मॉरिशियस - भाग चौथा - पोर्ट लुई Port Louis & Le Caudan Waterfront

Submitted by दिनेश. on 6 August, 2014 - 09:50

मॉरिशियस - ओळख - http://www.maayboli.com/node/50140

मॉरिशियस - भाग पहिला - ल मेरिडीयन http://www.maayboli.com/node/50152

मॉरिशियस - भाग दुसरा - शुगर म्यूझियम - Aventure du Sucre http://www.maayboli.com/node/50186

मॉरिशियस - भाग तिसरा - बोटॅनिकल गार्डन, Pamplemousses Botanical Garden, Sir Seewoosagur Ramgoolam Botanical Garden http://www.maayboli.com/node/50225

सहलीचा पहिला दिवस हा शॉपिंगचा होता. म्हणून सहप्रवासी पोर्ट लुईसला जायला उतावीळ होते. गार्डनमधून
बाहेर पडल्यावर ( म्हणजे मला बाहेर काढल्यावर ) आम्ही पोर्ट लुईस या मॉरिशियसच्या राजधानीकडे निघालो.
ब्रिटीशांनी वसवलेली हि राजधानी अजूनही या देशाचा आर्थिक केंद्रबिंदू आहे. सर्व जहाजांना इथेच यावे लागते.
बँका, विमा कंपन्याही इथेच आहेत. ( विमानतळ इथे नाही )

रस्ते अरुंद आहेत त्यामूळे वाहतुकिचा खोळंबा होतोच. सध्या त्यावर उपाययोजना चालू आहेत.

इथे जाण्यापुर्वी आम्ही एका जवळच्या डोंगरावरच्या किल्ल्यावर गेलो ( वरपर्यंत गाडी जाते ) तिथून या
शहराचे सुंदर दर्शन होते. या डोंगराच्या मागेच आणखी एक डोंगर रांग आहे आणि त्यातच त्या देशातले तिसर्‍या
क्रमांकाचे शिखर Le Pouce (812 Mtrs) आहे. ( म्हणजेच फ्रेंच भाषेत (नानाचा) अंगठा Happy ) त्यावरची चढाई
सोपी गणली जाते. माझ्याकडे एखादा जास्तीचा दिवस असता तर नक्कीच गेलो असतो.

तर चला शॉपिंगला..

१) डोंगरावरच्या किल्ल्यातून

२)

३) हा किल्ला अजूनही चांगल्या अवस्थेत आहे

४)

५)

६)

७) मागच्या डोंगररांगा

८)

९)

१०) तोफा कश्या रोखलेल्याच हव्यात, नाही का ?

११) Champ de mars racecourse

१२)

१३) बंदरातला समुद्रही निळाशारच आहे

१४) वासू सपना इल्ले Happy

१५)

१६) सर अब्दुल रझाक यांच्या नावाची कमान ( शहरात उतरल्यानंतर )

१७) चालत्या गाडीतून टिपलेला एक मॉरिशियन चेहरा

१८)

१९)

२०) तिथले एक फाइव्ह स्टार हॉटेल

२१) इथून पुढचे फोटो Le Caudan Waterfront या भागातले.

२२) तिथे नमस्ते नावाचे इंडीयन रेस्टॉरंट आहे. पदार्थाची चव खास नाही, दर मात्र भरपूर महाग.

२३) लाल पाटी दिसतेय, ती नमस्ते ची

पण बाकी खायला प्यायला भरपूर आहे. फळांचे ताजे रसही छान मिळतात.

२४) बंदरातले सायलोज

२५)

२६) तिथलाच कॅसिनो

२७) या इमारतीत दोन्ही बाजूला कपड्यांची दुकाने आहेत

२८)

२९)

३०)

३१) हा सबवे ओलांडून तूम्ही स्ट्रीट बजार मधे पोहोचता

इथे मात्र तूमच्या बार्गेन कौशल्याला भरपूर वाव आहे. दुकानात ५०० ला मिळणारी वस्तू इथे १०० ला मिळू शकते.
पारखी नजर मात्र हवी. मला तसा धोका दिसला नाही पण खिसा, पाकिट संभाळायच्या सूचना ड्रायव्हरने दिला होता. मला इथे काही चांगल्या वस्तू मिळाल्या.

३२) जरा फसवा फोटो

३३) दुबईच्या मॉल्सच्या मानाने पिटुकले मॉल्स आहेत तिथे ( दुबईला पण जायचे आहे आपल्याला )

३४)

३५)

३६)

३७) हा पूल (म्हणे) "कुछ कुछ होता है" चित्रपटात आहे

३८) तिथे दिसलेल्या काही जास्वंदी

३९)

४०)

४१)

४२) ही कमान "गरम मसाला" चित्रपटात आहे.. पण त्यावेळी हा भाग मोकळा होता.

४३) वेगळ्या आकाराची तगर

४४)

४५) Blue Penny Museum आतून बघायला वेळ नव्हता Sad

४६) ही पण चिमणीच

४७)

४८) तिथल्या मॉल्समधे सुव्हेनीयर्स् ची रेलचेल होती. पण मला खास मॉरिशियन काहीतरी हवे होते.
भरतकाम केलेले टेबलक्लॉथ घेतले. त्यावरचे भरतकाम खासच आहे. ( अवल आणि शिष्या प्लीजच नोट)
याचे नाव विचारले तर स्लेव्ह्ज असे सांगितले. साधे टाके वापरून फारसे डीटेलिंग न करता छान परिणाम साधला आहे.

पुढे चालू

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Sundar

मस्त मस्त मस्त.

जास्वंद आणि चिमण्या सुरेख.

सात नं.चा फोटो बघून मला माळशेज घाटातून केलेल्या प्रवासाची आठवण झाली असेच ढग उतरायचे डोंगरावर, मस्त वाटायचं बघायला.

Surekh ch aahe ek n ek photo...
Baher chya deshatil photo madhun tithali kamalichi swachhta, taap-teep ani shista janawat rahate...
ani apalya deshi ........... no bolalele bara...

अप्रतिम फोटोज...

छत्र्या, चिमण्या, फुलं, निसर्ग, नि़ळाशार समुद्र सगळेच छान... विशेष म्हणजे भरत काम!

ती छत्र्यांची आयडीया छानच होती.. उन्हापावसापासून संरक्षणही आणि सजावटही.

असे भरतकाम सर्व टेबलक्लॉथभर आहे. छान दिसतोय तोही. (मी फक्त एका छोट्या भागाचा फोटो काढलाय. )