विंबल्डन - २०१४

Submitted by Adm on 19 June, 2014 - 06:34

तर मंडळी..........
सालाप्रमाणे पावसाळा आला.. आणि पावसाबरोबर विंबल्डनही आलं..
यंदाची विंबल्डन स्पर्धा सोमवार २३ जून २०१४ पासून सुरु होते आहे..
नेहेमीचे यशस्वी जिंकणार की नवे विजेते येणार, फायनल रविवारीच होणार की सोमवारवर ढकलली जाणार अश्या विषयांबरोबर 'नेहमीच्या यशस्वी विषयांवर' चर्चा करण्यासाठी हा धागा..

यंदा पुरूष एकेरीत ज्योको, नदाल, मरे आणि फेडरर ह्यांना पहिली चार मानांकने तर महिला एकेरीत सेरेना विल्यम्स, ना ली, सिमोना हॅलेप, राडाव्हान्स्का ह्यांना पहिली चार मानांकने मिळाली आहेत.

उंपात्यपूर्व फेरीच्या संभाव्य लढती अश्या:
ज्योको वि बर्डीच, मरे वि फेरर, वावरिंका वि फेडरर आणि राओनिक वि नदाल.
सेरेना वि शारापोव्हा, हॅलेप वि ज्यांकोविक, अझारेंका वि राडाव्हान्स्का आणि क्विटोव्हा वि ली.

फिफा बरोबर मध्ये मध्ये विंबल्डनही बघुया..

स्पर्धेची वेबसाईट : .. http://www.wimbledon.com/index.html

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तृआ, मी दुसऱ्या सेटनंतरचा विराम म्हणतोय. Happy तो फेडररने मागितला नसून वॉरिंकाने मागितलेला होता. चुकून फेडरर म्हणालो. पण त्या वेळेत फेडररने देखील काहीतरी औषध घेतले होते म्हणे. असं बीबीसीवाले समालोचक म्हणाले.
आ.न.,
-गा.पै.

बुशा पोहोचली अंतिमेत! ज्याम गोड पोरगी आहे. पटकन कडेवर उचलून काऊचिऊचा घास भरवावासा वाटतो तिला! Happy
-गा.पै.

बुशा पोहोचली अंतिमेत! ज्याम गोड पोरगी आहे. पटकन कडेवर उचलून काऊचिऊचा घास भरवावासा वाटतो तिला! स्मित >> छ्या बिनधास्त लिहा हो. नाहीतरी इंग्लंडात बसला आहात तिथे लोक येत जात काय वाटेल ते करतात. काय उगा सोज्वळ पणा Happy
(हलके घेवा)

औषध घेतल्याचे मी तरी नाही बघितले. तो कोर्टच्या एका बाजूला उभा होता. घेतले तरी असं उघड-उघड काही उत्तेजक वगैरे घेणार नाहीत हे प्लेयर्स नक्कीच. मध्ये थोडा ब्रेक मिळाला तर स्वतःच्या आणि अपोनंटच्या गेम, गेम प्लॅनविषयी विचार करायला सवड मिळाल्याने फाइट बॅक करत असतील. खरं तर इतक्या ग्रँड स्लॅम खेळल्यानंतर अनुभवाने खेळतानाच गेम प्लॅन बदलतात हे लोकं पण तरी एक अंदाज.

सलिल्_गुमास्ते, अहो, सोज्वळपणाच दुर्मिळ झालाय इंग्लंडमध्ये! Happy खरंतर तिचा भाऊही गोंडस दिसतो. आता इंग्लंडमध्ये या विधानाचा कसा अर्थ लावला जाईल हे तुम्हाला चांगलंच ठाऊक आहे! Wink Lol
आ.न.,
-गा.पै.

तृआ, मीही बघितलं नाही. समालोचक म्हणाले की फेडररनेही ही संधी साधून कुठलंसं औषध घेतलं. अर्थात, ते उत्तेजक वगैरे असणं शक्य नाही.
आ.न.,
-गा.पै.

आमचा घोडा एकदाचा पोचला फायनलला ..

तो डिमिट्राव्ह एव्हढे वेळा पडला .. म्हणूनच चार सेट मध्ये आटपलं .. नाहीतर तो छान खेळत होता ..

फेडररचं अभिनंदन .. अगदीच अनिव्हेंन्टफुल मॅच ..

सध्यातरी फेडरचं पारडं जड वाटतंय .. ज्योको, एक बार फिर दिखा दे अपना कमाल ..

सलिल्_गुमास्ते, अहो, सोज्वळपणाच दुर्मिळ झालाय इंग्लंडमध्ये! >> ह्या वाक्याला अनुमोदन

बुचार्ड किरकोळीत हरली.. Sad पण तिचं भवितव्य उज्ज्वल आहे :). क्विटोवा चे अभिनंदन सलग दोन वर्षे ही स्पर्धा जिंकली तिने

भन्नाट खेळ. रॉजर हरला पण शेवटी शेवटी जोकोला जिंकु देतोय असे वाटले. Wink

काही म्हणा २००८ च्या राफा-फेडरर सामन्याची आठवण झाली. Happy

खरय २००८ ची आठवण झाली.
फेडररचा गेम प्लान नाही समजला, सर्व-वॉली करताना जोकरने १२-१४ पासिन्ग शॉट्स विनर्स मारले तरी शेवट पर्येन्त सर्वे करुन वॉली साठी नेट वर येतच होता. त्यातच ३ र्‍या सेटचा टायब्रेक घालवला.

वेल प्लेड जोकर !!

सिद्धार्थ,

मला वाटतं की फेडरर सेवाधाव (सर्व्हव्हॉली) आणि ठामरेखा (बेसलाईन) दोघांचे मिश्रण करू पाहत होता. सोबत सेवाही (सर्व्हिस) जोरदार पडत होती. त्याने तीसेक एक्के टाकले, तर ज्योकोने फक्त बाराच टाकले.

मात्र या प्रयत्नात फेडररच्या आगळीका (अन्फोर्स्ड एरर्स) खूप झाल्या. फटक्यांवर नियंत्रण राखणं अवघड पडंत होतं. त्यामुळे पाचव्या सटात (सेट) ऐन वेळी सेवा खंडित होऊन तो मागे पडला. ज्या तडफेने हा नवा प्रयोग केला त्याची दाद द्यायला पाहिजे. चौथ्या सटात २-५ वरून सलग ५ गेम मारून ७-५ ने जिंकणं, तेही ज्योकोविरुद्ध म्हणजे कमाल आहे.

आ.न.,
-गा.पै.

गा.पै.,
मी तेच म्हणतोय, सर्व्हव्हॉली चा गेम प्लान काम करत नसताना तोच ठेवला. जनरली सीडेड प्लेयर्स (फेडेक्स तर नेहमीच) असे प्लान्स बदलत राहतात. काल का बदलला नाही ह्याबद्द्ल मी बोलतोय.
३-४ वेळेला तर तो दुसर्‍या सर्ववरही व्हॉली करण्यास पुढे आला, जोको किन्वा कोणीही दुसर्‍या सर्विसवर हल्ला करणारच. :). ७-८ पासिन्ग विनर्स नन्तर तरी बेसलाइन वरुन खेळायला हवे होते.

>>चौथ्या सटात २-५ वरून सलग ५ गेम मारून ७-५ ने जिंकणं, तेही ज्योकोविरुद्ध म्हणजे कमाल आहे.
हे ५ गेम्स अफलातुन घेतले होते, जोकोने मग मेडिकल टायमआउट घेवुन मोमेन्टम घालवला Happy जोकोचा गेम प्लान यशस्वी ठरला.

सिद्धार्थ,

>> काल का बदलला नाही ह्याबद्द्ल मी बोलतोय.

हं! बरोबर निरीक्षण आहे तुमचं! Happy बहुधा आपली सर्व्हिस चांगली पडतेय असा वृथा विश्वास वाटंत असावा.

आ.न.,
-गा.पै.

@ सिद्धार्थ / गा पै

या लेवलला टेनिस मेंटल गेम जास्त असतो. फेडी बेसलाईन वरुन खेळत राहिला असता तर जोक्या सारख्या डिफेंसिव खेळाडु विरुद्ध लाँग रॅली करव्या लागल्या असत्या ज्यात त्याचेच जास्त नुकसान झाले असते. फेडरर नेट जवळ येण्याचे कारण एकच होते तो ऑफेंसिव टेनिस खळत होता. जोक्या सारखे खेळाडु एरर कमी करतात. फोर्सीग एरर ऑन युवर एस्ट्रीम डिफेंसिव आपोनंट हेच अशा वेळी जास्त उपयोगी असते. फेडररचा हाच प्रयत्न होता की ज्योकोविच डिफेंसिव खेळ्ण्याची संघी देण्या ऐवजी त्याला पासिंग विनर मारण्यास भाग पाडणे. यात जर त्याच्या चुका झाल्या असत्या तर मोमेंट्म फेडररच्या बाजुने वळले असते. टोटल गुण जिंकलेले पहा ज्यक्या १८६ आणि फेडरर १८०

ज्योकोविच चे अभिनंदन तो या सगळ्या प्लानला पुरुन उरला आणि मोक्याच्या वेळी कहिही गडबड केली नाही.

नेहमीच्या यशस्वी विषयांवरच्या चर्चा होता होता राहिल्या वाटतं इथे.. Happy

ज्योकोचे (आणि सशल, सुमंगलताईंचे) अभिनंदन !
बुचार्ड जिंकली असती तर अजून मजा आली असती... राफाला काय झालं काही कळेना..

Pages