऊ शकतील का?

असो.

दुसरी गोष्ट म्हणजे हा बाफ लिव्ह इन किंवा अब्यूज वगैरे बाबींवर नाहीये. एकरात्रसहवास स्त्रीकडे भोगवस्तू म्हणून पाहायला शिकवतो.याबद्दल चर्चा अपेक्षित आहे.

आ.न.,
-गा.पै.

सुबोध.. शेरांबद्द्ल धन्यवाद.
ते आपल्या जागी आहेत, हे मात्र पटले नाहीत.
मुद्दा केवळ दारू पिण्याचा नाही, तर कुठलीही समाजाला मान्य नसणार्‍या गोष्टीचा आहे. ती करताना उत्तदायित्व स्वतःशीच ( त्याला अल्ला म्हणा नाहीतर आणखी काही ) असते.. असा मी त्याचा अर्थ घेतो.

आय. टी. बद्दलचा शेरा मलाही पटला नाही.

रश्मी ताई, आशुडी, दिनेश साहेब
आयटी मध्ये फारतर १ % लोक असे स्वैराचारी असतील. मी उदाहरण प्रातिनिधिक दिले आहे ते अशासाठी कि पुरुषांची मनोवृत्ती दांभिक आहे. मी कितीही लफडी केली तर चालतील लग्नासाठी बायको मात्र "शुद्ध" हवी.
आयटी हे प्रातिनिधिक आहे कारण या क्षेत्रात फार लवकर भरपूर पैसा मिळतो( मिळत होता.अर्थात आता तशी परिस्थिती राहिली नाही) .चार वर्षे मध्ये २ वर्षे हिरानंदानी रुग्णालय पवईत आणि २ वर्षे बी के सी मध्ये एशियन हार्ट रुग्णालयात काम करून हे क्षेत्र जवळून पाहिले आहे म्हणून त्याचा उल्लेख केला.
काहीही कच्चा माल किंवा साधन सामग्री( physical resource) न वापरता सर्वात जास्त परकीय चलन मिळवणारा उद्योग म्हणून आय टी क्षेत्रा बद्दल मला नक्कीच आदर आहे.
आपल्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर क्षमस्व

>>यांतला बरेचदा हा शब्द खूप काही सांगून जातो. समाजाच्या मदतीने कुटुंब केव्हा सावरू शकेल? जर समाजात अशी कुटुंबे भरपूर असतील तरच ना? आज अमेरिकेतील ७०% मुले अपारंपारिक कुटुंबातून वाढलेली आहेत. पारंपारिक कुटुंब म्हणजे आईबाबा, मुले आणि असलेच तर आजीआजोबा. तर अशी मुलं पुढे पारंपारिक कुटुंबाचे सदस्य होऊ शकतील का?>>

का नाही? माझ्या बघण्यात अशा अनेक व्यक्ती आहेत, ज्यांची कुटुंब अपारंपारिक होती. आज त्यांचे स्वत:चे कुटुंब पारंपारीक आहे. यात मी वाढत असताना माझ्या आयुष्यात बाप नव्हता मात्र माझ्या मुलांच्या बाबतीत असे घडू देणार नाही असा निर्धार केलेले पुरुषही खूप आहेत. तसेच मला माझा बायलॉजिकल बाप आठवत नाही/त्याच्याशी काही कॉन्टॅक्ट नाही. माझा स्टेप डॅड हाच माझा खरा डॅड. आज मी जो /जी काही आहे ते त्याच्यामुळे असे सांगणारी बरीच मंडळी बघितली. त्याच जोडीला आईशी संबंध नाही, स्टेप मॉमनेच वाढवले सांगणारी मंडळीही आहेत. मध्यम मार्ग स्विकारलेल्या ब्लेंडेड फॅमिलीजही आहेत. यात मुलं सख्खे आईबाबा आणि सावत्र आईबाबा आणि जोडीला दोन्हीकडचा गोतावळा यांच्या छत्राखाली वाढतात.

अपारंपारीक कुटुंबातील व्यक्तींच्या तोंडची ही काही वाक्ये -

' या विकएंड ला माझी मुलं माझी एक्स स्टेप मॉम संभाळणार आहे. '
'माझ्या एक्स हसबंडचे वडील आजारी आहेत म्हणून मला मदत करायला जायचय''
'माझ्या बॉयफ्रेंडच्या आजीकडे माझा बेबीशॉवर ठेवलाय'
'माझ्या नातवाचा आज पहिला गेम आहे. नातू म्हणजे खरे तर तो माझ्या सावत्र मुलाचा मुलगा.'

कुटुंब अपारंपारिक आहे पण त्यात जिव्हाळा, प्रेम आहेच ना? मुलगा ग्रूहपाठ घरी विसरला म्हणून वर्कशीट घेऊन धावतपळत शाळेत येणारी सावत्र आई माझ्या रोजच्या बघण्यात आहे. त्याच जोडीला अगदी पारंपारिक कुटुंबात वाढून आज अपारंपारीक कुटुंब किंवा जीवनशैली असलेल्या व्यक्ती देखील बघायला मिळतात.
पारंपारीक कुटुंबच तेवढे चांगल्या जीवनमुल्याची जोपासना करते आणि अपारंपारीक कुटुंब करत नाही असे थोडेच आहे.

>>
एकरात्रसहवास स्त्रीकडे भोगवस्तू म्हणून पाहायला शिकवतो.याबद्दल चर्चा अपेक्षित आहे.
>>
मला वाटते, स्त्री कडे भोगवस्तू म्हणून पाहयची वृत्ती असेल तर एकरात्रसहवास असो किंवा लग्न संबंध बाईकडे भोगवस्तू म्हणूनच पाहिले जाईल. तशी वृत्ती नसेल तर एकरात्र सहवासाकडे परस्पर संमतीने आनंदाची देवणघेवाण असे पाहिले जाईल.

बाकी फक्त पुरुषच स्त्रीकडे भोगवस्तू म्हणून बघतो हे गृहितक मजेशीर वाटले. ते आधीचे शेवटची प्रेमिका गृहितक आहे तसेच हेही.

स्वाती२ : अजिबात कसला आव किंवा अकारण अ‍ॅग्रेसिव टोन न आणता पेशन्स ने मुद्दे लिहीत राहण्याबद्दल तुमचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे.

>>>एकरात्रसहवास स्त्रीकडे भोगवस्तू म्हणून पाहायला शिकवतो.याबद्दल चर्चा अपेक्षित आहे.<<<

हे विधान पटले नाही गामा! क्षमस्व!

समाजातील प्रत्येक संस्था स्त्रीबाबत कमीअधिक प्रमाणात हा दृष्टिकोन बाळगतेच, अगदी विवाहसंस्थासुद्धा!

हा बाफ कोणत्या बाजूने मांडला आहे हे समजणे खरोखरच क्लिष्ट होऊन बसलेले आहे माझ्यासाठी तरी!

तेच तेच लिहीत आहे असे कृपया समजू नयेत, पणः

१. ह्या बाफमधील लेखाने इतक्या विविध विषयांना हात घातला आहे की बास रे बास

आणि

२. अनेक प्रश्नांची उत्तरे 'ज्याच्यात्याच्या मतानुसार' अश्या स्वरुपात देऊनही टाकलेली आहेत

स्वाती२ : अजिबात कसला आव किंवा अकारण अ‍ॅग्रेसिव टोन न आणता पेशन्स ने मुद्दे लिहीत राहण्याबद्दल तुमचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे.<<<

मनापासून अनुमोदन

ते सातीअक्कांनी उग्गं प्रतिसाद लिहून अशी चर्चा करा सांगितलं.
बघा काय झालं?
बेफिंच्या हाती कीबोर्ड, अशी परिस्थिती आली की नै?
Light 1

ते सातीअक्कांनी उग्गं प्रतिसाद लिहून अशी चर्चा करा सांगितलं.
बघा काय झालं?
बेफिंच्या हाती कीबोर्ड, अशी परिस्थिती आली की नै?
Light 1

बाकी फक्त पुरुषच स्त्रीकडे भोगवस्तू म्हणून बघतो हे गृहितक मजेशीर वाटले. >> Happy . स्वाती२ फार फार पेशन्स बाई तुझ्यात.
तीन आठवडे 'सजा'/टेन्शन पण ह्यातलेच. आफ्टर मॉर्निंग पिल हे अक्षरे स्त्रियांना वाचता येत नाहीत का काय असले प्रश्न मला हा धागा वाचून पडायला लागले आहेत? गेले जवळपास १०-१५ वर्षे अशा पिल्स बाजारात आहेत.

आशुडी चांगल लिहतेस.

इब्लिस Proud

इब्लिस येथे चर्चा छान चालू आहे, आस्वाद घेऊयात चला Happy

सहभागही देऊयात जमेल तसा, पण चर्चा ओंगळवाणी होईल असे नको काही बोलायला.

Happy

अवांतर: कृन्मेश (नाव व्यवस्थित टाइप होत नाही, सॉरी) मत नको पण शेर आवर. Happy आवडला शेर!! Happy Happy

इंपल्स म्हणजे फक्त प्रजोत्पादनच का? एखाद्या स्त्री, पुरुषाला मिठी मारण्याने लगेच मूल होत नाही. पण ही गोष्टही संस्कृती, विवाह यांच्या कचाट्यात आहे. तिथेही इंपल्स झेलण्याची ताकदच लागते. वैद्यकशास्त्र कशाला?>>>>>> आशुडी, तू इथे इंपल्स म्हणजे एखाद्या स्त्री किंवा पुरुषाला वन नाईट स्टँड (किंवा साधी मिठी) करावासा वाटणे हा इंपल्स म्हणत आहेस की ह्या गोष्टी संस्कृती, विवाह ह्या गोष्टींच्या कचाट्यात आहेत हे माहित असून सुद्धा त्याची बंधनं झुगारुन पुढे जे होईल ते बघून घेऊ ह्या विचाराला इंपल्सचे (परिणाम) झेलणे किंवा पेलवायची ताकद ठेवणे ह्याबद्दल म्हणत आहेस? परिणामांबद्द्ल म्हणत असशील तर तो इंपल्स ला शरण जाऊन पुढे होणारा इंपॅक्ट म्हणता येईल.

इथे दोन गोष्टी आहेत, १) वन नाईट स्टँड करावासा वाटला तर तसं करण्याचे स्वातंत्र्य असणे किंवा स्वातंत्र्य घेणे (संस्कृती, विवाह, नैतिकता वगैरेंबद्दलची बंधने झुगारुन) २) वन नाईट स्टँडची गरज भासणे.

वर स्वाती२ आणि अजून एक दोघांनी लिहिलय तसं स्वातंत्र्याच्या व्याख्या ह्या काळाप्रमाणे बदलत आहेत त्यामुळे एखादी गोष्टी करायची की नाही ह्याचे स्वातंत्र्य असावे की की नाही हे काळ आणि त्यावेळेस असलेली समाजाची वैचारिक प्रगल्भता ठरवते. तो मुद्दा इथे गौण आहे.
राहिला प्रश्न ह्या इंपल्सला "बळी" पडणे किंवा पडलो तरी येवढी काही बिग डिल नाही ह्या विचाराचा तर तिथे मला खरेंची इंपल्सला बळी पडल्यावर पुढे होऊ घातलेल्या दुष्परिणामांबाबतची पोस्ट पटते आणि ती पटली तरी हे ही मी जाणतो की फक्त दुष्परिणाम लक्षात घेऊन सहसा कोणी ह्या मोहाला बळी पडणार नाही असं होणार नाही. ह्याचं कारण परत, एखाद्या व्य्क्तीला ही गरज का भासावी ह्या पाशी येऊन थांबतं.
तर गरज का भासावी, ह्याचं कारण माझ्यामते एखाद्या व्यक्तीची सुखाची कल्पना काय आहे ह्याच्या निगडीत आहे.
इथे परत चूक काय किंवा बरोबर काय हा प्रश्न नाही.
पुरुष स्त्री संबंधांमध्ये लैंगिक आकर्षण, सुख ह्याच्या पुढे जाऊन भावनिक गुंतवणूक (इमोशनल इन्वॉल्वमेंट ह्या अर्थानी) आणि त्यातून मिळणारा आनंद ह्याचा अनुभव तर जाऊ द्या पण कल्पना सुद्धा नसेल तर तशी गरज भासणे अशक्य आहे.
इथे खरं तर प्रजोत्पादन हे मानवजातीच्या एवोल्युशनच्या सेंटरला असल्यामुळे आताच्या सामाजिक दॄष्टिनी खुप पुढारलेल्या मानवाची खरं खुपच अडचण होऊन बसली आहे. समाज इवॉल्व झाला खरा पण माणसाच्या गरजा त्याच स्पीडनी इवॉल्व नाही झाल्या. लैंगिक सुखाच्या ओढ इतकी जबरदस्त आहे की ते मिळाल्यावर तिथेच अडकून न पडता त्याच्या पुढेही काही आहे हे शोधायच्या भानगडित कोण पडेल?

>>>लैंगिक सुखाच्या ओढ इतकी जबरदस्त आहे की ते मिळाल्यावर तिथेच अडकून न पडता त्याच्या पुढेही काही आहे हे शोधायच्या भानगडित कोण पडेल?<<<

स्वतंत्ररीत्या अत्यंत सुंदर विधान!

>>>२) वन नाईट स्टँडची गरज भासणे.<<<

हा मुद्दा मूळ लेखात आहे असे समहाऊ वाटले नाही, वाचायला चुकले असल्यास कृपया सांगावे.

स्वतंत्ररीत्या अत्यंत सुंदर विधान!

असे म्हणण्याची दोन कारणे जाणवली:

१. ह्यातून कुठेतरी विवाहसंस्था ही एखाद्या प्रकारच्या समाजासाठी अत्यावश्यक असल्याचे ध्वनीत होते

२. 'त्याच्या पुढेही काही आहे' हे 'शोधायची' गरज (बहुधा) कोणत्याच विकसित समाजातील कोणालाच नसते, ते आशूडी म्हणतात त्याप्रमाणे झेलण्याची क्षमता असणे / नसणे ह्याच्याशी निगडीत आहे.

आशुडी, तू इथे इंपल्स म्हणजे एखाद्या स्त्री किंवा पुरुषाला वन नाईट स्टँड (किंवा साधी मिठी) करावासा वाटणे हा इंपल्स म्हणत आहेस की ... इंपॅक्ट म्हणता येईल. >> वैद्यबुवा, कोणतीही गोष्ट करावीशी वाटणे हा इंपल्स. आणि ती केल्यावर त्याचे परिणाम काय होतील हे माहीत असले तरी ते आपल्याला झेपतील का? या प्रश्नाचे उत्तर म्हणजे "इंपल्स झेलण्याची आपली ताकद." हेच लिहीलंय मी. मग यात या धाग्याला अनुसरुन 'वन नाईट स्टँड' पासून अगदी दोन दोन कुटुंबे सांभाळण्यापर्यंत सगळं येतं. तुम्ही तुमच्या फक्त इंपल्सपुढे मान तुकवता का की "मी इंपल्सवर जगतो" हे ताठ मानेने सांगताही यात खरी मेख आहे.

>>>यात खरी मेख आहे<<<

ही मेख मानव व पशू ह्यांच्यात 'काही प्रमाणात' तफावत घडवून आणते, असेही वाटते.

हे अवांतर नसून डॉ. खरे ह्यांनी लिहिलेल्या एका मुद्याबाबत आहे.

आशुडी आलं लक्षात नेमकं इंपल्स म्हणजे काय म्हणायचय तुला ते.
फक्त मग जेव्हा तू इंपल्स महत्वाचा असं म्हणते तेव्हा तुझं नेमकं मत काय आहे ते लक्षात येत नाही. Happy

स्वाती२, I envy your clarity of thoughts! Kudos to you! आपण फार पटकन लेबल्स लावतो आणि सरसकटीकरण करतो! सत्य हे कधीच काळं पांढरं नसतं it lies somewhere between thousand shades of grey!

वन नाईट स्टँड हा बलात्कार किंवा त्या स्वरुपाचा संबंध नसतो ही क्लॅरिटी (का कोणास ठाऊक) आवश्यक वाटत आहे.

काही दशकांपूर्वीच्या अनेक प्रकारच्या सांस्कृतीक (व त्यामुळे मानसिक) जाचांमधून आजच्या स्त्रिया मुक्त झालेल्या आहेत हे सर्वज्ञात आहे.

स्पाऊसला स्पष्टपणे स्वतःच्या विचारांबद्दल सांगून किंवा न सांगताही झालेले सगळे लपवून असा प्रकार करणे हे आजच्या युगात सहज शक्य आहे.

कमिटमेंट दोघांपैकी कोणालाच नको आहे हे आजच्या युगात सहज शक्य आहे.

वैविध्य, नावीन्य ह्याचे सर्व प्रजातींना आकर्षण असते.

आर्थिक अपेक्षा नसतानाही वन नाईट स्टँड होऊ शकतो हे आता लोकांना ज्ञात आहे.

सर्व प्रिकॉशनरी मेझर्स घेण्याचे ज्ञान तळागाळापर्यंत पोचलेले आहे ह्यावर विश्वास ठेवायला हरकत नाही. (स्वाती२ म्हणाल्याप्रमाणे नशेत काही झाले तर बाब वेगळी)

असे सर्व असताना ह्या गोष्टी घडणे ही मानवाने संस्कृतीमधून काढलेली पळवाट नसून एक नवीन वाट आहे.

तात्कालीन शारीरिक सुखाची व काही प्रमाणात सार्वकालीन नावीन्याची गरज हा अश्या 'स्टँड'चा पाया आहे.

भावनिक गुंतागुंत आवश्यक असलेल्यांना 'इतरांच्या बाबतीत हे होऊ शकते हे मान्य असणे व त्यांच्या बाबतीत हे कदापी शक्य नाही हे माहीत असणे' हे नैसर्गीक आहे. ह्याला संस्कृतीचा पगडा म्हणण्याऐवजी 'वन राईट स्टँड' असे (गंमतीने) म्हणता येईल.

प्रेम, सद्भावना आणि लैंगिक सुख ह्यांचा अभूतपूर्व घोळ काही संस्कृतींनी घातलेला असला तरीही तेथे तो घोळ घातला नसता तर तेथे अनाचार माजला असता हे जाणून घेणे महत्वाचे आहे असे वाटते.

चूक भूल द्यावी घ्यावी

-'बेफिकीर'!

वैद्यबुवा,

>> लैंगिक सुखाच्या ओढ इतकी जबरदस्त आहे की ते मिळाल्यावर तिथेच अडकून न पडता त्याच्या पुढेही
>> काही आहे हे शोधायच्या भानगडित कोण पडेल?

अगदी अगदी. हे एक चिरंतन सत्य आहे.

खरा पुरूष केवळ नर नसतो. त्याहून अधिक काहीतरी असतो ना?

आ.न.,
-गा.पै.

गापै,
One Night Stand = एकरात्रसहवास , ये जम्या नही. एक रात्र थांबा असं होईल बघा शब्दशः. !

बेफिकीर,

१.
>> >>>एकरात्रसहवास स्त्रीकडे भोगवस्तू म्हणून पाहायला शिकवतो.याबद्दल चर्चा अपेक्षित आहे.<<<
>> हे विधान पटले नाही गामा! क्षमस्व!

तेच विधान थोडं बदलून सांगतो. एकरात्रसहवास स्त्रीकडे केवळ भोगवस्तू सोडून म्हणून पाहायला शिकवतो. हेच विधान पुरुषाच्या बाबतीतही लागू आहे. मग ह्यात आणि (स्त्री वा पुरूष) वेश्यागमनात गुणात्मक फरक तो काय?

२.
>> तीही एका स्त्रीपेक्षा खूप काही अधिक असते ना?

हो नक्कीच. एका रात्रीच्या सहवासात नेमका हाच मुद्दा दुर्लक्षिला जातोय.

आ.न.,
-गा.पै.

लॉजिकः

मी रोज तीच कार चालवतो.
तिची खूप काळजी घेतो.
सबब, कार ही भोगवस्तू नाही.

याउलट, कधीतरी टॅक्सीत बसून जातो. अन नंतर तिला विसरून जातो.
सबब, ट्याक्सी ही भोगवस्तू आहे.

एल. ओ. एल.

Pages