'सल्ला मेंडकेचा' सदरासाठी प्रश्नावली

Submitted by संपादक on 30 July, 2014 - 12:22






          सल्ला मेंडकेचा - प्रश्नावली






मेंडका ही स्वर्गातील एक शापित अप्सरा. स्वर्गलोक सोडून भूलोकी अर्धबेडकी-अर्धअप्सरा रूपात वावरण्याचा शाप तिला मिळाला आहे. दिवसातला काही काळ बेडकीच्या रूपात वावरणारी मेंडका उर्वरित वेळेत मात्र एक सौंदर्यवती, एक फॅशनिस्टा आहे. त्यामुळे तिचे सल्ले हे अप्सरेच्या व बेडकीच्या व्यक्तिमत्त्वांच्या एकत्रीकरणातून दिले गेलेले असतात. ‘मेंडकेचा सल्ला’ या सदरातील समस्यांची उकल सांगताना मायबोलीकरांनी हा परकायाप्रवेश साधायचा आहे व मेंडकेने 'वहिनीचा सल्ला' सदरातील प्रश्नांना जशी उत्तरे दिली असती, तशी या प्रश्नांची उत्तरे लिहून आम्हांला पाठवायची आहेत.


या दुव्यावर प्रश्न आहेत व तिथेच उत्तरे लिहिण्याची सोय आहे

अंतिम मुदतः ३१ ऑगस्ट २०१४


हितगुज दिवाळी अंक २०१४
नियमावली



विषय: 

प्रश्न भारी आहेत Lol
मेंडकेची सुप्पर कल्पना आणि इतके आचरट प्रश्न कुणाच्या डोक्यातून निघाले? माझा सादर विनम्र नमस्कार. _/\_ Proud

कैच्याकै भारी कल्पना आहे. नक्की सुपरडुपर यशस्वी होणार Happy
आचरट प्रश्नांना जमेल तितकी भारी आचरट उत्तरं देणार Wink

'सल्ला मेंडकेचा' या सदरासाठी एकापेक्षा अधिक प्रश्नांना उत्तरे द्यायची असल्यास सर्व प्रश्नोत्तरे एकाच प्रवेशिकेमध्ये समाविष्ट करावीत.>>> सर्व उत्तरे कम्पल्सरी नाही का?? ऑप्शनल टाकता येतील का प्रश्न?

हा हा हा
मेनका मेंडक अप्सरा बेडूक मेंडका ... आणि तिचे सल्ले आणि हे प्रश्न .. कल्पनाच भन्नाट आहे Happy
मजा येणारेय हे सदर वाचायला !

सीमंतिनी,

'मेंडकेचा सल्ला' सदरासाठी देण्यात आलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे देणे बंधनकारक नाही. आपण एक किंवा एकापेक्षा अधिक प्रश्नांची उत्तरे देऊ शकता. मात्र एकाहून अधिक प्रश्नांची उत्तरे द्यायची झाल्यास आपल्याला ती एकाच प्रवेशिकेत भरून सुपूर्त करायची आहेत.

_/\_ अचाट प्रश्न आहेत... Lol
जरा विचार करून काही प्रश्नांची उत्तरं देण्याचा विचार आहे... Biggrin

प्रत्येक प्रश्नाचं सर्वात मजेशीर उत्तर अंकात प्रकाशित होणार - मान्य.
पण इतरांनी काय काय धमाल उत्तरे दिलीत ते अंक प्रकाशित झाल्यावर आठवड्याभराने का होईना मायबोलीवर वाचायला आवडेल. बघा जमतंय का.

सॉलिड कल्पना आहे ही Lol

एक शंका:

>>>प्रत्येक प्रश्नासाठी आलेल्या उत्तरांमधून सर्वांत जास्त मजेशीर उत्तर या सदरात प्रकाशित केले जाईल<<<

हे ठरवणार कसे? Happy

(कोणाला काय वाचून अधिक मजा वाटेल ते कसे कळणार?) Wink

मस्त कल्पना Lol

केश्विनी, मामी वगैरेंसाठी अगदी सर्व्ह्ड ऑन द प्लॅटर! Lol
Light 1 घ्या दोघींनीही. तुमच्या अचाट कल्पनाशक्तीचा आदर राखूनच हे वाक्य लिहिले आहे! Happy

'वहिनीचा सल्ला' लिहिलंय म्हणून फक्त स्त्रीआयड्यांची चर्चा चालू आहे का? Wink
आपल्या फारएंडभाऊंना विसरू नका.

पण इतरांनी काय काय धमाल उत्तरे दिलीत ते अंक प्रकाशित झाल्यावर आठवड्याभराने का होईना मायबोलीवर वाचायला आवडेल. बघा जमतंय का. >> +१०००००

फारेण्ड, श्रद्धा, आशुडी, मामी, डीजे, मैत्रेयी, मृण्मयी, साजिरा, कौतुक, अस्चिग यांच्याकडून भरीव सहयोग अपेक्षित आहे!!!! Happy (अजूनही वीर आहेत हां!!)

Pages