पोळेीचा लाडु

Submitted by सुभाषिणी on 11 July, 2014 - 09:54

पोळीचा लाडु
साहीत्य – शीळ्या पोळ्या कींवा फुलके – तीन, बारीक चीरलेला गुळ –पाव वाटी , सुक्या खोबर्याचा खीस- दोन चमचे, भाजलेली खसखस- अर्धा चमचा, काजु बदामाचे तुकडे(ऐछीक),साजुक तुप- दोन चमचे, वेलदोडे पुड- पावचमचा.
शिळ्यापोळ्या कींवा फुलके मीक्सरमधुन काढावे. कढईत सा. तुप घेउन त्यात पोळीचा चुरा घालुन कींचीत परतावं. गॅस बंद करुन गुळ व इतर साहीत्य घालुन जरा कढईतच जरवेळ हलवावे म्हणजे गुळ वीरघळतो. मग लाडु वळावेत.
साधारण तीन लाडु होतात. चवीला छान आणि पाउश्टीकही.
स्त्रोत – माझी आई.
इतथे गुळ पावडर मिळत तशेी मिळाल्यास उत्तमच.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पोळीचा लाडू

साहित्य :– शिळ्या पोळ्या किंवा फुलके – तीन, बारीक चिरलेला गुळ –पाव वाटी , सुक्या खोबर्याचा कीस- दोन चमचे, भाजलेली खसखस- अर्धा चमचा, काजु बदामाचे तुकडे( ऐच्छिक),साजुक तूप- दोन चमचे, वेलदोडे पूड- पावचमचा
.
शिळ्या पोळ्या किंवा फुलके मिक्सरमधुन काढावे. कढईत सा. तुप घेउन त्यात पोळीचा चुरा घालुन किंचीत परतावं. गॅस बंद करुन गूळ व इतर साहित्य घालुन कढईतच जरा वेळ हलवावे म्हणजे गूळ विरघळतो. मग लाडू वळावेत.

साधारण तीन लाडू होतात. चवीला छान आणि पौष्टिकही.

मी साहित्य हेच वापरते. एका भांड्यात पोळीचा चुरा घेते. मग छोट्या कढल्यात आधी खसखस, खोबरं भाजून पोळीवर काढते. नंतर त्याच कढल्यात तूप गरम करुन गूळ घालून गॅस लगेच बंद करुन ते पोळीवर ओतते. गूळ जरा जरी जास्त राहिला तरी त्याचा पाक व्हायला लागतो म्हणून लगेच. मग वे.पूड घालून कालवून लाडू वळते. कोरडं वाटल्यास थोडा दुधाचा हबका मारते.
पुढच्यावेळी तुमच्या पद्धतीने पोळी परतून बघेन.

गूळ नंतर घालण्यापेक्षा, पोळीचा चुरा करताना त्यात घातला तरी छान एकत्र होतो. चिकटत नाही भांड्याला. आणि मग त्या मिश्रणात योग्य प्रमाणात तूप आणि इतर पदार्थ घालून मायक्रोवेव्ह मध्ये १-१.३० मिनिट फिरवलं कि मिश्रण छान मिळून येते..आणि लाडू पण छान होतात.