आम्ही काहि मित्र जुलै अखेरीस "लेह-लडाख"ला जाण्याचा बेत करत आहोत. खरंतर मुंबई-श्रीनगर-कारगिल-द्रास-लेह आणि लेह-मनाली-दिल्ली-मुंबई असा प्लान होता, पण सुट्ट्या आणि बजेट दोन्ही जुळत नसल्याने आंतरजालावर Make My Trip मध्ये लडाख पॅकेज पाहिले आणि आमच्या वेळेत आणि बजेटमध्ये बसत असल्याने जाण्याचा विचार आहे.
तरः
१. यापूर्वी Make My Trip तर्फे कुणी जाऊन आले आहे का?
२. असल्यास अनुभव काय?
३. एकुण पॅकेज व्यतिरीक्त Hidden Cost असते का?
हे आम्ही पाहिलेले लडाख पॅकेज
एकुण खर्च २७-३० हजार (यात दिल्ली ते लेह आणि परत असा विमानखर्च समाविष्ट आहे)
1. Round trip airfare with taxes in economy class (Delhi-Leh and Return)
2. Accommodation for 6 nights at specified hotels in Leh with attached bath
3. Stay on MAP basis (7 breakfasts and 7 dinners)
4. Transportation by non air-conditioned Qualis/ Tavera/ Scorpio/ Innova for arrival/ departure transfers
5. Assistance at the airport at the time of arrival and departure
6. Accommodation in Standard and Deluxe Category Hotels.
7. Accommodation for 1 night in Nubra Valley
8. Lunch on arrival in Leh and during Pangong Lake visits once during the stay
9. Sightseeing tours as per the itinerary (suitable vehicle will be used as per the group size)
10. Miscellaneous charges like inner-line permits, porter services at hotel and airport and all applicable luxury/ road taxes.
ह्या लिंकवर ७ रात्र आणि ८ दिवसाची Itinerary आहे:
http://www.makemytrip.com/holidays-india/7578-amazing_ladakh_from_delhi....
आम्हाला तरी हे पॅकेज चांगले वाटत आहे, पण यापूर्वी मेक माय ट्रिप बद्दल कुणाचा अनुभव असेल तर कृपया शेअर करा.
सेना ला विचार.........तो जाउन
सेना ला विचार.........तो जाउन आला आहे .......
जिप्स्या, आणखी किती दिवस
जिप्स्या, आणखी किती दिवस मित्रांसोबतच जाणारेस?? दगड्याकडुन दिक्षा घेच तु आता..
मी या साईटवरून विमान व
मी या साईटवरून विमान व रेल्वेची तिकीटे (विमानाची आंतरराष्ट्रीय सुद्धा) बुक केली आहेत. त्याबद्दलचा अनुभव चांगला आहे. पण पॅकेजचा अनुभव नाही.
७ दिवसाचे २७-३० हजार???
७ दिवसाचे २७-३० हजार???
योडी उदय, फारएण्ड धन्स ७
योडी

उदय, फारएण्ड धन्स
७ दिवसाचे २७-३० हजार???>>>>सेना, ७ रात्र आणि ८ दिवस. यात दिल्ली ते लेह विमानखर्च, २ स्टार हॉटेलमध्ये वास्तव्य ६ दिवस आणि एक रात्र नुब्रा व्हॅलीत, ७ ब्रेकफास्ट, ७ डिनर आणि २ लंच, साईटसिईंग इ> समाविष्ट आहे.
जास्त आहे कि कमी?
माझ्यामते जास्तच.. एक सांगु
माझ्यामते जास्तच..
एक सांगु का तुम्ही स्वत: प्लान ठरवुन गेलात तर कमीत पडेल..
तसेही ह्या लिंकवर http://www.makemytrip.com/holidays-india/7578-amazing_ladakh_from_delhi....
जे बघणार आहत ते अर्धवट आहे रे..
मी लडाख प्लॅन करत होतो आणि
मी लडाख प्लॅन करत होतो आणि त्यासाठी जे FIT कोट्स घेतले होते त्यानुसार २७-३० हजार पर हेड हि कॉस्ट जास्त आहे. मुंबईत बरेच टुर ऑपरेटर याहुन बर्याच कमी पैशात हिच आयटेनररी देतील. मित्रांचा ग्रुप असेल ( ५ ते ६ प्रत्येक गाडीत) तर लेहला जाउन १२ ते १५ हजारात लँड पॅकेज निगोशिएट होऊ शकते.
ही itinerary बघ http://crisscrossingindia.wordpress.com/2012/03/19/trans-himalayan-jeep-...
फारएण्डला अनुमोदन... मी या
फारएण्डला अनुमोदन...
मी या साईटवरून विमान तिकीटे बुक केली आहेत. त्याबद्दलचा अनुभव चांगला आहे.
सेनापती, मग तुम्ही प्लीज
सेनापती, मग तुम्ही प्लीज लिहाल का कुठे जावे अजुन काय पहाता येइल ते?
इथे अजून कोणी जाउन आले असेल तर ते प्लीज कुठे रहायचे, कायकाय फिरले हे साधाराण लिहू शकेल काय?
धन्यवाद पाटील. मी लिंक चेक
धन्यवाद पाटील. मी लिंक चेक करतो.
तुम्ही स्वत: प्लान ठरवुन गेलात तर कमीत पडेल..>>>>ओके.
ओक्के. मी कॉल करतो तुला संध्याकाळी. चंदनकडुनही काहि माहिती घेतो. 
जे बघणार आहत ते अर्धवट आहे रे.>>>>
When preparing to travel lay
When preparing to travel lay out all your clothes and all your money. Then take half the clothes and twice the money
स्वाती... मी लडाख वर इथे लेखमालिका लिहिली होती. त्यातुन तुम्हाला बरीच महिती मिळेल. तरी मी आत्ता एक पोस्ट तयार करतो. लिहुन झाले की इथेच पोस्ट करतो..
ओक्के. मी कॉल करतो तुला
ओक्के. मी कॉल करतो तुला संध्याकाळी.
फोन केलास तर शमिका घेईल.. 

>>> भावा मी बोटीवर आहे रे..
मी ३ तारखेनंतर भेटीन फोनवर..
लेह- लडाखला जाण्यासाठी
लेह- लडाखला जाण्यासाठी जून-जुलै हा सर्वोत्तम कालावधी आहे. मे महिन्यात कदाचित बर्फ पडल्यामुळे रस्ते अधून-मधून बंद असू शकतात तर ऑगस्टमध्ये गरम होऊ शकते. आम्ही ऑगस्ट मध्ये गेलो होतो आणि चक्क तिथे गरमी होती..
पण सप्टेंबर शेवटाला पुन्हा गारठा सुरू होतो.
कसे जावे -
१. दिल्लीहून मनाली मार्गे (जिस्पा - सरचू करत) (किमान २ दिवस)
२. जम्मू-श्रीनगर मार्गे द्रास-कारगिल करत लेह गाठावे. (किमान २ दिवस)
या दोन्हीमध्ये वातावरणाशी समरस होत वर चढत गेल्याने लेह येथे पोचल्यावर विरळ हवेचा त्रास होत नाही. विमानाने थेट लेह येथे गेल्यास तसा त्रास होऊ शकतो.
पोचल्यावर १ दिवस पूर्ण आराम करावा. आसपास पायी भटकणे, मार्केट मध्ये फिरणे वगैरे करू शकता.
लेहमध्ये काय बघावे -
भारत-चायना सीमेवर असणारे १५००० फुटांवरील 'पेंगोंग-सो, सो--मोरीरी हे २ तलाव,
चांग-ला
''१८३८० फुटांवरील जगातील सर्वोच्च उंचीचा रस्ता खरदूंग-ला,
नुब्रा - हुंदर
शक्य असल्यास द्रास - कारगिल
मुलबेक - लामायुरू गोम्पा
ठिकसे गोम्पा, सिंधूघाट दर्शन, शांतीस्तूप आणि 'शे पॅलेस
ही जुजबी यदी आहे आणि हे बघायला किमान ७-८ दिवस हवेत.\
झांस्कर पण बघु शकता.. ह्यासाठी वेगळे २ दिवस हवेत..
आणि हो जेवायला मार्केट मधल्या हॉटेल ड्रिमलँडमध्ये नक्की जा..
धन्यवाद सेनापती.
धन्यवाद सेनापती.
धन्स सेना या दोन्हीमध्ये
धन्स सेना
या दोन्हीमध्ये वातावरणाशी समरस होत वर चढत गेल्याने लेह येथे पोचल्यावर विरळ हवेचा त्रास होत नाही. विमानाने थेट लेह येथे गेल्यास तसा त्रास होऊ शकतो.>>>>येस्स. हे ऐकलं होत<
खरंतर जम्मू-श्रीनगर मार्गे द्रास-कारगिल-लेह मार्गेच जायचे होते पण सुट्ट्यांचा मेळ बसत नाहीए
हातात फक्त ११ दिवसच असल्याने विमानाने जायचे ठरले तर बजेट वाढतोय. बघु जुलै अखेरीस जमले तर नाहीतर मग नंतर प्रॉपर प्लान करून स्वतःच जाऊन येऊ. 
बेक्कार आहे. मी भारतात
बेक्कार आहे. मी भारतात जाण्यासाठी घेतला होता.. म्हटले एकदा घेवुया.. मग पुन्हा ईमरजेन्सी होती म्हणून घेतला. दोन्ही वेळा जाणवले... जबाबदारी घेत नाही. ट्रानझिट विसा वगैरेची नीट माहीती नसते. ठोकून देतात काही प्रोबलेम नाही.
एकदा विमान कॅनसल झाले, तेव्हा खूप त्रास झाला. ट्रानझित विसा न्हवता..वगैरे प्रॉबलेम.
दुसर्यांदा चुकले, तेव्हाही त्रास झाला. ( हाल्ट विमान सुटले व नंतर आमचे विमान पोचले).
कॉन्टीनेंटल होते.. बंडल आहे हे. सेवा बेक्कार...
जम्मू-श्रीनगर मार्गे
जम्मू-श्रीनगर मार्गे द्रास-कारगिल-लेह मार्गेच जायचे होते पण सुट्ट्यांचा मेळ बसत नाहीए हातात फक्त ११ दिवसच असल्याने
>>> जिप्सी हे बघ..हे असे करता येइल. आवडल्यास अंतरे देतो..
दिवस १ - जम्मु येथे पोचणे. (विमानाने)
दिवस २ - जम्मु ते श्रीनगर.
दिवस ३ - श्रीनगर ते द्रास मार्गे कारगिल.
दिवस ४ - कारगिल ते लेह. (फोटु-ला मर्गे मुलबेक-लामायुरु करुन)
असे केल्याने लेह मध्ये गेल्यावर १ दिवस आरम करायची गरज नाही.
दिवस ५ - लेहमध्ये भट्कंती. ठिकसे गोम्पा, सिंधूघाट दर्शन, शांतीस्तूप आणि 'शे पॅलेस, लेह राजवाडा, मार्केट वगैरे.
दिवस ६ - खार्दुंग्ला - नुब्रा.
दिवस ७ - नुब्रा - हुंडर परत लेह.
दिवस ८ - लेह - चांगला - पेंगोंग लेक
दिवस ९ - पेंगोंग लेक - लेह
दिवस १० - अल्ची, माग्नेतिक हिल, गुरुद्वारा वगैरे
दिवस ११ - विमानाने दिल्ली मार्गे मुंबई साठी प्रयाण.
मला ते पॅकेज स्वस्तच वाटलेलं.
मला ते पॅकेज स्वस्तच वाटलेलं. पण बाकीचे म्हणतायत तर असेल. पण तसंही स्वत: सगळं बुक करून जाणं आणि एखाद्या यात्राकंपनीतर्फे / साईटवरून बुक करणं यात तफावत असणारच. दोन्हीचे फायदे-तोटे आहेत.
मामी... तसंही स्वत: सगळं बुक
मामी...
तसंही स्वत: सगळं बुक करून जाणं आणि एखाद्या यात्राकंपनीतर्फे / साईटवरून बुक करणं यात तफावत असणारच. दोन्हीचे फायदे-तोटे आहेत.
>>> बरोबर. पण आपला स्वत:चा छोटा ग्रुप असेल तर आपल्याल हवी तशी आय्टेनरी ते देउ शकतात ना. मी एक उदा. वर दिलेच आहे. ते पण स्वस्तात पडेल.
मी नुकतेच सिक्किमसाठी स्वत: सर्व प्लान आखुन ट्रिप नक्की केली. खर्चात प्रचंड फरक पडला..
आम्ही काहि मित्र जुलै अखेरीस
आम्ही काहि मित्र जुलै अखेरीस "लेह-लडाख"ला जाण्याचा बेत करत आहोत>>
वाह!!!
आता तिकडचं सौंदर्य तुझ्या नजरेने पहायला मिळणार.
जून ते सप्टेंबर हा काळ
जून ते सप्टेंबर हा काळ लेह-लडाखमध्ये टुरिस्ट सीजन असतो. या काळात सगळ्याच गोष्टींच्या किमती जाम वाढतात तिकडे. विशेषतः विमानाच्या तिकिटांचे दर. मी अडीच वर्षे राहिले आहे लेहला.
७ दिवसांसाठी २७-३० हजार मला ठीक वाटते.
स्वतः प्लॅन करून गेल्यास खर्च कमी होईलच, पण बुकिंग्ज वगैरे स्वतःच करावी लागतील.
याशिवाय वहिनींचा मेल आयडी दिल्यास मी शॉपिंगबद्दल स्पेशल टीप्स, दुकानांची नावे वगैरे देऊ शकेन.
प्राची.. अर्थात. पण
प्राची.. अर्थात.
पण प्रत्येकाचे फिरण्याचे उद्दिष्ट्य वेगळे असते ना. आम्ही गेलो होतो तेंव्हा बाईक पेट्रोल हा एक भयंकर खर्च होता. त्यामुळे आम्ही राहायला होम स्टे घेतला होता. दिवसाला ५०० रुपये इतकाच खर्च राहाण्यावर. रात्री जेवायला मार्केट मध्ये. दुपारी जिथे असू तिथे मिळेल ते. काही नाही मिळाले तर सोबत आहे ते खायचे आणि वेळ मारून न्यायची अशी ट्रीप होती त्यामुळे लो बजेट होती.
मेक माय ट्रीप वाले २ स्टार हॉटेल देत आहेत म्हणजे त्याचा खर्च सहज वाढणार.
जीप्स्या तूला नेमक्या कुठल्या प्रकारची ट्रीप करायची आहे?
शॉपिंगबद्दल स्पेशल टीप्स >>>
शॉपिंगबद्दल स्पेशल टीप्स
पण तेंव्हा मला माहीतच नव्हते की माबोवरील कोणी तिथे असते.. 
>>> आम्ही गेलो होतो तेंव्हा सांगितले असतेस तरी
जीप्स्या तूला नेमक्या कुठल्या
जीप्स्या तूला नेमक्या कुठल्या प्रकारची ट्रीप करायची आहे?>>> अगदी हाच प्रश्न मी विचारणार होते. जर अॅडव्हेंचर म्हणून ट्रीप करायची असेल तर स्वतःच ट्रीप प्लान करावी. त्याची मजा वेगळीच.
पण जर मस्त निवांत फिरण्यासाठी ट्रीप्ला जायचे असेल तर २७ हजार जास्त नाहीत. कसलाही ताप नाही डोक्याला.
मेकमायट्रीपचा आम्हांला अनुभव चांगला आला आहे दरवेळी. अर्थात, आम्ही फक्त विमानाची तिकिटं बुक केली आहेत या साइटवरून. पण चार्जेस अगदी योग्य होते दरवेळी. उलट विमानकंपन्यांच्यापेक्षा जरा स्वस्तच मिळाली आहेत तिकिटं कधीकधी.
हॉटेल ड्रीमलॅण्ड आमचेही फेवरीट हॉटेल होते. तिथे 'व्हेज हैद्राबादी' अवश्य ट्राय करा.
चायनीजसाठी ड्रीमलॅण्डजवळच 'चॉपस्टीक' आहे, ते मस्त आहे.
अजून आठवेल तसे लिहीनच इकडे.
प्राची वहिनींचा अजून पत्ता
प्राची
वहिनींचा अजून पत्ता नाहीय (नसावा, माझ्या मते
) काय रे, जिप्स्या?
जिप्स्या बायको गळ्यात घेउन
जिप्स्या बायको गळ्यात घेउन फिरतो...
तिच्या डोळ्यासाठी नव्या-नव्या लेन्स घ्या हीच त्याची शॉपिंग... 
आम्हीसुद्धा सेनापतींच्या
आम्हीसुद्धा सेनापतींच्या सेनेतले- बाईकवर लेह-लडाख करणारे.
बुक करून ट्रीप केल्यास हा २५-३० खर्च ओके वाटतो. आमची सगळीच ट्रीप रामभरोसे बजेट ट्रीप होती, त्यामुळे यापेक्षा निम्म्या बजेटमधे पूर्ण झाली.
होय ज्ञानेश.. मला आठवतयं..
होय ज्ञानेश..
तुम्हाला तर खारदुंगला ला बर्फ पण मिळाला होता ना
मला आठवतयं..
हो, बरोबर. आम्ही तसे बरेच
हो, बरोबर.
आम्ही तसे बरेच उशिरा गेलो होतो- सप्टेंबरच्या पहिल्या आणि दुसर्या आठवड्यात.
दिल्ली ते लेह विमानाने
दिल्ली ते लेह विमानाने जाण्यापेक्षा मनालीवरून रस्त्याने गेलात तर जास्त चांगला अनुभव येईल. या रस्त्यावर रस्त्याने जोडलेले अतिउंचावरचे तीन पॉइंटस आहेत. पहिला अर्थातच लेह ते नुब्रा व्हॅली या प्रवासात लागेल. याच जिप्सीवाल्याशी तुम्ही नुब्रा व्हॅली फिरवण्याचा करार करू शकता. दिल्ली लेह विमानाचे तिकिट आता लक्षात नाही. चंदीगड वरून वायुदलाची फ्लाईट असते.
लेह मधे तीन दिवस घालवल्यावर तुम्ही डिस्कीटला यावे. या रस्त्यावर १८००० + फूट उंच पास आहे. इथेच एक मॅग्नेटिक डोंगर आहे जिथे गाडी पार्क केली तर चढाच्या दिशेने ओढली जाते. तुम्हाला डिस्कीट पासून पुढे ३ किमी हुंडेर या गावापर्यंत जाता येते. डिस्कीट मधे डोंगरावरचा एक बौद्ध मठ पाहण्यासारखा आहे. तिथून पुढे लष्कराचा विमानतळ असल्याने आणि पाक बॉर्डर जवळ असल्याने प्रवेश नाही. डिस्कीटहून पुन्हा माघारी खलसर या गावी यावे. इथून श्योक नदीच्या पलिकडे सियाचीन ग्लेशरकडे जाणारा रस्ता आहे. खलसर पासून साधारण २० किमी वर गरम पाण्याचे झरे आहेत. वाळूची बेटं आणि उंचावरचे वाळवंट प्रेक्षणीय. इथले उंट वेगळे आहेत. याक हा वाळवंतातला गायीसारखा प्राणी पाहण्यासारखा आहे. हुंडेरला एक सुतार आहे. त्याच्याकडे एक विशिष्ट प्रकारचे तेल मिळते. त्याबद्दल इथे जास्त लिहीत नाही. गेलात कि उलगडा होईल. जाणकारांकडून त्या तेलाला खूप मागणी आहे.
लेह जवळ एक झील आहे ( ३ इडीयटस मधे फुंगसुक वांगडू च्या स्कूल जवळ दाखवलेलं ). नुब्रा व्हॅली वारून परत येताना ते पहावे. येताना शक्य असेल तर मनाली मार्गे न येता सोनमर्ग मार्गे काश्मीरातून यावे. हा रस्ता जम्मूला येऊन मिळतो. श्रीनगर ला विमानसेवा आहे. पण जम्मूपासून जम्मूतावी आणि झेलम एक्स्रेस आहेत. इथून दिल्लीपर्यंत किंवा थेट पुण्यापर्यंत येऊ शकता.
Pages