मॉरिशियस - भाग सहावा - शिप मॉडेल फॅक्टरी

Submitted by दिनेश. on 11 August, 2014 - 04:29

मॉरिशियस - ओळख - http://www.maayboli.com/node/50140

मॉरिशियस - भाग पहिला - ल मेरिडीयन http://www.maayboli.com/node/50152

मॉरिशियस - भाग दुसरा - शुगर म्यूझियम - Aventure du Sucre http://www.maayboli.com/node/50186

मॉरिशियस - भाग तिसरा - बोटॅनिकल गार्डन, Pamplemousses Botanical Garden, Sir Seewoosagur Ramgoolam Botanical Garden http://www.maayboli.com/node/50225

मॉरिशियस - भाग चौथा - पोर्ट लुई Port Louis & Le Caudan Waterfront http://www.maayboli.com/node/50261

मॉरिशियस - भाग पाचवा - बीच टुअर Ile Aux Cerf Island (deer island) http://www.maayboli.com/node/50271#comment-3231325

शिप मॉडेल्स हा मॉरिशियसचा एक महत्वाचा निर्यात उद्योग आहे. मोठ्या बोटींची टु द स्केल अशी मॉडेल्स,
लाकडापासून केली जातात. तश्या एका फॅक्टरीला भेट दिली.. ती मॉडेल्स सुंदर होती पण किमतीही तश्याच होत्या.

१) आजची सकाळ वेगळेच रंग घेऊन आली होती

२) लॉबीमधूनच हे असे दिसत होते

३) आजचे दर्शनही वेगळे

४) रस्त्याच्या दोन्ही बाजूंना शेती

५) इंद्रधनुष्याचे वेगळेच प्रकार दिसले मला तिथे..

७)

८)

९) पोर्ट लुई मधे थोडा खोळंबा होतो खरा, पण एकदा ते पार केले कि रस्ते लहान असले तरी छान आहेत.

१०)

११)

१२) परत इंद्रधनुष्य . असा प्रकार मी यापुर्वी फक्त झीन्नत अमान च्या " सत्यम शिवम सुंदरम" मधे बघितला होता.. अर्थात त्यावेळी ते खरे वाटले नव्हते. ( नव्हतेही पण तसे असू शकते हे आता कळले )

१३)

१४)

१५)

१६)

१७)

१८) सोलर पॉवर्ड बिल्डींग

१९) चिंब पावसानं रान झालं आबादानी

२०)

२१) भूभू असा शहाणा असेल तर मी पण श्वानप्रेमी.. याच्या पाठीवरचे केस मीच विस्कटलेत

२२)

२३) शिप मॉडेल्स

२४) फॅक्टरी

२५) पूर्वतयारी

२६) छान मॉडेल आणि छानच किंमत

२७)

२८)

२९)

३०)

३१)

३२)

३३) पुढच्या भागात ज्वालामुखी बघू... चला निघू या

पुढे चालू

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त फोटो.. फोटो पाहुन सुस्कारा सोडला... आणि युरोतल्या किंमती पाहुनही Happy

तिथे रु. मध्ये पण किंमती लिहिल्यात!!!!!!!???

साधना, ते मॉरिशियन रुपये.. दोनाने गुणायचे त्याला !

बाँड.. विक्रीसाठी आहेत. नाजूक असल्याने व्यवस्थित पॅक करून देतात.

छान आहे फोटो .
मॉरिशियस आणि भारत यांच्या निसर्गात थोडे साम्य वाटते, दिनेशदा तुम्हाला काय फरक जाणवला.
मॉरिशियन रुपये फार महाग आहे, म्हणजे तुम्ही आणलेल्या सगळ्या वस्तु महाग होत्या.

कामिनी, निसर्गात साम्य आहेच पण हवामान उलट म्हणजे जून जुलै मधे थंडी तर डीसेंबर जानेवारी मधे उन्हाळा.
उसाशिवाय बाकी फक्त भाजीपाला आणि काही फळे करतात. पण सर्व देशात एकाच प्रकारचे हवामान नाही. मधल्या भागात तसेच उंचावरच्या ठिकाणांवर ( पुढच्या भागात असा एक भाग बघणार आहोत ) हवा थोडी थंड असते. आपल्याकडे थंड हवामानात होतात तशी फळे ( सफरचंद वगैरे ) नाहीत तिथे.

मी फार नाही खरेदी केली तिथे... पण गेल्यासारख्या काही वस्तू घेतल्या एवढेच.. कधी कधी हौसेला मोल नसते म्हणतात ना ते असे.

परत लिहितो... भारतासारखी स्वस्ताई नाही कुठे.

छान दिनेशदा म्हणजे घरी आणायला बरे. कलाकुसर फारच नजाकतीने केलेली जाणवतेय फोटों मधुन.
तुम्ही आणलेत की नाही ? Wink

नाहि घेतली...! ज्यावेळी गल्फ वॉर चालू होती त्यावेळी भरपूर आणली होती. ती म्हणजे दिलेल्या आराखड्यानुसार आपली आपणच अ‍ॅसेंबल करायची होती... आता एवढ्या वर्षात कुठे गेली, कुणी नेली ते पण आठवत नाही.

wow!!!!