कशाला वाण पेरू अन कशाला पीक मागू मी
तुझ्या काही सरींसाठी पुन्हा का भीक मागू मी
धुवाया डाग कर्मांचे कुण्या कुंडामधे न्हाऊ
मनाला साफ करणारे कुठे आन्हीक मागू मी
नको मागायला दोन्ही मने एकाच जातीची
तुला सोशीक मागू की मला सोशीक मागू मी
तसे नुकतेच आकारास आले आपले नाते
तुझा सल्ला कसा इतक्यात वैयक्तीक मागू मी
तुझ्या ठरल्या नकाराची पुन्हा आमंत्रणे आली
कुठे होवू परागंदा कुठे लपणीक मागू मी
मला माहीत आहे सत्यनारायण शिरा देतो
तरीही वाटते ...पूजेतली खारीक मागू मी?
"तसे" छापून आल्याने असा मौखीक झालो मी
मिळाला तो पुरे झाला किती लौकीक मागू मी
फुकटचे दु:ख प्याले की गझल चाखायला मिळते
तुझ्या गुत्त्यातली का मग सुखे खर्चीक मागू मी
मला कंपल्सरी आहेस केले विठ्ठला तू जे
कशाला प्रश्न त्या जगण्याकडे ऐच्छीक मागू मी
क्या बात है सर! सोशीक, खर्चीक
क्या बात है सर!
सोशीक, खर्चीक सगळ्यात जास्त आवडले!!!!!!
धन्यवाद
छान...
छान...
नको मागायला दोन्ही मने एकाच
नको मागायला दोन्ही मने एकाच जातीची
तुला सोशीक मागू की मला सोशीक मागू मी ___मस्त
मला माहीत आहे सत्यनारायण शिरा देतो
तरीही वाटते ...पूजेतली खारीक मागू मी?__ देवपूरकर टाईप झाला
मस्त.. ! शेवटचाही खासच!
नको मागायला दोन्ही मने एकाच
नको मागायला दोन्ही मने एकाच जातीची
तुला सोशीक मागू की मला सोशीक मागू मी
तसे नुकतेच आकारास आले आपले नाते
तुझा सल्ला कसा इतक्यात वैयक्तीक मागू मी
वा वा हे शेर आवडले ! खास !!
फुकटचे दु:ख प्याले की गझल
फुकटचे दु:ख प्याले की गझल चाखायला मिळते
तुझ्या गुत्त्यातली का मग सुखे खर्चीक मागू मी<<<
व्वा व्वा!
खारीक सोडून संपूर्ण गझल आवडली.
"तसे" छापून आल्याने असा मौखीक
"तसे" छापून आल्याने असा मौखीक झालो मी
मिळाला तो पुरे झाला किती लौकीक मागू मी
>>> 'तसे' खास!! नेमका शब्द!
तसे नुकतेच आकारास आले आपले
तसे नुकतेच आकारास आले आपले नाते
तुझा सल्ला कसा इतक्यात वैयक्तीक मागू मी
चांगला शेर. मतलाही आवडला, फक्त पुन्हा शब्दाचा संदर्भ लागला नाही.पुन्हा का ऐवजी 'कशाला' असे एक सहज सुचले. गैरसमज नसावा.
व्वा सर, सुंदर गझल. मतला खुप
व्वा सर, सुंदर गझल.
मतला खुप आवडला. सत्यनारायणाचा शेर वगळला असतात तर बर झाल असत.
नको मागायला दोन्ही मने एकाच
नको मागायला दोन्ही मने एकाच जातीची
तुला सोशीक मागू की मला सोशीक मागू मी
तसे नुकतेच आकारास आले आपले नाते
तुझा सल्ला कसा इतक्यात वैयक्तीक मागू मी
फुकटचे दु:ख प्याले की गझल चाखायला मिळते
तुझ्या गुत्त्यातली का मग सुखे खर्चीक मागू मी
व्वा व्वा!
काही शेर आवडले. मत्ला अधिक
काही शेर आवडले.
मत्ला अधिक चांगला होऊ शकला असता.
विठ्ठलाचा शेर सोडला तर आपल्या स्वतःच्या शैलीसाठी प्रयत्न व्हायला हवा, असे वाटते.
सर्वांचे मनःपूर्वक आभार सर्व
सर्वांचे मनःपूर्वक आभार
सर्व मते सूचना लक्षात घेत आहे
पुनश्च आभार
विठ्ठलाचा शेर सोडला तर आपल्या
विठ्ठलाचा शेर सोडला तर आपल्या स्वतःच्या शैलीसाठी प्रयत्न व्हायला हवा, असे वाटते.>>>
आता काही वेळापूर्वीच आपण ह्या विषयावर बोललो वैभव, विचार ज़रूर करावास असे माझे मत
सुंदर गझल ! नको मागायला
सुंदर गझल !
नको मागायला दोन्ही मने एकाच जातीची
तुला सोशीक मागू की मला सोशीक मागू मी
हा शेर समजला नाही..!!
कशाला वाण पेरू अन कशाला पीक मागू मी
तुझ्या काही सरींसाठी पुन्हा का भीक मागू मी
तसे नुकतेच आकारास आले आपले नाते
तुझा सल्ला कसा इतक्यात वैयक्तीक मागू मी
तुझ्या ठरल्या नकाराची पुन्हा आमंत्रणे आली
कुठे होवू परागंदा कुठे लपणीक मागू मी
"तसे" छापून आल्याने असा मौखीक झालो मी
मिळाला तो पुरे झाला किती लौकीक मागू मी
हे फार आवडले.
'खारीक'ही नीट कळला नाही !
'आन्हीक', 'सोशीक' आणि
'आन्हीक', 'सोशीक' आणि 'ऐच्छिक' हे सर्वात छान वाटले.
कणखरजी . जितू . उकाका
कणखरजी . जितू . उकाका धन्स
जितू सांगेन तुला कधीतरी मी नक्कीच
खोल दु:खातून आलेल्या
खोल दु:खातून आलेल्या विद्रोहाचा शांत आविष्कार करता येतो ? येतो. तुमच्या या गझलेत तो जाणवला.
तुम्ही इतक्या मायेनं, इतक्या
तुम्ही इतक्या मायेनं, इतक्या भरजरी शब्दांनी तिची वाखाणणी करावी आणि तिने ती नेसावी इतक्या योग्यतेची माझी कविता खरंच आहे का ..माहीत नाही .......
धन्स भरतीताई