'सल्ला मेंडकेचा' सदरासाठी प्रश्नावली

Submitted by संपादक on 30 July, 2014 - 12:22






          सल्ला मेंडकेचा - प्रश्नावली






मेंडका ही स्वर्गातील एक शापित अप्सरा. स्वर्गलोक सोडून भूलोकी अर्धबेडकी-अर्धअप्सरा रूपात वावरण्याचा शाप तिला मिळाला आहे. दिवसातला काही काळ बेडकीच्या रूपात वावरणारी मेंडका उर्वरित वेळेत मात्र एक सौंदर्यवती, एक फॅशनिस्टा आहे. त्यामुळे तिचे सल्ले हे अप्सरेच्या व बेडकीच्या व्यक्तिमत्त्वांच्या एकत्रीकरणातून दिले गेलेले असतात. ‘मेंडकेचा सल्ला’ या सदरातील समस्यांची उकल सांगताना मायबोलीकरांनी हा परकायाप्रवेश साधायचा आहे व मेंडकेने 'वहिनीचा सल्ला' सदरातील प्रश्नांना जशी उत्तरे दिली असती, तशी या प्रश्नांची उत्तरे लिहून आम्हांला पाठवायची आहेत.


या दुव्यावर प्रश्न आहेत व तिथेच उत्तरे लिहिण्याची सोय आहे

अंतिम मुदतः ३१ ऑगस्ट २०१४


हितगुज दिवाळी अंक २०१४
नियमावली



विषय: 

संपूर्ण पेपर सोडवल्यानंतर सुपूर्त करा हे बटण दाबलं. त्यानंतर तुम्हाला हे पान पहायची परवानगी नाही असा गंमतीशीर मेसेज आला.

उत्तरपत्रिका पोहोचली कि नाही हे कसं कळणार ?

काही प्रश्नांना कोल्हापुरू उत्तरं दिलीत तेव्हडं चालवुन घ्या.

नमस्कार आशूडी, तुमच्या सूचनेचा संपादक मंडळ विचार करेल. धन्यवाद!

नमस्कार बेफ़िकीर,

या धाग्याच्या प्रस्तावनेत लिहिल्याप्रमाणे संपादक मंडळ बहुमताने उत्तरांची निवड करणार आहे.

नमस्कार उदयन,

एका प्रश्नाचे तुम्ही एकच उत्तर पाठवू शकता. प्रवेशिका सुपूर्त केल्यावर एखाद्या प्रश्नाचे उत्तर नव्याने सुचल्यास प्रवेशिका संपादित करू शकता. मात्र ही सोय फक्त उत्तरे पाठवायच्या अंतिम मुदतीपर्यंत उपलब्ध असणार आहे.

नमस्कार स्वर्णसुंदरी,
त्रुटी लक्षात आणून दिल्याबद्दल आभार. अ‍ॅडमिन यांनी हा प्रश्न सोडवला आहे. आता उत्तरे सुपूर्त केल्यानंतर प्रश्नावलीचे पान दिसत आहे. आपली उत्तरपत्रिका या दुव्यावर बघू शकता.

सस्नेह,
संपादक मंडळ,
हितगुज दिवाळी अंक २०१४

ही कल्पना छान आहे पण .... (हे लिहून आता फार उपयोग होणार नाही याची कल्पना आहे )
प्रश्न वाचून असे वाटले की प्रश्नच फार सजेस्टिव्ह / अँटिसिपेटिंग आहेत आणि जे काय विनोद करण्याची शक्यता आहे ते प्रश्नातच करण्यात / सुचवण्यात आले आहेत... आता उत्तर लिहिणार्‍याला फार काही करण्यासारखे नाही आहे! Happy

जबरी प्रश्न आहेत. मात्र एक अडचण वाटते - अशा प्रश्नांना उत्तरे एकदम सुचतील असे नाही. त्या प्रश्नांची सुचतील तशी तेथे देऊन पोस्ट केलेले चालणार नाही असे दिसते. म्हणजे सुचली की आधी कोठेतरी सेव्ह करून शेवटच्या तारखेच्या आसपासपर्यंत जेवढी जमतील तेवढी एकदाच भरून टाकावी लागेल असे दिसते.

(माझे नाव वरती सुचवणार्‍यांनो, तुम्ही मला आता मनोवैज्ञानिक दबाव टाकलेला आहे Happy )

नमस्कार फारएण्ड,

प्रवेशिका सुपूर्त केल्यावर एखाद्या प्रश्नाचे उत्तर नव्याने सुचल्यास प्रवेशिका संपादित करू शकता. मात्र ही सोय फक्त उत्तरे पाठवायच्या अंतिम मुदतीपर्यंत उपलब्ध असणार आहे. प्रवेशिका संपादित केली असता आधी दिलेली उत्तरे तिथे दिसतील.

एकदा सुपूर्त केलेली प्रवेशिका रद्द (delete) करून नव्याने प्रवेशिका भरण्याचा पर्याय देखील आहे.

सस्नेह,
संपादक मंडळ,
हितगुज दिवाळी अंक २०१४

Pages