माहिती हवी - परांजपे ब्लू रिज (हिंजवडी)

Submitted by अरविंद on 17 July, 2014 - 03:13

नमस्कार, परांजपेच्या ब्लू रिज(हिंजवडी) स्कीम बद्दल माहिती देऊ शकेल का? भविष्याच्या दृष्टीने तिथे flat घेऊन गुंतवणूक करावी का?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

८ते १० % चलनवाढ/ फुगवटा पण विचारात घ्या ईब्लिस.

शिवाय एफ. डी करायला १ कोटी एकरकमी द्यावे लागतात. सदनिका घेताना आपल्याला २० ते २५ लाख द्यावे लागतात बाकिचे बँक भरते आणि आपल्याकडून हप्त्याने घेते.
मी जर ७५ लाखाचे लोन केले तर मला साधारण ७५ हजाराचा हप्ता २० ते २५ वर्षासाठी पडतो. मला आज जरी ७५ हजाराचा हप्ता जास्त वाटला तरी १० ते १५ वर्षानी तितके जास्त नाही वाटणार

रिटायरमेंटपर्यंत पर्चेस पॉवर वाढायला हवी, अनलेस तुम्ही अंगमेहनतीच्या, हमाली, गवंडीकामावर पाट्या वाहणे इ. व्यवसायात आहात. तिथे कमी होईल.>>>>>>

मी माझी पर्चेस पॉवर नाही, १ कोटी ची पर्चेस पॉवर म्हणतोय

मी जर १० वर्षापुर्वी १ कोटी मधे३० किलो सोने घेउ शकत होतो तर आज ३ किलो घेउ शकतो. १ कोटी मधे १० वर्षापुर्वी २० गुंठे जमीन येत होती तर आज ५ गुंठेच येईल कदाचित.

मी जर १० वर्षापुर्वी १ कोटी मधे३० किलो सोने घेउ शकत होतो तर आज ३ किलो घेउ शकतो. १ कोटी मधे १० वर्षापुर्वी २० गुंठे जमीन येत होती तर आज ५ गुंठेच येईल कदाचित.
<<
मी १० वर्षांपूर्वी १ कोटी रुपये कमवू शकत नव्हतो. आज कमवू शकतो. हा फरक येतोय का लक्षात?
सोन्याचा भाव सांगू नका. Happy ज्या काळी ७०० रुपये सोनं होतं तेव्हा तीर्थरूपांचा पगार ३५० रुपये होता. आज सोनं ३० हजार आहे, अन त्याच जॉबचा पगार ५० हजार. इन्कम दुप्पटीने वाढलंय.

जौद्या. अवांतर होतंय फार. पण फक्त इन्व्हेस्टमेंट म्हणून पुण्यात अन तोही फ्लॅट घ्यावा असं मला तरी वाटत नाही.

विषय भरकटतोय. १ कोटीची गुंतवणूक कुठे/कशी करायची हा विषय नसून परांजपे ब्लू रिज (हिंजवडी) इथे सदनिका घ्यावी का असा आहे. कृपया विषयावर लिहा Happy

मी १० वर्षांपूर्वी १ कोटी रुपये कमवू शकत नव्हतो. आज कमवू शकतो. हा फरक येतोय का लक्षात?>>>>>
बरोबर. ह्याच न्यायाने तुम्हाला आज जरी १ कोटी जास्त वाटत असले तरी अजुन १० वर्षाने वाटणार नाहीत. कारण त्यावेळेस तुम्ही कदाचित १० कोटी कमावित असाल.
१ कोटी बँकेत ठेउन १ कोटीच राहतील म्हणजे चलनवाढ पकडली तर कदाचित त्याची व्हॅल्यू आजच्या १० लाखा ईतकी असेल.

फक्त इन्व्हेस्टमेंट म्हणून पुण्यात अन तोही फ्लॅट घ्यावा असं मला तरी वाटत नाही.>>>>

माझेही मत असेच होत चालले आहे. कारण return on investment आता तेवढा मिळत नाही. आता नाशिक किंवा कोहापूर बरे गुंतवणूकीला

अरविंद,

ब्लु रिज गुंतवणुकीच्या दृष्टीने उत्तम आहे. बांधकामाची गुणवत्ता, सोयी सुविधा, आणि विश्वासार्हता यात परांजपे नाव म्हटल्यावर प्रश्नच नाही. तिथे निर्माण होणारे इन्फ्रास्ट्रक्चर, शाळा, नोकरीच्या संधी पाहता भविष्यात लोक तिथे जागा घेणार नाहीत किंवा तिथे मागणी कमी होइल हे कुठल्या बेसिस वर लोक म्हणत आहेत मला कळत नाही. (Cyclic Variation in demand होउ शकते पण ट्रेंड हा वाढणाराच राहणार आहे असे मला वाटते)
आपण स्वतः ब्लु रिज मधे जाउन पाहणी केली आहे का? नसेल तर एकदा जाउन या आणि ठरवा.

आता थोडेसे अवांतरः
१.एफ डी मधे समजा १०% व्याज मिळत असेल तरी त्यावरील टी डी एस आणि क्लबिंग ऑफ इन्कम मधील टॅक्स स्लॅब लक्षात घेतली तर इफेक्टीव रेट हा ६ % मिळतो. रेट ऑफ इन्फ्लेशन त्याच दरम्यान असल्याने तुमचे इफेक्टीव अप्रीसिएशन शुन्य. पण याचा फायदा एवढाच की लिक्विडिटी चांगली असेल.
२. रीयल इस्टेट मधील गुंतवणुक लाँग टर्म मधे फायदेशीर वाटली तरी त्यात मिळणारा फायदा खिशात जाण्यापुर्वी पुढील गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात.
अ)फायद्यावरील कर - जर तुम्ही तुमची "गुंतवणुक" विकुन दुसरे घर घेणार नसलात तर झालेल्या फायद्यावर कर भरावा लागतो.
ब्)घरावरील प्रॉपर्टी टॅक्स, मेंटेनन्सचा खर्च, भाड्याने दिल्यास त्या भाड्याचा उत्पन्नात समावेश, न दिल्यासही डीम्ड रेंट इ.इ
क्)विकायला गेल्यावर आपल्याला हवी ती किंमत मिळेलच या साठी पेशन्स हवा.

थोडक्यात काय तर डोकेदुखी ही सगळीकडे आहेच.. आपले "पॉयझन" कुठले ते आपण ठरवायचे Happy

शुभेच्छा..

ईथे मनस्मी१८ यांच्याशी सहमत! एकदा परांजपे ब्ल्यु रिज ला नक्की भेट द्या. मी स्वतः केवळ विश्वासार्हता या मुद्द्यावर ईथे फ्लॅट खरेदी केलाय.

गुंतवणूकीबद्दल म्हणाल तर ईथल्या ३बीएच्के ची किंमत अवघ्या ४ महिन्यात १५लाखाने वाढली हे स्वतः पाहिलय.

बाकी ईब्लिस...एका ठराविक काळानंतर किंवा वयानंतर सतत भाड्याने राहण्याचा पण वैताग नाही येणार का? दर ११ महिन्यांची टाम्गती तलवार पण फारशी सुखदायक नाहि...असं मला वाटतं.

एका ठराविक काळानंतर किंवा वयानंतर सतत भाड्याने राहण्याचा पण वैताग नाही येणार का? दर ११ महिन्यांची टाम्गती तलवार पण फारशी सुखदायक नाहि...असं मला वाटतं.>>> पण आज काल पुण्यात खुप जागा पडुन आहेत आणि मालक batchlor ना जागा द्यायला तयार नसतात. पण तरीही तुमच म्हण अगदी बरोबर.

४ महिन्यात १५लाखाने वाढली>>> खरच चागली वाढ आहे. पण प्रश्ण हा आहे पगार त्याच रेटनी वाढतो आहे का? आज तुम्हाला flat घ्यायला परवड तो आहे पण next generation ला आजुन ५-१० वषानी २ कोटीची घ्रर परवडतील का?

१.एफ डी मधे समजा १०% व्याज मिळत असेल तरी त्यावरील टी डी एस आणि क्लबिंग ऑफ इन्कम मधील टॅक्स स्लॅब लक्षात घेतली तर इफेक्टीव रेट हा ६ % मिळतो. रेट ऑफ इन्फ्लेशन त्याच दरम्यान असल्याने तुमचे इफेक्टीव अप्रीसिएशन शुन्य. पण याचा फायदा एवढाच की लिक्विडिटी चांगली असेल.>>>> मनस्मी, अगदी बरोबर. फक्त NRE la no tax. अजुन तरी ऊस गावा सारख UK वाल्याना Indiat ले accounts declare करावे लागत नाही :-).

<<बांधकामाची गुणवत्ता, सोयी सुविधा, आणि विश्वासार्हता यात परांजपे नाव म्हटल्यावर प्रश्नच नाही. >> मायबोलीवर कोणी कोणी परांजप्यांच नाव बघून त्यांच्या स्कीम मध्ये घर घेतली आहेत . त्यांच्या आणि इतरांच्या बांधकामात काय फरक ? डी एस के कसे आहेत? ( आणि इतर बिल्डर सुद्धा ) Happy

Pages