Submitted by अ. अ. जोशी on 17 August, 2014 - 09:24
१७ ऑगस्ट ...! माझ्या वडिलांचा (कै. अनंतराव जोशी यांचा) जन्मदिवस. त्या निमित्ताने....
फोटोमधुनही बघतात बाबा..!
बिनधास्त जग तू, वदतात बाबा..!
नाहीत बाबा, हे मान्य नाही;
माझ्यात राहुन जगतात बाबा..!
झोळी रिकामी माझी तरीही;
प्रेमास हृदयी भरतात बाबा..!
पाठीवरी तेंव्हा हात फिरला...
तो आठवा, मग कळतात बाबा..!
तू मान किंवा मानू नको, पण..
असतेच आई, असतात बाबा..!
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
- ___/\___
-
___/\___
असतेच आई, असतात बाबा..!<<<<
असतेच आई, असतात बाबा..!<<<< वा उत्तम ओळ
_/\_
भावना आवडल्या.
भावना आवडल्या.
शेवटचा टचिंग आहे.
शेवटचा टचिंग आहे.
धन्यवाद सर्वांना.
धन्यवाद सर्वांना.