विंबल्डन - २०१४

Submitted by Adm on 19 June, 2014 - 06:34

तर मंडळी..........
सालाप्रमाणे पावसाळा आला.. आणि पावसाबरोबर विंबल्डनही आलं..
यंदाची विंबल्डन स्पर्धा सोमवार २३ जून २०१४ पासून सुरु होते आहे..
नेहेमीचे यशस्वी जिंकणार की नवे विजेते येणार, फायनल रविवारीच होणार की सोमवारवर ढकलली जाणार अश्या विषयांबरोबर 'नेहमीच्या यशस्वी विषयांवर' चर्चा करण्यासाठी हा धागा..

यंदा पुरूष एकेरीत ज्योको, नदाल, मरे आणि फेडरर ह्यांना पहिली चार मानांकने तर महिला एकेरीत सेरेना विल्यम्स, ना ली, सिमोना हॅलेप, राडाव्हान्स्का ह्यांना पहिली चार मानांकने मिळाली आहेत.

उंपात्यपूर्व फेरीच्या संभाव्य लढती अश्या:
ज्योको वि बर्डीच, मरे वि फेरर, वावरिंका वि फेडरर आणि राओनिक वि नदाल.
सेरेना वि शारापोव्हा, हॅलेप वि ज्यांकोविक, अझारेंका वि राडाव्हान्स्का आणि क्विटोव्हा वि ली.

फिफा बरोबर मध्ये मध्ये विंबल्डनही बघुया..

स्पर्धेची वेबसाईट : .. http://www.wimbledon.com/index.html

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ज्जे बात! सध्या घरी केबल नाहीये त्यामुळे याचा वापर रोजच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी करणार Happy

हुर्रे.. आला रे आला.. धागा आला.. Happy

सिडिंग झाली ना जाहीर. नोवाकला प्रथम,नदालला दुसरं,मरेला तिसरं,फेडीला चौथं,वॉरविंका पाचवं
महिलांमध्ये सेरेनाला पहिलं,ली नाला दुसरं.

अरे,किती खाली गेला हा धागा? मला फार कष्ट करून वर आणायला लागलाय.. Proud
पग्या,लै ढिल्ला पड्लायस भौ तू यावेळेस. Wink

मी जाणार आहे या वर्षी विंबल्डनला येत्या शनिवार. लंडनकर कोणी तयार ? मग भेटू विंबल्डन च्या मैदानावर waiting line मधे.

मला मिळेल का center court चे ticket ? मग बघायला मिळेल का murrey vs nadal ? Azerika ला पण पाहायचे आहे, किती स्वप्ने ?

Sad Sad Sad
सशल, मी फ्रेन्च ओपन ची फायनल रेकॉर्ड करुन देखिल जोको हारला म्हणुन पाहु शकले नाही. जरा जास्तच गुंतते मी. ह्या वेळेस जिंकाया हवा.

वॉर्म अप ला वेळ लागला असेल .. फ्रेन्च ओपन आणि विम्बल्डन मधला दोनच आठवड्यांचा कालावधी पुरेसा आहे का असं काहितरी वाचत होते मध्ये ..

पुढच्या वर्षी तीन आठवड्यांचा असणार आहे म्हणे ब्रेक ..

लेडीज मध्ये नेहमीप्रमाणे भरपूर सीडेड प्लेअर्स बाहेर.. जांकोव्हीच, एरानी, स्टोसुर, स्लोन स्टीफन्स, रॉबर्टा विन्सी, कुझनेत्सोवा..

>>चांगली फाईट दिली पण त्याने १५व्या मानांकीत खेळाडूला...

१५व्या मानांकीत खेळाडू= आन्कोविच ( Janowicz) मागच्या वर्षीचा सेमी फायनलीस्ट होता.
सोमदेवची त्याच्या बरोबर ही दुसरी मॅच होती, दोन्ही ५ सेट पर्यन्त चालल्या.
५ सेट तग धरली म्हणजे very good stamina Happy
सोमदेवने बरेच एस + फोरहॅन्ड विनर्स मारले..

काल राफाची मॅच बघता आली. २ र्‍या सेट मधे राफा ने सामना फिरवला. २ ब्रेक पॉइंट डाउन असताना गेम जिंकुन त्याने मोमेंट्म स्विंग केला. सामना जिंकला तरी सुरुवात अवघड झालेली आहे.

झी वरच्या मराठी मालिका आणि विश्व चषक फुट्बॉल या कात्रीत आमच विंबलडन सापडलेल आहे.

अरे हो की .. मी आधी चुकीचं वाचलं बहुतेक .. शेवटचे दोन्हीं टाय ब्रेकर्स .. म्हणजे टफ फाईट दिली वाटतं ..

Pages