५ वर्षांपूर्वीची गोष्ट . नवीन नौकरी . Office चा एक इवेन्ट . पार्टी एका उच्चभ्रु हॉटेल मध्ये . मी आणि माझा मित्र -कम -सहकारी एकत्रच गेलो . पार्टी एकदम रंगात आली असतानाच हा एकदम दिसेनासाच झाला . मी त्याला फोन केला . तर त्याने तो उचललाच नाही . थोड्या वेळाने त्याचा मेसेज आला कि त्याला काही अर्जंट काम निघाल्यामुळे त्याला एकदम जावे लागले . उद्या ऑफिस मध्ये भेटूयात . असेल काही काम म्हणून मी हि फारस लक्ष दिल नाही . दुसर्यादिवशी हा गडी ऑफिस मध्ये एकदम खुशीत . मी त्याला विचारले , "काय रे मित्रा , कुठे गायबला होतास काल ?" तो म्हणाला ," कुणाला सांगणार नसशील तर सांगतो ." माझी उत्सुकता चाळवली . मित्र पुढे म्हणाला ," आपल्या HR मधली ती अबक मुलगी आहे ना तिच्यासोबत माझ्या flat वर गेलो होतो . माझा flatmate सध्या बाहेरगावी आहे आणि मी एकटाच आहे ." मला धक्का बसला .
मी ," आयला भारी रे ! कधीपासून चालू आहे ? लग्न वैगेरे कधी करताय मग ?"
तर तो ," वेडा झालायस का ? ते तितक्या पुरतच होत . काही serious नाही आहे ."
परभणी सारख्या ठिकाणाहून आलेल्या मला सगळ्यात पहिले सांस्कृतिक वैगेरे म्हणतात तसा धक्का बसला . आणि नंतर त्या धक्क्याची जागा हेव्याने घेतली . One Night Stand या गोष्टीशी आलेला हा माझा पहिला संबंध .
आताशी हा लिंगो बर्याच वेळा कानावर पडतो . आणि या प्रकारच्या गोष्टींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे हे स्पष्टच आहे . मला स्वतहाला या नातेसंबंधांच्या कदाचित सगळ्यात छोट्या फॉर्म बद्दल कुतूहल आहे . म्हणजे योनिशुचीतेबद्दल कुठलेही वांझोटे प्रोटेस्ट माझ्या मनात नाहीत पण अशा एखाद्या नात्यात (?) आलेल्या लोकांबद्दल कुतूहल नक्कीच आहे . म्हणजे असे पाहा की शारीरिक आकर्षण हाच एखाद्या नात्याचा (मग तो किती पण short span चा असेल) पाया असू शकतो का ? का मुळात तमाम आपली महान भारतीय संस्कृती वादी म्हणतात तस या नात्यांना काही शेंडा बुडखा नसतो ? या अशा गोष्टींमुळे आपल्या महान संस्कृती ला धक्के बसतात का? आणि सगळ्यात महत्वाच म्हणजे भारतीय समाजमनात sex किंवा इतर कुठल्याही अधिभौतिक गोष्टीचा मजा घेण्याबद्दल जो प्रचंड अपराधगंड आहे त्यामुळे one Night Stand सारख्या गोष्टींमुळे आपल्या तकलादू मुल्य व्यवस्थेला
धक्के बसतात का ?
माझ निरीक्षण अस आहे की अनेक ठिकाणासारखा इथे पण इंडिया आणि भारत असा divide झाला आहेच . एका बाजूला शहरांमध्ये हा phenomena वाढत असताना संस्कृती रक्षकाना अर्थातच हा भारतीय संस्कृती वरचा घाला वाटत आहे . समाजात यामुळे एक sexual anarchy येईल अशी भीती त्यांना वाटते. आपल्या मुली (नोट -मुलांची त्याना काळजी नाही ) बिघडतील असे पण त्याना वाटते .
बर हा stand कायम दोन अविवाहित लोकांमध्ये च होईल असे काही नाही . अशी काही अट नाही . म्हणजे एखादा विवाहित पुरुष किंवा स्त्री एखाद्या अविवाहित पुरुष किंवा स्त्री सोबत पण अनेकदा रात्र घालवू शकतात . सिनिकस असे पण म्हणू शकतात हा विवाह संस्थेच्या मुळावरच घाला आहे . Where is the sanctity of marriage ? या अवघड प्रश्नांची उत्तर फार गुंतागुंतीची आणि प्रत्येकापुरती वेगवेगळी आहेत . माझ्या अनुभवाच्या कक्षेत आलेल्या लोकांची जेवढी अशी प्रकरण मी पाहिली आहेत तेवढ्यावरून मी माझ्यापुरती काही उत्तर बनवली आहेत .
सर्वात महत्वाच म्हणजे या अशा नात्यात असलेल्या एकमेका कडून असणार्या शुन्य अपेक्षा . हि सर्वात सुंदर गोष्ट आहे . न कसले राग , न कसले लोभ , ना कसल्या आणि कुठल्या तरी insignificant तारखा लक्षात ठेवण्याचे ओझे . आपल्या दोघाना या क्षणी एकमेकांची गरज आहे . आपण ती पूर्ण करूया आणि लेट्स अपार्ट ऑन गुड नोट . साध आणि सरळ . काही लोकाना हे खूप कोरड वाटू शकत पण पहिलेच नमूद केल्याप्रमाणे to each his /her own .
आणि किती लोक अशी संधी समोर आल्यावर ती सोडतील ? मग ती विवाहित असो वा अविवाहित . याच उत्तर आपणच आपल्या मनाशी ताडून बघाव . नात्याचं पावित्र्य , आपली संस्कृती , कुणाला कळल तर, आणि लोक काय म्हणतील हे प्रश्नांचे ब्रम्ह राक्षस मानगुटीवरून उतरवून . मला वाटत बहुतेक लोकांच उत्तर नाही असेच असेल .
भानू काळे यांच्या बदलता भारत या पुस्तकात अतिशय सुंदर para आहे तो quote करण्याचा मोह आवरत नाहीये . : आपला देश अंतर्विरोधानी एवढा भरलेला आहे की कुठल्याही एका चौकटीत या देशाचे संपूर्ण वास्तव सामावले जाणे अशक्य वाटते .
इथल्या विविधातेबद्दल असे गमतीने म्हणतात की या देशाबाबत केलेलं कुठलेही विधान खरे असू शकते आणि त्या विधानाचा व्यत्यास हि तेवढाच खरा असू शकतो .
आम्ही अणु उर्जा वापरतो , तसेच शेण गोळे हि वापरतो .
इथे धारावी आहे तसेच मलबार हिल पण आहे .
पाण्याचा एकही नळ नसलेल्या शाळा आहेत तसेच स्विमिंग पूल असलेल्याही आहेत .
हा देश गरीब आहे , हा देश संपन्नही आहे .
भानू काळे यांचे हे विधान अजून पुढे न्यायचे ठरवल्यास या देशात आणि समाजव्यवस्थेत one night stand ला पण जागा आहे आणि विवाह संस्थेला पण असे म्हण्यास हरकत नसावी . भारतीय व्यवस्थेने पहिले विरोध करून नंतर विधवा विवाह , संगणक आणि जागतिकीकरण पचावलेच की .
कदाचित काही वर्षांनी हे मोठ्या शहरांमध्ये असणारे लोण छोट्या शहरांमध्ये आणि ग्रामीण भागात पण जाईल . त्याचा वेग कमी जास्त असू शकतो .
लेखाच्या सुरुवातीला ज्या मित्राचा उल्लेख आहे त्याची परवा फेस बुक वर मैत्री विनंती आली . मी लगेच त्याची friend लिस्ट चाळून बघितली . त्यात "ती ' पण होती . दोघांची पण लग्न झाली होती . वेगवेगळ्या लोकांसोबत .
कुत्रे जास्त आनंदी असतात.
कुत्रे जास्त आनंदी असतात. आयती बिस्किटं खाऊ शकतात. काडीचंही काम करायची त्यांना गरज नसते. इ.>>:D
अजूनही एक अडचण निदान मला तरी जाणवत आहे. सगळे एकमेकांशी एकमेकांनी दिलेल्या प्रतिसादांवर चर्चा करत आहेत ते समजले, पण मूळ लेखात काय चर्चा अपेक्षित आहे हेच मला समजत नाही आहे. >>>>>>मला वाटते लोकाना बोलायचे आहे या विषयावर पण कुठलाच प्रश्न कुणालाच मनात पडत नाहीये, त्यामुळे असे चालू आहे.
बाकी सीमा गैलाड भन्नाट आहे, आजच वाचले.
मूळ लेख़काला या प्रश्नांवर
मूळ लेख़काला या प्रश्नांवर चर्चा करायची आहे-
१.शारीरिक आकर्षण हाच एखाद्या नात्याचा (मग तो किती पण short span चा असेल) पाया असू शकतो का ?
२. का मुळात तमाम आपली महान भारतीय संस्कृती वादी म्हणतात तस या नात्यांना काही शेंडा बुडखा नसतो ?
३. या अशा गोष्टींमुळे आपल्या महान संस्कृती ला धक्के बसतात का?
४,आणि सगळ्यात महत्वाच म्हणजे भारतीय समाजमनात sex किंवा इतर कुठल्याही अधिभौतिक गोष्टीचा मजा घेण्याबद्दल जो प्रचंड अपराधगंड आहे त्यामुळे one Night Stand सारख्या गोष्टींमुळे आपल्या तकलादू मुल्य व्यवस्थेला धक्के बसतात का ?
५.Where is the sanctity of marriage ?
६. किती लोक अशी संधी समोर आल्यावर ती सोडतील?
आता या प्रश्नांच्या अनुशंगाने लिहा.(लेखाबरहुकूम चर्चा ़करायची असल्यास)
डॉ. सुबोध खरे, अतिशय आवडली
डॉ. सुबोध खरे, अतिशय आवडली तुमची पोस्ट.
बाकी, संस्कृती, विवाहसंस्था, कौमार्य यांसारखे मोठे बुडबुडे दुसरे नाहीत. इंपल्स महत्वाचा आणि तो झेलण्याची ताकदही.
व्वा आशूडी, शेवटचे वाक्य
व्वा आशूडी, शेवटचे वाक्य मस्त! >>>इंपल्स महत्वाचा आणि तो झेलण्याची ताकदही<<<
>>>साती | 18 August, 2014 -
>>>साती | 18 August, 2014 - 02:49
मूळ लेख़काला या प्रश्नांवर चर्चा करायची आहे-<<<
आता बघा, लेखकाने विचारलेल्या ह्या प्रश्नांवर लेखक स्वतःच काय म्हणत आहे. प्रश्न आणि त्यापुढे लेखकाने स्वतःच दिलेली उत्तरे कॉपी पेस्ट करत आहे.
>>>१.शारीरिक आकर्षण हाच एखाद्या नात्याचा (मग तो किती पण short span चा असेल) पाया असू शकतो का?
२. का मुळात तमाम आपली महान भारतीय संस्कृती वादी म्हणतात तस या नात्यांना काही शेंडा बुडखा नसतो ?
३. या अशा गोष्टींमुळे आपल्या महान संस्कृती ला धक्के बसतात का?
४,आणि सगळ्यात महत्वाच म्हणजे भारतीय समाजमनात sex किंवा इतर कुठल्याही अधिभौतिक गोष्टीचा मजा घेण्याबद्दल जो प्रचंड अपराधगंड आहे त्यामुळे one Night Stand सारख्या गोष्टींमुळे आपल्या तकलादू मुल्य व्यवस्थेला धक्के बसतात का ?<<<
>>>माझ निरीक्षण अस आहे की अनेक ठिकाणासारखा इथे पण इंडिया आणि भारत असा divide झाला आहेच . एका बाजूला शहरांमध्ये हा phenomena वाढत असताना संस्कृती रक्षकाना अर्थातच हा भारतीय संस्कृती वरचा घाला वाटत आहे . समाजात यामुळे एक sexual anarchy येईल अशी भीती त्यांना वाटते. आपल्या मुली (नोट -मुलांची त्याना काळजी नाही ) बिघडतील असे पण त्याना वाटते .<<<
>>>५.Where is the sanctity of marriage ?<<<
>>> या अवघड प्रश्नांची उत्तर फार गुंतागुंतीची आणि प्रत्येकापुरती वेगवेगळी आहेत . माझ्या अनुभवाच्या कक्षेत आलेल्या लोकांची जेवढी अशी प्रकरण मी पाहिली आहेत तेवढ्यावरून मी माझ्यापुरती काही उत्तर बनवली आहेत .
सर्वात महत्वाच म्हणजे या अशा नात्यात असलेल्या एकमेका कडून असणार्या शुन्य अपेक्षा . हि सर्वात सुंदर गोष्ट आहे . न कसले राग , न कसले लोभ , ना कसल्या आणि कुठल्या तरी insignificant तारखा लक्षात ठेवण्याचे ओझे . आपल्या दोघाना या क्षणी एकमेकांची गरज आहे . आपण ती पूर्ण करूया आणि लेट्स अपार्ट ऑन गुड नोट . साध आणि सरळ . काही लोकाना हे खूप कोरड वाटू शकत पण पहिलेच नमूद केल्याप्रमाणे to each his /her own .
आणि किती लोक अशी संधी समोर आल्यावर ती सोडतील ? मग ती विवाहित असो वा अविवाहित . याच उत्तर आपणच आपल्या मनाशी ताडून बघाव . नात्याचं पावित्र्य , आपली संस्कृती , कुणाला कळल तर, आणि लोक काय म्हणतील हे प्रश्नांचे ब्रम्ह राक्षस मानगुटीवरून उतरवून . मला वाटत बहुतेक लोकांच उत्तर नाही असेच असेल .<<<
>>>६. किती लोक अशी संधी समोर आल्यावर ती सोडतील?<<<
>>>मग ती विवाहित असो वा अविवाहित . याच उत्तर आपणच आपल्या मनाशी ताडून बघाव . <<<
आता हे तुम्ही दिलेले सल्ले बघा साती:
>>>आता या प्रश्नांच्या अनुशंगाने लिहा.<<<
लिहिले, किंबहुना ते लेखकाने आधीच लिहिलेले आहे.
>>>(लेखाबरहुकूम चर्चा ़करायची असल्यास)<<<
ह्या टीपेची आवश्यकता नव्हती, असे प्रतिसाद चर्चा कडवट करतात.
धन्यवाद!
टीप - मला असे वाटत आहे की लेखकाने त्याला पडलेल्या प्रश्नांची त्याला वाटतील ती उत्तरेही दिलेली आहेत व ती संतुलित उत्तरे बनवण्याचा गंभीर प्रयत्नही केला आहे. एकुण 'आपणच आपल्या मनाशी ताडून पाहावं' हे लेखाच्या शेवटी शेवटी आलेले मत लेखातील बहुतांशी प्रश्नांनाही लागू होत आहे असे मला वाटते.
अश्या विषयांवर लिहिताना ठोस भूमिका घेण्याने चर्चा अधिक भरीव होते असे वाटते. 'मला असेही वाटते, मला तसेही वाटते आणि ज्याला ज्याला जसे जसे वाटते तेही महत्वाचेच' अशी भूमिका घेतल्यावर चर्चा भरकटू शकते.
चु भु द्या घ्या
-'बेफिकीर'!
स्त्री आणि पुरुष ह्यांच्या
स्त्री आणि पुरुष ह्यांच्या संदर्भात काम हा विषय ही नैसर्गीक प्रवृत्ती आहे. हजारो वर्षांच्या अनुभवानंतर लग्नसंस्था सर्वच धर्मात/देशात प्रचलीत होण्याची कारणे
१) हे सहजपणे उपलब्ध्द न झाल्यास समाजाला होणारे त्रास ( बलात्कारासारखे गुन्हे )
२) तो बलात्कार नसला तरी त्यातुन होणार्या गर्भसंभवाची जबाबदारी.
३) मानवाच्या अर्भकांनांच नाही तर कायद्याने १८ वर्षे किमान पालन पोषण करण्याची जबाबदारी अन्य पशुंची मुले लगेचच ( काही महिन्यात/ १-२ वर्षात आपले अन्न शोधण्यास सक्षम होतात )
४) पशु पेक्षा मानवात संस्काराचे महत्व आहे. केवळ ( आहार , निद्रा, भय, मैथुन ) यात मनुष्य अडकुन न पडता याला जीवनात स्थान देत आणखी काही करु शकतो.
लग्न संस्था म्हणजेच सर्वकाही नाही. पण समाजाला धर्म आणि कायदा याच्या चौकटीत ( सर्व सामान्य माणसांना ) बसवले की प्रशासन सोपे होते असा ह्या संस्था निर्माण केलेल्या अनामिक समाजपुरुषांचा समज असावा.
ही बंधने तोडुन ( स्वैराचार म्हणावे असे माझे मत नाही ) वर्तन करणार्यांना काहीना काही त्रासाला सामोरे जावे लागले असेल म्हणुन सामान्य माणुस लग्नसंस्थाच काही कामाची नाही म्हणुन बंधने तोडायला जात नाही असा आजपर्यंतचा इतिहास आहे.
लग्नसंस्था मग कुढलेच बंधन नाही मग त्यातले फायदे- तोटे समजुन पुन्हा विवाह संस्था या चक्रातुन मानव समाज जात असावा कारण मध्यंतरी कुटुंबसंस्था मोडकळीस आल्यामुळे अमेरीकेत समाजजीवनाचा र्हास झाला आहे असे मत अमेरीकेच्या कुढल्याशा अध्यक्षाने म्हणले आहे असे स्मरते.
मानवात जे काय बिघडले आहे ते पुन्हा सुधारण्याची क्षमता आहे त्यामुळे विवाहसंस्था संपली तरी पुन्हा निर्माण होईल.
काही बाबतीत असहमत १)संधी
काही बाबतीत असहमत
१)संधी मिळताच त्याचा फायदा घेणे-- हे म्हणजे कोणी पाहत नसताना सार्वजनिक मालमत्तेची चोरी करणे. आपली चोरी पकडली जाणार नाही हि खात्री असली तरी किती लोकं प्रत्यक्ष चोरी करतील. तेंव्हा केवळ संधी आली म्हणून त्याचा फायदा घेणे.
चार चोर्या वाढल्या म्हणजे समाजातील नितीमत्ता लयास गेली असे नाही. पण म्हणून चोरीचे समर्थन होते असे नाही.
२) इम्पल्स महत्त्वाचा -- यात तीन मिनिटांची मजा त्या स्त्रीला( आणि कधी कधी पुरुषाला) आयुष्यभर एक टोचणी लावू शकतो.
संस्कृती वर घाला हे फार मोठे शब्द आहेत. झार खंडात एक आदिवासी जमत आहे तेथे तरुणतरुणी सहा महिने एकत्र राहतात. जर ती तरुणी गरोदर राहिली तर त्यांचे लग्न करतात नाही तर नवीन जोडी. यात कोणताही दांभिकपणा नाही आणि सामाजिक संमती आहे.
राहिली गोष्ट विधिनिषेधाची त्यात आपण देवळात जाऊन सिगरेट ओढली किंवा मशिदीत जाऊन दारू प्यायली तरी काय फरक पडणार आहे.
आपण काय करीत आहोत आणी त्याचा परिणाम काय होऊ शकेल हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे अन्यथा मनुष्य आणि पशु यात काय फरक आहे. प्राणी पण आपल्या आंतरिक प्रेरणांप्रमाणे(instinct) वागत असतात.
मनुष्य हा देखील एक पशू आहे
मनुष्य हा देखील एक पशू आहे फक्त तो संस्कारी पशू आहे इतकेच !!!
........ एकदा का असा निकष लाऊन चर्चा करायला घेतली की मग कशाचेही समर्थन होऊ शकते. हो, अगदी कश्याचेही, फक्त मग ते संस्कार वा नितीमत्तेचे परिमाण आपल्या सोयीनुसार कमीजास्त केले की झाले.
अर्थात वरील पहिले वाक्य साफ चूक आहे असेही नाहीच .
आपण काय करीत आहोत आणी त्याचा
आपण काय करीत आहोत आणी त्याचा परिणाम काय होऊ शकेल हे
लक्षात घेणे महत्त्वाचे>> म्हणजेच इंपल्स झेलण्याची ताकद.
>>>संस्कृती वर घाला हे फार
>>>संस्कृती वर घाला हे फार मोठे शब्द आहेत. झार खंडात एक आदिवासी जमत आहे तेथे तरुणतरुणी सहा महिने एकत्र राहतात. जर ती तरुणी गरोदर राहिली तर त्यांचे लग्न करतात नाही तर नवीन जोडी. यात कोणताही दांभिकपणा नाही आणि सामाजिक संमती आहे.<<<
मूळ लेखाशी ह्या परिच्छेदाचा नेमका कसा संबंध आहे हे समजत नाही आहे.
सेक्स ही इमोशनल अॅटॅचमेंट
सेक्स ही इमोशनल अॅटॅचमेंट झाल्यावर येणारी गोष्ट आहे हे एका पिढीचे/समाजघट्काचे लॉजिक, तेच आता बदलले आहे. ह्रितिक रोशनला एका मुलाखतीत विचारले 'कॅजुअल सेक्सबद्दल तुझे मत काय?' त्याचे उत्तर नव्या पिढीचे प्रातिनिधिक आहे -'नो प्रॉब्लेम इफ यू आर गोईंग टू रिमेन कॅज्युअल अबाउट इट'.
कुत्रे जास्त आनंदी असतात. आयती बिस्किटं खाऊ शकतात. काडीचंही काम करायची त्यांना गरज नसते. इ.>> आणि ते मालकप्रेमावर धागेही काढत नाहीत.
सुबोध... मशिदीत दारी
सुबोध... मशिदीत दारी पिण्यासंबंधी एक शेर वाचला होता.. नेमके शब्द नाही आठवत पण त्याचा अर्थ असा होता.
मशिदीत दारू पितोय म्हणून क्षमा कर... पण अशी एखादी जागा आहे का जिथे तू नसशील !
...
या असल्या संबंधाचे जे भले बुरे परिणाम असतील ते, ते दोघे आणि जर त्यातून जन्माला आले तर अपत्य भोगते. समाज काय जबाबदारी घेतो त्याची.. आणि समाजाची बंधने पाळून केलेल्या प्रेमाच्या यशस्वीतेची तरी
काय जबाबदारी घेतो ?
>>>कुत्रे जास्त आनंदी असतात.
>>>कुत्रे जास्त आनंदी असतात. आयती बिस्किटं खाऊ शकतात. काडीचंही काम करायची त्यांना गरज नसते. इ.>> आणि ते मालकप्रेमावर धागेही काढत नाहीत.<<<
आणि जिथे माणसांनी असायला पाहिजे, बसायला पाहिजे तिथे त्यांनाही असता येते, बसता येते. एक उदाहरण म्हणजे बागेतला बाक! वर पुन्हा माणसांत येऊन माणसांचीच संसाधने वापरून शहाणपणा करणार्या अश्या कुत्र्यांना त्यांचे मालक पाठिंबाही देतात.
शराब पीने दे मस्जिद में बैठकर
शराब पीने दे मस्जिद में बैठकर या वो जगह बता दे जहाँ पर खुदा न हो
- गालिब
(शब्द इकडचा तिकडे झाला असावा)
डॉ. खरेसाहेब, मी विवाहबाह्य
डॉ. खरेसाहेब,
मी विवाहबाह्य संबंध किंवा लिव्हींग इन किंवा अन्य विवाहाशिवाय अन्य प्रकाराने लैंगीक संबंधाचे समर्थन करत नाही. आपण जी गोष्ट १०० वर्षांच्या कालखंडातल्या मापदंडावर पाहिली तर चुक वाटते तीच स्थल/ काल बदलल्यास गैर दिसत नाही इतकेच म्हणतो.
लग्न झालेल्या माणसाला मुक्त संबंधांचे आकर्षण असते तर या उलट मुक्तसंबंधात असलेले अस्थैर्य, असुरक्षीतता या मुळे कधीना कधी मुक्त संबंंध असलेल्या माणसाला लग्नामुळे येणार्या स्थैर्य आणि सुरक्षीतता याचा विचार मनात येत असेल.
हजारो वर्षांच्या कालखंडात आलटुन पालटुन समाज दोन टोकाकडे जात असतो. पण पशुसारखी मनुष्यप्राण्याची मुले लवकर स्वतंत्र होउ शकत नाहीत म्हणुन लग्न आणि कुटुंबसंस्थेची आवश्यकता मनुष्याला जास्त आहे असे माझे मत आहे.
जाहिद शराब पीने दे मस्जिदमें
जाहिद शराब पीने दे मस्जिदमें बैठकर
या वो जगह बता के जहांपर खुदा न हो
- गालिब
आभार अभिषेक, बेफी
आभार अभिषेक, बेफी
>> बाकी, संस्कृती,
>> बाकी, संस्कृती, विवाहसंस्था, कौमार्य यांसारखे मोठे बुडबुडे दुसरे नाहीत. इंपल्स महत्वाचा आणि तो झेलण्याची ताकदही. <<
आत्तापर्यंतच्या शब्दबंबाळ, उपदेशीय थाटात लिहिलेल्या सगळ्या प्रतिसादांना चोख जबाब; क्या बात है.
यहा खुदा वहा खुदा, वहा खुदा
यहा खुदा वहा खुदा,
वहा खुदा यहा खुदा,
जहा देखो वहा खुदा,
जहा नही है खुदा,
वहा कल खोदेंगे !
बेफिकीर यांच्याशी सहमत, चर्चेचा ठोस नाही दिशा,
शेवटाला कोणत्या निष्कर्शाला जायचे आहे, किसी को नही पता !
अवांतर - मस्जिद, खुदा, दारू यावरून अजून एक चांगला शेर आहे,
मंदिरो मे हिंदू देखे,
मस्जिदो में मुसलमान,
शाम को जब मयखाने गया,
तब जाकर दिखे इन्सान.
---
---
>>स्वाती२, तुमची ही दोन
>>स्वाती२,
तुमची ही दोन विधाने परस्परविरोधी आहेत असं वाटतं :
>> संस्कृती वगैरे काही बुडत नाही आणि विवाह संस्थाही मोडकळीला येत नाही.
आणि
>> कितीही नाही म्हटले तरी परीणामांची जबाबदारी टाळणे होते आणि समाज व्यवस्थेवर कालांतराने त्याचे ओझे होते.
या ओझ्यामुळेच कुटुंब मोडकळीस येते. अशा मोडकळीस आलेल्या कुटुंबांची संख्या वाढली की विवाहसंस्था मोडकळीस येण्यास कितीसा उशीर?
आ.न.,
-गा.पै.>>
गा. पै. ,
मी जिथे रहाते तिथे कंसेंटचे वय १६ आहे. लिव इन, कॅज्युअल संबंध वगैरे सामान्य आहे. नो फॉल्ट डिवोर्स स्टेट असल्याने घटस्फोट मिळायलाही अडचण येत नाही. असे असले तरी लोकांना विवाह बंधन हवे असते. बहुतेक जोडपी विवाह टिकवण्यासाठी धडपडतात. प्रसंगी काउंसेलरची मदत घेतात. विवाहाला ६०/५०/४०/२५ वर्षे पूर्ण झाली म्हणून सोहोळे करतात. आता अब्युझ आहे म्हणून किंवा मारुनमुटकून लग्न टिकवण्यात काही अर्थ नाही म्हणून घटस्फोट घेतला जात असेल तर त्याचा अर्थ विवाह संस्था मोडकळीला आली असा होत नाही. संस्कृती बद्दल बोलायचे तर ती प्रवाही आहे. एकेकाळी विधवेला जगण्याचा अधिकार नाकारणे, अस्पृष्यता पाळणे, पुरुषांचे एकापेक्षा जास्त विवाह संबंध हा आपल्या संस्कृतीचा भाग होता. आज असे वर्तन गुन्हा आहे. एकेकाळी स्त्री शिक्षणाने संस्कृती बुडेल म्हणून लोकं गळा काढत होते. आज उच्चशिक्षित मुलीचा पालकांना अभिमान वाटतो. बदल हितकारक असेल तर तो काळाच्या कसोटीवर टिकेल अन्यथा टिकणार नाही.
दुसरा मुद्दा परीणामांची जबाबदारी टाळण्याचा. यात फक्त अशा संबंधातून होणारी संतती आणि तिचे भरण पोषण एवढेच मर्यादित नाही. याचे साधे उदाहरण डॉ. खर्यांनीच दिले आहे. विवाहपूर्व संबंध आणि एकंदरीत सेक्शुअल हिस्टरी जोडीदारापासुन लपवून ठेवणे आणि त्यामुळे अपराधीपणा, तणाव वाटणे. आता विवाहपूर्व संबंध जोडीदारापासून लपवणे हे एक प्रकारचे बेजबाबदार वर्तनच आहे. जोडीला बेजबाबदार लैगिंग वर्तनाची डायरेक्ट मेडिकल कॉस्ट, झालेच तर रेप,स्टॉकिंग, ब्लॅकमेलीग सारख्या गुन्ह्यांची डायरेक्ट आणि इनडायरेक्ट कॉस्ट. या सगळ्याची किंमत या ना त्या प्रकारे समाजाला मोजावी लागते. यात कुटुंब नेहमीच मोडून पडते का? तर नाही. तडे जातात. ते सांधायचा प्रयत्नही होतो. बरेचदा समाजाच्या मदतीने कुटुंब सावरते. काही वेळा कुटुंबाचे स्वरूप बदलते. पण कुटुंब रहाते आणि विवाह संस्थाही.
भारतासारख्या देशात लिव इन म्हणजे काहीतरी सनसनाटी वाटत असले तरी मी इथे आर्थिक अगतीकतेतून आलेले लिव इन बघितले आहे. आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी त्या जोडप्यांची धडपड आणि त्यानंतर आनंदाने स्विकारलेले विवाहबंधन बघता कुटंब आणि विवाहसंस्था मोडीत निघेल असे मला तरी वाटत नाही.
विवाहसंस्थेचा अर्थ........
विवाहसंस्थेचा अर्थ........ पुरषाने बाईला "मी तुला सांभाळतो, त्या बदल्यात तु मला लैंगिक सुखाचा आनंद दे" असे केलेले एग्रीमेँट, असे एग्रीमेंट सर्वासमक्ष करणे याला विवाह म्हणतात! थोडक्यात पुरषाने स्त्रीला ठेवली असे दिसु नये वा वाटू नये यासाठी केलेला तो कव्हरअप आहे. जर विवाहातुन लैंगिकता वर्ज्य केली तर त्या संस्थेला काही अर्थ राहील काय?
वन नाईट स्टँड म्हणजे फक्त कुत्र्यांसारखी लैंगिकता जर असेल तर विवाहसंस्था म्हणजे त्यागाचा महामेरु नव्हे ,ड्रायविंग फोर्स लैंगिकताच आहे.पहीले एका रात्रीचे कॉन्सेश्युल एग्रीमेंट व दुसरे जन्मभराचे(?) वा घटस्फोटापर्यंत.
अचाट, अफाट प्रगल्भता आहे ह्या
अचाट, अफाट प्रगल्भता आहे ह्या प्रतिसादात! धन्य झालो.
स्वाती२ तुमच्या सगळ्याच
स्वाती२ तुमच्या सगळ्याच पोस्ट्स आवडल्या.
आर्थिक अगतीकतेतून आलेले लिव इन, प्रवाही संस्कृती आणि कुटुंबसंस्था मोडकळीस येण्याची गल्लत पूर्ण सहमत.
@ दिनेश, बेफिकिर अन तुमचा
@ दिनेश, बेफिकिर अन तुमचा अभिषेक
जाहिद शराब पीने दे मस्जिद मे बैठकर
या वो जगह बता दे जहां पर खुदा न हो I
इति --मिर्झा गालिब (१९ वे शतक)
मस्जिद खुदा का घर है पीनेकी जगह नही
काफ़िर के दिल मे जा वहां पर खुदा नहीI
इति -- इक्बाल (५० वर्षानंतर)
काफ़िर के दिल से आया हुं मै ये देख कर,फर्झ
खुदा मौजूद है वहां पर उसे पता नहीI
इति --फर्झ २० वे शतक
असो
शेरो शायरी आपल्या जागी
स्वाती२, मस्त पोस्ट आहे तुझी.
स्वाती२, मस्त पोस्ट आहे तुझी. खूपच आवडली.
धिरज काटकरांना नमस्कार.. _/\_
इम्पल्स झेलण्याची ताकद वगैरे
इम्पल्स झेलण्याची ताकद वगैरे गोष्टी जेंव्हा वैद्यकशास्त्र पुढे गेले तेंव्हाच्या आहेत म्हणजे गर्भपात आणि नको असणारी गर्भधारणा टाळण्याचे सुरक्षित उपाय उपलब्ध झाल्यानंतरच. त्यापूर्वी (फक्त १०० वर्षापूर्वी) इम्पल्स टाळता न आल्यामुळे स्त्रियांना आयुष्यभर बदनामी सहन करावी लागली किंवा आत्महत्या. पुरुष सर्व करून नामानिराळा होत असे. मी जे लिहिले आहे ते आपल्या आंतरिक प्रेरणानबद्दल. विस्तवाजवळ लोणी ठेवले तर ते पाघाल्णारच हे आपल्या पूर्वजांनाहि माहित होते.
प्रश्न इम्पल्स झेलण्याची ताकद या बद्दल प्रत्येक माणूस मोठ्या धारीष्ट्याने बोलतो पण असेच "धैर्यवान" लोक व्यसन मुक्ती केंद्रात डझनांनी दिसतात जे मला व्यसन लागणार नाही म्हणून गर्द / हेरोईन चव बघतात आणि आयुष्य उध्वस्त होताना अगतिकपणे पाहत राहतात. हीच गोष्ट स्त्रियांच्या बाबतीत होताना दिसते.
अंतर्प्रेरणेने त्या अशा संबंधात पडतात पण नंतर येणारया वादळात वाताहत होताना अगतिक पणे पाहण्याशिवाय त्यांच्या हातात काही राहत नाही. गर्भपात करताना येणारा अनुभव हा त्या स्त्रीसाठी अत्यंत वेदनादायक असतो.
बाकी पुरुषांना या गोष्टी पकाऊ वाटतातच पण त्यांना मी एकच विचारतो आपण दुसर्याशी एका रात्रीची सोबत असणाऱ्या मुलीशी लग्न कराल काय? यावर ९० टक्के लोक तोंडावर हो म्हणतील पण प्रत्यक्षात पाय मागे घेतात असे आढळून येईल.
हि गोष्ट मी चार वर्षे आय टी क्षेत्रात पाहत आलो आहे. फिरण्यासाठी मज मारण्यासाठी कॉल सेंटर आय टी बी पी ओ मधील मुलगी चालते पण लग्नासाठी नाही.
काटकर साहेब
लग्नसंस्थेत लैंगिक सुख हे महत्त्वाचे आहेच परंतु त्यावरच ती अवलंबून आहे हे मत फारच एकांगी आहे. पन्नाशी नंतर लैंगिकता ९० (किंवा १०० टक्क्यांनीसुद्धा) कमी झालेली असते तरी बहुसंख्य लग्ने जगभरात टिकून राहतात हे कसे? हा फार गहन विषय आहे. लग्नसंस्था परिपूर्ण नाही हि वस्तुस्थिती आहेच परंतु त्याला दुसरा सशक्त असा पर्याय जगभरात कुठेही अजून तरी अस्तित्वात आलेला नाही. (हीच गोष्ट लोकशाहीबद्दल म्हणता येईल). लग्नसंस्था हि पुरुषांसाठी बंधन असली तरी ती बालकांच्या आणि वृद्ध माणसांच्या साठी अतिशय उपयुक्त आहे. मानवाचे बालपण हे १८ वर्षे इतके लांब असते आणि मानवी मादीला बालकाला स्वतंत्रपणे इतकी वर्षे सांभाळणे फार कठीण आहे. कुत्र्या मांजरांमध्ये नराचा सहभाग फक्त शुक्राणू दान इतकाच असतो. कुत्र्या मांजरांची पिल्ले डोळे उघडल्यावर आपले अन्न वास आणि नजर या इंद्रियांनी स्वतः मिळवू शकतात. त्यामुळे या प्राण्यात नराचा सहभाग ० असूनही चालू शकते. माणसात तसे नाही त्यामुळे एकदा संभोग करून वेगळे होणे हे प्राण्यांच्या अन्तर्प्रेरणे सारखे आहे. मग ते आपल्याला कितीही आक्षेपार्ह वाटले तरीही.
असो या विषयावर प्रत्येकाचे मत वेगळे असेल.
इम्पल्स झेलण्याची ताकद वगैरे
इम्पल्स झेलण्याची ताकद वगैरे गोष्टी जेंव्हा वैद्यकशास्त्र पुढे गेले तेंव्हाच्या आहेत >> प्लीज. इंपल्स म्हणजे फक्त प्रजोत्पादनच का? एखाद्या स्त्री, पुरुषाला मिठी मारण्याने लगेच मूल होत नाही. पण ही गोष्टही संस्कृती, विवाह यांच्या कचाट्यात आहे. तिथेही इंपल्स झेलण्याची ताकदच लागते. वैद्यकशास्त्र कशाला?
हि गोष्ट मी चार वर्षे आय टी क्षेत्रात पाहत आलो आहे. फिरण्यासाठी मज मारण्यासाठी कॉल सेंटर आय टी बी पी ओ मधील मुलगी चालते पण लग्नासाठी नाही. >> डॉक्टर, तुम्हीसुद्धा?
चला, आता या चर्चेला योग्य वळण लागले आहे अमुचा रामराम घ्यावा.
(No subject)
अहो खरे साहेब मी या चर्चेवर
अहो खरे साहेब मी या चर्चेवर मत देणार नाही, पण तुमची आणी स्वाती २ ची मते आवडली.
पण अहो नका न असे करु. म्हणजे ते धीरज काटकर आधीच आय टी वाल्यान्वर जाम म्हणजे जामच चवताळुन आहेत, येता जाता कोसतात त्याना. मग तुम्ही कशाला त्यान्च्या हातात मशाल+ पेट्रोल+ रॉकेल+ सगळी तेले देताय.:फिदी:
आणी परत एकदा सान्गते की सगळ्याच आय टी वाल्याना एकाच तागड्यात तोलु नका. १० जणात २ जण चावट असतील, म्हणजे बाकी पण तसेच का?:अओ: कुटुम्बवाले आय टीयन्स पण आहेत की . मग काय म्हणताय, फेर विचार करा हो जरा.:स्मित:
Pages