जाधवरावांनी धुतलेली कोंबडी पिळून वाळत टाकली आणि ते सज्जात दोन हातांवर उभे राहून बाहेर पाहू लागले. झाडांची मुळे हिरवीगार होती आणि डोळ्यांना दिसत होती. झाडांची झालेली वाढ मात्र अदृष्य होती. वाळत पडलेल्या कोंबडीने पकाक पक असा आवाज केला व जाधवराव तिला म्हणाले की अडीच वाजता सन्याशी येईल. ते ऐकून सोळा टिटव्या उडाल्या. नाना पाटेकर वेडा आहे नाना पाटेकर वेडा आहे असे म्हणत एक पॅसेंजर ट्रेन लांबवरून निघून गेली.
जाधवराव घरात आले. मंगलाबाई आंघोळ करून गोदीच्या लग्नात ज्येष्ठ जावयांसाठी घेतलेल्या व त्यांनी फणकार्याने नाकारलेल्या टॉवेलने आपला सुडौल देह पुसत होत्या. लिप्रिल वीस एम जी च्या दोन गोळ्या भिंतीवर टांगलेल्या घुबडाच्या नाकात टाकून जाधवरावांनी लांबूनच विचारले
"चीन युद्धादरम्यान माझ्यासाठी घेतलेल्या सपाता कुठे आहेत?"
चपापून मंगलाबाईंनी अंगभर टॉवेल पांघरला व मादक नजरेने १३९ अंशाच्या कोनातून कटाक्ष टाकत उद्गारल्या:
"इश्श्य त्या खाऊनच नाही का हैबती बैल तडफडून मेला कारगिलच्या दरम्यान?"
जाधवरावांचा भुतांवर फार विश्वास! त्यांनी घरात वावरणार्या भुतांसाठी कित्येकदा गोबी मांचूरियन पार्सल आणलेले होते. त्यांचा इमेल आय डी सुद्धा जी एम बी अन्डरस्कोअर जे अॅट द रेट मंगलाबाई हॉट कॉम असा होता. जी एम बी म्हणजे गोबी मांचुरियन भुते, जे म्हणजे जाधवराव! हॉट म्हणजे गरम आणि कॉम म्हणजे कमोडिटी!
त्यातच क्षितीजाकडून आलेल्या एका निरपराध कवडश्यावर बसून बाबू नावाचा एक नोकर तेथे प्रवेशला. त्याला पाहून मंगलाबाईंनी खडसावून विचारले.
"ताबडतोब ये म्हणून सांगितले आणि इतका उशीर?"
"प्रकाशवेगाने आलो बाईसाहेब, साडे तीन लाख किलोमीटर सेकंदाला"
"चल कटकट सुरू कर"
बाबूने दोन मेलेले उंदीर एकमेकांवर आपटायला सुरुवात केली. सर्वत्र कट कट असा आवाज भरून राहिला. त्याच जुनूनमध्ये मंगलाबाईंनी मानेवर लिपस्टिक ओढली.
जाधवराव हर्षोल्लासित होऊन शवासन करू लागले.
एक आगळाच नाद सर्वत्र भरून राहिला. पिशाच्चयोनीतील काही आत्मे पिंगा घालत शवासनातील जाधवरावांच्या छाताडावर चिकटायचा प्रयत्न करत 'भुतकाईले भुता फेविकॉलसे' असे आक्रोशू लागले. मंगलाबाईंनी मोबाईल हातात घेतला आणि आपण फक्त मोबाईलच हातात घेतला हे कळताच संतापून एक भूतही हातात घेतले.
ते हातात घेतलेले भूत कोणाशीतरी चॅट करत असल्यामुळे मंगलाबाईंनी मोड आलेले सहा कवी फोडणीला टाकून त्यांचे सूप बनवले.
शवासनामार्फत इस्रो बरखास्त करून जाधवराव बर्म्युडा ट्रँगल वाचू लागले.
ही कथा पूर्ण करण्यास कृपया हातभार लावा. कथावस्तू, वातावरण, पात्रनिर्मीती हे सगळे स्पष्ट झालेले आहेच.
धन्यवाद!
-'बेफिकीर'!
(No subject)
(No subject)
कठीण कठीण महा कठीण. ही कथा
कठीण कठीण महा कठीण. ही कथा पुर्ण करायला एखाद्या नाही तर अवकाळी मारल्या गेलेल्या एखाद्या मोठया कुटुंबाच्या सर्वच पिशाच्यांना यावे लागेल. जेव्हा त्यांच्या सर्व इच्छा या कथेच्या माध्यमातुन पुर्ण होतील तेव्हाच ही कथा पुर्ण होईल. तो पर्यत किती कवी आणि नवोदीत लेखक मोड येऊन फोडणीला पडतील सांगता येत नाही.
यानंतर अनेक पावसाळे आणि वसंत नवकविता शिवाय जातील.
बाप रे ! कठीण आहे .
बाप रे ! कठीण आहे .
कै च्य कै...असंबद्ध
कै च्य कै...असंबद्ध गप्पांच्या धाग्यावरुन प्रेरणा घेतलेले लिखाण आहे हे.
तरी लिहीण्यास हर्कत नसावी...
असंबंध आणि अतर्क..
असंबंध आणि अतर्क..
बुधवारचे २२ वाजून १०
बुधवारचे २२ वाजून १० मिनिटांनी कथा पोस्ट केलीय.

Befikir aahat mhanun kahipan
Befikir aahat mhanun kahipan lihal ka
कृपया कथा पूर्ण करा.
कृपया कथा पूर्ण करा.
तेच करतायत की.
तेच करतायत की.
हो पण तसे मला वाटायला नको का?
हो पण तसे मला वाटायला नको का?
बरोबर त्यांना तसे वाटायला हवे
बरोबर त्यांना तसे वाटायला हवे नाई का? paha
मग आम्ही ठरवू पुढे न्यायची की नाय गोष्ट... 
बाकी साडेबत्तेचाळीस मिलीग्रअॅमचा अणूबाँब या कथेतील पात्रांवर अचानक टाकला जातो आणि त्यांची घट्ट वाफ होते.ही वाफ घट्ट असल्याने वायू होते आणि बेफिकीर तिला शोधत बसतात...शोधत बसतात शोधतातचे...शोधतातचे... त्यांना ती सापडली की गोष्ट पुढे सरकेल...अन्यथा संपल्याचे जाहीर करतो.अर्थात ती वाफ आम्हाला 'वाटली पाहीजे' सापडली दिसली म्हणून...
to be contd.
shubha raatri...shabba khair...
हा हा हा
हा हा हा
बेफी, चला सकाळ सकाळी करु
बेफी, चला सकाळ सकाळी करु सुर्वात,
शवासनामार्फत इस्रो बरखास्त करून जाधवराव बर्म्युडा ट्रँगल वाचू लागले.>>>> इतक्यात माकडाच्या डोळ्यात लाल दिवा उघडझाप करु लागला, मंगलाबाईंनी हात लांब करुन मोठा स्क्रिन जवळ आणला आणि मायबोलीच्या धार्मिक विभागातील अमानविय घाग्यावर आपल्या लांब टोकदार नखाने कट कट केले. मानविय बिनविय सगळ झुट असतं असं पुटपुटत नेमकि कोणती पोस्ट नविन आलिय ते शोधु लागल्या. याच्या अगोदरच्या धाग्याने या दोन जिवांच्या आयुष्यात एक प्रकारची आलेली मरगळ झटकुन नविन नवलाइचे दिवस आणले होते. इतक्या मस्त मस्त आईडीया मिळायच्या कि बस्स.... म्हणुन्त तर खास माकडाला हे काम दिले होते कि अमानविय आला वर कि लगेच उघडझाप...
पण शेवटी शेवटी नविन काहिच समजल्यामुळे त्याला कारणीभुत असलेल्या काहि आयडींचा बळी देण्यासही त्या कचरल्या नव्हत्या. आता नविन धाग्यावर सुधा नविन काहिच न मिळालामुळे बरीच दिवस तडफड चिडचिड होत होती. गानु आज्जीही बरेच दिवसात फिरकली नव्हती. बहुतेक इराकला गेली कि क्काय असे वाटुन मंगलाबाईंनी सुटकेचा श्वास आत घेतला. नाहितरी लोचटच होती जिवती आली कि जाधवरावांच काही खर नसायचं.... जाधवराव पण नेमका हेच विचार करत असलेने घुबडाने अत्यानंदाने आरोळ्या ठोकायला सुरुवात केली. हे पाहुन वटवाघळाने पण पंख फडफडवुन घेतले. जाधवरावांचा आवडता धागा काल सकाळी अचानक काही मानविय (त्यांच्यामते) प्रकारांनी दिस्स्यचा बंद झाला होता. पिंजर्यातला सो कॉल्ड मानुस आता भयावह केकाटु लागला होता. त्याचे ते आल्हादायक केकाटणे ऐकुन मंगलाबाई एकदम रोमांचित होउन तरुनपनात पोहोचल्या. बहुतेक नविन चार पाच भजल आल्या असणार. त्यांच्या डोळ्यांच्या खोबणी खालची जागा जराशी वर सरकली जणु स्मितहास्यचते.... जाधवराव आता भुतकाळात आपले कसे होणार याचा विअचार करायला आणि मंगलाबाईंनी आपले हात्पाय झाडायला सुरवात त केली. परत अमानविय वर धुमाकुळ सुरु होणार त्याची त्यांना लागलेली पुर्वसुचनाच होती ती. जाधवराव मलेशियाच्या विमानाबद्दल विचार करत होते. मंगलाबाईंची आपल आत्मवृत्त कोणितरी लिहाव अशी सुप्त इच्छा आता जणु पुरी होणार होती. तनानं त्या आता बालपणात पोहोचल्या होत्या. शेजारचा जाधवांचा पांड्बा आता लांब लांब दिसत होता.
बास आता जरा पोटापाण्याची कामं करु
एक इंग्लिश पिक्चर किंवा
एक इंग्लिश पिक्चर किंवा सिरियल होती.. त्यात सगळेच असे आचरट भरलेले होते.. ... फॅमिली... नावच आठवत नाहीये... अगदी तशीच स्टोरी वाटतीये ही..
निपा, जबरी
मंगलाबाईंनी मोड आलेले सहा कवी
मंगलाबाईंनी मोड आलेले सहा कवी फोडणीला टाकून त्यांचे सूप बनवले.
>>>>
त्यांनी ते सुप कवटीच्या पात्रात घेउन जाधवरावांना सर्व्ह केले व टिव्ही वर गाणी पाहु लागल्या..कारण आजकान त्यांना गाण्यामध्ये चाललेला धींगाना फारच आवडायचा.तेवड्यात त्यांना कोणीतरि ओरड्ल्याचा आवाज आला त्यांनी हिमेश समजुन दुर्लक्ष केल पण थोड्याच वेळात त्यानी जाधवरावांना हातात कवटी घेऊन टीव्हीत नाचताना पाहीले पण त्यांच्या चाणाक्ष भुत बुद्धीने त्यांनी लगेच ओळखले ते टीव्हीत नाय समोर आहेत.
त्यानी आपल्या भक्कम मानेला जोरात झटका देऊन लाजुनच विचारले काय हवय त्याना वाट्ले आता हे आले मुडमध्ये रोमँटिक कवीं चि फोडणि दुसरे काय? तसे पण ते नेहमीच मुड मध्ये असायचे पण जरा वेगळे ट्राय करावे म्हणून्....
त्या लाडानेच जाधवरावांच्या जवळ गेल्या पण लगेच थांबल्या कारण जाधवराव कानाखाली जाळ काडण्याच्या मुडमध्ये होते म्हणुन गरम झाले होते ..हे त्यांच्या चाणाक्ष भुत बुद्धीने त्यांनी लगेच ओळखले होते..
गरम होण्याचे कारण जाधवरावांना सुप आवड्ले नव्हते....रांगड्या जाधवरावांना हे पुचाट सुप त्यात रोमँटिक कवीं चि फोडणि ????त्यामुळे ते गरम झाले होते...त्यांनी मंगलाबाईंना जरा चागले कवी फोडनीला वापरत जा असा सल्ला दिला.
तेव्हडयात त्यांना आटवन झाली आज सन्याशी येणार आहे जेवायला अडीच वाजता.त्यांनी मंगलाबाईंना कोबडिचा रस्सा करायला सांगितला आणी म्हणाले 'उगा शहानपना करु नगासा आणी कवी नका घालु वाटुन सन्याशी हाय तो ब्रमचारि वर.. जरा रोमँटीक घाला कायतरि...अख्खा जनम असाच घालविलाय आता वाया नाय घालवायचाय त्याला...क्ळ्ल का?'
या पेक्षा तुमच्या राहिलेल्या
या पेक्षा तुमच्या राहिलेल्या कथा पुर्ण करा आधी
माझ्या घरी सोमवारी येणार्या
माझ्या घरी सोमवारी येणार्या भुताला विचारतो. तो पुर्वी लिहायचा म्हणे.
कै च्या काही आहे हे, पण
कै च्या काही आहे हे, पण मनोरंजक
शवासनामार्फत इस्रो बरखास्त
शवासनामार्फत इस्रो बरखास्त करून जाधवराव बर्म्युडा ट्रँगल वाचू लागले.>>
वाचता वाचता त्यांचा डोळा लागला आणि ते मंगळावर उतरले. पाहतात तर काय? आज मंगळावर नाकतोड्यांचे संमेलन भरले होते आणि एका नाकतोड्याने म्हशीशी लग्न लावल्याबद्दल चर्चा चालु होती. जाधवरावांनी झाल्या प्रकाराचा कडक शब्दात निषेध केला आणि त्या नाकतोड्यास मायक्रोवेव्ह भेट देऊन तडक शनीचा रस्ता धरला. जाता जाता डाव्या पायाच्या करंगळीचे नख खाजायला लागले म्हणून त्यांनी फोन काढुन बघितला आणि त्यावर मंगलाबाईंचे बत्तेचाळीस मिस्स्ड कॉल बघून ते चुपचाप घरच्या वाटेला लागले. जाता जाता आयफेल टॉवर वरून गोबी मंचुरियन न्यायला ते विसरले नाहित. घरी बाबुची कटकट अजुनही चालु होती पण भुतांचा नाच थांबला होता. मंगलाबाई एकीकडे महाभारताची कोचकाई करण्यात मग्न होत्या आणि शीला कि जवानी सुरकुतली होती. हे सगळे बघुन जाधवरावांच्या हृदयातला प्रत्येक ऑप्टीकल फायबर धाय मोकलून हसला आणि त्यांनी आणलेले गोबी मांचुरियन तातडीत टी व्ही ला लावले. पण आज घरच्या भुतांच्या मनात काही निराळेच असावे. कारण एक एक करून सर्व भुतांनी चीनची भींत खाल्ली आणि जाधवरावांच्या मंचुरियन ला केळी दाखवली. आता मात्र जाधवरावांचा कडेलोट झाला आणि त्यांनी मंगलाबाईंचा चपलाहार घेऊन बाबुला फोडुन काढले. बिचारा बाबु गुपचुप कपाटावर जाऊन बसला. त्याला आता परत जाण्यासाठी चांदण्याची वाट पाहण्याशिवाय गत्यंतर नव्हते. जाधवरावांनी घुबडाला आत पाठवले आणि मंगलाबाईंना ढोकळे करायला सांगायचा निरोप दिला. ह्यावर मंगलाबाईंनी त्यांच्याकडे असे काही लाजून बघितले कि घरातल्या सर्व भुतांना परत नाच सुरु करावा लागला. एव्हाना संध्याकाळचे दोन वाजत आले होते आणि सकाळची पॅसेंजर ट्रेन मनमोहनसिंगांशी गप्पा मारत परत निघाली होती. झाडांच्या मुळांनी हसता हसता जाधवरावांना सलाम केला आणि सुझुकी सामुराई ला कुशीत घेऊन ती झोपी गेली. जाधवरावांचा आजचा दिवस भलताच बीझी गेला होता. ते मंगलाबाईं बरोबर झी मराठीवर संध्याकाळच्या शिळ्या मालिका ऐकता ऐकता ओट्यावर पहुडले.
>>
एवढ सगळं एका दमात सुचेल असं वाटलं नव्हतं, पण प्रयत्न केला.
बेफि, कशी वाटली कथा ते नक्कि सांगा.
मुक्तपीठच्या स्वाती ठकारचे
मुक्तपीठच्या स्वाती ठकारचे प्रतिसाद वाचतेय असं वाटलं
ही कथा कधी संपेल तरी की नाही अशी शंका आहे.
चौकट राजा, भन्नाट आर एम डी -
चौकट राजा, भन्नाट
आर एम डी -
(No subject)
बेफिकर, निपा, सीमा आणी चौकट
बेफिकर, निपा, सीमा आणी चौकट राजा भारी कथा आहे.:हाहा:
रमड भारी कमेन्ट.:फिदी:
खतरनाक .... अशी कथा तर लवकरात
खतरनाक ....
अशी कथा तर लवकरात लवकर पूर्ण व्हायला हवी .
(No subject)
मला काहिच समजले नाहि
मला काहिच समजले नाहि ............
भर दुपारच्या किच्च उन्हाच्या
भर दुपारच्या किच्च उन्हाच्या वेळी काटेरी घुबड आपल्या ढोलीत येरझाऱ्या घालीत होतं. कारणच तसं होतं. रक्ताळलेल्या चंद्राला त्यानं वचन दिलेलं की भर पौर्णिमेला सूर्यग्रहण लावून दाखवीन म्हणून! आता पैज मारली खरी, पण अंगावर जबाबदारी पडली ना! ऐन वेळेला कलटी मारायला घुबड म्हणजे माणूस थोडंच होतं. भर दुपारी जागं असलेलं शूरवीर स्थितप्रज्ञ घुबड होतं ते.
काटेरी घुबडाच्या डोक्याचा बराच मोठा भाग डोळ्यांनी व्यापलेला होता. त्याने आपले डोळे मिटून घेतले. साहजिकच त्याच्या सर्व बौद्धिक क्षमता एकाग्र झाल्या. ते मधमाशीचा मधुचंद्र या पुस्तकातील उतारे आठवू लागलं. असे निदान हजारेक उतारे उजळणी करून झाले. पण तरीही पौर्णिमेस सूर्यग्रहण लावण्यासाठी चंद्रास कुठे ढकलावं ते त्यास सुचेना. शेवटी त्याने टंबाणी नॉलेज सिटीला फोन लावायचं ठरवलं.
"घूत घूत" -काटेरी घुबड घुत्कारलं.
"हेलो टंबाणी हियर"
"मी काटेरी घुबड बोलतोय!"
"मी घाटेरी कुबड! बोला काय काम काढलंत?"
"मला एक अडचण आलीये."
"पैसे टाका अगोदर."
"अरे पण ऐकून तर घ्या आधी काय अडचण आहे ते!"
"ऐकतोय म्हणजे उपकार करतोय. बोला आता."
"मधमाशीचा मधुचंद्र या पुस्तकात पौर्णिमेस सूर्यग्रहण लावायची कृती कुठल्या पानावर आहे?"
"दोनशे!"
"हा पानाचा क्रमांक नाही. पुस्तक चारशेविसाव्या पानापासून सुरू होतं."
"हा पान क्रमांक नाहीच्चे मुळी. ही आमची फी आहे. वट्ट दोनशे दिनार!"
"मी काटेरी घुबड आहे. घुबडांकडे इतके पैसे नसतात. शिवाय हल्ली फक्त सर्बियामध्येच दिनार मिळतात. तिथेही युरो वापरायला सुरुवात झालीये."
"असं म्हणता? मग भूतकाळात जाऊन मिळवा दिनार. नाहीतरी तुम्हां भुतांच्या जगात भविष्य नसतंच."
"अहो पण मी पैज मारलीये. माझ्याकडे एव्हढे पैसे नाहीत. क्रेडीटवर द्या की सोल्युशन!"
असं म्हणून काटेरी घुबडाने सर्व कथा ऐकवली.
"पैसे नाहीत तर मारली कशाला पैज?" -घाटेरी कुबड.
"तुमच्यासारखे ज्ञानवंत असले की हा प्रश्न पडायला नको!"
हे ऐकून घाटेरी कुबड विचारात पडलं. "हां हेही खरंच! मग असं करू. रक्ताळलेल्या चंद्राशी तुम्ही जी पैज मारलीये तिच्या रकमेचा १०% हिस्सा टंबाणीस मिळला पाहिजे."
काटेरी घुबडाने ताबडतोब होकार दिला. कारण पैज बिनपैशाची होती. हा फक्त प्रतिष्ठेचा प्रश्न होता. फुकटात आपला अहं सुखावणार म्हणून काटेरी घुबड मनोमन खूष झालं. घाटेरी कुबडास हे सुतराम माहीत नव्हतं.
"हं, घ्या सोल्युशन." -घाटेरी कुबड
"सांगा बरं!"
"आगोदर १०% रकमेचं वचन द्या! वेताळाला साक्षी ठेऊन."
"दिलं."
"पिंगळा."
"अहो, मी घुबड आहे. मला पिंगळा म्हणून कशाला हाक मारताय."
"मंगलाबाईंची मुलगी पिंगला."
"असं बोला की. जाधवराव आणि मंगलाबाईंची ढोलीखालच्या घरातच राहतात. त्या लाडात आल्या की जाधवराव म्हणतात, पिंगळा का ओरडतोय. खरंतर यावर मीच ओरडायला पाहिजे. पण मी पडलो भिडस्त. पण त्या पिंगलेचं करायचं काय?"
"तिच्याकडून तुम्हाला उत्तर मिळेल."
"म्हणजे तुमच्याकडे उत्तर नाहीच?"
"असं कसं? तुम्हाला पुढचा पॉईंटर दिला की!"
"बरं!"
"एक मिनिट. तिला तुमची समस्या सांगू नका. विचारायचा प्रश्न वेगळा आहे."
"काय आहे तो?"
"ऐन मधुचंद्रात चंद्र कसा विझवायचा"
"ठीकाय. कळलं! अशुभसंध्या!"
"माझा डायरेक्ट नंबर घ्या लिहून. अशुभसंध्या!"
काटेरी घुबडाने घाटेरी कुबडाचा फोन क्रमांक टिपून घेतला. ते ज्याम खूष झालं. दिवेलागणी व्हायला आली होती. त्याने लगेच पिंगलेला गाठलं. पिंगला आरश्यासमोर मेकप करीत होती. काटेरी घुबडाला बघून तिने चोचीसकट मान वेळावली. ते पाहून काटेरी घुबड लाजलं.
"लाजू नकोस." -पिंगला
"लाजू नको तर माजू? माझा प्रश्नच तसा आहे."
"सांगा काय आहे तो."
"ऐन मधुचंद्रात चंद्र कसा विझवायचा?"
"१०७३"
"धन्यवाद."
काटेरी घुबडाने घरी ढोलीत येऊन मधमाशीचा मधुचंद्र पुस्तकाचं १०७३ क्रमांकाचं पान उघडलं. ते पाहून त्याला काही अर्थबोध झाला नाही. परत टंबाणीला फोन लावला.
"ह्यालो, घाटेरी कुबड आहे का!"
"घरी गेलंय."
"ठीक आहे. मी नंतर फोन करेन."
आता आली का पंचाईत! तेव्हढ्यात काटेरी घुबडाला आठवलं की घाटेरी कुबडाचा थेट क्रमांक आहे ते. त्याने थेट फोन लावला. घाटेरी कुबड जेवण करून झोपायच्या तयारीत होता.
"ह्यालो, मी काटेरी घुबड बोलतोय."
"बोला."
"पिंगलेने दिलेल्या उत्तराने शंकासमाधान होत नाहीये."
"शंका लघु आहे का दीर्घ?"
"ती शंका नाही हो. तिने जे उत्तर दिलं त्यातून अर्थबोध होत नाहीये."
घाटेरी कुबड विचारात पडला. थोडा वेळ कुबड खाजवून झाल्यावर विचारलं,
"पिंगला तुझ्यासारखीच दिसते का?"
"हो. जाधवराव आणि बाकीची लोकं तसं म्हणतात तरी."
"तुला नख्या किती?"
"चार."
"आणि पाय किती?"
"दोन."
"अरे तू घुबड आहेस का गाढव!"
"आता काय झालं?"
"अरे निर्बुद्धा, तुला आठ बोटं आहेत बरोबर?"
"हो."
"पिंगलेलाही तेव्हढीच आहेत किनई?"
"हो."
"तर मग तिचं उत्तर ऑक्टलमध्ये असणार ना?"
"पण ती तर जाधवरावांची मुलगी आहे ना?"
"ते माणसांच्या जगात! आपण कोण आहोत याचं भान सुटलंय तुझं! माणसांची पुस्तकं वाचून इतका शहाणपणा आला की घुबडांची नंबर सिस्टीम विसरलास?"
"चुकीबद्दल माफी असावी. तोडग्याबद्दल धन्यवाद!"
काटेरी घुबडाने १०७३ ऑक्टलचं डेसिमलमध्ये रूपांतर केलं. त्यानुसार पान क्रमांक ५७१ बघू लागलं. त्या पानावरील सूर्यग्रहण, चंद्रग्रहण इत्यादिंच्या आकृत्या पाहून विचारात गढून गेलं. मग त्यानं राहूकेतूला फोन लावला.
"मी काटेरी घुबड बोलतोय"
"आम्हाला कोणाचाही काटा काढायचा नाहीये!"
"तुमच्यासाठी एक ऑफर घेऊन आलोय."
"सांगितलं ना आम्हाला कोणाचाही काटा काढायचा नाहीये. आम्हाला भूक लागलीये."
"मी टेलिमार्केटिंगवाला नाहीये. तुमच्या भुकेची तरतूद करू पाहतोय."
"ह्यँ! तुला काय माहिती आमची भूक!"
"रक्ताळलेल्या चंद्राला खोपच्यात घेतोय पुढल्या पौर्णिमेस. तुम्ही त्याला गिळणार का?"
"अरे वा वा वा! ही तर पर्वणीच आली. आम्ही सदैव भुकेलेलेच असतो."
व्हेरी गुड! आजून एक काम आहे. रक्ताळलेल्या चंद्रासोबत मी एक पैज लावली आहे. तुम्ही त्याचा घास घेतलात की मी ती पैज जिंकणार आहे. या प्रसंगी तुमची साक्ष लागेल."
"ठीक आहे. सौदा मंजूर!"
"मंजूर!"
असं म्हणून काटेरी घुबडाने फोन ठेवला. एव्हाना रात्र झाली होती. त्याने जाधवरावांना येत्या पौर्णिमेस चंद्रग्रहण असल्याची वर्दी एसेमेसवरून दिली आणि उपस्थित राहायला बजावलं.
पौर्णिमेच्या रात्री जाधवराव, मंगलाबाई आणि पिंगला जातीने हजर होते. रक्ताळलेला चंद्र आकाशात चढू लागला. काटेरी घुबडाने त्याचं स्वागत केलं. रक्ताळलेल्या चंद्राने छद्मीपणे विचारलं,
"काय मग आज सूर्यग्रहण दिसणार का?"
"जरा वेळ थांबा" काटेरी घुबडाने घड्याळाकडे एक कटाक्ष टाकला.
"थांबू आणि काय करू? सूर्यग्रहण दाखवणार का ते सांगा!"
तेव्हढ्यात काटेरी घुबडाने राहूकेतूंना मेसेज टाकला आणि त्यांनी अधाशाप्रमाणे रक्ताळलेल्या चंद्रावर झडप घातली. राहू त्याला गिळू लागला. गिळणे पूर्ण होताच काटेरी घुबडाने रक्ताळलेल्या चंद्राला मानभावीपणाने म्हंटलं,
"मी पैज जिंकलो. कबूल कर!"
"सूर्यग्रहण कुठाय? हे तर चंद्रग्रहण आहे."
"हाहाहा! वाटलंच मला. तूही स्वत:सारखा ल्युनॅटिक निघालास!!"
"म्हणजे?"
"म्हंजे काय म्हंजे, वाघाचे पंजे. कुत्र्याचे कान अन उंटाची मान!"
"असं कोड्यात नको बोलूस!"
"आज पौर्णिमा आहे बरोबर?"
"हो."
"आणि हे चंद्रग्रहण आहे, बरोबर?"
"यात काय नवीन"
"अरे ल्युनॅटिका, जेव्हा पृथ्वीवर चंद्रग्रहण चालू असतं तेव्हा चंद्रावर सूर्यग्रहण होत असतं किनई? मधमाशीचा मधुचंद्र या पुस्तकात पान क्रमांक ५७१ वरच्या आकृत्या पहा. सगळे संदर्भ सापडतील."
असे म्हणताना काटेरी घुबडाने पिंगलेकडे एक तिरपा कटाक्ष टाकला. पिंगला त्याच्या बुद्धिमत्तेवर भाळून जमिनीस मढ्यासारखी खिळून राहिली होती.
काटेरी घुबडाने पैज जिंकल्याचं रक्ताळलेल्या चंद्राने मोठ्या कष्टाने कबूल केलं. जाधवराव, मंगलाबाई, पिंगला, राहूकेतू साक्षीदार होतेच. त्यासरशी केतूने रक्ताळलेल्या चंद्राला बाहेर ओकायला सुरुवात केली.
आणि चंद्रग्रहण सुटू लागलं. जाधवरावांनी आणि मंगलाबाईंनी कौतुकाने उलट्या हाताने टाळ्या पिटल्या. पिंगला आजूनही चाकितावस्थेत होती. काटेरी घुबडाच्या बुद्धिमत्तेऐवजी त्याच्यावरच भाळू लागली होती. इतक्यात....
.... इतक्यात घाटेरी कुबडाचा फोन आला.
"दोनशे दिनार टाका माझे!"
क्रमश:
-गा.पै.
अरारा! हरलेच मी हे सगळं वाचून
अरारा! हरलेच मी हे सगळं वाचून
Pages