One Night Stand आणि आपण सगळे

Submitted by बावरा मन on 16 August, 2014 - 00:18

५ वर्षांपूर्वीची गोष्ट . नवीन नौकरी . Office चा एक इवेन्ट . पार्टी एका उच्चभ्रु हॉटेल मध्ये . मी आणि माझा मित्र -कम -सहकारी एकत्रच गेलो . पार्टी एकदम रंगात आली असतानाच हा एकदम दिसेनासाच झाला . मी त्याला फोन केला . तर त्याने तो उचललाच नाही . थोड्या वेळाने त्याचा मेसेज आला कि त्याला काही अर्जंट काम निघाल्यामुळे त्याला एकदम जावे लागले . उद्या ऑफिस मध्ये भेटूयात . असेल काही काम म्हणून मी हि फारस लक्ष दिल नाही . दुसर्यादिवशी हा गडी ऑफिस मध्ये एकदम खुशीत . मी त्याला विचारले , "काय रे मित्रा , कुठे गायबला होतास काल ?" तो म्हणाला ," कुणाला सांगणार नसशील तर सांगतो ." माझी उत्सुकता चाळवली . मित्र पुढे म्हणाला ," आपल्या HR मधली ती अबक मुलगी आहे ना तिच्यासोबत माझ्या flat वर गेलो होतो . माझा flatmate सध्या बाहेरगावी आहे आणि मी एकटाच आहे ." मला धक्का बसला .

मी ," आयला भारी रे ! कधीपासून चालू आहे ? लग्न वैगेरे कधी करताय मग ?"

तर तो ," वेडा झालायस का ? ते तितक्या पुरतच होत . काही serious नाही आहे ."

परभणी सारख्या ठिकाणाहून आलेल्या मला सगळ्यात पहिले सांस्कृतिक वैगेरे म्हणतात तसा धक्का बसला . आणि नंतर त्या धक्क्याची जागा हेव्याने घेतली . One Night Stand या गोष्टीशी आलेला हा माझा पहिला संबंध .

आताशी हा लिंगो बर्याच वेळा कानावर पडतो . आणि या प्रकारच्या गोष्टींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे हे स्पष्टच आहे . मला स्वतहाला या नातेसंबंधांच्या कदाचित सगळ्यात छोट्या फॉर्म बद्दल कुतूहल आहे . म्हणजे योनिशुचीतेबद्दल कुठलेही वांझोटे प्रोटेस्ट माझ्या मनात नाहीत पण अशा एखाद्या नात्यात (?) आलेल्या लोकांबद्दल कुतूहल नक्कीच आहे . म्हणजे असे पाहा की शारीरिक आकर्षण हाच एखाद्या नात्याचा (मग तो किती पण short span चा असेल) पाया असू शकतो का ? का मुळात तमाम आपली महान भारतीय संस्कृती वादी म्हणतात तस या नात्यांना काही शेंडा बुडखा नसतो ? या अशा गोष्टींमुळे आपल्या महान संस्कृती ला धक्के बसतात का? आणि सगळ्यात महत्वाच म्हणजे भारतीय समाजमनात sex किंवा इतर कुठल्याही अधिभौतिक गोष्टीचा मजा घेण्याबद्दल जो प्रचंड अपराधगंड आहे त्यामुळे one Night Stand सारख्या गोष्टींमुळे आपल्या तकलादू मुल्य व्यवस्थेला
धक्के बसतात का ?

माझ निरीक्षण अस आहे की अनेक ठिकाणासारखा इथे पण इंडिया आणि भारत असा divide झाला आहेच . एका बाजूला शहरांमध्ये हा phenomena वाढत असताना संस्कृती रक्षकाना अर्थातच हा भारतीय संस्कृती वरचा घाला वाटत आहे . समाजात यामुळे एक sexual anarchy येईल अशी भीती त्यांना वाटते. आपल्या मुली (नोट -मुलांची त्याना काळजी नाही ) बिघडतील असे पण त्याना वाटते .

बर हा stand कायम दोन अविवाहित लोकांमध्ये च होईल असे काही नाही . अशी काही अट नाही . म्हणजे एखादा विवाहित पुरुष किंवा स्त्री एखाद्या अविवाहित पुरुष किंवा स्त्री सोबत पण अनेकदा रात्र घालवू शकतात . सिनिकस असे पण म्हणू शकतात हा विवाह संस्थेच्या मुळावरच घाला आहे . Where is the sanctity of marriage ? या अवघड प्रश्नांची उत्तर फार गुंतागुंतीची आणि प्रत्येकापुरती वेगवेगळी आहेत . माझ्या अनुभवाच्या कक्षेत आलेल्या लोकांची जेवढी अशी प्रकरण मी पाहिली आहेत तेवढ्यावरून मी माझ्यापुरती काही उत्तर बनवली आहेत .

सर्वात महत्वाच म्हणजे या अशा नात्यात असलेल्या एकमेका कडून असणार्या शुन्य अपेक्षा . हि सर्वात सुंदर गोष्ट आहे . न कसले राग , न कसले लोभ , ना कसल्या आणि कुठल्या तरी insignificant तारखा लक्षात ठेवण्याचे ओझे . आपल्या दोघाना या क्षणी एकमेकांची गरज आहे . आपण ती पूर्ण करूया आणि लेट्स अपार्ट ऑन गुड नोट . साध आणि सरळ . काही लोकाना हे खूप कोरड वाटू शकत पण पहिलेच नमूद केल्याप्रमाणे to each his /her own .

आणि किती लोक अशी संधी समोर आल्यावर ती सोडतील ? मग ती विवाहित असो वा अविवाहित . याच उत्तर आपणच आपल्या मनाशी ताडून बघाव . नात्याचं पावित्र्य , आपली संस्कृती , कुणाला कळल तर, आणि लोक काय म्हणतील हे प्रश्नांचे ब्रम्ह राक्षस मानगुटीवरून उतरवून . मला वाटत बहुतेक लोकांच उत्तर नाही असेच असेल .

भानू काळे यांच्या बदलता भारत या पुस्तकात अतिशय सुंदर para आहे तो quote करण्याचा मोह आवरत नाहीये . : आपला देश अंतर्विरोधानी एवढा भरलेला आहे की कुठल्याही एका चौकटीत या देशाचे संपूर्ण वास्तव सामावले जाणे अशक्य वाटते .

इथल्या विविधातेबद्दल असे गमतीने म्हणतात की या देशाबाबत केलेलं कुठलेही विधान खरे असू शकते आणि त्या विधानाचा व्यत्यास हि तेवढाच खरा असू शकतो .

आम्ही अणु उर्जा वापरतो , तसेच शेण गोळे हि वापरतो .

इथे धारावी आहे तसेच मलबार हिल पण आहे .

पाण्याचा एकही नळ नसलेल्या शाळा आहेत तसेच स्विमिंग पूल असलेल्याही आहेत .

हा देश गरीब आहे , हा देश संपन्नही आहे .

भानू काळे यांचे हे विधान अजून पुढे न्यायचे ठरवल्यास या देशात आणि समाजव्यवस्थेत one night stand ला पण जागा आहे आणि विवाह संस्थेला पण असे म्हण्यास हरकत नसावी . भारतीय व्यवस्थेने पहिले विरोध करून नंतर विधवा विवाह , संगणक आणि जागतिकीकरण पचावलेच की .
कदाचित काही वर्षांनी हे मोठ्या शहरांमध्ये असणारे लोण छोट्या शहरांमध्ये आणि ग्रामीण भागात पण जाईल . त्याचा वेग कमी जास्त असू शकतो .

लेखाच्या सुरुवातीला ज्या मित्राचा उल्लेख आहे त्याची परवा फेस बुक वर मैत्री विनंती आली . मी लगेच त्याची friend लिस्ट चाळून बघितली . त्यात "ती ' पण होती . दोघांची पण लग्न झाली होती . वेगवेगळ्या लोकांसोबत .

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुलीचं कौमार्य आणि मुलाचं कौमार्य याच्यात (सांस्कृतिकदृष्ट्या दिलेलं अवास्तव फरकाचं महत्व सोडून) काय फरक असतो?

वरदा,

जेव्हा स्त्रीपुरुष एकमेकांशी बांधिलकी ठेवू इच्छितात, तेव्हा स्त्रीला त्याची शेवटची प्रेमिका व्हायचं असतं. तर पुरुषाला तिचा पहिला प्रेमिक व्हायचं असतं. हा त्या दोघांच्या कौमार्यातील फरक आहे.

हे मी बहुतांश लोकांबद्दल म्हणतोय. अपवादात्मक प्रकरणे वेगळी.

आ.न.,
-गा.पै.

गामा पैलवान क्या बात है..

आणि हा फरक ५० टक्के पुरुषांनी उर्वरीत ५० टक्के महिलांवर संस्कृतीच्या नावाखाली लादला आहे असे जर कोणी म्हणत असेल तर बेसिकच गंडलेय.

आपल्याकडे स्त्रीच्या कौमार्याला अवाजवी महत्व दिले जाते हे नक्कीच कबूल आहे. पण पुरेसे महत्वही नाकारण्याची बंडखोरी चूकीची अन घातक ठरेल.

स्वाती२,

तुमची ही दोन विधाने परस्परविरोधी आहेत असं वाटतं :

>> संस्कृती वगैरे काही बुडत नाही आणि विवाह संस्थाही मोडकळीला येत नाही.

आणि

>> कितीही नाही म्हटले तरी परीणामांची जबाबदारी टाळणे होते आणि समाज व्यवस्थेवर कालांतराने त्याचे ओझे होते.

या ओझ्यामुळेच कुटुंब मोडकळीस येते. अशा मोडकळीस आलेल्या कुटुंबांची संख्या वाढली की विवाहसंस्था मोडकळीस येण्यास कितीसा उशीर?

आ.न.,
-गा.पै.

नाणे हवेत उडवले तर छापा पडतो किंवा काटा पडतो, ते उभे क्वचितच राहते. पण यामुळे नाण्याला तिसरी बाजू नसतेच असा समज होणे चुकीचेच.

अक्षरशः काय नडलं होतं वरदा!
Wink

बाळ ऋन्मेश, तू अजून वयाने आणि अनुभवानेपण लहान आहेस.
कळेल तुला हळूहळू.

जरा ते घटकंचुकी गुगल करच.

घटकंचुकी प्रकार मी मागेही वाचला होता आणि विस्मरणातही गेला होता म्हणून पुन्हा गूगाळून वाचले. पण मध्ययुगातील संदर्भ या आजच्या काळातील चर्चेत का येताहेत? तसेच घटकंचुकी हा वेश्याप्रकार वन नाईट स्टँड या दोन्ही बाजूंच्या संमतीने केल्या जाणार्‍या प्रकाराशी कसा संबंधित हे ही नाही समजले.

अवांतर - वयाने लहान या कॉम्प्लिमेंटबद्दल धन्यवाद Happy
अनुभवाने लहान नाही तर शून्य म्हणालात तरी हरकत नाही. मत चुकीचे असे वा बरोबर ते मांडावे अन्यथा त्या शिवाय ते चूक आहे की बरोबर हे आपल्याला कधीच समजणार नाही म्हणून माझी हि धडपड असते बस्स Happy

घटकंचुकीचा अर्थ थोडक्यात, घट म्हणजे रांजण ,कंचुकी याचा अर्थ काचोळी /ब्लाऊज.
पेशवाईतले मात्तबर लोक, सरदार वगैरे स्वखुशीने पत्नीहस्तांतरण करायचे, आधुनिक आंग्ल भाषेत याला wife swaping असे संबोधतात.
ही एलाईट मंडळी सपत्नीक ठराविक ठिकाणी जमत असत, एका मोठ्या घटात/ रांजणात स्त्री सदस्या त्यांच्या कंचुकी काढुण टाकायच्या, नंतर एक आड एक पुरुष सदस्य त्या रांजणात न डोकावता, त्यात हात घालुन एक कंचुकी काढत, ती कंचुकी ज्या स्त्रीची असेल तिच्याशी रत होण्याची परवागणी त्या पुरुषाला मिळायची.अर्थात याला स्त्री सदस्यांची अनुमती असायची .
(सदर कमेंट अश्लील वा नियमात बसत नसेल तर उडवावी, आयडी उडवु नये)

घटकंचुकी हा वेश्याप्रकार च्या स्म्दर्भात नसून विलफूल वाईफ स्वॅपींगसाठी वन नाईट स्टँड संदर्भात आहे. <<
विलफुल हे फक्त पुरूषाच्या बाजूने. बाईला यात से नसे.

http://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%98%E0%A4%9F%E0%A4%95%E0%A4%82%E0%A4%...

हे विकीभाऊ जे म्हणाले ते मी इथे टाकले.
पेशवाईने याला काय रूप दिले हे त्यात दिलेले नाही, लिंक मिळाली तर बरे होईल, मी देखील शोधतो.

घटकंचुकी ही मध्ययुगात भारतीय उपखंडात प्रचलित असलेली एक कामक्रीडा होती[ संदर्भ हवा ]. यामध्ये अनेक वेश्या पहाटेपर्यंत आपल्या खास ग्राहकांसमोर नाचगाणी करीत. गिर्‍हाइके मनसोक्त दारू पीत असत[ संदर्भ हवा ]. त्यानंतर बोल्या लागायच्या आणि जी वेश्या सगळ्यात सुंदर, तिला जास्त पैसे देवून श्रीमंत माणसे त्या रात्रीपुरती शय्यासोबतीस नेत असत. अश्या खास बायांच्या बोल्या संपल्या, की उरलेल्या वेश्या एका सजवलेल्या रांजणात आपल्या कंचुक्या, म्हणजेच चोळ्या, टाकत आणि आपले स्तन हातांनी झाकून एका वर्तुळात गोलाकार पद्धतीने ग्राहकाभिमुख उभ्या राहत[ संदर्भ हवा ]. सगळ्या बायका संपल्या, की ठरावीक रक्कम घेवून तेवढ्याच पुरुष ग्राहकांना प्रवेश दिला जाई[ संदर्भ हवा ] व हे पुरुष त्या रांजणातील एकेक कंचुकी बाहेर काढीत. ज्या बाईची कंचुकी ज्या पुरुषाच्या हाती लागेल, तो पुरुष त्या स्त्रीस रात्री शय्यासोबतीस नेई.

बाकी सरदारांच्या पत्नी म्हणजे त्या देखील मोठ्या घरातल्याच कन्या असणार, त्या यासाठी कसे तयार व्हायच्या. कि या साठी म्हणून एखाद्या गरीब बिचार्‍या मुलीला आपली पत्नी बनवले जायचे ?
पेशवाईत हे असे या लेव्हलवर होत असेल हे पटणेबल वाटत नाही.

पेशवाईविषयी एक प्रसिद्ध म्हण आहे ,ती इथे देऊ शकत नाही.
विकीपेडीयावरचा उल्लेख चूकीचा आहे.
उच्चकुलीन स्त्रीया घटकंचुकीसाठी कशा तयार व्हायच्या हा प्रश्न गौण आहे.काही तयार असतील काहींना दबावाखाली करावे लागत असेल .
हे वाचा
http://www.firstpost.com/india/naval-officers-wife-claims-senior-officer...

धिका, पेशवाईबद्दल मला स्वताला शोधून फार काही विश्वासार्ह सापडले नाही. तसेही मी ते उत्सुकता किंवा माहितीसाठी म्हणूनच शोधत होतो, इतिहासातील मुर्दे उखडण्यात बाकी काही हशील नाही. सो, त्याबद्दल नो कॉमेंटस.

याउपर आपण जी लिंक दिली आहे ती बातमी तेव्हा माझ्याही वाचनात आलेली. अर्थात या प्रकाराची मला कल्पना आहे म्हणूनच तर मी माझ्या पोस्टमध्ये याचा उल्लेख केलेला. मी स्वताही या प्रकाराचे समर्थन करत नाहीयेच, जरी ते स्त्रीच्या संमतीने असले तरीही, कारण हा प्रकार फोफावला तर दरवेळी त्यात दोन्ही बाजूच्या स्त्रियांची संमती असेलच असे नाही. कोणावर तरी जोरजबरदस्ती होत असण्याची शक्यता नेहमीच असणार.

गामांना कुणी सांगितले स्त्रीला (अनुभवी ?) पुरुषाची "शेवटची प्रेमिका " व्हायचे असते इ. ?!!
ऋन्मेष , कौमार्याचा आणि वन नाइट स्टँड चा संबंध नाही , तो वेगळ्या बहुहजारी बाफचा विषय म्हणून छान आहे पण . Happy बाकी पेशवाईत घटकंचुकी प्रकार अन त्याला स्त्रियांची अनुमती नसेलच हा समजही डिनायल चे उत्तम उदाहरण आहे.
डॉ. खरेंच्या पोस्ट्स या इथल्या इतर पालथ्या घड्यांच्या समूहात आश्वासक वाटल्या Happy

स्वाती२ आणी डॉ खरे यांना अनुमोदन. बाकी घतकंचुकी नक्की कशी करत हे पाल्हाळिक विवेचन अस्थानी वाटते.

गापैंचे वाक्य inane आहे. (वपुंच्या पुस्तकातले आहे का?) उदा 'सौंदर्य हे स्त्रीचे सामर्थ्य आहे तर सामर्थ्य हे पुरुषाचे सौंदर्य आहे' ई.ई.

ऋन्मेष , कौमार्याचा आणि वन नाइट स्टँड चा संबंध नाही , तो वेगळ्या बहुहजारी बाफचा विषय म्हणून छान आहे पण . स्मित >>>>>> मला वन नाईट स्टॅंडवरून सहज वाईफ स्वॅपिंग आठवले, पुढे कोणीतरी स्त्री-पुरुष समानता आणि दांभिकपणा आणला त्यावर मी काही टंकले पुढे कोणी कौमार्य आणले, घटकंचुकी आले, लगे हाथ पेशवाई वगैरे .. एकमेकांशी संबंध जोडण्यापेक्षा हवे ते वेचायचे Happy

मला तरी ही संकल्पना खुपच चुकीची वाटते.
sex without love is more like animals.
असेच जर केले तर आपल्यात आणि रस्त्यावरच्या कुत्र्यांमध्ये फरक तो काय??

कुत्रे जास्त आनंदी असतात. आयती बिस्किटं खाऊ शकतात. काडीचंही काम करायची त्यांना गरज नसते. इ.

बरीच चर्चा छान झाली आहे.

स्वाती २, सुबोध खरे ह्यांच्या पोस्ट्स आवडल्याच.

अजूनही एक अडचण निदान मला तरी जाणवत आहे. सगळे एकमेकांशी एकमेकांनी दिलेल्या प्रतिसादांवर चर्चा करत आहेत ते समजले, पण मूळ लेखात काय चर्चा अपेक्षित आहे हेच मला समजत नाही आहे. Sad

क्षमस्व!

ऋन्मेऽऽष: अर्थातच..
आपले मत वेगळे असू शकते. पण माझ्यामते sex is a ultimate form of love and submission between a couple.

Pages