लडाख ट्रीपसाठी माहिती हवी आहे.

Submitted by वेल on 6 August, 2014 - 02:27

जुन्या प्रश्नांची उत्तरं मिळाली म्हणून काही नवे प्रश्न

३१ ऑगस्ट ह्या दिवशी श्रीनगर येथून पुढे आम्ही लेह इथे जाणार आहोत त्यामुळे त्या प्रवासासाठी काही वस्तू श्रीनगर मधून घेउन जाव्यात का?

जसे ऑक्सिजन सिलिंडर (मला सध्या खूप सर्दी आहे आणि मुंबईतला साधा एक जिना चढताना धाप लागते.) प्रवासात खाण्यासाठी ताजी फळे, ड्रायफ्रुटस.. पाण्याच्या बाटल्या. त्या थंडीत साधे पाणे पिववते का, (अ‍ॅक्लमटायझेशन साठी खूप पाणी प्यावे लागते ना?) गरम पाण्याचा थर्मास न्यावा का? रस्त्यात धाबे असतात का तिथे गरम पाणे प्यायला मिळेल का? धाब्यावर मॅगी मिळते त्यात घालायला त्यांच्याकडे भाज्या / अंडी असतात का? का ड्राय वेजिटेबल्सची पाकिटे घेऊन जावीत?

झोझिला ओलांडताना खूप वेळ लागला तर वेळ जावा ह्यासाठी काही सल्ला द्याल का?

हा प्रश्न खास त्यांच्यासाठी जे टूर बुक करून गेले नव्हते. आम्ही सुद्धा स्वतःचे स्वतः जाणार असल्याने पैसे ऑन द स्पॉट भरावे लागणार ह्या दृष्टीने पैसे कसे कॅरी करावेत. तिथे पैसे काढायला काय आणि कुठे ऑप्शन आहे? कार्ड पेमेण्ट चालते का?

तळटीप - केदार, सेनापती, मार्को पोलो, साधना-जिप्सी-इंद्रा ह्यांचे लेख वाचले आहेत. ह्याशिवाय devilonwheels हा ब्लॉगसुद्धा वाचला आहे काही जणांशी बोललेही आहे, तरीही प्रश्न आहेतच. आल्यावर ह्याच प्रश्नांची मी माझ्या अनुभवातली उत्तरं लिहेन.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूपच दिवस आहेत तुमच्याकडे. श्रीनगर, पहेलगाम आणि गुलमर्ग सहज जमू शकेल. अर्थात तुम्ही इतर कोणती ठिकाणं बघणार त्यावर ही हे अवलंबून आहे. आम्ही जून जुलॅ मधे गेलो होतो गेल्या वर्षी आणि थंडी फार नव्हती. कापूर घरूनच घेउन जावा. पण तरिही वईद्अकीय मदतीची आवश्यकता पडू शकते. आणि त्या साठी लेह मधले सोनम नोरबू हॉस्पिटल अतिशय उत्तम आहे. श्रीनगर नंतर कारगिलला मुक्काम आणि दुसर्या दिवशी लेहला पोहोचता येते. श्रीनगर बेस ठेवून तुम्ही पहलगाम, गुलमर्ग करू शकता आणि मग लेह व्हाया कारगिल.

वेल सॉरी जरा आश्चर्य वाटले म्हणून विचारते आहे. तू जिप्सी,इन्द्र आणी तसेच साधनाचे लडाख टूर प्रचि आणी वर्णन वाचले नाहीत का? वाचले नसशील तर वाच. बाकी मदत करतीलच. आगाऊपणाबद्दल सॉरी.

तुला व तुझ्या जवळच्याना अनेक शुभेच्छा.:स्मित:

वेल, http://www.maayboli.com/node/34511 हे वाचा.
काही विचारायचे असेल तर संपर्क करु शकाता. मी दोन वर्षांपुर्वी जाऊन आले आहे. लिहीण्याचा कंटाळा.

रणजीत पराडकर आणि जिप्सीच्या धाग्यावर माहीती मिळेलच. तरी शक्य तितकी द्यायला आवडेल.

१. गरम कपडे ( इनर्स ) दिल्लीत विकत घ्या. कानटोपी आवर्जून घ्या. तसंच लडाख साठी वेगळ्या प्रकारचे गरम कोट मिळतात ते ही घ्या.
२. तुमचं राहण्याचं बुकींग झालं असेल तर स्लीपिंग बॅग्जची गरज नाही. हीटर किंवा बुखारीची सोय असते. पण फोनवर बोलून कन्फर्म करून घ्या. हल्ली गरम पांघरुणं मिळतात.
३. लेहला गर्दी जास्त असते. तिथलं बुकींग आधी करा. डिस्कीटला ह्युंडेर या गावात छान गेस्ट हाऊसेस आहेत. त्यांचं बुकींग दिल्ली किंवा लेहमधे होतं.
४. लेहला गेल्यानंतर सुमो आणि मारुती जिप्सी वाले खूप जण भेटतात. त्यांची युनियन असते. रेट्स कमी होत नाहीत. पण अव्वाच्या सव्वा मागतात का हे पाहण्यासाठी चार ठिकाणी चौकशी करावी. (श्रीनगरमधील लोकल माणसाची गाडी हायर केली तर खूप भाव सांगण्याची शक्यता असते. एखादे वेळी रीझनेबल पण मिळून जाईल).
५. कुणी पेशंट नसेल तर ऑक्सिजन सिलिंडरची गरज पडू नये. चार दिवस आराम करा. त्याने शरीर वातावरणाशी जुळवून घेतं. लेह वरून डिस्कीटला जाताना खारदुंगला पासला त्रास होतो. खलसर वरून तुम्हाला परतापूर आणि पॅनामिकचे गरम पाण्याचे झरे अशा दोन ठिकाणी जाण्यासाठी रस्ते आहेत. वाळूची बेटं देखणी आहेत. पाठीवर दोन उंचवटे (काय म्हणतात त्याला) असलेला उंट, केसाळ कुत्री आणि याक पहायला मिळेल. युंडेर गावातली शाळा, मायनस तापमानात फिरणारी उघडी मुलं हे अनुभवण्यासारखं आहे. या गावात एक मिल आहे.त्याच्याकडे मिळणारं औषधी तेल आणि शिलाजीत अस्सल आहे. पुढारी दैनिकाने उभारलेलं हॉस्पिटल पाहण्यासारखं आहे.

लडाखबद्दलचे मायबोलीवरचे सगळे धागे वाचले. तरीसुद्धा प्रश्न पडतच आहेत. (रश्मी सॉरी काय असतं ग, मला माहितच नाही.. Wink )

आम्ही हॉटेल बुकिंग आधी करणार नाही आहोत. केदारच सजेशन पटलय म्हणून. त्या त्या गावात पोहोचल्यावर गेस्ट हाऊस आणि हॉटेल्स पाहून मग ठरवणार कुठे राहायचं. याचं कारण आम्हाला ट्रॅव्हलिंगचा खरच जास्त येईल कदाचित. सोबतचे पाच जण पँगाँग त्सो ला बाईक वरून जाणार् आहेत तेव्हा गाडीचा खर्च फक्त आम्हा दोघांवर पडेल. सो राहाण्यात एक्दम काटकसर.

स्वर्णसुंदरी - आम्ही दिल्लीत जात नाही आहोत. मुंबई श्रीनगर डायरेक्ट फ्लाईट आहे. म्हणून गरम कपड्याबद्दल प्रश्न, कुठल्या प्रकारचे कपडे आणि किती घेउन जायचे. मनालीला भर डिसेंबरमध्ये वापरलेले गरम कपडे पुरतील का? अधिक काही लागेल? लेहमध्ये हॉटेल्स नाही मिळाले तरी चांगले गेस्ट हाऊस नक्की मिळेल म्हणून रिलॅक्स्ड आहोत. सोबत पेशण्ट कोणीच नाही पण आपणच पेशण्ट होऊ नये म्हणून एक्स्ट्रा खबरदारी. श्रीनगर (राहाणे) कारगिल (राहाणे) मग लेह (राहाणे) मगच लडाखमध्ये भटकणे असेच ठरले आहे. जिप्सी आणि सुमो मध्ये सात जण मावणार नाहीत असे वाटते,

स्वाती तुम्हाला पीएम करते.

निर्मल तुम्हालाही पीएम करते अजून थोडे डिटेल्स मध्ये सांगू शकाल तर खूप बरं होईल,

अजून कोणी काही सांगू शकाल तर प्लीज मदत करा.

मुंबईत वरून घालायचे वूलन कोट मिळतील. लक्सचे इनर्स सुद्धा चालतील. याशिवाय डोकं आणि छाती यांचा विंड चिल इफेक्ट आणि मायनस टेंपरेचरपासून बचाव करा. HAPO , HACO, Blister याविषयी गुगळून माहीती करून घ्या. पायातले सॉक्स जाड असू द्या. शूज देखील जाड आणि हाय अल्टीट्यूडला पायाचं रक्षण करणारे असू द्या. गुगळून घ्या. आता लक्षात नाहीत डिटेल्स.

स्कीन साठी चांगली कोल्ड क्रीम जवळ ठेवा. तिथल्या मेडीकल मधे एक बाम मिळतो त्याचं नाव लक्षात नाही. तो छान आहे आर्मीच्या स्टोअर मधेही मिळतो. पायाच्या भेगा असतील तर ते क्रीम ठेवा. जाण्याआधी किमान आठवडाभर आधी डेंटीस्टकडे चक्कर टाका. तिथे गेल्यानंतर ठणका लागला तर असह्य होतं.

श्रीनगर पासून रस्त्याने जात असल्याने acclimatisation to high altitude आपोआप होईल. तरी देखील पहीले दोन दिवस विश्रांती घेतली तर पुढची ट्रीप सुखाची होईल.

स्व.सु - धन्स. मस्त टिपा. वुलन कानटोपी, वुलनचे जाडे सॉक्स, सन्स्क्रीम, लक्स इनरवेअर, कोल्डक्रीम सगळं रेडी आहे मनाली साठी घेतल होतं. तो बाम कशासाठी लागतो. वेगळा असतो का तिथे वापरायला? इथे कुठे मिळेल का आर्मी स्टोअरला नो अ‍ॅक्सेस. जाडे शूज म्हणजे नक्की कसे? नॉर्मल स्पोर्ट्स शूज नाही चालणार का?

कापूर कसा उपयोगी पडतो ते कोणी तरी सांगा ना,

माझी डेंटल ट्रीटमेंट चालू केली आहे आत्ताच पण "ह्यांनासुद्धा" सांगायला हवं डेंटिस्टकडे जाउन या...;)

अगं वेल, जिप्सीभाऊंचे बाफं वाचून काढ.

http://www.maayboli.com/node/42503

हा बाफ आणि जाऊन आल्यावर त्याने अत्यंत सुंदर मालिका लिहिली ती वाच. त्याच्या लेखनात मिळेल.

श्रीनगरवरून कारगिलला जाताना सोनमर्गचा एक स्टॉप होतोच तिथे एक दिवस राहावे का? पाहाण्यासारखे खूप काही आहे का?

>> बर्फात खेळायचे असेल तर कोल्होय ग्लेशियर वर जाता येईल. पण श्रीनगर ते कारगिल मध्ये कुठलाही स्टॉप घेण्याची गरज नाही.

ओळखीच्या एकजण लडाखला गेल्या होत्या त्यांनी एका ड्रायव्हरचा नंबर दिला होता तो दहा हजार अ‍ॅडव्हान्स मागतो आहे. भरावा का >>

हरकत नाही. पण जर तुम्ही लेह टॅक्सी स्टॅण्डवर गेलात तर लिहिलेल्या रेटपेक्षा २०% वगैरे कमी मध्ये मिळतील. लेह टॅक्सी रेट असे गुगल करा, तिथे चार्ट मिळेल.

सात जण एका गाडीत मावतील अशी कोणती गाडी बुक करावी. माबोकरांच्या माहितीत लडाखचा कोणी चांगला ड्रायव्हर आनि त्याची स्वतःची सात जणांना माववेल अशी गाडी आहे का? >>

सात जण एका गाडीत डे ट्रीप्स असतील तरी जास्त होतात, पण इनोव्हा, स्कॉर्पियो बघा.

आम्ही सप्टेंबरच्या पहिल्या दुसर्‍या आठवड्यात तिथे असू त्या दृष्टीने गरम कपडे किती न्यायला हवेत? >>> गरम कपड्यांची खूप आवशक्ता नाही. सप्टे एन्डला थंडी वाजेल. इनर बिनर विकत घ्यायच्या भानगडीत पडू नका. स्वेटर मात्र जरूर न्या. रात्री कामास येतील.

जाताना काय सामान नेणे मस्ट आहे? >> काहीच नाही. पण तुम्ही हॉप्स करणार असाल तर खायचे काही सामान जवळ बाळगणे आवश्यक आहे . ते सोडून काही नको.

कापूरचा फायदा नक्की कसा होतो? किती न्यायला हवा? >> नका नेऊ. कापूर बिपूर वापरू नये खरं तर. पण लोक वापरतात. तो फक्त ज्वालाग्राही आहे, ह्याचा अर्थ असा नाही की तो विरळ ऑक्सीजन असेल तिथे ऑक्सिजन अमाप पैदा करतो.

आम्ही हॉटेल बुकिंग आधी करणार नाही आहोत. केदारच सजेशन पटलय म्हणून. त्या त्या गावात पोहोचल्यावर गेस्ट हाऊस आणि हॉटेल्स पाहून मग ठरवणार कुठे राहायचं. >>

गुड ! लेहला चंगस्पा मार्केट मध्ये जाऊन रहा. मजा येईल. माझ्या सोबत मुलं असूनही मी असे केले कारण स्वतःची गाडी होती आणि आम्हाला सो कॉल्ड बुक्ड / फिक्स व्हेकेशन ऐवजी असे करायचे होते. तुम्ही विचार करूनच करा. लेह मध्ये बार्गेन खूप चालते.

श्रीनगर आणि जमल्यास पहलगाम गुलमर्ग पाहावे. श्रीनगरवरून पहलगाम गुलमर्ग असे जाऊन यायला तिथे फिरायला किती वेळ लागेल? पहलगाम आणि गुलमर्ग ह्यातील एकाच ठिकाणे जाणे जमणार असेल तर कुठे जावे? श्रीनगरमध्ये काय पाहावे? खरेदी कुठे करावी? >>

श्रीनगर मध्ये नेहमीचे दाल लेक फक्त पाहा. पण बोट राईड करायची असेल तर त्याला नगिना लेक मध्ये ने म्हणा. तो रस्ता दाल मधून जातो.
श्रीनगर - गुलमर्ग एका दिवसात होऊ शकते. फक्त सकाळी लवकर निघा. हवे असेल तर श्रीनगर मध्ये दोन दिवस राहा. पहिल्या दिवशी गुलमर्ग करून या, दुसरा दिवस निवांत श्रीनगर मध्ये घाला म्हणजे दगदग होणार नाही. (तुम्ही श्रीनगर मध्ये जाताच कशाला? दिल्ली - लेह असे विमान आहे.)

बरेच लोकं डायमॉक्स आधीच घ्या असे सुचवतात. मी सांगेन घेऊ नका. एकदा घेतली की रोज घ्यावी लागते. लेह खूप मोठे आहे आणि डॉक्टर्स आहेत. त्रास झाला तर त्यांच्याकडे जा, पण उगाच कोणाच्या फुकट सल्यावर काही औषधं घेऊ नका.

वेल प्रचि आणी बाफाचे सोड पण तू जिप्सीला विपु पण करु शकली असतीस. तुला मदत व्हावी या हेतुनेच मी लिहीले, माझा तुला दुखवायचा वा कमी लेखायचा उद्देश नव्हता.:अरेरे:

हो आणी केदार जाऊन आलेत हे पण मी विसरले त्या बद्दल सॉरी. कारण भटकन्ती म्हणले की डोळ्यासमोर जिप्सी आणी दिनेशजीच येतात.

हो की केदार पण जाऊन आलाय. स्वारी हां केदार. तुझी रोड ट्रिप विसरले याला क्षमाच नाही. पण वयापरत्वे वगैरे ..... Happy

अग रश्मी इतक्या छोट्या गोष्टीला सॉरी म्हणू नकोस असं मला म्हणायचं आहे, असं सॉरी म्हणत राहिलीस ना तर माबोकरांना नको त्या सवयी लागतील, नाही का?

प्लान करतानाच सगळे बाफ वाचले होते. आता परत वाचतेय. आणि नोट्स काढते आहे.

केदार, धन्स. माझ्या डोक्यातही कापूरचा हाच पॉइंट होता म्हणून विचारल.

कारण भटकन्ती म्हणले की डोळ्यासमोर जिप्सी आणी दिनेशजीच येतात.>> रश्मी Wink

दिनेशदा तर आंतरराष्ट्रीय पर्यटक आहेत. त्यांनी जेव्हढे देश पाहीलेत तेव्हढे मा. राष्ट्रपती प्रतिभातैंनी पण पाहीलेले नसतील. माझा तर असा प्रस्ताव आहे की, दिनेशदांनी गरजू मायबोलीकरांसाठी मॉरीशस किंवा स्वित्झर्लंडची ट्रीप प्रायोजितच करावी.

श्रीनगरचा विषय आला आहे म्हणून इथेच विचारतो .सप्टेंबरमध्ये तिसऱ्या चौथ्या आठवड्यात काय पाहता येईल ?बर्फ आणि फुले पाहायची नाही आहे .जम्मूला परत येताना ट्राफिकमुळे रात्री साडेनऊची झेलम मिळेल का ?