माहिती हवी - परांजपे ब्लू रिज (हिंजवडी)

Submitted by अरविंद on 17 July, 2014 - 03:13

नमस्कार, परांजपेच्या ब्लू रिज(हिंजवडी) स्कीम बद्दल माहिती देऊ शकेल का? भविष्याच्या दृष्टीने तिथे flat घेऊन गुंतवणूक करावी का?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अहो भाऊ, तुमच्या prompt प्रतिसादाबद्दल आभार.. पण त्या धाग्यात हवी ती माहिती नाही मिळाली, शिवाय खूप प्रोजेक्टस वर चर्चा आहे.. म्हणून म्हटलं हा धागा उघडावा..

अहो तुम्हाला काय माहीती पाहीजे ते विचारा ना.

सर्व सामान्य माहीती, प्लॅन वगैरे तर परांजपेंच्या वेबसाईट वर आहेच.

वेगळे काही पाहीजे असेल तर विचारा स्पष्ट पणे

प्रश्न मी आधीच वर विचारलाय .. तो आपल्याला नसेल दिसला तर मोठा लोचा आहे बघ टोचा Proud
इब्लिस -> खरच काही गरज आहे का?? कशाबद्दल बोललो समलं असेलच.. Lol

@अरविन्द - तुमचे दोन प्रश्न होते

१ : परांजपेच्या ब्लू रिज(हिंजवडी) स्कीम बद्दल माहिती देऊ शकेल का? - ह्याबद्दल मी माझे मत दिले की काय विचारायचे ते स्पष्ट विचारा.

२: भविष्याच्या दृष्टीने तिथे flat घेऊन गुंतवणूक करावी का? : तुमची दिड ते दोन कोटी फक्त गुंतवणुक म्हणुन एका फ्लॅट मधे घालायची आर्थिक कपॅसिटी असेल तर मला तुमची शिकवणी लगेच लावायला पाहीजे.

ब्लू रिज(हिंजवडी) स्कीम मधे आम्ही फ्लॅट घेतलाय, नोवेंबर २०१३ मधे. आणि आज त्याच फ्लॅट ची किंमत जवळजवळ १५ लाखाने वाढलीय. अर्थात आम्ही इनवेस्टमेंट म्हणुन नाही घेतलाय हा फ्लॅट. रिटायरमेंट होम म्हणून घेतलाय.

सेझ मुळे हा भाग कायमच गुंतवणुकीला योग्य असणार आहे. या भागात भाडीही प्रचंड आहेत.

अरविंद, तुम्हाला अजुनही काही नेमके विचारायचे असल्यास नक्की विचारा. सांगायचा प्रयत्न करिन.

माझ्या मते गुंतवणुक करताना अनेक बाबी विचारात घ्यायला हव्यात.
तुमच्याकडे डाउनपेमेंट किती आहे, तुमचे बजेट किती आहे, तुम्ही सदनिका घेतल्यावर किती दिवसांनी विकणार आहात, हे प्रोजेक्ट तुम्हाला पाहिजे त्या बँक मधे अ‍ॅप्रुव्हड आहे का? तुम्हाला या सर्व गुंतवणुकीमधून किती वर्षामधे किती परतावा हवा आहे, पसेशन आल्यावर लगेच विकणार कि काही वर्षे भाड्याने देणार?

स्वता राहणार असाल तर तुमच्या सोयीचा विभाग कोणता, मुलांच्या शाळा, तुमची नोकरी, तुम्हाला हव्या असलेल्या सेवा सुविधा, सोशल लाईफ, वास्तुशास्त्र (मानत असाल तर...)

वरचे सगळे मुद्दे तुम्ही कदाचित विचारात घेतले असतीलच, तरी उगीचच मला किती कळते हे दाखविण्यासाठी माझी ही पोस्ट Proud

तुम्हाला मोठेच प्रोजेक्ट हवे असेल तर megapolis, xerbia, woodsville, DSK dream city, empire quare असे बरेच आहेत. ते हि पहा. भविष्यात हे सर्व लोकेशन तुम्हाला कमावून देतील नक्किच.

टोचा>> तुमची दिड ते दोन कोटी फक्त गुंतवणुक म्हणुन एका फ्लॅट मधे घालायची आर्थिक कपॅसिटी असेल तर मला तुमची शिकवणी लगेच लावायला पाहीजे. >>> ब्लू रिज मध्ये ३६ लाखापासून फ्लॅट मिळतात, करोडोची आवश्यकता नाही.. त्यामुळे आपली शिकवणी नुसती घ्यायला आवडेल असं नाही तर आपल्याला गरज आहे.. Lol माहिती पूर्ण असल्यासच बोलावे, हा आजच्या शिकवणीतील पहिला पाठ.. Proud

स्वप्नांची राणी >> खूप धन्यवाद.. मी फक्त पुण्यातील दुसरं घर ह्या कल्पनेतून बघतोय तिथे फ्लॅट.. नवीन टाॅवर मध्ये १ बीएचके, ३६ लाखापासून चालू आहे.. त्याचाच विचार करतोय.. पण इथले दर हिंजवडीतील इतर स्कीम पेक्षा १०-२०% जास्त आहेत.. पण सेझमुळे दर वाढतील, आपण म्हटल्याप्रमाणे भाडीही बरी मिळतात.. तिथे मेंटेनन्स, पाणी, वीज दराबद्दल थोडी माहिती दिलीत तर बरं होईल. मी ऑगस्ट मध्ये प्रत्यक्ष पाहणार आहेच. धन्यवाद!

अतरंगी >> डिटेल्ड प्रतिसादाबद्दल आभार.. ह्या सगळ्या गोष्टी ध्यानात घेऊनच विचार चालू आहे.. पुढील महिन्यात प्रत्यक्ष साईट वर जाण्याआधी आपली मतं विचारली. हिंजवडीत megapolis , life republic, ecoloch हे हि कन्सिडर करतोय. ह्या सगळ्यात ब्लू रिज चे दर जास्त आहेत म्हणून जरा confusion आहे.. आपण सुचवलेले इतर पर्यायही बघतो. Happy

टु बीएच्के चे दर काय आहेत?
कोणत्या बँका अधिकृत कर्जं द्यायला उपलब्धं आहेत?
स्वरा, तुमच्या मते घर्/काँप्लेक्स /बांधकाम कसे आहे?

ब्लू रिज : दर (१ जुलै २०१४)

1 BHK - 579 TO 806 SQ. FT. - 37 L To 54.50 L

2 BHK - 1321 SQ. FT. - 92 L. To 1.03 Cr.

3 BHK - 1730 SQ. FT. - 1.06 Cr. To 1.30 Cr.

4 BHK - 2551 SQ. FT. - 1.69 Cr. To 1.73 Cr.

5 BHK - 3102 SQ. FT. -2.15 Cr. To 2.24 Cr.

मिळणारे भाडे :
१ BHK : अजून पझेशन सुरु झाले नाहीत त्यामुळे दर सांगता येणार नाहीत . (८ ते ९ हजाराच्या रेंज मधे मिळायला हरकत नाही .)
२ BHK : इमारत ७ (Tower ७ ) चे पझेशन मागच्या महिन्यात सुरु झाले आहे. मिळणारे भाडे १३ ते १४ हजार.
३ BHK : माझ्याकडे एक सदनिका २ महिन्यापासून उपलब्ध आहे. मालकाची अपेक्षा १८ हजार आहे . अजून क्लायंट मिळायचा आहे.

तुम्हीच ठरवा गुंतवणुक आणि त्यातून मिळणारे उत्पन्न याची सांगड घालता येते का ते .
आणि सदनिकेची किंमत जरी वाढत असली तरी जेंव्हा ती किंमत मिळवायची असेल तेंव्हा ती सदनिका लगेच विकली पण गेली पाहिजे ना !! इथे विकण्याच्या शर्यती मधे बिल्डरच तुमचा प्रतिस्पर्धी असणार आहे.

ज्याला १ BHK म्हणले आहे ते खरे तर १RK आहे.
४० लाख म्हणायचे, पण बाकीच्या गोष्टी धरुन ५० च्या पुढे जाणार.

1 BHK - 579 TO 806 SQ. FT. - 37 L To 54.50 L >>> बाबौ!!!!!!!!!

चिखली गाव बरं बाबा आमचं.

यातील २/३ रक्कम प्रॉपर्टीचे आणि १/३ रक्कम परांजपे नावाची.... तेवढी वजा केली की इतर स्कीमचा रेट मिळेल....

अरविंद भाऊ - ब्लूरिज टाऊनशीप आणि हिंजवडीत असल्यामुळे त्यांचे मासिक सोसायटी मेंटेन्न्स जास्त असेल... जर तुम्हाला इनवेस्ट्मेंट म्हणून गुंतवणूक करायची असेल तर वाकड/ हडपसर बघा.. खूप प्रोजेक्ट्स आहेत.. इकडे शोधा..www.proptiger.com
शक्यतो, पुणे/ पिचिमपामध्ये बघा आणि ३/ ४ बिल्डिंगचा संकुल बघा...
इनवेस्ट्मेंट करताना मासिक सोसायटी मेंटेन्न्साचा मुद्दा लक्षात ठेवा...

हिन्जेवाडी भागामधे रेट प्रचंड आहेत. माझा स्वत:च आहे अस आहे कि खुप जास्त downpayment करणार असाल तर या भागात घर घ्यावे नाहीतर स्वत: रहाणार असाल तर.
Investment म्हणुन घेणे longterm horizon मधेही परवडण्यासारखे नाही. Maintanance, Taxes will be more in new areas.

2 BHK - 1321 SQ. FT. - 92 L. To 1.03 Cr >>> १ Cr बॅंकेत ठेउन ९% ते १०% व्याज घेतलेल बर. २५,००० भाड्यात गेले तरी चालतील. (NRE असेल तर tax free interest).

1 BHK - 579 TO 806 SQ. FT. - 37 L To 54.50 L

2 BHK - 1321 SQ. FT. - 92 L. To 1.03 Cr.

3 BHK - 1730 SQ. FT. - 1.06 Cr. To 1.30 Cr.

4 BHK - 2551 SQ. FT. - 1.69 Cr. To 1.73 Cr.

5 BHK - 3102 SQ. FT. -2.15 Cr. To 2.24 Cr.

>>>>>>
हे रेट London ला पण लाजवतील.

2 BHK - 1321 SQ. FT. - 92 L. To 1.03 Cr >>> १ Cr बॅंकेत ठेउन ९% ते १०% व्याज घेतलेल बर. २५,००० भाड्यात गेले तरी चालतील. (NRE असेल तर tax free interest).>>>>>>>>>>>>

पण आज १ कोटीची जी purchase power आहे ती अजुन १० वर्षानी नसेल. ते १ कोटी तेवढेच राह्तील उलट त्याची व्हॅल्यू कमी होईल. पण आज जर १ कोटी जागेत किंवा सदनिकेत गुंतवले तेर त्याची व्हॅल्यू किती तरी जास्त असेल नाही का ?

पण आज १ कोटीची जी purchase power आहे ती अजुन १० वर्षानी नसेल. <<

पर्चेस पॉवर १० वर्षांनी कमी होईल अश्या कोणत्या व्यवसायात/नोकरीत आहात?

>> ते १ कोटी तेवढेच राह्तील उलट त्याची व्हॅल्यू कमी होईल. <<

कशी?
८% व्याज धरले, तर ८ लाख वर्षाला मिळतील. २५हजाराप्रमाणे ३ लाख भाडे जाईल. उरलेले ५ लाख तो माणूस कचर्‍यात फेकेल असे गृहित धरायचे आहे का? ते असेच १० वर्षांत ५० लाख होतात. हेच जर परत ब्यांकेत किंवा पोस्टात ठेवले, तर चक्रवाढ व्याजाने पैसे वाढणार नाहीत का? शिवाय मूळ १ कोटी तसेच राहतील.

इब्लिस, तुम्ही महागाई दर लक्षात नाही घेतलेला. तो ८% गृहीत धरला तर किंमत कमी नाही झाली तरी १ कोटीच्या हिशेबात नगण्य वाढेल.
पर्चेस पॉवर १० वर्षांनी कमी होईल अश्या कोणत्या व्यवसायात/नोकरीत आहात? >> महागाईमुळे ही कायम कमीच होते. कुठल्याही व्यवसायात नसलात तरी. बरोबर बोलतोय ना मी?

बिल्डिंग पडली, किंवा जमीन आरक्षणात गेली, किंवा कुणी अतीक्रमण केले, तर त्या जमीन/फ्लॅटचं काय होईल?
*
रिटायरमेंटपर्यंत पर्चेस पॉवर वाढायला हवी, अनलेस तुम्ही अंगमेहनतीच्या, हमाली, गवंडीकामावर पाट्या वाहणे इ. व्यवसायात आहात. तिथे कमी होईल.

Pages